26 सप्टेंबर दिनविशेष


*26 सप्टेंबर दिनविशेष 2022 !*
    
          🧩 *सोमवार* 🧩


💥 *घटस्थापना*
💥 *संत बहिणाबाई पुण्यतिथी*
         
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *2001 - सकाळ वृत्तपञाचे व्यवस्थापीकीय संपादक संचालक प्रताप फवार यांची इंडीयन न्युजपेपर सोसायटी च्या अध्यक्षपदी निवड*         
👉 *2009 - टायसन केत्साना या चक्रिवादळाच्या तडाख्यात फिलिपाईन्स,चीन, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस व थायलंड मध्ये 600 लोक मृत्यूमुखी*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*

👉 *1932 - मनमोहन सिंग- भारतीय माजी पंतप्रधान व अर्थतज्ञ  यांचा जन्म*
👉 *1981 - सेरेना विल्यम्स अमेरिकन लाॅन टेनिस खेळाडू   यांचा जन्म*

🌍 *मृत्यू*

👉 *2002 - राम फाटक मराठी संगीतकार, गायक यांचे निधन*
👉 *2020 - इशर जज अहुलवालिया भारतीय अर्थशास्त्रज्ञ यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आजच्या बातम्या*

१.गोंदियात 120 विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये कोंबून प्रवास, श्वास गुदमरल्याने काही जण बेशुद्ध, मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेचा बेजबाबदारपणा

२.पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा दिलेल्या व्हिडीओचा फॉरेन्सिक तपास होणार; पुणे पोलिसांची   पुरावे असून बंदी का नाही? PFI चा फायदा भाजपालाच; काँग्रेसचे टीकास्त्र  मनसे पदाधिकाऱ्यांकडून औरंगाबादमध्ये PFI कार्यालय फोडण्याचा प्रयत्न 

३. 'आता माझ्यासोबत अनुभवी फडणवीस, त्यामुळं काही कमी पडणार नाही'; माथाडी मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महत्वाच्या घोषणा ..तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात अडीच लाख मराठा तरूण उद्योजक झाले असते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका 

४. 'वर्षा' सोडताना नवरीसारखं सोंग केलं; संदिपान भुमरेंची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका आदित्य ठाकरे गोबेल्स नीती अवलंबत आहेत, दीपक केसरकरांचा हल्लाबोल 

५. एसटीमधील अनेक महिला कर्मचारी बालसंगोपन रजेपासून वंचित; निर्णयावर अंमलबजावणी नसल्याने नाराजी 

६. 'भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्याचं लक्ष्य, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था', संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं वक्तव्य

७. मजुरांवर काळाचा घाला! नांदेडमध्ये आयशर आणि ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण ठार बेळगावमधील सौंदत्तीत तीन वाहनांचा भीषण अपघात, चार जण जागीच ठार 

८. मुकेश अंबानी मुख्यमंत्र्यांना भेटायला वर्षा बंगल्यावर; शनिवारी रात्री उशीरा झालेल्या दीड तासांच्या भेटीबाबत कमालीची गुप्तता  अंबानी-अदानी यांच्या महाराष्ट्रातील बड्या राजकारण्यांच्या भेटी, चर्चांना उधाण 

९. 14,000 कोटींची एफडी, 14 टन सोनं आणि 85 हजार कोटींची मालमत्ता; तिरूपती बालाजी मंदिराची संपत्ती जाहीर 

१०. IND vs AUS, T20 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी टी20 असणार निर्णायक, कधी, कुठे पाहाल सामना?   Road Safety World Series: आज पुन्हा सचिनची बॅट तळपणार? भारतीय दिग्गज बांगलादेश लीजेंड्सशी भिडणार 

*स्पेशल*

१.Mann Ki Baat : चंदीगडच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव 'शहीद भगतसिंह विमानतळ'; 'मन की बात'मधील महत्वाचे 10 मुद्दे 

२.International Daughter's Day 2022 : प्रत्येक आई- वडिलांसाठी मुलगी असते खास; काय आहे 'डॉटर्स डे' चा इतिहास? 

३.Mumbai BEST Bus : नवरात्रीनिमित्त मुंबईकरांसाठी बेस्टची भन्नाट ऑफर; 19 रुपयांत 10 वेळा करता येणार प्रवास 

४.Rules Change from 1st October 2022: एक ऑक्टोबरपासून बँकिंग आणि डिमॅटबाबत नियमात होणार बदल

५.Nandurbar  Agriculture News :  पारंपारिक शेतीला फाटा देत 'गवती चहा'ची शेती, 250 एकरवर यशस्वी प्रयोग 

६.यूपीच्या विधानसभेत भाजप आमदार व्हिडीओ गेम खेळण्यात अन् तंबाखू मळण्यात व्यस्त
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═➖➖➖➖═━┅

*👉जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा करतात ?*
*🥇५ जून*

*👉कोणत्या रक्तगटाला सर्वग्राही रक्तगट म्हणतात ?*
*🥇AB*

*👉उष्णतेचे एकक काय आहे ?*
*🥇कॅलरी*

*👉जैन धर्माचे संस्थापक कोण आहेत ?*
*🥇वर्धमान महावीर*

*👉जगातील सर्वांत उंच प्राणी कोणता ?*
*🥇जिराफ*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
*👍मूल्यांकन👎*  

 *एका महात्म्याच्या शिष्यांमध्ये एक राजकुमार आणि एक शेतकऱ्याचा मुलगा होता. राजकुमाराला राजपुत्र असण्याचा अहंकार होता.मात्र शेतकऱ्याचा मुलगा विनम्र आणि कर्मठ होता.राजकुमाराचे वडील अर्थात तेथील राजा दरवर्षी एका स्पर्धेचे आयोजन करीत असत. त्यात बुद्धिमत्ता आणि दृष्टीची पारख केली जात असे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूरदूरचे राजकुमार येत असत. अध्ययन पूर्ण झाल्यावर राजकुमाराने शेतकऱ्याच्या मुलालाही या स्पर्धेत सामील होण्याचे आमंत्रण दिले. कारण त्याला तेथे बोलावून त्याचा अपमान करण्याचे त्याच्या मनात होते. जेंव्हा शेतकऱ्याचा मुलगा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचला तेंव्हा त्याला राजकुमार आणि राजपुत्रांमध्ये बसण्यास मनाई केली.*

              *शेवटी शेतकऱ्याचा मुलगा वेगळा बसला. राजाने प्रश्न विचारला,"तुमच्यासमोर जर जखमी वाघ आला तर तुम्ही त्याच्यावर उपचार कराल का त्याला तसेच सोडून निघून जाल ?" सर्व राजपुत्रांचे उत्तर हे एकच होते. "आम्ही आमचा जीव धोक्यात घालून वाघावर उपचार करणार नाही." मात्र शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला," मी जखमी वाघावर उपचार करेन कारण जखमीचा जीव वाचविणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. माणूस होण्याच्या नात्याने माझे हे कर्म आहे. मांस खाणे हे जर वाघाचे कर्म असेल तर तो बरा झाल्यावर माझा जीव का घेईना ? त्यात त्याचा दोष नाही. माणूस म्हणून मी त्याच्यावर उपचार करणे हे माझे आद्यकर्तव्य आहे." हे उत्तर ऐकताच राजाने त्या मुलाला विजयी घोषित करून राज्याचे मंत्रिपद दिले.*

*🧠तात्पर्य:- व्यक्तीचे मुल्यांकन हे त्याच्या विचारातून होत असते. त्याच्या राहणीमानावरून कि त्याच्या दिसण्यावरून होत नसते. कधी कधी साधारण दिसणारी माणसे असाधारण कार्य करतात.*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद व्हि वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन* 
*8860214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿
📚💥⛓️🇮🇳👨🏻🇮🇳⛓️💥📚
       
           *बॕरिस्टर नाथ बापू पै*
               (स्वातंत्र्य सैनिक)

     *जन्म : 25 सप्टेंबर 1922*
               वेंगुर्ला , भारत
  *मृत्यू : 18 जानेवारी 1971*
              (वय 48)
राजकीय पक्ष : प्रजा सोशलिस्ट     
                     पार्टी
खासदार, लोकसभा : 1957–
                                1971
मतदार संघ : राजापूर
                 नाथ बापू पै हे स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू आणि निष्णात घटनातज्ञ. जन्म वेंगुर्ले येथे. तेथेच प्राथमिक शिक्षण. बेळगावच्या लिंगराज कॉलेजमधून अर्थशास्त्र घेऊन बी. ए. (१९४७). नंतर लंडनच्या लिंकन्स इनमधून बार अट लॉ (१९५५). त्यांचे वडील लहानपणीच वारले. आई तापी आणि वडीलबंधू अनंत (भाई) यांच्या संस्कारांचा नाथांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत मोठा वाटा होता. संस्कृत, मराठी, इंग्रजी या भाषांवर त्यांनी लहानपणीच प्रभुत्व मिळविले व वक्तृत्व गुणाचाही परिपोष केला. विल्यम शेक्सपिअर, पर्सी शेली, जॉर्ज बायरन इत्यादींच्या साहित्याचे आणि विदग्ध संस्कृत वाङ्‌मयाचे परिशीलनही त्यांनी केले होते. १९६० साली क्रिस्टल मिशेल या ऑस्ट्रियन युवतीशी त्यांनी विवाह केला. त्या सध्या व्हिएन्ना येथे भारत सरकारच्या परराष्ट्र विभागात काम करतात. महाविद्यालयात असतानाच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली.
                    तत्कालीन भूमिगत चळवळींमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. टपाल-कचेऱ्या लुटणे, पोलीस-कचेऱ्यांवर हल्ला करणे इ. कारणांसाठी त्यांच्यावर त्यावेळी खटले भरण्यात आले. तुरुंगातील बेदम मारामुळे त्यांच्या हृदयावर विपरीत परिणाम झाला. १९४६ च्या प्राथमिक शिक्षकांच्या संपात, तसेच गोवामुक्ती आंदोलनात ते सहभागी झाले. १९४७ साली ते इंग्लंडला गेले. तेथील इंटरनॅशनल नाथ पै युनियन ऑफ सोशॅलिस्ट यूथचे ते सहा वर्षे अध्यक्ष होते. मजूर पक्षाच्या कामगार संघटनांतून काम करीत असताना फ्रेनर ब्रॉक्वे, रेजिनल्ड सरेनसन इ. मजूर नेत्यांशी त्यांचा निकटचा संबंध आला. गोवामुक्तीसाठी रोममध्ये पोर्तुगीज वकिलातीसमोर त्यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली होती. ज्ञानसंपन्नत्ता व अखंड व्यासंगीवृत्ती तसेच गरिबांविषयीची कळकळ, हे त्यांचे स्थायीभाव होते. बेळगावच्या प्रश्नावर त्यांनी सतत लढा दिला. साराबंदी चळवळीत प्रामुख्याने भाग घेतले (१९६०). त्याच वर्षीच्या सरकारी नोकरांच्या संपाचे ते प्रमुख होते. त्यात त्यांना अटक झाली.
                      लोकसभेत त्यांचा स्पष्टवक्तेपणा, निर्भयपणा व चिकित्सक अभ्यास हे गुण दिसून येत. सुसंस्कृत राजकारणी (जंटलमन पोलिटिशिअन) अशा शब्दांत पं. नेहरूंनी त्याचा गौरव केला आहे. जगातील अनेक राष्ट्रांच्या राज्यघटनांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. गोलकनाथ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध लोकसभेत त्यांनी घटनादुरुस्ती विधेयक मांडले. ‘ज्या घटनेत दुरुस्ती होऊ शकत नाही, ती मृतवत होय’, असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यांच्या या विधेयकाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली. रोजगारी हा मूलभूत हक्क आहे आणि तो देता येत नसेल, तर सरकारने बेकारी भत्ता मंजूर करावा, असेही एक विधेयक त्यांनी मांडले होते. आणि आणीबाणीत न्यायालयात दाद मागता येत नाही, म्हणून घटनेतील त्या संबंधीचे ३५९ वे कलम रद्द करावे, असेही विधेयक त्यांनी मांडले. आपली वाणी व बुद्धी त्यांनी जनहितासाठी राबविली. शासनसत्तेचे अधिष्ठान तत्त्वतः लोकशक्तीत असते, अशी त्यांची धारणा होती. कोकण रेल्वे व कोकण विकासासाठी ते आयुष्यभर झगडले.
               १९७० मध्ये महाबळेश्वर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते उद्‌घाटक होते. चेकोस्लोव्हाकिया व हंगेरी या देशांतील रशियन सैनिकी कारवायांविरुद्ध लोकसभेत त्यांनी केलेली भाषणे उल्लेखनीय आहेत (१९५६). अशी त्यांची अत्यंत महत्त्वाची निवडक भाषणे लोकशाहीची आराधना (१९७२) या पुस्तकात संग्रहीत केलेली आहेत. हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी १७ जानेवारी १९७१ रोजी ते बेळगावला गेले. तेथील सभेत भाषण झाल्यावर हृदयविकाराने त्यांचे आकस्मिक निधन झाले.
          
          🇮🇳 *जयहिंद*🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏
                                                                                                                                                                                                                                                        ➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा