14 सप्टेंबर दिनविशेष


*14 सप्टेंबर दिनविशेष 2022 !*
    
          🧩 *बुधवार* 🧩

💥 *हिंदी भाषा दिन*
   
     
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *2017 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिजो आवै यांनी आज संयुक्तपणे भारताच्या पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रक्लपाची पायाभरणी केली*         
👉 *2000 - मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोज मिलेनियम एडीशन किंवा विंडोज एम.ई. ग्राफिकल ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

👉 *1914 - हिंदी चिञपट सृष्टीतील चिञपट निर्माता आणि दिग्दर्शक जी.पी.सिप्पी यांचा जन्म*
👉 *1948 - भारतीय ग्वाल्हेर व जयपूर येथील किराणा घराण्यातील हिन्दूस्तानी शास्ञज्ञ संगीतातील गायक व संगीतकार वीणा सहस्ञबुध्दे यांचा जन्म*

🌍 *मृत्यू*

👉 *1989 - पद्मश्री पुरस्कार व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक इंडीयन कौन्सिल ऑफ ॲग्रीकलचरत रिसर्च (ICAR) चे पहिले संछालक बेन्जामिन पिअरी पाल  यांचे निधन*
👉 *2011 - ध्यानचंद पुरस्कार सन्मानित भारतीय कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्र्चंद्र माधवराव बिराजदार यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═➖➖➖➖➖═━┅

*👉भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो ?*
*🥇अरुणाचल प्रदेश.* 

*👉भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती ?*
*🥇बोधगया*

*👉भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे ?*
*🥇कन्याकुमारी*

*👉पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे ?*
*🥇गुरुमुखी*

*👉आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती ?*
*🥇स्वामी दयानंद सरस्वती*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
*🐯ढोंगी साधू*

*एका जंगलात एक वाघ राहत होता. तो आता म्हातारा झाला होता. त्याच्यातली ताकत संपली होती. त्याने विचार केला,” मी आता काही शिकार करू शकणार नाही. माझे पोट भरण्यासाठी मला आता काही तरी युक्ती केली पाहिजे.”*

*वाघाने खूप विचार केला. त्याला एक झकास कल्पना सुचली. त्याने जाहीर केले,” मी आता खूप म्हातारा झालो आहे. आता उरलेले आयुष्य मी धार्मिकपणे जगणार आहे. मी यापुढे फक्त गवत आणि फळे खाईन. सतत देवाचा जप करीन. जंगलातल्या पशुपक्ष्यानी आता मला अजिबात घाबरायचे नाही.”*

*वाघाच्या शब्दांवर काही भोळ्याभाबड्या प्राण्यांचा विश्वास बसला. ते म्हणाले,” किती महान संत आहे हा!आपण त्याला भेटला पाहिजे. त्याचा दर्शन घेतला पाहिजे.”*

*मग दररोज काही प्राणी वाघाला भेटायला त्याच्या गुहेत जाऊ लागले. वाघ त्या भोळ्याभाबड्या प्राण्यांवर झडप घालत असे.  त्यांना मारून खात असे. अश्या प्रकारे तो म्हातारा वाघ आपले पोट भरू लागला.*

*एके दिवस कोल्ह्याला या साधुमहाराज वाघांबद्दल कळले.  तो मनात म्हणाला,”वाघ कसा काय गवत आणि फळे खाऊ शकेल? माझा यावर विश्वास नाही. मी स्वतःच जाईन. खरे काय त्याचा शोध घेईन. ”*

*दुसऱ्याच दिवशी कोल्हा वाघाच्या गुहेकडे निघाला. गुहेच्या दरवाजापाशी तो थांबला. त्याने पहिले कि, गुहेत गेलेल्या प्राण्याच्या पावलाचे ठसे जमिनीवर उमटले होते.  कोल्ह्याने त्या ठशांचे बारकाईने निरीक्षण केले. त्याला फक्त गुहेत जाणाऱ्या पावलांचे ठसे दिसले. पण गुहेतून बाहेर येणाऱ्या प्राण्यांचे ठसे आढळले नाहीत. तो म्हणाला,”या ढोंगी साधुमहाराजाला जिवंत ठेवण्यासाठी मी नाही माझा जीव देणार!” आणि कोल्हा बाहेरूनच परत फिरला.*

*🧠तात्पर्य :- साधूचे सोंग घेतलेल्या ढोंगी माणसांवर विश्वास ठेवू नये.*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         *🌐 आजच्या बातम्या 🌐*

*📢महाराष्ट्रात येणारा उद्योग गुजरातमध्ये कसा? आदित्य ठाकरेंच्या ट्वीटने चर्चांना उधाण* 
*📢पुण्यात मांजरी, वानवडीनंतर कोंढव्यात बनावट पनीर कारखान्यावर छापा; 22 लाखांचा पनीर साठा जप्त, 15 दिवसात FDAची तिसरी मोठी कारवाई* 
*📢शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश.. येत्या दोन महिन्यात नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्याच्या सूचना* 
*📢मंत्रिमंडळ बैठकीत अब्दुल सत्तारांना ताकीद, सदा सरवणकरांमुळे अडचण; शिंदे गटातील मंत्र्यांच्या कारभारावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चा* 
*📢अतिवृष्टीच्या मदतीतून बीड जिल्ह्याला वगळले, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात* 
*📢लेकीला न्याय देण्यासाठी 42 दिवस मृतदेह मिठाच्या खड्ड्यात ठेवला, नंदुरबारमध्ये अंत्यसंस्कार न करता बापाचा लढा*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
.*मिलिंद व्ही वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज  कान्द्री-माईन* 
*9860214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा