17 सप्टेंबर दिनविशेष


*17 सप्टेंबर दिनविशेष 2022 !*
        
          🧩 *शनिवार* 🧩


💥 *मराठवाडा मुक्ती संग्राम दिन*
         
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *2017 - भारतीय बॅडमिंटनपटू खेळाडू पी वी सिंधु ही कोरिया ओपन सुपर सिरिज जिकंणारी पहिली भारतीय महिला ठरली*         
👉 *1976 - अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपली पहिली अंतरिक्ष कक्षा (स्पेस शटल) द एन्टर प्राईज चे जगासमोर प्रदर्शन केले*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*

👉 *1950 - भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचा जन्म*
👉 *1915 - भारतातील सर्वोत्कृष्ट पद्मश्री, पदमभुषण व पद्मविभूषण पुरस्कार तसच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चिञकार एम.एफ.हुसेन   यांचा जन्म*

🌍 *मृत्यू*

👉 *2005 - प्रसिद्ध भारतीय कथकली संगीतकार कलामंडलम हरिदास  यांचे निधन*
👉 *2002 - महाराष्ट्रीयन मराठी कवी व संगीतकार वसंत बापट यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आजच्या बातम्या*

१.विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी, गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार.. चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची लवकरच गृहपाठातून सुटका 

२.चायनीज लोन अ‍ॅपप्रकरणी ईडीची मोठी कारवाई, ऑनलाईन पेमेंट अ‍ॅपवरील 47 कोटी रुपये गोठवले


३.. आता पाचवीपासून शिकवला जाणार शेती विषय, कृषीमंत्री सत्तारांची माहिती, शिक्षकांनाही देणार प्रशिक्षण 

४.. यंदाच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मोकळेच राहणार? मुंबई महापालिका शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांच्या अर्जाला नकार देण्याची शक्यता 

५. आदित्य ठाकरेंचा CM शिंदे यांच्यावर हल्लाबोल, मुख्यमंत्री गणपतीत गरागरा फिरले, पण. आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत तडजोड? झेड सुरक्षा असूनही खासगी गाड्या ताफ्यात! 

६. प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा; 'या' घोटाळ्यात मुंबई पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट, ईडीच्या भूमिकेकडे लक्ष 

७. धक्कादायक! मुंबईत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पुणे एक्स्प्रेसवे मार्गाजवळ अत्याचार, गुन्हा दाखल 

८. 'जनावरांमध्येही आता दो गज दूरी', लम्पीला रोखण्यासाठी क्वारंटाईन सेंटर उभारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश  लम्पी रोगाच्या निदानासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन, नियमित उपाययोजना आणि शिफारशी करणार 

९. मुंबईसह ठाणे, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी  परतीच्या पावसाचा दणका, उजनी आणि वीर धरणातून विसर्ग, पंढरपूर शहरासह 46 गावांना पुराचा धोका वाढला 

१०. फेडेक्स रिटायर होतोय, 'टेनिस सम्राट' रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा  रॉजर फेडररच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राफेल नदालची इमोशनल पोस्ट 

*स्पेशल*

१.Pune Science Film News: पोरानं नाव काढलं! पुण्याच्या सिध्दार्थ दामलेच्या महितीपटाला इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सिल्व्हर बीव्हर अवॉर्ड' 

२.Gautam Adani: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत अदानी दुसऱ्या क्रमांकावर, 

३.मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील स्वातंत्र्यवीर बहिर्जी शिंदेंच्या कुटुंबाची दयनीय अवस्था, पडक्या घरात राहण्याची वेळ 

४.हिंगोलीच्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी शासन निर्णय जारी, चालू वर्षात 10 कोटी रुपये देणार 

५.Nashik Rain : मान्सून चार महिने पुढे सरकला! पावसाचा पॅटर्न बदललाय का? नेमकं काय झालंय? 

६.Pune News : पुण्यातील तीन दिवसांचे 'सेक्स तंत्रा' शिबिर अखेर रद्द, कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═➖➖➖➖═━┅

*👉ब्राझील देशाचे नाव कोणत्या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे?* 
*🥇 पाऊ ब्रासिल*

*👉जगात सर्वात जास्त इथेनॉलचे उत्पादन कोणत्या देशात होते?* 
*🥇अमेरिका*

*👉भारताचे हवामान कोणत्या प्रकारात मोडते?* 
*🥇मान्सून*

*👉शरीरात रक्तपुरवठा कोणत्या अवयवा मुळे होतो?* 
*🥇हृदय*

*👉विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करतात?* 
*🥇 टांगस्टन धातू*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*GENERAL KNOWLEDGE*
◆ Name the Oceans of the World?
Ans. : *The Atlantic, Pacific, Indian, Arctic, and the Southern (Antarctic) oceans.*

➖➖➖➖➖➖➖➖➖

        *STORY TELLING*

*Two Frogs With The Same Problem*

Once, a group of frogs was roaming around the forest in search of water. Suddenly, two frogs in the group accidentally fell into a deep pit. The other frogs worried about their friends in the pit.
Seeing how deep the pit was, they told the two frogs that there was no way they could escape the deep pit and that there was no point in trying.

They continued to constantly discourage them as the two frogs tried to jump out of the pit. But keep falling back. Soon, one of the two frogs started to believe the other frogs — that they’ll never be able to escape the pit and eventually died after giving up.

The other frog keeps trying and eventually jumps so high that he escapes the pit. The other frogs were shocked at this and wondered how he did it. The difference was that the second frog was deaf and couldn’t hear the discouragement of the group. He simply thought they were cheering him on!

*Moral of the story :*
People’s opinion of you will affect you, only if you believe it to be so. It’s better to believe in yourself.

➖➖➖➖➖➖➖➖➖

  *SPECIAL INTRODUCTION*

*Dr Rani Bang*
[Indian Social Worker]

Dr Rani Bang is known for her stellar work in changing the face of health care for rural women in the area of Gadchiroli, Maharashtra.
Dr Rani Bang, along with her husband, Dr Abhay Bang, was recently awarded the Padma Shri for her immense contribution to medicine. She is known for her stellar work in the area of Gadchiroli, Maharashtra. As co-founders of Society for Education, Action and Research in Community Health (SEARCH), the doctor couple have changed the face of healthcare in this part of Maharashtra.

Rani Bang (formerly Rani Chari) was born in Chandrapur. She belonged to a family with strong commitment both to medical service and, in her grandparents' generation, to public service. Abhay and Rani completed their graduation and post graduation in medical studies from Nagpur University. When Abhay was studying for final year exam of MBBS at Nagpur, he read an incident about Gandhi where Gandhi was very careful regarding use of natural resources. After reading the incident Abhay decided to use resources carefully. He switched off the fan in his room. He thought that he should be able to live without fan. He did not use the fan for next five years during his education even in the heat of Nagpur. Abhay and Rani married in 1977. Both of them have secured MPH (Masters in Public Health) from Johns Hopkins University. Anand Bang is their elder son and Amrut Bang is their younger son.

Rani Bang has worked extensively on women's medical issues. The community based study of gynaecological problems in rural area that she conducted in 1988 is the first study in the world focusing on women's health beyond maternity care. Rani Bang first brought to the notice of the world that rural women had a large hidden burden of gynecological diseases. She subsequently trained the Dais in villages to make them village level health workers. With convincing evidence she advocated the need for a comprehensive reproductive health care package for rural women in India. This study initiated the programme of women's reproductive health all over the world specifically in developing countries. She has written a book – Putting Woman First, which throws light on women's issues in rural India. Their research showed that nearly 92 percent of women had some kind of gynaecological issues. Her research in this field has changed the understanding of this issue worldwide and global policy has changed accordingly. Rani Bang was one of the principal speakers in Tietze symposium in Rio de Janeiro, Brazil in 1990. She served as a consultant to INCLEN (International Clinical Epidemiology Network) for Reproductive health, IWHAM (International Women's Health Advocates on Microbicides), 10th Five Year Plan Maharashtra Health and Nutrition Committee Member. She was nominated for Nobel Peace Prize in 2003 as a member of 1000 women worldwide for peace prize. Rani Bang has worked on women's reproductive health issues, sexually transmitted diseases and AIDS control, adolescent sexual health, tribal health, alcohol and alcoholism. She conducts sessions on sex education called 'Tarunyabhaan' for adolescents and teenagers across Maharashtra. Rani Bang has been awarded with National Award for Women's Development through Application of Science & Technology in recognition of her outstanding and pioneering contribution for the past two and a half decades on improving women's health in rural India through an innovative and powerful approach of research with the people and for the people. The award was conferred upon her by the President of India at the National Conference on Showcasing Cutting Edge Science & Technology by Women in New Delhi.

➖➖➖➖➖➖➖➖➖
               *PASAYDAN*
                 *SILENCE*
*All students will keep silence for two minutes.*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*MILIND V. WANKHEDE*
*HEADMASTER*
*PRAKASH HIGHSCHOOL AND JUNIOR COLLEGE KANDRI MINE*
*9860214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿
⚜️💥🔫🇮🇳👨🏻🇮🇳🔫💥⚜️

                   *१७ सप्टेंबर*
       *मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन*

*आधी जाणून घेऊ मराठवाड्याबद्दल थोडंसं –*

         मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे. मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे 64590 चौ. किमी असून यामध्ये पुढील 8 जिल्हे आणि त्यातील – 78 तालूके व 63 बाजारपेठेची शहरं आहेत.
1)औरंगाबाद
2)नांदेड
3)परभणी
4)बीड
5)जालना
6)लातूर
7)उस्मानाबाद व
8) हिंगोली
 
दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यातून वाहते. जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे.

यामध्ये वेरूळ, अजिंठा जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, 52 दरवाजे, पानचक्की, 3 जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण, तूळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात.

*मुक्ती संग्राम आणि पार्श्वभूमी–*
   *'स्वप्ने पडली उष:काळाची*
        *हाती मात्र अंध:कार*
     *देश सारा उजळला जरी* 
   *मराठवाड्याची काजळ रात'*

           दिवस १५ ऑगस्ट १९४७ चा साऱ्या भारतभर स्वातंत्र्याचे पर्व सुरु झाले. परंतु हैद्राबादव संस्थान मात्र अजूनही भारतात विलीन झाले नव्हते. त्यामुळे हैद्राबाद संस्थानात असलेला
 मराठवाडा पारतंत्र्यात होता. 
स्वातंत्र्याचे सुख अनुभवणाऱ्या भारताच्या हृदयावर मराठवाड्याच्या पारतंत्र्याची बोचरी जखम होतीच. परकीय सत्तेविरुद्ध एकत्र येताना भारतीयांनी केलेला नेटाचा
 प्रयत्न  हा कौतुकाचा खराच; पण स्वातंत्र्यानंतरही आणखी एका स्वातंत्र्यासाठी लढा देणं किती क्लेशदायक असेल? हैद्राबाद हे भारतातील एक मोठे संस्थान होते. स्वतंत्र भारतात सामील न होण्याचा निजामाचा अट्टाहास  होता. तेलगु, मराठी, कन्नड भाषिक लोकांचा मोठा वर्ग या संस्थानात होता. निजामाच्या जुलुमी अधिपत्याखाली या प्रांतातील लोकांना कोणतेही राजकीय व नागरी अधिकार नव्हते; म्हणून निजामाविरुद्ध जनमत तयार होऊ लागले. त्यातच  निजामाचे पाठबळ असलेला कासीम रजवी याने आपल्या 'रझाकार' या संघटनेच्या माध्यमातून निष्पाप जनतेवर अमानुष अत्याचार सुरु केले.

*'रण  पेटले पेटले रण*
           *अग्निज्वाला सर्वदूर* 
*अंगार मनामनात* 
                *झुगारु हा अंकुश'*

जनमताचा प्रक्षोभ उसळला. खेडी, शहर, निजामाविरुद्ध खदखदू लागली; आणि याला संघटनात्मक व वैचारिक आव्हान दिल, स्वामी रामानंद तीर्थ यांनी.
    १९३८  मध्ये स्थापन झालेल्या हैद्राबाद स्टेट काँग्रेसकडे याचे नेतृत्व आले. लढा घराघरात 
पोहोचला आणि प्रत्येक स्तरातून मुक्तिसंग्रामाचे सेनानी उभे राहिले. गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, पुरषोत्तम चपळगावकर, रामलिंग स्वामी, श्रीनिवासराव बोरीकर, 
किशोरभाऊ शहाणे यांनी हे स्फुलिंग चेतवले. या लढ्यात स्त्रियाही काही मागे नव्हत्या. आशाताई वाघमारे, करुनाबेन चौधरी, सुशीलाबेन दिवान यांची नावे आपल्याला घेता येतील. वेदप्रकाश श्यामलाल, गोविंद पानसरे, बहिर्जी शिंदे, श्रीधर वर्तक यासारख्या कित्येक विद्यार्थ्यांनी 'वंदे मातरम' चालवली. निजाम सरकारविरुद्ध आपला रोष  व्यक्त केला.

*'मुक्तीचा आक्रोश आमुचा*
        *स्वातंत्र्य आम्हा पाहिजे* 
*ध्यास एक श्वास एक* 
        *हेच आमुचे ध्येय असे'*

भारत सरकारमध्ये सामील होण्याची तेथील लोकांची तीव्र इच्छा , त्याचे उठणारे तीव्र पडसाद, लोकांवर होणारा अमानुष अत्याचार यासगळ्याविरुद्ध 13 सप्टेंबर १९४८  रोजी भारत सरकारने
 हैद्राबाद संस्थाना विरुद्ध कारवाई केली. इ.स.१२९४ मध्ये मराठवाडा
 इस्लामी राजवटीचा आरंभ झाला. १७ सप्टेंबर १९४८ ला या संस्थानाच्या वीलीनीकरणाने 
त्या राजवटीचा अंत झाला. समान संस्कृती व समान भाषा बोलणाऱ्या आप्तांना लोकशाही राज्यात म्हणजे महाराष्ट्रात 
मराठवाडा विलीन झाला त्यासाठी 1 नोव्हेंबर 1956  या दिवसाची वाट पहावी लागली.
       आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामिरीतून स्वातंत्र्य मिळाले खरे पण हे स्वातंत्र्य अधुरे होते. काश्मिर, जुनागड आणि निजाम संस्थानातील जनता अजूनही गुलामीत होती. मराठवाडा आणि तेलंगणात निजामाची राजवट होती.
 17 सप्टेंबर 1948
 रोजी मराठवाडा निजामाच्या गुलामीतुन मुक्त झाला....! 

*डॉ.आंबेडकर जी की भूमिका-*
 मराठवाडा के साथ पूरा हैदराबाद संस्थान का दलितवर्ग एक तरफ 
निर्धनता और दूसरी तरफ निजामी अत्याचार, दो पाटों के बीच पिसा
 जा रहा था. निजाम मीर उस्मान
अली खान ने डॉ. बाबासाहब आंबेडकर को २५ करोड का लालच दिखाकर इस्लाम स्वीकारने का प्रस्ताव भेजा था. यदि दलितवर्ग इस्लाम को ग्रहण करता है तो उन्हें ऊंचे ओहदों पर रखा जाएगा इत्यादि सुविधा देने की बात कही थी. डाॕ.अम्बेडकर ने निजाम के प्रस्ताव को यह कहकर ठुकरा दिया कि,"राज्य के दलित भाई आर्थिक दृष्टी से जरूर निर्धन है लेकिन वे मन से निर्धन नही है. रही मेरे इस्लाम ग्रहण करने की बात मेरे जमीर को खरीदने की ताकत किसी में भी नही है."बाबासाहब अम्बेडकर ने १८-११-१९४७ तथा
 २७-११-१९४७ को एक परिपत्र निकालकर जोर-जबरदस्ती धर्मांतरित किये हुये दलितों को आवाहन किया की वे वापस घर आवें. यह पत्र २८नवम्बर के नैशनल स्टैण्डर्ड नामक दैनिक में प्रकाशित किया गया.

हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.

हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर 
निजामाचा सेनापती कासीम 
रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुस-या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु 
झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, 
गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा, 
बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.

मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची 
पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर
पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे 
काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार , विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर,
 नांदेड येथील देवरावजी 
कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या
 कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम
 तेजस्वीपणे लढला गेला .
            या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत , गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल
 काढणं शक्य नाही.
              निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडूनआलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.

हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि
खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.
 
मराठवाडा मुक्तिसंग्रामाला यश प्राप्त होऊन  १७ सप्टेंबर रोजी तब्बल ७० वर्षे पूर्ण होत आहेत. ७० वर्षांपूर्वी १७ सप्टेंबर १९४८ रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत.मराठवाडा मुक्तिसंग्रामामुळे स्वातंत्र्याला खर्‍या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे.अन्यथा हैदराबादचा निजाम ‘स्वतंत्र राष्ट्रा’चे स्वप्न बघत होता.
       या संग्रामाच्या उज्ज्वल आणि 
लोकविलक्षण पर्वाच्या आठवणींना उजाळा देताना मुक्ततेनंतर महाराष्ट्रात विलीन होणार्‍या 
मराठवाड्याचा कितपत विकास झाला याचाही गांभीर्याने विचार
 होण्याची आवश्यकता आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम हे हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यातील एक उज्ज्वल आणि लोकविलक्षण 
असे पर्व होते. हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्याची तुलना स्वातंत्र्यलढ्याच्या कोणत्याही पर्वाशी केली जाऊ शकते, इतका तो गौरवास्पद आहे. असे असूनही या लढ्याकडे उर्वरित जनतेचे फारसे लक्ष जाऊ शकले नाही. कारण हा लढा चालू असताना उर्वरित देश नव्याने जन्मू घातलेल्या स्वातंत्र्याच्या प्रसूती वेदनात पार बुडून गेला होता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी देश
 स्वतंत्र झाला तरी हैदराबाद 
संस्थानच्या रहिवाशांसाठी किंबहुना मराठवाड्याच्या जनतेसाठी स्वातंत्र्याचा खरा जन्म १७ सप्टेंबर १९४८ रोजी झाला. स्वातंत्र्याच्या जवळपास ११ महिने या संस्थानामधील लोक गुलामगिरीतच होते. त्यांच्यासाठी स्वातंत्र्याची पहाट तब्बल ११ महिन्यांनंतर उजाडली. 

निजामाचा धूर्त डाव होता की,
 १५ ऑगस्ट १९४७पर्यंत हैदराबाद संस्थान हिंदुस्थानात सामील न करता ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून 
घोषित करायचे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी हिंदुस्थान व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे स्वतंत्र झाली तरी त्या दिवशी कुठेच सामील न झालेले एकमेव संस्थान हे ‘हैदराबाद’ होते. निजामाने २७ ऑगस्ट १९४७ रोजी आपले ‘स्वातंत्र्य’ घोषित केले. तेथील ‘रजाकार’ या दहशतवादी
 संघटनेने हिंदी जनतेवर अत्याचार सुरू केले. मोठ्या प्रमाणामध्ये दडपशाही सुरू झाली. हैदराबाद
 सरकारने हिंदुस्थान सरकारबरोबर ‘जैसे थे’ करार केला होता. त्याचा भंग होऊ लागला. त्यामुळे 
हिंदुस्थान सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी आपल्या फौजा निजामाच्या राज्यात घुसविल्या. 
घाबरलेला निजाम शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी संध्याकाळी ५ वाजता हिंदुस्थानी सैन्याला शरण आला.
 निजामाच्या डोक्यातील स्वतंत्र राष्ट्राचे मनसुबे भंग पावले. या लष्करी कारवाईला *‘पोलीस ऍक्शन’* असे म्हणतात. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याद्वारे केली गेलेली ही कारवाई देशाच्या इतिहासात अजरामर ठरली. निजामशाहीचा अंत झाला. तेथील जनता अत्याचाराच्या कचाट्यातून मुक्त झाली.

१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला....!

*मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन भाषण*

भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, मात्र त्यावेळी 
संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये
 विखुरलेला होता. त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थांनांनी स्वतंत्र 
भारतात सामील होण्याची सहमती 
दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते. त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त 
होऊन भारतीय संघराज्यात 
सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती
 संग्राम सुरु झाला होता. 

हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर 
निजामाचा सेनापती कासीम रझवी 
याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.
मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले.
        मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल 
उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, 
मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या 
बदनापूर तालुक्यातील धोपटश्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार , विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने
 मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला . या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, 
शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत , गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले.
 या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही. निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 
1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या.पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते. 
हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली 
आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला.हैदराबाद संस्थानात 
तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा  लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.
  
   *"समोर होता एकच तारा* 
       *अन पायतळी अंगार !"*

  *अशा धेयधुंद भावनांनी ज्यांनी हैद्राबाद मुक्ती लढयासाठी जीवाची बाजी लावून तुरुंगवास भोगला, हौतात्म्य पत्करले. अशा सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सेनानी, वीरांगनाना ही  शब्दरूप आदरांजली.....!* 🙏🙏

       🇮🇳 *जयहींद*  🇮🇳
   
                                                                                                                                                                                                                                                          ➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा