*27 सप्टेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *मंगळवार* 🧩
💥 *जागतिक पर्यटन दिन*
💥 *राष्ट्रीय ग्रंथालय दिन*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1998 - साली निर्मीती गुगल ने सन 2006 सालापासून 27 सप्टेंबर या दिवशी आपला जन्मदिन साजरा करण्यास सुरुवात केली*
👉 *1980 - युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन ने 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*
👉 *1932 - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिन्दी चिञपट निर्माते व दिग्दर्शक तसच यशराज फिल्मस या चिञपटांची निर्मीती हा वितरण कंपनीचे संस्थापक अध्यक्ष यशराज चोप्रा यांचा जन्म*
👉 *1907 - महान भारतीय क्रांतिकारक भगतसिंग यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*
👉 *2015 - भारतीय कार्यकर्ते आणि लेखक काॅलन पोकुकुडन यांचे निधन*
👉 *2012 - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक संजय सूरकर यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आजच्या बातम्या*
१.राज्यभरात नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात, देवीच्या शक्तीपीठांसह राज्यभरात वेगवेगळ्या देवस्थानात आणि घरोघरी घटस्थापना ठिकठिकाणी सार्वजनिक नवरात्री मंडळाकडून देवीची प्रतिष्ठापना
२. "सत्तांतर होताच विरोधकांना मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का?"; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा विरोधकांना सवाल चौफेर टीकेनंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून दिलगिरी व्यक्त तानाजी सावंतांच्या वक्तव्याचा विपर्यास केला; चंद्रकांत पाटलांनी घेतली तानाजी सावंतांची बाजू
3. आमदार बांगर यांच्या गाडीवर हल्ला प्रकरणी 11 जण ताब्यात; बांगर म्हणाले, ...अन्यथा 'एक घाव दोन तुकडे केले असते'
4. मुंबईत रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीवर आरटीएचे शिक्कामोर्तब, येत्या शनिवारपासून होणार अंमलबजावणी
5. नाशिकमध्ये लष्करी हद्दीत पुन्हा ड्रोन उडाला, गृह विभागाकडून गंभीर दखल, नाशिक पोलिसांची विशेष बैठक
6. त्रिसदस्यीय समितीच पाहणार शिर्डी साईसंस्थानचं कामकाज; विश्वस्त मंडळाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच, नोटीसा जारी
7. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, 'अधीश'च्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणारच; राणेंची याचिका फेटाळली
8. 'जाहिरातींचा त्रास होत असेल तर टीव्ही बंद करा'; मांसाहाराच्या जाहिरातींविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली
9.. शेअर बाजारासाठी 'ब्लॅक मंडे'; Sensex 953 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान शेअर बाजारातल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे चार दिवसांत 14 लाख कोटी रुपये पाण्यात
*स्पेशल*
१.Amol Kolhe : महाराजांची भूमिका साकारणं मोठी जबाबदारी... 'शिवप्रताप गरुडझेप' अवघ्या देशाचं लक्ष वेधणार : डॉ. अमोल कोल्हे
२.Navratri 2022 : नवरात्रीसाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ, नवरात्र मंडळांना भरभक्कम देणग्या, मंडळांचे यंदाचे रेट कार्ड काय?
३.भारतातील पहिल्या चावी आँकोलॉजी इमेज बँकेची स्थापना, कॅन्सरवरील संशोधनाला मिळणार चालना
४.ABHA Health Card : आता नागरिकांसाठी 'आभा हेल्थ कार्ड'; कसं कराल रजिस्ट्रेशन?
५.प्रतीक्षा संपली! नवीन Maruti Grand Vitara भारतात लॉन्च
६.Navratri 2022 : कोरोनाच्या दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात
७.Champa singh Thapa : 'मातोश्रीचा सेवक' शिंदे गटात; बाळासाहेबांचे सहाय्यक चंपासिंह थापांची शिंदेना साथ
८.पोलिस निरीक्षकासोबत वाद, अपमानित झाल्याच्या भावनेतून आत्महत्येचं स्टेटस ठेऊन कर्मचारी गायब
९.Nashik DRDO परिसरात ड्रोनच्या घिरट्या, संरक्षण विभागाकडून गंभीर दखल
१०.Chandrashekhar Bawankule: वेदांता फॉक्सकॉन बद्दल आदित्य ठाकरे आणि इतर नेते खोटे बोलत आहेत
११.Sharad Pawar Speech: सत्यशोधक समाज हा फक्त धार्मिक सुधारणा बदलाव्यात असा म्हणत नव्हता- शरद पवार
१२.Radhakrishna Vikhe Patil: अडीच वर्षे मविआकडून मराठा आरक्षणाबाबत काय झालं ते सगळ्यांना माहित- पाटील
१३.Champa Singh Thapa Join Shinde Group : बाळासाहेबांचे विश्वासू चंपासिंह थापा शिंदे गटात
➖➖➖➖➖➖➖➖➖
*GENERAL KNOWLEDGE*
◆ Name the smallest continent?
Ans. : *Australia*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*STORY TELLING*
*The Golden Touch Of Midas*
A long time ago, there lived a king in Greece named Midas. He was extremely wealthy and had all the gold he could ever need. He also had a daughter whom he loved very much.
One day, Midas saw a Satyr (an angel) who was stuck and was in trouble. Midas helped the Satyr and asked for his wish to be granted in return.
The Satyr agreed and Midas wished for everything he touched to be turned to gold. His wish was granted.
Extremely excited, Midas went home to his wife and daughter touching pebbles, rocks, and plants on the way, which turned into gold.
As his daughter hugged him, she turned into a golden statue.
Having learnt his lesson, Midas begged the Satyr to reverse the spell who granted that everything would go back to their original state.
*Moral of the story :*
Stay content and grateful for what you have. Greed will not get you
➖➖➖➖➖➖➖➖➖
*SPECIAL INTRODUCTION*
*Raja Ram Mohan Roy*
Raja Ram Mohan Roy is considered as the pioneer of modern Indian Renaissance for the remarkable reforms he brought in the 18th and 19th century India. Among his efforts, the abolition of the brutal and inhuman Sati Pratha was the most prominent. His efforts were also instrumental in eradicating the purdah system and child marriage. In 1828, Ram Mohan Roy formed the Brahmo Samaj, uniting the Bhramos in Calcutta, a group of people, who had no faith in idol-worship and were against the caste restrictions. The title 'Raja' was bestowed upon him by the Mughal emperor Akbar II, in 1831. Roy visited England as an ambassador of the Mughal King to ensure that Bentick's regulation banning the practice of Sati was not overturned. He died of meningitis in 1833 while residing in Bristol, England.
Raja Ram Mohan Roy was born on August 14, 1774 to Ramakanta Roy and Tarini Devi in Radhanagar village of Hoogly district, Bengal Presidency. His father was a wealthy Brahmin and orthodox individual, and strictly followed religious duties. At the age of 14 Ram Mohan expressed his desire to become a monk, but his mother vehemently opposed the idea and he dropped it.
Following the traditions of the time, Ram Mohan had a child marriage at age nine but his first wife died soon after the marriage. He was married for a second time at ten and had two sons from the marriage. After the death of his second wife in 1826, he married for a third time and his third wife outlived him.
Post completion of his education, Rammohan entered the services of the East India Company as a clerk. He worked in the Collectorate of Rangpur, under Mr. John Digby. He was eventually promoted to be a Dewan, a post that referred to a native officer entrusted with the role of collecting revenues.
During the late 18th century (what was known as the Dark Age), the society in Bengal was burdened with a host of evil customs and regulations. Elaborate rituals and strict moral codes were enforced which were largely modified, and badly interpreted ancient traditions. Practices like child marriage (Gouridaan), polygamy and Sati were prevalent that affected women in the society. The most brutal among these customs was the Sati Pratha. The custom involved self-immolation of widows at their husband’s funeral pyre. While the custom in its original form gave choice to the women to do so, it gradually evolved to be a mandatory custom especially for Brahmin and higher caste families. Young girls were married to much older men, in return for dowry, so that these men could have the supposed karmic benefits from their wives’ sacrifice as Sati. More often than not the women did not volunteer for such brutality and had to be forced or even drugged to comply.
Ram Mohan Roy was educated in traditional languages like Sanskrit and Persian. He came across English much later in life and learned the language to get better employment with the British. But a voracious reader, he devoured English literature and journals, extracting as much knowledge as he could. He realised that while traditional texts like Vedas, Upanishads and Quran provided him with much reverence for philosophy, his knowledge was lacking in scientific and rational education. He advocated the introduction of an English Education System in the country teaching scientific subjects like Mathematics, Physics, Chemistry and even Botany. He paved the way to revolutionizing education system in India by establishing Hindu College in 1817.
Ram Mohan Roy was a staunch supporter of free speech and expression. He fought for the rights of vernacular press. He also brought out a newspaper in Persian called 'Miratul- Akhbar' (the Mirror of News) and a Bengali weekly called 'Sambad Kaumudi' (the Moon of Intelligence). In those days, items of news and articles had to be approved by the Government before being published. Ram Mohan protested against this control by arguing that newspapers should be free and that the truth should not be suppressed simply because the government did not like it.
Raja Ram Mohan Roy travelled to England in 1830 to request the Imperial Government to increase the royalty, received by the Mughal Emperor and to ensure that Lord Bentick's Sati Act would not be overturned. During his visit to United Kingdom, Raja Ram Mohan Roy died of meningitis at Stapleton in Bristol on 27 September, 1833. He was buried at the Arnos Vale Cemetery in Bristol. Recently, the British government has named a street in Bristol as 'Raja Rammohan Way' in the memory of Raja Ram Mohan Roy
➖➖➖➖➖➖➖➖➖
*PASAYDAN*
*SILENCE*
*All students will keep silence for two minutes.*
━➖➖➖➖➖➖➖➖═
*MILIND V. WANKHEDE*
*HEADMASTER*
*PRAKASH HIGHSCHOOL AND JUNIOR COLLEGE KANDRI MINE*
*9860214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖
🇮🇳 *स्वातंत्र्याचा अमृत महोत्स्व* 🇮🇳
➿➿➿➿➿➿➿➿➿
🇮🇳 *गाथा बलिदाना*
▬ ❚❂❚❂❚ ▬
संकलन ~ सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
चंद्रपूर, 9403183828
➿➿➿➿➿➿➿➿➿
⚜️📚🔥🇮🇳👳♀🇮🇳🔥📚⚜️
*समाजसुधारक*
*राजा राममोहन रॉय*
*जन्म : २२ मे १७७२*
(राधानगर, हुगळी,
बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत)
*मृत्यू : २७ सप्टेंबर १८३३*
(६३ वर्ष)
( ब्रिस्टल, इंग्लंड )
मृत्यूचे कारण : मेंदूज्वर
टोपणनावे : आधुनिक भारताचे
जनक
पदवी : राजा
वडील : रमाकांत राॕय
आई : तारिणीदेवी
प्रसिद्ध कामे : आत्मीय सभा,
ब्राह्मो समाज
ख्याती : सती बंदी, एकेश्वरवाद
राजा राममोहन रॉय यांना नवनिर्मितीचा काळ आणि आधुनिक भारताचे वडील मानले जाते. भारतीय सामाजिक आणि धार्मिक धर्मातच त्याच्या विशिष्ट क्षेत्र आहे.सतीची चाल कायदेशीरपणे बंद करणारे व अनेक भाषांतून प्रावीण्य मिळविलेले थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय होय.राजा राम मोहन रॉय यांना परंपरांनी जखडलेला भारत आणि सर्व परंपरा झुगारून देणारा भारत यांच्यामधील पूल अस म्हटल जात. त्यांच जीवन कार्य इतक प्रचंड आणि असाधारण आहे की त्याचा केवळ एकाच लेखात धावता आढावा घेणदेखील शक्य नाही.
राजा राममोहन रॉय भारतीय समाजसुधारक होते. त्यांचा जन्म बंगालमधील हुगळी गावातील ब्राह्मण कुटुंबात २२ मे १७७२ रोजी झाला.त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अमेरिका होती. त्यामुळे पर्शियन व अरेबिक शिकण्यासाठी त्यांना पाटणा येथे पाठविण्यात आले. त्यानंतर ते बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी तिबेट व बनारसला गेले. पर्शियन व अरेबिक भाषेत त्यांनी वेदांत ग्रंथ हे पहिले पुस्तक लिहले. १८१५ मध्ये कोलकत्ता येथे परतल्यावर त्याचे बंगाली भाषेत रुपांतर (भाषांतर) केले. त्यांना "राजा" हि पदवी मुगल सम्राट अकबर {द्वितीय} याने बहाल केली. मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते.राजा राममोहन रॉय यांना भारतात नव विचाराचे जनक म्हंटले जातात.त्यांनी सर्वप्रथम "ब्रह्मपत्रिका" नावाचे वृत्तपत्र सुरु केले.ते पहिले उच्चशिक्षित व्यक्ती होते. ते भारतातून इंग्लडला गेले.त्यांनी मूर्तीपूजेला, देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे,असे ते मानत होते. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता. भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती.त्यासाठी त्यांनी १८३० साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला. प्रथा, परंपराविरुद्ध लढा दिला. भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, व शिक्षणव्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली.त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरु केली.त्यांना भारतीय सुधारणेचे जनक म्हटले जाते. त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी मिरात-उल-अखबार हे पर्शियन वृत्तपत्र सुरु केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिदेन्शी कॉलेज सुरु केले.
💁♂ *जन्म आणि शिक्षण*
२२ मे १७७२ रोजी बंगालमधील राधानगर येथे जन्मलेल्या राममोहन यांच्या जडणघडणीत त्यांच्या माता-पित्यांच्या घराण्यांचा संबंध फार मोठा आहे. वडीलांकडील सर्व मंडळी आधुनिक शिक्षण घेतलेली आणि बहुतांश सरकार दरबारी मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणारी होती. त्यामुळेे त्यांच्या वडीलांनी वयाच्या नवव्या वर्षी त्यांना अरबी, फारसी या त्याकाळच्या सरकारात / व्यवहारात वापरल्या जाणार्या भाषा आणि शास्त्र शिकण्यासाठी पाटण्याच्या एका मदरशात (मुक्तब) पाठवल. मदरशामधे अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते.तिथ शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी आईच्या प्रभावामुळे, ज्यांच्या माहेरची मंडळी प्रामुख्याने पौरोहित्य करणारी होती, धार्मिक शिक्षण घेण्यासाठी म्हणून बनारस (काशी) इथ त्यांना पाठवण्यात आल. तिथ त्यांनी संस्कृत भाषेबरोबरच वेद, वेदांत, उपनिषदे अशा गोष्टींचा अभ्यास केला. सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी बनारस मधे वास्तव्य केल. हे अस दोन टोकाच्या किंवा पूर्ण वेगवेगळ्या व्यवस्थेत शिक्षण घेउन राम मोहन वयाच्या सोळाव्या वर्षी घरी परत आले. घरी परतल्यावर त्यांनी तुहफतूल मुवाहीद्दीन (एकेश्ववरवाद्यांना भेट) नावाचा अरबीत प्रस्तावना असणारा एक लेख फारसीमधे लिहीला. यामधे त्यांनी मूर्तीपूजेवर कडाडून टीका केली होती. त्यांच्यामते मूर्तीपूजा ही वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध होती. त्या लेखामुळ वडीलांशी त्यांचे पटेनास झाल आणि स्वत्:च घर सोडून निघून गेले.
राजा राममोहन रॉय हे आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक व ब्राह्यो समाकजाचे संस्थापक. . कृष्णचंद्र बंदोपाध्याय हे त्यांचे प्रतितामह बंगालमधील नवाबाच्या नोकरीत होते. नवाबाच्या दरबाराने ‘राय’ ही सन्मानदर्शक पदवी त्यांना दिली. त्यांचे पितामह ब्रजविनोद रॉय यांनी नवाबाची नोकरी सोडून दिली. रामकांत रॉय यांच्या कुळात वैष्णव संप्रदात होते. राममोहनांची माता तारिणीदेवी यांचे माहेर राममोहन रॉय याचे पिता आणि पितामह हे परमधार्मिक होते.
घरात देवपूजा आणि भागवताचे पठण नित्य चालत होते. राममोहन यांचे बंगाली, फार्सी व संस्कृत या तीन भाषांचे प्राथमिक अध्ययन घरीच झाले. वयाच्या अठराव्या वर्षी ते बिहारमधील पाटणा येथे अरबी आणि फार्सी यांच्या शिक्षणासाठी गेले. कुराणाचाही त्यांनी अभ्यास केला. मुल्ला व मौलवी त्यांचा अरबी, फार्सी पांडित्याने विस्मित होत. इस्लाम धर्मातील आणि सूफी संप्रदायातील त्यांची पारंगतता पाहून मातापित्यांनी संस्कृत अध्ययनासाठी त्यांची वाराणसीला रवाना केले. श्रुतिस्मृती-पुराणांचा, कुराणाचा आणि बायबलचा सखोल अभ्यास त्यांनी केला. वयाच्या सोळाव्या वर्षी ते आपल्या गावी परतले. त्या वेळी तुलनात्मक अध्ययन करून त्यांच्या लक्षात आले, की विविध देवदेवता व त्यांचे अवतार यांची आणि मूर्तीची पूजा करणे अयोग्य आहे. कारण एकच अद्वितीय परमेश्वर आहे.
त्यांनी आपले मूर्तिपूजाविरोधी विचार आपल्या पित्याला व मातेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. माता पिता आणि राममोहन यांच्यामध्ये जबरदस्त मतभेद उत्पन्न झाला. त्यांची मातापित्यावर श्रद्धा होती आणि विलक्षण भक्तीही होती. मतभेदामुळे राममोहन यांना घर सोडावे लागले. हिंदू समाज रचनेतील उच्चनीच जातिभेदही त्यांना अमान्य होता. त्यांनी भारतभर प्रवास केला. बौद्ध धर्म समजावून घेण्याकरिता बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा त्यांनी अभ्यास केलात्यासाठी तिबेटात गेले. तिबेटात प्रतिमापूजन, धर्मगुरुपूजन, मंत्रतंत्र व कर्मकांड या बाह्यांगांचा पसारा त्यांना दिसला.
त्या कर्मकांडावर तेथील धर्मगुरूंशी त्यांनी वाद केले. तेथील बौद्ध लोक चिडले. राममोहनांना ठार मारण्याचाही प्रयत्न झाला. या वेळी सुदैवाने दयाळू स्त्रियांनी त्यांना प्राणसंकटातून वाचविले आणि स्वदेशी सुरक्षितपणे पोहोचविले. १९७० मध्ये स्वगृही परतल्यावर मातापित्यांचा रागही निवळला होता; परंतु मातापित्यांची त्यांनी निराशा केली. त्यांची मूर्तिपूजाविरोधी व बहुदेवतावाद विरोधी मते अधिकच ताठर व कणखर बनली होती. भोवतालच्या समाज सनातनी व रूढिनिष्ठ असल्याने त्यांचा द्वेष करू लागला. पिताजींनी त्यांना घराबाहेर काढले.
तत्कालीन रीतीला अनुसरुन राममोहनांचे बालपणीच पहिले लग्न झाले होते. प्रथम पत्नीच लवकरच निवर्तल्यामुळे वडिलांनी १७८१ व १७८२ साली त्यांची दोन लग्ने लावून दिली. १८०० साली त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पुत्राचे नाव राधाप्रसाद असे ठेवले. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्याने घरची सांपत्तिक स्थिती ठीक असूनही त्यांना सरकारी नोकरी पत्करावी लागली. १८०३ मध्ये डाक्का येथील कलेक्टर टॉमस वुडफर्ड याचे दिवाणपद स्वीकारले. त्याच वेळी रामकांत रॉय निवर्तले. याच सुमारास राममोहनांनी ग्रंथलेखनास सुरुवात केली. फार्सी भाषेत त्यांनी ‘ईश्वरभक्तांस देणगी’ (तुहफास-उल्-मुवहिद्दीन) या अर्थाच्या शीर्षकाखाली एक निबंध प्रसिद्ध केला. त्याचे सार असे-सृष्टिकर्ता व पालनकर्ता एक निराकार परमेश्वर आहे. हा सिद्धांत सर्व धर्माचा पाया होय. निरनिराळ्या धर्माच्या लोकांनी या धर्मतत्त्वावर भलभलत्या कल्पनांचा डोलारा चढवला; त्यामुळे भिन्नभिन्न धर्मसंप्रदाय अस्तित्वात आले.
धर्माचे खरे मूलभूत तत्त्व ठरविण्याकरिता खऱ्याखोट्याचा ऊहापोह केला पाहिजे. रामगड जिल्हा कोर्टाचे रजिस्ट्रार डिग्बी यांच्याशी १८०५ साली त्यांची मैत्री जमली. त्या वेळी वरिष्ठ इंग्रजी अधिकाऱ्यांपुढे भारतीय लोक हांजीहांजी करीत, गुलामासारखे वागत. राममोहन अनेक वरिष्ठ पदस्थ इंग्रजी अधिकाऱ्यांच्या नोकरीत राहिले; परंतु स्वतःच्या अंगच्या गुणांच्या बळावरच ते चढत गेले. डिग्बींच्या सहवासात असताना त्यांनी इंग्रजीचे अध्ययन केले.
इंग्रजीत भाषण, लेखन ते उत्कृष्टपणे करू लागले. बायबलचा व अनेक विषयांतील ग्रंथांचा व्यासंग त्यांनी सुरू ठेवला. राममोहनांनी १८१० साली सरकार नोकरी सोडली व रंगपूरच्या जवळ माहीगंज येथे स्वतःचे घर बांधून ते राहू लागले. तेथे लोकांना पाण्याची सोय व्हावी स्वखर्चाने एक तळेही बांधले. तेथे सुशिक्षित मंडळीबरोबर धर्मचर्चा सत्र सुरू केले. या मंडळींमध्ये विविध धर्मपंथांचे लोक भाग घेत. मूर्तिपूजेचा ऊहापोह विशेष होऊ लागला; कारण हिंदू धर्मात अगणित धर्मसंप्रदाय असले, तरी मूर्तीपूजा सर्वमान्य आहे. त्यामुळे मूर्तिपूजेची बाजू उचलून धरणारे बहुसंख्य लोक होते. मूर्तिपूजेचे समर्थक गौरीकांत भट्टाचार्य यांनी ज्ञानचंद्रिका हे पुस्तक लिहिले.
ही सनातनी मंडळी मतभेदांमुळे राममोहनांना विविध प्रकारे छळू लागली. पत्नी व मुले यांच्यासह गावात राहणे कठीण होऊ लागले. राममोहन यांनी राधानगराजवळ रघुनाथापूर येथे नवे घर बांधले. या घरासमोर त्यांनी ईश्वरोपासनेकरता एक वेदी उभारली. या घरातच त्यांच्या रामप्रसादनामक दुसऱ्या पुत्राचा जन्म झाला. धार्मिक-मौलिक मतभेदांमुळे त्यांच्या मातेशी त्यांचे वितुष्ट आले. धाकटी दोन भावंडे मृत्यू पावली, म्हणून मातेच्या सांत्वनासाठी तिच्या भेटीला ते गेले. तशाही स्थितीत मातेने भेट घेण्याचे नाकारले. या घटनेने त्यांना फार दुःख झाले.
तिच्या हट्टाकरिता कुलदेव राधागोविंद याच्या मूर्तीपुढे साष्टांग नमस्कार घातला व म्हटले, की ‘मी माझ्या आईच्या देवाला नमस्कार करतो’. राममोहन १८१४ साली कलकत्त्याला स्थायिक झाले. तेथे सामाजिक व धार्मिक आंदोलनास त्यांनी प्रारंभ केला. आरंभी ‘आत्मीय सभा’ सुरू करून तीत भिन्नभिन्न विषयांवर चर्चा सुरू झाल्या. वेदान्तसूत्रे, उपनिषदे यांची बंगाली व इंग्रजी भाषांतरे छापून प्रसृत केली. सतीप्रथेकरता धर्मशास्त्राचे आलोचन केले. जेथेजेथे एखादी स्त्री सती जात असे, तेथे आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न ते करू लागले. त्यामुळे समाज त्यांना हिंदुधर्मविरोधी मानू लागला.
१८१८ साली, सतीची प्रथा बंद व्हावी म्हणून समाजातील प्रतिष्ठित मंडळीच्या सह्यांसह एक अर्ज त्यांनी सरकारकडे पाठवला. त्यात म्हटले, की या अमानुष चालीवर बंदी घालून सरकारने कायदा करावा आणि हे समाजाकडून व आप्तेष्टांकडून होणारे स्त्रियांचे खून बंद पाडावेत. त्यावेळचे गव्हर्नर ज. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी राममोहनांशी प्रदीर्घ चर्चा करून सतीबंदीच्या कायद्याची निश्चिती केली. ४ डिसेंबर १८२९ रोजी सतीबंदीचा कायदा जाहीर केला. ख्रिस्ती धर्मप्रसारक व पाद्री हे हिंदू धर्मावर जबरदस्त टीका करीत. त्यांच्याशी साधार चर्चा करण्याकरिता ग्रीक व हिब्रू भाषांचे सखोल अध्ययन राममोहनांनी केले. कारण मूळ बायबल हिब्रू व ग्रीक भाषांत लिहिले आहे.
हिंदू पंडितांना वाटले, की राममोहन ख्रिस्ती होणार; परंतु लवकरच हिंदूंचा भ्रमनिरास झाला. १८२० साली राममोहनांनी द प्रिसेप्टस ऑफ जीझस, द गाइड टू पीस अँड हॅपिनेस (येशूच्या आज्ञा, शांती व सुखाचा मार्ग) या नावाने ७० पृष्ठांचे एक इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. १८८१ साली नव्या करारातील चारही शुभवर्तमानांचे बंगालीत भाषांतर केले. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मप्रसारावर व उपद्रव्यापांवर जोराचा हल्ला केला. ४ डिसेंबर १८२१ रोजी संवादकौमुदी नामक एक साप्ताहिक बंगालीत सुरू केले. सामाजिक आणि धार्मिक सुधारणांविषयक प्रश्नांचा आणि भारतीयांच्या राजकीय मागण्यांचा व तक्रारींचा ऊहापोह करणारे भारतीयाने सुरू केलेले हे पहिले नियतकालिक होय.
भारतीय वृत्तपत्रव्यवसायाचा हा शुभारंभ होय. १८२२ साली मिरात-उल्-अखबार हे फार्सी साप्ताहिकही सुरू केले. यामधील भाषा आणि उच्चार अतिशय प्रखर होते. याचवेळी सरकारने हुकूम काढला, की गव्हर्नर जनरलच्या परवान्याशिवाय कोणीही नियतकालिक काढू नये. हा हुकूम म्हणजे वृत्तपत्रस्वातंत्र्यावरील पहिले गंडांतर होय. राममोहनांना विस्मय वाटला व रागही आला. वृत्तपत्रस्वातंत्र्यासाठी सरकार दरबारी त्यांनी बराच काळ झगडा चालू ठेवला. वृत्तपत्रस्वातंत्र्यासाठी झगडत असताना त्यांनी शिक्षणषयक प्रश्नाला हात घातला.
याच वर्षी सरकारी शिक्षणखाते स्थापन झाले व कलकत्ता येथे शिक्षणखात्यातील मंडळींनी ही गोष्ट अमान्य झाली. भारताचा भाग्योदय होण्यास व पुढारलेल्या अन्य राष्ट्रांबरोबरीचा दर्जा भारतास प्राप्त होण्यास भारतीयांना आधुनिक पाश्चात्त्य पद्धतीचे शिक्षण मिळाले पाहिजे, असा विचार त्यांनी मांडला. नुसत्या परंपरागत संस्कृत शिक्षणाने आजच्या नवीन ज्ञानाचा जो महान विस्तार झाला आहे., त्यापासून भारतीय लोक वंचित राहणार हे पाहून त्यांनी निक्षून सांगितले, की भौतिकी, रसायन, तंत्रज्ञान, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र इ. विद्यांचे शिक्षण भारतीयांना देणारी विद्यालयेच स्थापन करणे आवश्यक आहे. त्यांनी संस्कृत महाविद्यालयाला विरोध केला, तरी स्वखर्चाने वेदान्त महाविद्यालयाची स्थापना केली (१८२५). १८२४ मध्ये बंगाली भाषेत इतिहास, भूगोल इ. अनेक विषयांवर पुस्तके लिहिली. त्यांच्या वेदान्त ग्रंथ (१८१५) ह्या स्वतंत्र ग्रंथामुळे बंगाली गद्यलेखनाचा पाया घातला गेला. बंगाली गद्याचे ते जनक मानले जातात. बंगाली व्याकरणावर दीर्घ व्यासंग करून गौडीय व्याकरण (१८३३) हा ग्रंथ लिहिला. त्यामुळे बंगाली भाषेला उत्कर्षाचे दिवस प्राप्त झाले.
आपल्या धर्मविषयक व ईश्वरविषयक उदार तत्त्वज्ञानाचा व उपासनापद्धतीचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी २० ऑगस्ट १८२८ रोजी ब्राह्म समाजाची (ब्राह्मो समाजाची) स्थापना केली. कलकत्ता येथे राममोहनांनी रामचंद्र विद्यावागीष, उत्सवानंद विद्यावागीष, ताराचंद्र चक्रवर्ती इ. सहकाऱ्यांबरोबर ब्राह्मसमाजाची पद्धतीने उपासनेला प्रारंभ केला. या नवविचारप्रणालीची यथोचित कल्पना देणारे सार्वत्रिक धर्मनामक पुस्तक लिहिले.
त्यात मूळ सिद्धांत असा सांगितला, की ईश्वर पूजा म्हणजे ईश्वराच्या गुणांचे चिंतन. तो अतर्क्य व अवर्णनीय आहे. सृष्टिक्रमावरून त्याचे आकलन होते. ज्या वेळी मन शांत असेल, त्या वेळी चांगल्या जागी, चांगल्या वेळी त्याची पूजा करावी. दिल्लीचा बादशहा दुसरा अकबर याच्या काही राजकीय तक्रारी ब्रिटिश सरकारपुढे दाखल करण्याकरता, त्याचप्रमाणे संतीबंदीच्या कायद्याविरुद्ध ब्रिटिश सरकारच्या दरबारी अर्ज विनंत्या येत असल्याने सरकारने सतीबंदीचे धोरण कायम ठेवावे म्हणून १९ नोव्हेंबर १८३० या दिवशी राममोहन इंग्लंडला रवाना झाले. त्या वेळी दिल्लीच्या बादशहाने खुष होऊन त्यांना ‘राजा’ हा किताब दिला. परदेशात त्यांचे अनेक ठिकाणी सत्कार झाले.
तिथल्या प्रतिष्ठित लोकांना त्यांच्याविषयी अत्यंत आदर वाटला. त्यांच्या सभासमारंभातील भाषणांनी व चर्चा संवादांनी भारताचा प्रतिमा त्यांनी उजळून टाकली. याच वेळी ते अकस्मात आजारी पडले. ब्रिस्टल येथे त्यांचे निधन झाले. रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) यांचे आजोबा द्वारकानाथ ठाकूर व इतर सहका-यांनी कार्नोव्हेल येथे त्यांची समाधी बांधली. ब्राह्म समाजाच्या स्थापनेने हिंदी नवयुगाची प्रभात झाली. कन्या विक्रय, कन्याहत्या, बालविवाह, बाला-वृद्धविवाह इ. अनेक हीन चालींच्या बंधनातून भारतीय स्त्रीला मुक्त करण्याकरता त्यांनी आंदोलन उभारले. बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य आणि मानवी समानता ही तीन मूल्ये या प्रज्ञाशाली पुरूषाने भारतीयांना उपलब्ध करून दिली. सुंदर, भव्य, विद्वान, त्यागी व तपस्वी असा हा पुरूष इंग्रजी राज्याच्या स्थापनेनंतर लवकरच उदयास आला.
🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा