15 सप्टेंबर दिनविशेष


*15 सप्टेंबर दिनविशेष 2022 !*
    
          🧩 *गुरुवार* 🧩


💥 *डाॅ.विश्र्वेश्र्वराया जयंती*
💥 *अभियंता दिन*
         
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *2016 - वेगवान उष्णकटीबंधीय चक्रिवादळ मेरान्तीच्या तडाख्याने फिलीपीन्स, तायवान आणि चिन मचे जवळजवळ 30 लोकांचा मृत्यू*         
👉 *2013 - तिना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*

👉 *1935 - दगडू मारोती तथा दया पवार- सुप्रसिद्ध मराठी साहित्यीक*
👉 *1921 - कृष्णचंद्र मोरेश्र्वर ऊर्फ दाजी भाटवडेकर- रंगभूमी अभिनेते यांचा जन्म*
👉 *1909 - रत्नाप्पा कुंभार  - स्वातंत्र्यसैनिक, सहकार चळवळीतील अग्रणी नेते,खासदार, आमदार, भारतीय राज्यघटनेचे सदस्य  यांचा जन्म*

🌍 *मृत्यू*

👉 *2008 - गंगाधर गाडगीळ- साहित्यीक, समीक्षक व अर्थतज्ञ, 56 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष  यांचे निधन*
👉 *2012 - के.एस.सुदर्शन प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 5 वे सरसंघचालक  यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आजच्या बातम्या*

१.Semiconductor Gujarat: सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये; महाराष्ट्राचं किती नुकसान?  सेमीकंडक्टरच्या प्रकल्पासाठी वेदांता-फॉक्सकॉनच्या अहवालाची पसंती महाराष्ट्र की गुजरात? गुजरात ला पसंती 

२.वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प: PM मोदी आणि CM शिंदे यांच्यात रात्री चर्चा  वेदांता-फॉक्सकॉनवरुन 'ब्लेम गेम'! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...तर वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात असता; उदय सामंत यांचा दावा  

३.रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, आदित्य ठाकरेंचा आरोप  महाराष्ट्राचं आणि मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु : सुप्रिया सुळे   

४.दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा 'प्लॅन B'? शिवतीर्थ न मिळाल्यास 'या' जागेचा पर्याय   तुम्ही तयारीला लागा, यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश  

५.राज्यात जोरदार पावसाचा अंदाज, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट   पंचगंगा नदी मोसमात तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग     

६.मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून 4 साधूंना बेदम मारहाण, सांगलीतील जत तालुक्यातील घटना  सांगलीत साधूंना मारहाण करणाऱ्यांना अटक 

७.Ahmednagar News : दोन महिन्याच्या आत नवऱ्यानं बायकोकडं नांदायला जावं, अहमदनगरच्या न्यायालयाचा आदेश.

८.काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु असतानाच गोव्यात काँग्रेस छोडो, दिगंबर कामत, मायकल लोबोंसह 8 काँग्रेस आमदार भाजपमध्ये दाखल    

९.'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा जीव वाचवता आला असता', संसदीय समितीचे केंद्र सरकावर ताशेरे  

१०. केंद्र सरकारचं सर्वसामान्यांना 'दिवाळी गिफ्ट'? एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता   सणासुदीच्या तोंडावर खुशखबर? खाद्यतेल स्वस्त होणार? 

*स्पेशल*

१. यंदा पुण्यात रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार; मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानला स्पर्धेचा मान 

2.. मुख्यमंत्र्यांना गावात आणण्यासाठी त्यानं केलं असं काही, स्वतः एकनाथ शिंदेंही नकार देऊ शकले नाही 

3. जेवणाच्या थाळीलाही राजकीय टच, 40 गद्दार थाळी आणि 50 खोके एकदम ओके थाळीने लक्ष वेधलं 

4. Viral Video : लग्नपत्रिकेतून अंमली पदार्थांच्या तस्करी, महिला अटकेत,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═➖➖➖➖═━┅

*👉सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे?* 
*🥇गंगटोक*

*👉पांढरे हत्ती कोणत्या देशात आढळतात?* 
*🥇थायलंड*

*👉पश्चिम बंगालमधील कोणते अभयारण्य वाघांसाठी राखीव आहे* 
*🥇सुंदरबन*

*👉देवाच्या नावाने राखले जाणारे वन कोणते?* 
*🥇देवराई*

*👉 इंग्रजी भाषा कोणत्या देशाची राष्ट्रभाषा आहे?* 
*🥇नागालँड*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
*🗣️👥तीन धूर्त आणि मूर्ख रामू👤*

*एका छोट्या गावात एक रामू नावाचा व्यक्ती राहत होता. लोंकाच्या घरी कामे करून तो स्वत:चे पोट भरीत होता. त्याच्या कामावर खुश होवून एका श्रीमंत व्यापाऱ्याने त्याला एक शेळी भेट दिली.*

*ती शेळी खांद्यावर उचलून घेऊन तो आनंदाने घरी निघाला. रामू घरी निघाला तेव्हा रस्त्यात तीन धूर्त चोर उभे होते. त्यांनी रामूला फसवायचे ठरवले. आपणच शेळी पळवायची असा त्यांनी विचार केला. रामूला लांबूनच येताना बघितल्यावर ते तिघेही पांगले. रस्त्यावर ठराविक अंतरावर लपून बसले.*

*रस्त्यात एका निर्जन स्थळी पहिला चोर एकदम रामूसमोर येउन उभा राहिला. तो म्हणाला, ' अहो तुम्ही कुत्र्याला कशाला खांद्यावर घेतले आहे? रामुने एकदा शेळी कडे पहिले प्रश्न विचारणाऱ्या माणसाकडे दुर्लक्ष केले आणि तो चालतच राहिला. थोड्या वेळाने दुसरा चोर रामूसमोर आला. त्याने विचारले, 'अहो तुम्ही गाढवाला का खांद्यावर घेतले आहे? अशीच गोष्ट तिसऱ्या चोराची. आता मात्र रामू घाबरला त्याने मनाशी विचार केला अरे शेळी आहे कि भूत ? सारखाच आकार बदलत आहे.*

*थोडे पुढे जाऊन रामुने शेळी रस्त्याच्या कडेला सोडून दिली आणि तो पळून गेला. तीन चोर एकत्र आले त्यांनी शेळी पकडली. तिला घरी घेऊन गेले.*

*🧠तात्पर्य - ऐकावे जनाचे करावे मनाचे.*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद व्हि वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज  कान्द्री-माईन*
*9860214288* 
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿
⚜️🏢🤝🇮🇳👨🏻🇮🇳🤝🏢⚜️ 

      *रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार*
      (स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी)

    *जन्म : १५ सप्टेंबर १९०९*
(निमशिरगाव, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र)
    *मृत्यू : २३ डिसेंबर १९९८*
                 (इचलकरंजी)

राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,                                                                          इतर राजकीय पक्ष : संस्थान प्रजा परिषद
पत्नी : पार्वती
अपत्ये : ३ मुली
निवास : इचलकरंजी
धर्म : हिंदू धर्म , (लिंगायत)
                 डाॅ. रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असलेले इचलकरंजीतील स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यानंतर डेक्कन स्टेटमधील २१ संस्थाने त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीमुळेच भारतीय संघराज्यात विलीन झाली. ते भारताच्या घटना मसूदा समितीचे सदस्य व घटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. ते पहिल्या लोकसभेचे खासदार, तसेच महाराष्ट्र विधानसभेत ६ वेळा निवडून गेलेले आमदार व महाराष्ट्र सरकारमधील गृहमंत्री,अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. ते देशभक्त रत्नाप्पा कुंभार नावाने परिचित होते.
१९८५ साली त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८५ साली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी.लिट् पदवी दिली.

💁‍♂ *प्रारंभी जीवन*
                   रत्नाप्पांचा जन्म १५ सप्टेंबर १९०९ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव या खेडेगावात कुंभार काम करणाऱ्या शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील भरमाप्पा व आई गंगूबाई होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातच झाले. माध्यमिक शिक्षण हातकणंगले या तालुक्याच्या गावी झाल्यावर १९२८ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयात गेले. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थांच्यासाठी स्थापन केलेल्या वीरशैव वसतीगृहात राहून त्यांनी १९३३ साली बी.ए. ची पदवी संपादन केली. कायद्याच्या अभ्यासासाठी त्यांनी एल्.एल्.बी च्या पहिल्या वर्गात प्रवेशही घेतला. मुलगा चांगले शिकत असलेले पाहून त्या काळच्या चालीरीतीप्रमाणे वडिलांनी रत्नाप्पांचे लग्न ठरविले व मिरज तालुक्यातील गुंडेवाडी गावातील पार्वतीबाई यांच्याशी १९३४ साली रत्नाप्पांचा विवाह झाला.

🎯 *भारतीय स्वातंत्र्य चळवळ*
     त्या काळात जोमात असलेल्या मिठाच्या सत्याग्रहामुळे भारतातील राजकीय वातावरण तापले होते. रत्नाप्पा एल्.एल्.बी च्या पहिल्या वर्गात असताना १९३४ साली, कोल्हापुरात माधवराव बागल हे शेती व शेतीमालाचे ब्रिटिशांकडुन होणारे शोषण व लूट या विषयांवर सभांमधून बोलत असत. रयतेच्या सत्यस्थितीचे बागल करीत असलेल्या विश्लेषणाने रत्नाप्पा त्यांच्याकडे आकर्षित झाले व कायद्याचा अभ्यासक्रम अर्धवट सोडून ते बागलांचे सहकारी बनले. २५ डिसेंबर १९३८ रोजी कोल्हापुरात शेत-सारा कमी करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूरच्या संस्थाना विरुद्ध मोर्चा निघाला. त्याकाळी अस्तित्वात असलेल्या स्थानिक संस्थानांचे राज्यांत विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनांमध्ये रत्नाप्पा आघाडीवर होते. ६ जून १९३९ रोजी जयसिंगपूर गावातील श्रीराम ऑईल मिल मध्ये प्रजा परिषद स्थापनेसाठी बैठक बोलावण्यात आली. माधवराव बागल, रत्नाप्पा, दिनाकर देसाईंसह अंदाजे दोन हजार लोक उपस्थित होते. बैठकीचे फलस्वरूप संस्थान प्रजा परिषद या नावाचा राजकीय पक्ष स्थापन झाला व ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. हा पक्ष ऑल इंडिया स्टेट पीपल्स कॉग्रेसशी संलग्न होता. ८ जुलै १९३९ रोजी त्यांना अटक झाली व दंडाची आणि कैदेची शिक्षा ठोठावली गेली. कुंभार, बागल, देसाई व इतरांना कोल्हापूरच्या तुरुंगात कैदेत ठेवून शिवाय त्यांना दंड ही करण्यात आला. काही दिवसांनी सुटल्यावर रत्नाप्पा लगेच कॉग्रेसच्या अधिवेशनात सामील होण्याकरता मुंबईला गेले. याच अधिवेशनात चले जाव चा नारा दिला गेला. ब्रिटिश सरकारने कॉग्रेसच्या नेत्यांची धरपकड सुरू केली. रत्नाप्पा रातोरात भूमिगत झाले व त्यांनी इंग्रज सरकारविरोधात लढाई सुरू ठेवली.
सुरूवातीला भूमिगत झाल्यावर त्यांनी त्यांची कचेरी मिरजे जवळ्च्या मालगाव जवळ असलेल्या दंडोबाच्या डोंगरावर असलेल्या बाबंण्णा धुळी यांच्या मळ्यात केली होती. तेथे त्यांना मदत करण्यासाठी कॉग्रेड एस. पी. पाटील सामील झाले. भूमिगत झालेले कार्यकर्ते गावतील चावड्या जाळणे, रेल्वे स्टेशन्स जाळणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, दारूचे गुत्ते जाळणे आदी घातपाती कारवाया करत, रत्नाप्पांनी या भूमिगत कार्यकर्त्यांमधे एकसूत्रीपणा आणला. या भूमिगत चळवळीची सर्व आखणी आणि कर्यक्रम रत्नाप्पा या दंडोबाच्या डोंगरावरच्या कचेरीत ठरवत असत. त्या नंतर रत्नाप्पांच्या मार्गदर्शनाखाली अनेक घातपाती कार्यवाया झाल्या. पुढे या चळवळीच्या कामासाठी पैशाची चणचण जाणवू लागली. मिरजेजवळील मालगावात काही मोजक्या क्रांतिकारकांची रत्नाप्पांच्या अध्यक्षतेखाली २० डिसेंबर १९४३ च्या सुमारास ३ दिवासांची गुप्त बैठक झाली व यात बार्शी रेल्वेतून जाणारे इंग्रजांचे टपाल लुटण्याचा बेत त्यांनी आखला गेला. चनगोंडा पाटील, काका देसाई, कुंडल देसाई, आय.ए. पाटील, व्यंकटेश देशपांडे, हरिबा बेनाडे, दत्तोबा ताबंट, ईश्वरा गोधडे, शंकरराव माने या क्रांतिकारी युवकांनी रत्नाप्पांच्या नेतृत्वाखाली २९ डिसेंबर १९४३ रोजी बार्शी येथे टपालाच्या डब्यावर हल्ला केला. ड्रायव्हर, फायरमन व गार्ड यांना पकडून त्यांना दोन ते तीन मैल लांब सोडून देण्यात आले. टपालाच्या पिशव्या व थैल्या ताब्यात घेऊन सर्वजण पसार झाले. या लुटीत अनेक मौल्यवान वस्तुंबरोबरच एका शाळेच्या हिंदी परीक्षेच्या सर्टिफिकेट्सचा पुडका होता. तो पुडका कार्यकर्त्यांनी पोष्टाने त्या शाळेला परत पाठवला.
                                  पुढे काही मोजक्या साथीदारांना सोबत घेऊन रत्नाप्पांनी जेजुरी येथील खंडोबाच्या मंदिरातील जामदारखाना लुटण्याचा बेत आखला. २७ जुलै १९४४ रोजीच्या रात्री शंकरराव माने, डॉ.माधवराव कुलकर्णी, दत्तोबा तांबट, शाम पटवर्धन, य. म. कुलकर्णी, शि. पी. पाटील, इब्राहीम नदाफ निवडक सहकारी क्रांतिकारी युवकांच्या साथीने रत्नाप्पांनी जेजुरी देवस्थानावर दरोडा घातला. तेथील सेवेकरी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर हल्ल्ला करून त्यांना मारहाण केली व पुजाऱ्याकडून मंदिरातील जामदारखान्यातील तिजोरीच्या किल्ल्या घेऊन खजिना उघडला. तिजोरीत इंदूरचे होळकर , ग्वाल्हेरचे शिंदे आणि पुण्याचे पेशवे व इतर धनिकांनी खंडोबाला दिलेल्या सोन्याच्या, रत्नांच्या कुड्या, माणिकाचे खडे, पानड्या, लाकड्या, कंठी, मोत्याचे तुरे, कंबरेचे छल्ले, शिरपेच, देवाचे मुखवटे, जडजवाहीर, सोन्याच्या मूर्ती असे कोट्यवधी रुपये किमतीचे दागिने होते ते घेऊन हे सर्वजण पळून गेले. पोलिसांनी या दरोड्याचा तपास लावला व रत्नाप्पा कुंभार सोडून बाकीच्या सर्व आरोपींना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले. १९४५ सालच्या जानेवारीत पुणे कोर्टात १३ आरोपींवर खटला भरण्यात आला. ब्रिटिश सरकारने रत्नाप्पांबद्दल माहिती देणाऱ्या अथवा त्यांना अटक करण्यात मदत करणाऱ्यांसाठी २०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले तरीसुद्धा ते काही सापडले नाहीत. पुढील ६ वर्षे ते अज्ञातवासातच होते. त्यांनी सहकारी क्रांतिकारकांच्या सोबतीने लुटलेल्या पैशाचा वापर भूमिगत चळवळीच्या कामासाठी अत्यंत योग्य रितीने केला.
            १९४७ साली त्यांचे वडील भरमाप्पा यांचे निधन झाले, ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्या घरावर त्यांना पकडण्यासाठी पहारा ठेवला होता पर्ंतु रत्नाप्पांनी वेशांतर करून वडिलांचे अंत्यदर्शन घेतले व ते त्याही वेळेस ही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर एके दिवशी अचानक ते कोल्हापुरात अवतरले.

🔮 *संस्थाने विलिनीकरणाची चळवळ*
              १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांनी भारत देशातील ५६५ संस्थानातील राजेशाही अबाधित ठेवून भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती. यामुळे सर्वंकष स्वातंत्र्य प्राप्तीचे स्वप्न अपुरे रहाण्याचा धोका निर्माण झाला होता. सरदार वल्लभभाईंसोबत रत्नाप्पा ही या चळवळीत सामील झाले. रत्नाप्पा कुंभारांनी स्थानिक संस्थानांना आपाआपली संस्थाने खालसा करण्याचे आवाहन केले. कोल्हापूर अक्कलकोट, सावंतवाडी, जंजिरा, मुधोळ व जतसह अनेक संस्थानांनी विलीनीकरणास नकार दिला होता.

🔹 *अक्कलकोट संस्थान*
          प्रजा परिषदेने अक्कलकोट संस्थानाचे विजयसिंगराव राजे सरकारांना भारतात सामील होण्यासाठीच्या अनेक वेळा विनंत्या केल्या होत्या. पर्ंतु संस्थानिक त्यास अनुकूल नव्हते. शेवटी रत्नाप्पांनी आरपारच्या लढाईला हात घातला व आपला विश्वासू सहकारी गोपाळ बकरे यांना सत्याग्रहाच्या तयारीसाठी अक्कलकोटला पुढे धाडले. २५ डिसेंबर १९४७ रोजी रत्नाप्पांनी राज्य प्रजा परिषदेची बैठक बोलावून त्यात अक्कलकोटच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह करण्याचा ठराव मंजूर करून घेतला. दुसरे दिवशी सत्याग्रहाचा आराखडा तयार करून त्यांनी कामे वाटून दिली. १ जानेवारी १९४८ रोजी अक्कलकोटला सत्याग्रह सुरू करत असल्याची माहिती देण्यासाठी मुंबई व दिल्लीला तारा करून कळवले. १ जानेवारीच्या पहाटे अंदाजे १ हजार लोकांची प्रभात फेरी सुरू झाली व दुपारी १२ वाजता लक्ष्मी मार्केटवर तिरंगा ध्वज लावण्यात आला. त्याच दिवशी रात्री रत्नाप्पांचे भाषण झाले. २ जानेवारीला सत्याग्रहींनी शेंगदाण्याच्या निर्यातीस अक्कलकोट संस्थानाने घातलेली बंदी मोडली व लहान लहान पिशव्यातून शेंगदाणे सोलापूरला निर्यात केले. ३ जानेवारीला आंदोलन चिघळले व अशांतता, मारहाण व जाळपोळ सुरू झाली. सत्याग्रहींनी मामलेदार कचेरीवर तिरंगा फडकवला व राजवाड्यावर दगडफेक केली. संस्थानच्या समर्थकांनी पण रत्नाप्पा कुंभार ज्या ठिकाणी मुक्कामास होते ती कचेरी जाळली व त्यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी दुपारी संचारबंदी जाहीर झाली. अक्कलकोट संस्थानाचे विजयसिंगराव राजे सरकारांनी सोलापूरच्या जिल्हा आधिकाऱ्यांकडे संरक्षण मागितले. भारतात विलिन होण्याच्या शर्तेवर संरक्षण देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले. वाटाघाटी झाल्या व ५ जानेवारीला संस्थानिकांनी भारतात खालसा होण्यास थोडी अनुकुलता दाखवली. ८ जानेवारीला सोलापूरच्या लोखंड गल्लीत रत्नाप्पांसह त्यांचे सहकारी गोपाळ बकरे, वकील भाऊसाहेब बिरजे, शांबदे, रहीम अत्तारांसह इतर सत्याग्रहींचा सत्कार झाला. १६ जानेवारीला रत्नाप्पांनी सरदार वल्लभभाई पटेलांना लिहिलेल्या पत्रात अक्कलकोट मधील परिस्थितीचा आढावा कळवला व कायदा व सुव्यवस्था चांगली नसल्याचे सांगून भारतीय यंत्रणेने ताबडतोब हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. या सत्याग्रहचा परिणाम अक्कलकोट संस्थान ८ मार्च १९४८ साली भारताच्या मुंबई प्रांतात सामील झाले व अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका बनले.

🔶 *सावंतवाडी संस्थान*
                महात्मा गांधींची ३० जानेवारी १९४८ ला हत्या झाली. देशभरात निषेधाची लाट पसरली होती. कोल्हापूर सह काही संस्थानांत जातीय हिंसाचार वाढला होता त्यातच सावंतवाडीला १४ फेब्रूवारी १९४८ रोजी रत्नाप्पांच्या अध्यक्षतेखाली प्रजापरिषदेचे तिसरे आधिवेशनस सुरवात झाली. सावंतवाडीत त्या आधी प्रजा परिषदेने विलिनिकरणासाठी अनेक अंदोलने केली होती. रत्नाप्पांनी आपल्या भाषणात विलिनीकरणाच्या प्रश्नावर जोर देत लठा आधीक तीव्र करण्याचे संकेत दिले व अधिक विलंब न लावता, भारतात विलीन होण्यास सावंतवाडी संस्थानाच्या राजेसाहेबांना विनंती करण्याचा व तसे न झाल्यास प्रतिसरकार स्थापन करण्या संमंधिचा ठराव करून मंजुर केला. २१ जानेवारी पर्यत वाट पाहुन २२ तारखेला जाहीर पत्रके वाटुन अंदोलन करण्यात आले. २३ जानेवारीला संस्थानाच्या सर्व आधिकाऱ्यांना कुडाळला कैदेत ठेवुन संस्थानात दंगल करण्यात आली. परिस्थीती हाताबाहेर जात असल्याचे पाहून शिवराम राजे साहेबांनी विलीनीकरणास तयार असल्याची घोषणा केली.

🔷 *कोल्हापूर संस्थान*
        ब्रिटिश राजवटीच्या अंतानंतर झालेला काँग्रेसचा वाढता प्रभाव पहाता कोल्हापूर संस्थानाने सर्व समावेशक सरकार स्थापन करण्याची भूमिका घेतली व रत्नाप्पांना या सरकारात पद देऊ केले. परंतु संस्थाने भारतात पूर्णपणे विलीन करण्याच्या भूमिकेवर रत्न्नाप्पा हे ठाम होते. त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. नंतर त्यांना डेक्कन रीजनल काउन्सिलचे अध्यक्ष करण्यात आले व त्यांच्या मार्गदर्शानाखाली पश्चिम महाराष्ट्रातील सगळी संस्थाने भारतात विलीन झाली.

♦ *राजकीय कारकीर्द*
        रत्नाप्पांचा काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. ते कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षही झाले, १९५० साली त्यांची लोकसभा सदस्य पदी नियुक्ती झाली. ते भारतीय राज्यघटनेची रचना करण्यासाठी स्थापन केलेल्या घटनासमितीचे सदस्य बनले. ते भारताच्या घटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. १९५२ च्या पहिल्या लोकसभेचे ते खासदार म्हणून निवडून आले. कोल्हापूर व सातारा असा हा मतदार संघ होता. रत्नाप्पांना १,६३,५०५ मते मिळाली व त्याचे प्रतिद्वंदी कृष्णाजी लक्ष्मण मोरे यांना १,४५,७४७ मते मिळाली. त्यांनी मोरे यांचा १७७५८ मतांनी पराभव केला. १९५७ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान झालेल्या विधानसभा निवडणुकीत सातगोंड रेवगोंड पाटील ( सा. रे. पाटील) त्यांनी रत्नाप्पांचा पराभव केला.  इ.स १९६२ ते १९८० आणि नंतर १९९० ते निधनापर्यंत त्यांनी आमदार म्हणून शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९६३ सालच्या वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात व नंतर वसंतराव दादा पाटीलांच्या मंत्रिमंडळात १९७४ ते १९७८ पर्यंत ते महाराष्ट्राचे गृह आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री होते. कोल्हापूर जिल्हातील शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत औद्योगिक व शेतीविषयक समृद्धी घडवून आणण्यात रत्नाप्पांचे फार मोठे योगदान होते.

🤝 *सहकारी चळवळ*
            रत्नाप्पा कुंभारांनी १९५२ साली खासदार झाल्यावर लगेचच भारतातील दुसऱ्या सहकारी सहकारी साखर कारखान्याची उभारणीच्या हालचाली इचलकरंजी येथे सुरू केल्या. त्या काळात खाजगी उद्योग प्रचलित होते, सार्वजानिक अथवा सहकारी क्षेत्रातील उद्योग नव्हते. पिकलेल्या उसाचा गूळ करून गुजराती व्यापाऱ्यांना विकणे एवढेच प्रचलित होते. रत्नाप्पांनी सहकारी साखर कारखाना उभारणीसाठीचा अभ्यास केला व सरकारी परवानगी साठीच्या हालचाली करून प्रस्ताव सादर केला. तात्कालिन मुंबई राज्याचे अर्थमंत्री जीवराज मेहता यांनी साखरेच्या उत्पादनाने गुळाच्या निर्यातीस मार बसतो असे कारण सांगून कारखाना स्थापन करण्यासाठीची परवानगी नाकारली. गुजराती गुळाच्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा बळी देणे योग्य नसल्याचे जाणून रत्नाप्पांनी प्रस्तावित कारखाना क्षेत्रातील एकूण बागायती असलेली जमिन, पाणी पुरवठा करून येणारी अतिरिक्त बागायती जमीन, त्यांच प्रमाणे साखर व गूळ उत्पादनाचा तुलनात्मक अभ्यास करून शेतकऱ्यांच्या हिताचा आढावा घेणारा सर्वंकष अहवाल त्यांनी अर्थ तज्ज्ञांना सादर केला. या तज्ञांच्या अभिप्रायासह कारखान्याच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव पुन्हा अर्थमंत्र्यांना सादर केला गेला. ३ वर्षाच्या अथक परिश्रमांनंतर त्यांनी १ ऑक्टोबर १९५५ रोजी सहकारी तत्त्वावरच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीचा परवाना मिळवला. १२,९६,०३७ रुपयांचे भागभांडवल शेतकरी जनतेतून उभे केले व पश्चिम जर्मनीतील बकाऊ वुल्फ या कंपनीकडून रोज १००० टन ऊस गाळण क्षमता असलेली यंत्रसामुग्री आयात केली.
           प्रत्येक साखर कारखान्याने आपल्या परिसरातील गावांचा आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास साधून संपूर्णपणे कायापालट घडवून आणला पाहिजे...
साखर कारखाना हा शिक्षणाचे व संस्कृतीचे केंद्र बनला पाहिजे.
साखर कारखान्याचे काम समाजाच्या जडणघडणीचे आहे.
प्रत्येक साखर कारखाना आदर्श समाजाचा शिल्पकार म्हणून पुढे यावा.
         कारखान्याची उभारणी पूर्ण झाल्यावर १९५७/५८ च्या पहिल्या गळित हंगामात या साखर कारखान्याने ३५३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले व शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला ४१ रुपये प्रती टन इतका भाव दिला. १९६३-६४ च्या हंगामात कारखान्याने २,३५,००० पोती सखरेचे उत्पादन केले. रत्नाप्पांनांनी १ कोटी रुपयांच्या खर्चाने नविन २४ पाणी पुरवठा योजना केल्या. १९६४ साली या साखर कारखान्याच्या अनुषंगाने त्यांनी उभारलेल्या एकूण ५९ पाणी पुरवठा योजनांनी अंदाजे ५६,००० एकर शेतीला पाणी पोहचवले. शेतीच्या विकासासाठी पाणी, खत, अवजारे, तांत्रिक ज्ञान, शेतीमालाच्या किमती यांबरोबरच खेड्यातून शेतीवाड्यात जाणाऱ्या पाणंद रस्त्यांची बांधणी आणि दुरुस्ती करण्यावर त्यांनी भर दिला. शेतकऱ्यांना गावातून शेताशिवारात जा-ये करण्यासाठी या पाणंद रस्त्यांची अहोरात्र गरज असते त्या पांदण रस्ते, जोड रस्ते करण्याचा २ लाख रुपये खर्चाचा प्रकल्प साखर कारखान्याच्या वतीने केला. यासाठीच रत्नाप्पा कुंभारांना, शेतकरी राजाचे आर्थिक उन्नयन होण्यात मोलाची कामगिरी बजावणारे देशभक्त म्हणून ओळखले जाते. स्थापनेच्या वेळी रोज १००० टन ऊस गाळण क्षमता असलेला कारखाना ३० सप्टेंबर १९८३ रोजी कर्जमुक्त झाला व तेव्हा तो रोज ५००० टन गाळण क्षमतेचा होता. पुढच्या काळात त्यांनी एक सहकारी बँक व ग्राहक सोसायटीही स्थापन केली, परंतु त्या दोन्ही संस्था नंतर बुडाल्या. रत्नाप्पा कुंभार यांनी स्थापन केलेली सहकारी सूतगिरणी यड्राव येथे सुरू आहे.
              १९७२ साली तत्कालीन सहकारमंत्री यशवंतराव मोहिते यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य कापूस एकाधिकार महासंघाची संकल्पना मांडली. रत्नाप्पा कुंभार या महासंघाचे पहिले अध्यक्ष झाले. त्यांनी शेतकऱ्यांंकडून कापूस विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करणाऱ्या जिनिंग फॅक्टऱ्यांचे जाळे उभे केले. विदर्भामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरभराटीचे दिवस आले. पण पुढे काही चुकीच्या धोरणांमुळे ही योजना बुडीत निघाली. १९७५ साली डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटच्या उभारणीत ते अग्रणी होते.

🏢 *शिक्षण संस्था*
      *शिक्षण ही एक अखंड जीवनप्रक्रिया आहे.*
*जीवनातील नव्या अनुभवांचा* *अर्थ समजावून घेणे व*
*समजावून देणे म्हणजे शिक्षण.*
     *---- - रत्नाप्पा कुंभार*
                १९५१ साली कोल्हापूर संस्थान भारतात विलीन झाल्यावर या संस्थानाच्या वतीने चालवले जाणारे शहाजी कायदा महाविद्यालय अनाथ झाले व आर्थिक मदत थांबल्यामुळे अधोगतीस आले होते. रत्नाप्पा कुंभारांनी कॉन्सिल ऑफ एज्युकेशन नामक शिक्षण संस्था १७ फेब्रुवारी १९५१ रोजी स्थापन करून या संस्थेमार्फत शहाजी कायदा महाविद्यालय दत्तक घेतले. ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. १९५७ साली त्यांनी कोल्हापुरात कॉमर्स कॉलेज स्थापन केले. १९८५ साली त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कॉमर्स कॉलेजचे नाव देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स असे करण्यात आले. हा कार्यक्रम तेव्हाचे उपराष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते पार पडला. १९६० साली त्यांनी कसबा सांगाव येथे दादासाहेब मगदूम हायस्कूलची स्थापना केली. १९६३ साली त्यांनी कोरोची गावात रत्नदीप हायस्कूल उभारले. दिवसा काम करणाऱ्या मुलांसाठी त्यांनी कोल्हापुरात रात्र महाविद्यालयाची कल्पना मांडून नाइट कॉलेज ऑफ आर्ट्‌स ॲन्ड कॉमर्सची स्थापना १९७१ साली केली.
        १९९० साली रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची स्थापना झाली. Deshbhakta Ratnappa Kumbhar vidyalaya Kamptee Dist Nagpur also established by Educatinalist Mr Ramdas Khopey

🎥 *चित्रपट निर्माता*
                              १९६७ साली निर्माता म्हणुन बाळासाहेब पाटील (सत्त्यवादीकार) यांच्या सह रत्नाप्पा कुंभारांनी सुदर्शन नामक चित्रपट केला. दत्ता माने हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.

⌛ *निधन*
                    रत्नाप्पा कुंभार यांचे २३ डिसेंबर १९९८ च्या सकाळी वयाच्या ८६ व्या वर्षी हृदयाघाताने निधन झाले. त्या काळाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. रत्नाप्पा कुंभार यांच्या निधनानंतर त्यांनी उभारलेल्या सहकारी साखर कारखान्यास त्यांचे नाव देण्यात आले. आता हा साखर कारखाना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना मर्यादित या नावाने ओळखला जातो. कोल्हापूरच्या वाणिज्य महाविद्यालयाचेही देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार वाणिज्य महाविद्यालय असे नामांतर झाले.

शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे देशभक्‍त रत्नाप्पा कुंभार यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधननंतर त्यांच्या कन्या रजनीताई मगदूम यांनी त्यांच्या राजकीय वारस म्हणून २००४ साली निवडणुक लढविली. पण त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याकडून पराभूत झाल्या.

📚 *पुस्तके संपादन*
            हे कुंभ अमृताचे ( रत्नाप्पा कुंभार यांनी १९६४ ते १९७४ या कालखंडात केलेल्या निवडक ३४ भाषणांचा संग्रह), संपादक: रा. तु. भगत, पाने: २१५, चक्रप्रवर्तन प्रकाशन, (१९७५)
कोल्हापूर संस्थान प्रजा परिषदेतील रत्नाप्पा कुंभार यांचा सहभाग - १९३८ ते १ मार्च १९४९, लेखक: रामलिंग कुंभार, अभिनंदन प्रकाशन.
"कथा एका महा मानवाची"- लोकनेते डॉ. रत्नाप्पा कुंभार यांचे जीवन चरित्र, मूळ कन्नड लेखक- के.बी. होन्नायक, मराठी अनुवाद - सी. एस. कुलकर्णी

          🇮🇳 *जयहिंद*🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏                                                                                                                                                                                                                                                                    ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     *🇮🇳 आझादी का अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿                                                            
⚜️✍⛓🇮🇳👨🏻🇮🇳⛓📝⚜️
               *पद्मभूषण*
     *बाबा पृथ्वीसिंह आझाद*

( भारतीय क्रांतिकारी - गदर पार्टी के संस्थापकों मे से एक )

      *जन्म : 15 सप्टेंबर 1892*
(रायपुरानी, पटियाला, पंजाब, भारत)

     *मृत्यू : 5 मार्च 1989*
                 (वय 96)
                  (भारत)

व्यवसाय : भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ता
वर्ष सक्रिय : 1907–1989
प्रसिद्ध : भारतीय स्वातंत्र्य संग्राम
लाहोर षड्यंत्र चाचणी
भागीदार : कै.आझाद देवी
संतान : अजितसिंग भट्टी, प्रज्ञा कुमार
               बाबा पृथ्वी सिंह आजाद (१८९२ - १९८९) भारत के स्वतन्त्रता संग्राम के सेनानी, क्रान्तिकारी  तथा गदर पार्टी के संस्थापकों में से एक थे। स्वतंत्रता के पश्चात वे पंजाब के भीम सेन सचर सरकार में मन्त्री रहे। वे भारत की पहली संविधान सभा के भी सदस्य रहे। सन १९७७ में भारत सरकार ने उन्हें पद्मभूषण से अलंकृत किया।
                  पृथ्वी सिंह को 'जिन्दा शहीद' भी कहा जाता है। उन्हें लाहौर षड्यंत्र केस में फांसी की सजा सुनायी गयी थी जिसे बाद में आजीवन कारावास में बदल दिया गया था। स्वतन्त्रता संग्राम में उन्हें कई बार जेल जाना पड़ा। उन्हें सेल्युलर जेल में रखा गया था । उनकी 'लेनिन के देश में' नामक पुस्तक बहु चर्चित पुस्तकों में से एक है। आजादी के बाद भारतीय कम्युनिस्ट पार्टी के मुख्यालय अजय भवन में जीवन पर्यन्त रहे।

*किस्सा कुछ यूं था: रोज सामने मौत की बाल्टी देख कर भी डरे नहीं पृथ्वीसिंह आजाद*

          भारतीय स्वतंत्रता आंदोलन में अपना सर्वस्व न्यौछावर कर देने वाले कुछ ऐसे क्रांतिकारी भी रहे, जिन्हें आजादी मिलने के बाद भुला दिया गया। या तो उन्हें जानबूझकर भुलाया गया या फिर उनके बारे में कहीं कोई जानकारी दर्ज थी ही नहीं, इसलिए देश उन्हें भूल गया। ऐसे ही क्रांतिवीर थे पृथ्वीसिंह आजाद, जिनके बारे में छुटपुट जानकारी ही देश के सामने आ सकी। बाबा पृथ्वीसिंह आजाद ऐसे क्रांतिवीर थे, जिनके जीवन का प्रत्येक क्षण देश की स्वतंत्रता के लिए अर्पित था। 15 सितंबर 1892 को पंजाब के सर्कपुर टावर, जिला अम्बाला में जन्मे पृथ्वीसिंह आजाद कुछ कमाने के लिए कई देशों की यात्रा करते हुए अमेरिका पहुंचे थे। वहां वे भारत की आजादी के लिए लड़ रही 'गदर पार्टी' में शामिल हो गए।
                   गदर पार्टी के आह्वान पर वे अपने साथियों के साथ वापस भारत लौटे और अम्बाला की सैनिक छावनियों में भारतीय सैनिकों को अंग्रेजों के विरुद्ध विद्रोह करने की प्रेरणा देने लगे। दुर्भाग्य से 8 दिसम्बर 1914 को उन्हें बंदी बनाकर लाहौर की सेंट्रल जेल भेज दिया गया। उन्हें लाहौर षड्‌यंत्र केस में अन्य कई क्रांतिकारियों के साथ अभियुक्त बनाया गया।
                  न्यायालय ने उक्त केस में 24 क्रांतिकारियों को फांसी का दंड घोषित किया। उन क्रांतिकारियों में बाबा पृथ्वीसिंह आजाद भी थे। उस समय जेल में फांसी देने के बाद शवों को नहलाया नहीं जाता था। जेल परिसर में जेल के ही कर्मचारियों द्वारा शव को जला दिया जाता था। अतः राजबंदियों की मांग थी कि जिस दिन हमें फांसी दें, उसके पहले स्नान करने की व्यवस्था करें। मगर क्रूर अंग्रेजी शासक क्रांतिकारियों को मानसिक प्रताड़ना देने का कोई मौका छोड़ना नहीं चाहते थे।
                जेल में बाबा पृथ्वीसिंह आजाद की कोठरी के सामने रोज एक बाल्टी पानी रख दिया जाता था। क्रांतिकारियों को लगता था कि आज उन्हें फांसी दी जाएगी। ऐसी मानसिक क्रूरता लगातार 14 दिनों तक की गई। किंतु इससे न तो बाबा पृथ्वीसिंह आजाद डिगे, न ही कोई अन्य क्रांतिकारी।

       🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏                                                                                                                                                                                                                                                     ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     *🇮🇳 आझादी का अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿
🎖️💥🔫🇮🇳👳🏻‍♂️🇮🇳🔫💥🎖️
      
        *लांसनायक करम सिंह*
(भारतीय सेना में लांस नायक एवं परमवीर चक्र प्राप्त करने वाले प्रथम जीवित अधिकारी)

*जन्म : 15 सितम्बर 1915*
(सेहना, बरनाला, पंजाब, भारत)
*देहांत : 20 जनवरी 1993 (उम्र 77)*
निष्ठा : ब्रिटिश भारत, भारत 
सेवा/शाखा : ब्रिटिश भारतीय सेना, भारतीय सेना
सेवा वर्ष : 1941–1969
उपाधि : लांस नायक, बाद में  मानद कैप्टन
सेवा संख्यांक : 22356
दस्ता : प्रथम बटालियन (1सिख)
युद्ध/झड़पें : द्वितीय विश्व युद्ध,
भारत-पाकिस्तान युद्ध 1947
सम्मान : परम वीर चक्र, मिलिट्री मैडल (एमएम)
               
                लांस नायक करम सिंह (बाद में सूबेदार एवं मानद कैप्टन) (15 सितम्बर 1915 - 20 जनवरी 1993), परमवीर चक्र प्राप्त करने वाले प्रथम जीवित भारतीय सैनिक थे। श्री सिंह 1941 में सेना में शामिल हुए थे और द्वितीय विश्व युद्ध के दौरान बर्मा की ओर से भाग लिया था जिसमे उल्लेखनीय योगदान के कारण उन्हें ब्रिटिश भारत द्वारा मिलिट्री मैडल (एमएम) दिया गया। उन्होंने भारत-पाकिस्तान युद्ध 1947 में भी लड़ा था जिसमे टिथवाल के दक्षिण में स्थित रीछमार गली में एक अग्रेषित्त पोस्ट को बचाने में उनकी सराहनीय भूमिका के लिए सन 1948 में परमवीर चक्र से सम्मानित किया गया।
              वह 1947 में आजादी के बाद पहली बार भारतीय ध्वज को उठाने के लिए चुने गए पांच सैनिकों में से एक थे। श्री सिंह बाद में सूबेदार के पद पर पहुंचे और सितंबर 1969 में उनकी सेवानिवृत्ति से पहले उन्हें मानद कैप्टन का दर्जा मिला।

💁🏻‍♂️ *प्रारम्भिक जीवन*
                श्री करम सिंह का जन्म 15 सितंबर 1915 को ब्रिटिश भारत के पंजाब में बरनाला जिले के सेहना गांव में एक सिख जाट परिवार में हुआ था। उनके पिता उत्तम सिंह एक किसान थे। श्री सिंह भी एक किसान बनना चाहते थे, लेकिन उन्होंने अपने गांव के प्रथम विश्व युद्ध के दिग्गजों की कहानियों से प्रेरित होने के बाद सेना में शामिल होने का फैसला किया। 1941 में अपने गांव में अपनी प्राथमिक शिक्षा पूरी करने के बाद वह सेना में शामिल हो गए।

💂‍♂️ *सैन्य जीवन*
                    15 सितम्बर 1941 को उन्होंने सिख रेजिमेंट की पहली बटालियन में दाखिला लिया। द्वितीय विश्व युद्ध के बर्मा अभियान के दौरान एडमिन बॉक्स की लड़ाई में उनके आचरण और साहस के लिए उन्हें मिलिट्री मैडल से सम्मानित किया गया था। एक युवा, युद्ध-सुसज्जित सिपाही के रूप में उन्होंने अपनी बटालियन में साथी सैनिकों से सम्मान अर्जित किया।

💥 *भारत-पाकिस्तान युद्ध 1947*
                    1947 में भारत की आजादी के बाद भारत और पाकिस्तान ने कश्मीरी रियासत के लिए लड़ाई लड़ी। संघर्ष के प्रारंभिक चरणों के दौरान पाकिस्तान के पश्तून आदिवासी सैन्य टुकड़ियों ने राज्य की सीमा पार कर दी तथा टिथवाल सहित कई गांवों पर कब्जा कर लिया। कुपवाड़ा सेक्टर में नियंत्रण रेखा पर स्थित यह गांव भारत के लिए रणनीतिक रूप से महत्वपूर्ण था। 23 मई 1948 को भारतीय सेना ने पाकिस्तानी सैनिकों से टिथवाल पर से कब्जा वापस ले लिया लेकिन पाकिस्तानी सेना ने क्षेत्र को फिर से प्राप्त करने के लिए एक त्वरित हमले शुरू कर दिए। पाकिस्तानी हमले के दौरान भारतीय सैनिक जो उस हमले का सामना करने में असमर्थ थे अपने स्थिति से वापस टिथवाल रिज तक चले गए और उपयुक्त पल के लिए तैयारी करने लगे।
                       चूंकि टिथवाल की लड़ाई कई महीनों तक जारी रही, पाकिस्तानियों ने हताश होकर 13 अक्टूबर को बड़े पैमाने पर हमले शुरू कर दिए ताकि भारतीयों को उनकी स्थिति से हटाया जा सके। उनका प्राथमिक उद्देश्य टिथवाल के दक्षिण में स्थित रीछमार गली और टिथवाल के पूर्व नस्तचूर दर्रे पर कब्जा करना था। 13 अक्टूबर की रात को रीछमार गली पर भयानक लड़ाई के दौरान लांस नायक करम सिंह 1 सिख की अग्रिम टुकड़ी का नेतृत्व कर रहे थे। लगातार पाकिस्तानी गोलीबारी में श्री सिंह ने घायल होते हुए भी साहस नहीं खोया और एक और सैनिक की सहायता से वह दो घायल हुए सैनिकों को साथ लेकर आए थे। युद्ध के दौरान श्री सिंह एक स्थिति से दूसरी स्थिति पर जाते रहे और जवानों का मनोबल बढ़ाते हुए ग्रेनेड फेंकते रहे। दो बार घायल होने के बावजूद उन्होंने निकासी से इनकार कर दिया और पहली पंक्ति की लड़ाई को जारी रखा। पाकिस्तान की ओर से पांचवें हमले के दौरान दो पाकिस्तानी सैनिक श्री सिंह के करीब आ गए। मौका देखते ही श्री सिंह खाई से बाहर उनपर कूद पड़े और संगीन (बैनट) से उनका वध कर दिया जिससे पाकिस्तानी काफी हताश हो गए। इसके बाद उन्होंने तीन और हमलों को नाकाम किया और सफलतापूर्वक दुश्मन को पीछे हटा दिया।

📜 *सम्मान*
                लांस नायक करम सिंह को भारत-पाकिस्तान युद्ध 1947 के दौरान उल्लेखनीय योगदान के लिए भारत सरकार द्वारा गणतंत्र दिवस 1950 के दिन परमवीर चक्र से सम्मानित किया गया।

           🇮🇳 *जयहिंद*🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹                                                                                                                                                                                                                                                           ➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा