*2 सप्टेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *शुक्रवार* 🧩
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1999 - भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली*
👉 *1920 - महात्मा गांधी चे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
👉 *1988 - भारतीय गायक इश्मीत सिंग यांचा जन्म*
👉 *1965 - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक पार्थो सेन गुप्ता यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*
👉 *1976 - वि.स.खांडेकर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यीक*
👉 *2011 - संगीतकार श्रीनिवास खळे यांचे निधन*
👉 *2014 - भारतीय वकील आणि राजकारणी गोपाल निमाजी वाहनवती यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
━━━━━━━━━━━━ *बोधकथा* . *खरी आई की खोटी आई*
━━━━━━━━━━━━━
एका आठ वर्षाच्या मुलाची आई देवाघरी जाते. मुलाच्या संगोपनात काही अडचण येऊ नये म्हणून वडील दुसरे लग्न करून त्या मुलासाठी नवीन आई घरी घेऊन येतात. एक महिन्यानंतर वडील मुलाला विचारतात,''बेटा, तुला ही नवीन आई कशी काय वाटते? तुझी देवाघरी गेलेली आई चांगली की ही नवीन आई चांगली आहे?'' यावर मुलगा उत्तर देतो,'' बाबा, ही नवीन आलेली आईच खरी आहे आणि देवाघरी गेलेली आई खोटी होती.'' हे अचानक आलेले उत्तर पाहून वडील संभ्रमात पडतात. त्यांना समजत नाही की मुलगा काय बोलतो आहे? म्हणून पुन्हा त्या मुलाला विचारतात,'' अरे तुला असे का वाटते ते मला सांग? जिने तुला नऊ महिने पोटात सांभाळले, प्रसुतीवेदना सहन करून जन्म दिला ती आई तुला खोटी कशी काय वाटते? आणि ही काल आलेली नवीन आई मात्र तुला खरी कशी काय वाटते?'' मुलगा म्हणतो,'' बाबा, मी खूप खोडकर आहे हे तुम्हाला माहितीच आहे. देवाघरी गेलेली माझी आई माझ्या खोड्यांना कंटाळून नेहमी मला '' जर तु खोड्या केल्या तर तुला मी खायला देणार नाही'' असे म्हणत असे. पण तिचे न ऐकता मी सतत खोड्या करत असे. पण ती मात्र मला जेवण देण्यासाठी उन्हातान्हात पूर्ण गावात मला शोधत असे व मला वेळप्रसंगी रागवून, मारून घरी आणत असे व मला स्वत:च्या मांडीवर बसवून खाऊपिऊ घालत असे आणि ही नवीन आईही पण '' जर तु खोड्या केल्या तर तुला मी खायला देणार नाही'' असेच म्हणते आणि खरं सांगू का बाबा तुम्हाला? गेल्या तीन दिवसात खरेच तिने मला खायला दिलेले नाही. म्हणूनच मी तिला खरी आई असे म्हणत आहे.
🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹
━━━━━━━━━━━━
© *प्रश्नमंजुषा* १)पहिली भारतीय महिला मिस युनिव्हर्स कोण? २)'सद्या शाळा का सुरू नाहीत ? ३)भारतातील कोणकोणत्या राज्यावरून कर्कवृत जाते ?
(उत्तरे- १-सुश्मिता सेन,२-कोरोनामूळे ३-गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल , मिझोरम)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सामान्य ज्ञान*
🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹
*👉मानवी मनाचा अभ्यास कोणत्या वैज्ञानिक शास्रात केला जातो?*
*मानसशास्त्र (साइकोलॉजी)*
*👉दूरबीन या उपकरनाचा शोध कोणत्या शास्रज्ञाने लावला आहे?*
*गॅलिलिओ*
*👉खेडयातिल कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो?*
*पोलिस पाटील*
*👉कात्रजघाट हा कोणत्या जिल्ह्यात आहे?*
*पुणे*
*👉महाराष्ट्र पठार हे कोणत्या खडकाचे बनलेले आहे?*
*बेसाल्ट*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ ▬▬▬▬▬▬▬▬ 🛟 *ठळक घडामोडी*
▬▬▬▬▬▬▬▬
◆ *शिक्षकांची ड्युटी आता एसटी आगारात*
*शिक्षकांमध्ये संताप*
◆ *आमदार प्रशांत बंब यांचा नवा बॉम्ब; शिक्षक, पदवीधर मतदारसंघ बंद करण्याची मागणी*
◆ *जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात GST घटला, महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी*
◆ *लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांचं भरभरुन दान, मोजदाद सुरु*
◆ *पुणे फेस्टिव्हलमध्ये भाजप नेत्यांची भाऊगर्दी; भाजपला सुरेश कलमाडी का हवेसे?*
◆ *2024 मध्ये सत्तेवर यायचंय, शिवसेनेसोबतच्या युतीनंतर संभाजी ब्रिगेड कामाला, मराठा सेवा संघात मोठे बदल*
▬▬▬▬▬▬▬▬
*मिलिंद व्हि वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹🇮🇹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा