12 सप्टेंबर दिनविशेष


*12 सप्टेंबर दिनविशेष 2022 !*
      🧩 *सोमवार* 🧩
     
   
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *2011 - हल्ल्याच्या दहाव्या वर्धापण दिनानिमित्त एक समर्पण समारंभ पार पडल्यानंतर न्यूयाॅर्क शहरातील स्मारक संग्रहालय सर्वासाठी सुरु करण्यात आले*         
👉 *1966 - भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांनी डार्डानेल्स खाडी पार केली*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

👉 *1966 - भारतीय-अमेरिकन संगणक वैज्ञानिक व हार्वर्ड जाॅन ए पाॅलसन स्कूल ऑफ इंजिनीअरिंग ॲड एप्लाइड सायन्सेसमध्ये गाॅर्डन मॅकके काॅम्पुटर सायन्सचे प्राध्यापक मधु सुदन  यांचा जन्म*
👉 *1930 - पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय मल्ल्याळ भाषीक कवी,साहित्यीक समीक्षक तसच प्राचीन भारतीय सौदर्यशास्ञ आणि साहित्य परंपरा क्षेञाचे अभ्यासक डाॅ के.अप्पा पाणिकर यांचा जन्म*

🌍 *मृत्यू*

👉 *1996 - भारतीय चिञपट, दुरदर्शन व रंगमंच अभिनेञी पदमा चव्हाण  यांचे निधन*
👉 *1992 - पद्मविभूषण पुरस्कार व संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय जयपूर येथील अनोली घराण्यातील शास्ञीय गायक मल्लिकार्जुन बी.मंसुर  यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आजच्या बातम्या*

१.मुंबईत शिवसेना आणि शिंदे गटात राडा, हाणामारीनंतर दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप, भाजपचीही शिवसेनेवर टीका  राड्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या भेटीला, ठाकरेंकडून शिवसैनिकांचं कौतुक 

२.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलो म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न; आमदार सदा सरवणकरांचा आरोप तर, तुम्हाला जुनी शिवसेना दाखवून देऊ; शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा इशारा 

३.   दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात, महागाईचा परिणाम कृषी आणि उद्योगांवर, रोजगारही कमी झाले, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा 

४.  विठ्ठल मंदिर सरकारमुक्त करण्यासाठी लढा सुरु होणार, डॉ. सुब्रमण्यम स्वामी 7 ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार याचिका 

५.अमरावतीत शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत दोन गटात तुफान राडा; पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्येही बाचाबाची, आमदार देवेंद्र भुयार यांनाही धक्काबुक्की 

६.औरंगाबादमध्ये शिक्षकांचा महामोर्चा, भाजप आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात शिक्षक आक्रमक, भत्ते बंद करण्याच्या बंब यांच्या मागणीचा विरोध 

७. खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अखेर अदखलपात्र गुन्हा दाखल, चार दिवसांपूर्वी अमरावतीच्या राजापूर पोलीस ठाण्यात राडा घालणं भोवलं 

८. पुढचे पाच दिवस कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, तर मराठवाड्यातही पावसाचा अंदाज  राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडले, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान 

९.जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचं निधन, मध्य प्रदेशच्या नरसिंहपूर जिल्ह्यात घेतला अखेरचा श्वास 

*स्पेशल*

१.सोलापूरचं इंदिरा गांधी स्टेडियम रणजी सामन्यांसाठी तयार! क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी 

२.औरंगाबादच्या देवगिरी नाल्याच्या पुरात तीन जण अडकले, दोन महिलांना वाचवण्यात यश, एका मुलीचा शोध सुरु 

३.झेडपी शिक्षकाकडून ऊसतोड मजुरांच्या लेकरांना भाकरी करण्याचे ट्रेनिंग! शाळकरी मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी शोधला 'रामबाण' उपाय 

४.आजपासून 'माऊंट मेरी' जत्रेला सुरुवात, 'मोत माऊली'च्या दर्शनाला लाखो भाविक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═➖➖➖➖═━┅

*👉रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला?*
*🥇पार्किन्स*

*👉भारताचे अंटार्क्टिकावर कोणते संशोधन केंद आहे ?*
*🥇मैत्री*

*👉मूलद्रव्याचा अणु हा विदयुत दृष्टया कसा असतो ?*
*🥇उदासीन*             
               
*👉भारतात पहिला ई - पासपोर्ट कोणाला दिला गेला ?*
*🥇प्रतिभा पाटील*     
                                           
*👉ताश्कंद करार घडविण्यासाठी कोणी मध्यस्थी केली ?*
*🥇कोसिजिन*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
*🤝एकीचे बळ मोठे असते🤝*
                                                       
*एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्डय़ात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिल्याचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वाना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणार्‍या एका मोठय़ा खड्डय़ात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले.*

*🧠तात्पर्य : एकीचे बळ मोठे असते.*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद व्हि वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज  कान्द्री-माईन*
*9860214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा