23 सप्टेंबर दिनविशेष


*23 सप्टेंबर दिनविशेष 2022 !*
      🧩 *शुक्रवार* 🧩
   
     
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *2002 - मोबिला फायरफाॅक्स ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली*         
👉 *1984 - महात्मा फुले यांचे सहकारी रावबहादुर नारायण लोखंडे यांनी बाॅबे मिल हॅडस असोशिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन केली*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*

👉 *1957 - पार्श्र्वगायक कुमार सानू यांचा जन्म*
👉 *1950 - समाजशास्त्रज्ञ डाॅ.अभय बंग  यांचा जन्म*

🌍 *मृत्यू*

👉 *2015 - भारतीय सन्यासी आणि तत्त्वज्ञान दयानंद सरस्वती   यांचे निधन*
👉 *2012 - जादूगार कांतीलाल गिरीधारीलाल ऊर्फ के लाल जादूगार  यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आजच्या बातम्या*

१.टेरर फंडिंगप्रकरणी NIA ची मोठी कारवाई  पॉप्युलर फ्रंटच्या कार्यालयांवर राज्यभर छापेमारी, टेरर फंडिंग प्रकरणी 20 हून अधिक संशयितांना अटक. देशभरात 15 राज्यातील 93 ठिकाणी छापेमारी, 45 जणांना अटक  बंदी घातलेल्या सिमीचा नवा अवतार पीएफआय? जाणून घ्या ही संघटना आहे तरी काय 

२.राज्यातील 56 शहरात मुस्लिमांचे सर्व्हेक्षण होणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, तसा कोणताही निर्णय नाही 

३.पुण्यातील रूपी बँकेला हायकोर्टाचा दिलासा, परवाना रद्द करण्याच्या निर्देशाला 17 ऑक्टोबरपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती 

४. 'तुम्ही मला संपवू शकत नाहीत', देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार.. 2019 मध्येच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मिळून संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप 

५.दसरा मेळाव्याच्या शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सुनावणी; वकिलांच्या विनंतीवरून सुनावणी उद्यापर्यंत तहकूब  महापालिकेचं ठरलं, शिवाजी पार्क कुणालाच नाही! मनपाचं पत्र माझाच्या हाती  'गनिमी काव्यानं घेणार दसरा मेळावा', शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेचे ओपन चॅलेंज 

६.मुस्लीम धर्मगुरु इमाम इलियासी यांच्यांकडून सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपित्याची उपमा, दोन्ही धर्मीयांचा NDA एकच असल्याचा दावा 

७.'गोधन खतरे मे' म्हणणारे नेते आता एक शब्दही बोलत नाहीत, लम्पी स्कीनवरुन रोहित पवारांचा भाजपला टोला  लम्पी झालेल्या गायीचे दुध प्यायल्यास माणसांना लम्पी रोग होतो का? आरोग्य मंत्री भारती पवार म्हणाल्या.. 

८.उद्या अहमदनगर ते आष्टी मार्गावर पहिली प्रवासी रेल्वे धावणार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे आणि मुख्यमंत्री दाखवणार रेल्वेला हिरवा झेंडा 

९.नाशिक बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी 21 पोलिसांवर गुन्हा दाखल, सिव्हीलचे डॉक्टर्स फरार

१०.यंदाचा विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्कार जेष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना जाहीर 

*स्पेशल*

१. Beed News : पाण्यातून जाणारी जीवघेणी वाट, बीडच्या हिंगणी आणि मुंडे वस्तीतील नागरिकांचा संघर्ष 

२. धक्कादायक! औरंगाबादच्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने गळफास घेऊन केली आत्महत्या, शहरात खळबळ 

३. आता BHIM अॅपला क्रेडिट कार्ड जोडा आणि डिजिटल पेमेंट सुलभ, सुरक्षितपणे करा 

४. Kaas Pathar : कास पठाराच्या पर्यावरणपूरक पर्यटनाला मिळणार चालना, पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते ई-बस व बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण 

५. Ratan Tata : उद्योजक रतन टाटा यांच्यावर मोठी जबाबदारी, पीएम केअर फंडाच्या विश्वस्तपदी नेमणूक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*  ❂ देशभक्ती गीत ❂* 
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

. *✸ जय जवान जय किसान✸*
     ➖➖➖➖➖➖➖
एक सूर एक ताल, एक गाऊ विजयगान
जय जवान, जय किसान !
जय जवान, जय किसान, जय जय !

अखिल देश पाठीशी, 'जवान' व्हा रणी चला
किसान होऊनी कसा, भूमी सस्य श्यामला
यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान
जय जवान, जय किसान !

शत्रू मित्र जाणुनी सावधान सर्वदा
आपल्या श्रमे करू प्रसन्‍न देवी अन्‍नदा
उभ्या जगात आपुली सदैव उंच ताठ मान
जय जवान, जय किसान !

अजिंक्य सैन्य आमचे, गाजवी पराक्रमा
भूमिदास दाखवी निर्मितीत विक्रमा
स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधू आसमान
जय जवान, जय किसान !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*     ❂ प्रार्थना ❂*
━┅━➖➖➖➖━┅━

  *✹धार वज्राची मिळू दे !✹*
➖➖➖➖➖➖➖➖➖
गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !

पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटतांना दर्वळू दे !

लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*    ❂ बोधकथा ❂*
━═➖➖➖➖➖➖═━

.  *❃❝ गरुड झेप..!! ❞❃*
   ━═•➖➖➖➖➖•═━
    एकदा एका राजाने दोन गरुडाचे पिल्लं आणले. त्यातला एक गरुड राजाने आपल्या हातावर घेतला आणि हाताला झटका देऊन त्याला आकाशात उडवले. लगेच तो आकाशात उंचच उंच झेप घ्यायला लागला, तर दुसरा मात्र आपल्या फांदीवर बसूनच होता. तो उडेचना. हे पाहून राजा फार दुःखी झाला.

    त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली, की 'जो कोणी त्याच्या दुसऱ्या गरुडाला आकाशात उडायला लावील. त्याला सुवर्ण मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येतील.'

     हे ऐकून बक्षिसाच्या मोहाने अनेक लोक आले, पण कोणीही गरुडाला उडवू शकले नाही. तेव्हा दवंडी ऐकून एक गरीब शेतकरी राजाकडे आला आणि मी गरुडाला उडवण्याचा प्रयत्न करतो अशी त्याने राजाला विनंती केली. अनेक रथी-महारथी थकले, तिथे हा फाटका काय करणार असा विचार राजाच्या मनात आला, पण गरुड उडणे आवश्यक होते, म्हणून त्याने त्याला संमती दिली.

    शेतकरी गरुडाकडे गेला आणि परत आला. राजाने विचारले, "काय रे, उडाला काय गरुड?" तेव्हा शेतकऱ्याने आकाशाकडे बोट दाखवले. राजाने बोटाच्या दिशेने आकाशाकडे बघितले आणि काय आश्चर्य! तो दुसरा गरुड आकाशात पहिल्यापेक्षा उंच भराऱ्या घेत होता. राजा आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला..!!
   त्या धक्क्यातून सावरल्यावर त्याने शेतकऱ्याला विचारले, "अरे, तू हे कसे केलेस?"

   तेव्हा शेतकरी म्हणाला, "मी काही फार वेगळं केलं नाही. मी फक्त तो गरुड बसलेला होता, ती फांदी मोडून टाकली! त्याचबरोबर त्याने उंच आकाशात भरारी घेतली!!"
   आयुष्यात अनेक जण असेच कोणत्यातरी फांद्यांना चिकटून बसलेले असतात. कोणी त्यांच्या शेती-वाडीला, कोणी परंपरागत व्यवसायाला, तर कोणी छोट्या-मोठ्या नोकऱ्यांना! या छोट्या-मोठया फांद्यांना चिकटून राहून मिळेल त्यावर भागवण्याच्या नादात आपल्यातला गरुडच ते विसरून जात असतात..!!
     मिळेल ती नोकरी धरायची. मग घर घ्यायचं. मुलं झाली की, त्यांचं शिक्षण, मग त्यांचं सेटलमेंट, लग्न, हे सारं करत-करत निवृत्त व्हायचं, बस्स, संपलं आयुष्य! यालाच मध्यमवर्गीय कुपमंडुक मानसिकता म्हणतात!

     अरे कधीतरी स्वतःमध्ये डोकावून बघा! आयुष्य म्हणज फक्त इतकंच आहे काय? तुमची फांदी तोडायला कोणीही येणार नाही, हे लक्षात असू द्या. तुम्हाला जर आकाशात उंच उडायचं असेल, तर तुमची तुम्हालाच तोडावी लागेल ती फांदी! कधीतरी स्वतःच तोडून तर बघा! तुम्ही जितकं समजताय ना त्याहूनही अधिक करण्यासारखं खूप आहे हो आयुष्यात! जग खूप मोठं आहे. विशाल आहे, पण तुम्हीच स्वतःला पारंपरिक मध्यमवर्गीय मानसिकतेच्या चार भिंतींमध्ये कोंडून घेतलंय आणि त्याहूनही अधिक चिंतेची बाब म्हणजे त्या चार भिंतींनाच तुम्ही विश्व समजत आहात!

   ठीक आहे, तुम्ही जगला आणि जगत असाल असं, पण कृपया तुमच्या मुलांना तरी या फांद्यांना नका बांधून ठेवू! त्यांना तरी उडू द्या स्वच्छंद अन मनसोक्तपणे आकाशात. शक्य झालंच तर तुम्ही मोडून टाका त्यांच्या फांद्या!
मग बघा तुमच्या फांदीवरचा तो पक्षी कसा दिगंतराला जातो...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━➖➖➖➖➖═┅━

. *मन ओळखणारयांपेक्षा मन*
     *जपणारी माणसं हवीत...*
          'कारण, ओळख ही 
     क्षणभरासाठी असते तर 
   *जपवणूक आयुष्यभरासाठी!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━➖➖➖➖━┅━

 *✿ भारतातील पहिले ✿*
  ➖➖➖➖➖➖➖➖➖
■ *पहिले जलविद्युत यंत्र- 
    ➜ *दार्जिलिंग (१८९७-९८)*

■ *पहिला आकाशवाणी केंद्र-
    ➜ *मुंबई (१९२७)*

■ *पहिला बोलपट- 
    ➜ *आलमआरा (१९३१)*

■  *पहिली पंचवार्षिक योजना- 
    ➜ *१९५१*

■  *पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- 
    ➜ *१९५२*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━➖➖➖➖➖➖═━

. *❒ ♦राव तुलाराम सिंह♦❒*  
                  (राव बहादुर)
     ━═•●◆●★★●◆●•═━
●जन्म :~ ९ डिसेंबर १८२५
            (रामपुरा, रेवाडी, पंजाब)
●मृत्यु :~ २३ सप्टेंबर १८६३
            ( काबूल, अफगानिस्तान)

◆वडिल : राव पुरण सिंह
◆आई : राणी ज्ञान कौर

       राव तुला राम सिंह हरियाणाचे जहागीरदार होते. १८५७ च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख क्रांतिकारकांपैकी एक होते. त्यांना हरियाणा राज्यातील 'राज नायक'  मानले जाते. त्यांनी नसिबपुर येथे इंग्रजांसोबत लढाई केली. यामध्ये पाच हजारांहून जास्त सैनिक मारले गेले. त्यानंतर नवराने येथे इंग्रजांशी दुसरी लढाई केली पण पराभवच पदरात पडला. पुढील रणनीती आखण्यासाठी तात्या टोपे यांच्या भेटीला गेले पण त्यांना इंग्रजांनी बंदी बनविल्यामुळे त्यांनी दुसऱ्या देशातील शासकांशी संपर्क साधला. १८५७ चा हरियाणाच्या दक्षिण-पश्चिम भागातील संपूर्ण ब्रिटिश राजवटीला तसेच दिल्ली शहरातील विद्रोही सैनिकांना युद्धसामग्री पुरविण्याचे श्रेय त्यांना जाते.  १८५७ लढ्यात भाग घेतल्यामुळे इंग्रजांनी  १८५९ मध्ये राव तुला राम सिंह यांची रियासत जप्त केली. परंतु त्यांच्या दोन्ही पत्नींचा संपत्तीवरील अधिकार कायम ठेवला. भारत मातेला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याच्या उद्देशाने इंग्रजांसोबत युद्ध करण्यासाठी त्यांनी आपल्या तीन सहकाऱ्यांसह सहाय्यता मागण्यासाठी इराण व अफगाणिस्तान येथील शासकांची  भेट घेतली. रशियाच्या जार सोबत संपर्क करण्याची त्यांची योजना होती पण या प्रयत्ना दरम्यानच २३  सप्टेंबर १८६३ ला काबूल येथे त्यांचे निधन झाले. अफगान सरकारने त्यांना मानवंदना देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते. १८७७  ला त्यांचे पुत्र राव युधिष्ठिर सिंह यांना प्रमुख पदी बसवून त्यांची उपाधी परत करण्यात आली. 
      २३ सप्टेंबर २००१ मध्ये भारत सरकारने महाराजा राव तुलाराम सिंह यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तिकीट जारी केले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩
*मिलिंद व्हि वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज  कान्द्री-माईन*
*9860214288*
🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩🧩
*⚜️आझादी का अमृत महोत्सव ⚜️*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬
     संकलन ~ सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
                    चंद्रपूर, 9403183828
➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  
🙋🏻‍♂️⛓️💥🇮🇳👨🇮🇳💥⛓️🙋🏻‍♂️
    
              *यूसुफ़ मेहरअली*                                                           (भारत छोडो आंदोलन के असली नायक)

   *जन्म : 23 सितंबर 1903*
      (मुम्बई, महाराष्ट्र)
    *मृत्यु : 2 जुलाई, 1950*          
पूरा नाम : यूसुफ़ जफर मेहरअली                                                       नागरिकता : भारतीय
प्रसिद्धि : स्वतंत्रता सेनानी और राजनीतिज्ञ
पार्टी : कांग्रेस
पद : कांग्रेस सोशलिस्ट के संस्थापक
शिक्षा : 1920 में दसवीं, 1925 में स्नात्तक
जेल यात्रा : 1934 में ब्रिटिश राज पर षड्यन्त्र रचने के आरोप में गिरफ्तार कर लिया और उन्हें दो वर्ष की कठोर कारावास की सजा सुनाई।
विशेष योगदान : युसूफ़ मेहरअली ने (1930) के नमक सत्याग्रह में हिस्सा लिया।
                         यूसुफ़ मेहरअली  स्वतंत्रता सेनानी तथा समाज सुधारक थे। यूसुफ़ ने मज़दूर और किसान संगठन को मज़बूत कराने में योगदान दिया तथा इसी कारण स्वतंत्रता संग्राम के दौरान आठ बार जेल में जाना पड़ा। मेहरअली कांग्रेस सोशलिस्ट के संस्थापकों में से एक थे।

💁🏻‍♂️ *परिचय*
यूसुफ़ जफर मेहरअली का जन्म 23 सितंबर, 1903 को मुम्बई के अभिजात्य वर्गीय खोजा मुस्लिम परिवार में हुए था। उन्होंने कलकत्ता और मुम्बई से अपनी शिक्षा प्राप्त की। यूसुफ़ ने सन 1920 में दसवीं की परीक्षा तथा 1925 में स्नात्तक की परीक्षा उत्तीर्ण की। मीनू मसानी, अशोक मेहता, के.एफ. नरीमेन, अच्यूत पटवर्धन, जयप्रकाश नारायण तथा कमला देवी चट्टोपाध्याय उनके कुछ निकट सहयोगी थे।

⛓️👱‍♂️⛓️ *जेल यात्रा*
यूसुफ़ मेहरअली ने 1930 के नमक सत्याग्रह में हिस्सा लिया। सन 1934 में ब्रिटिश राज पर षड्यन्त्र रचने के आरोप में उन्हें गिरफ्तार कर लिया गया और उन्हें दो वर्ष के कठोर कारावास की सजा सुनाई गई। मेहरअली कांग्रेस सोशलिस्ट के संस्थापकों में से एक थे। उन्होंने 1940 के विशिष्ट सत्याग्रह में हिस्सा लिया और दोनों अवसरों पर उन्हें गिरफ्तार कर सलाखों के पीछे पहुंचा दिया गया।

📚✍️ *रचनाएँ*
यूसुफ़ मेहरअली द्वारा रचित निम्न पुस्तकें हैं:-

वॉट टू रीड: ए स्टडी सिलेबस (What to Read: A Study Syllabus) (1937)
लीडर ऑफ इण्डिया (Leaders of India) (1942)
ए ट्रिप टू पाकिस्तान (A Trip to Pakistan) (1944)
द मोर्डन वर्ल्ड: ए पॉलिटिकल स्टेडी स्लेवस पार्ट-1 (The Modern World: A Political Study Syllabus Part-1) (1945)
द प्राइज ऑफ लिबर्टी (The Price of Liberty) (1948)

🪔 *निधन*
यूसुफ़ मेहरअली का निधन 1950 में 47 वर्ष की अल्पायु में हुआ था।
          🇮🇳 *जयहिंद*🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏
     
                                                                    
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा