5 SEPTEMBER DINVISHESH


*5 सप्टेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *सोमवार* 🧩


🛟 *डाॅ राधाकृष्णम जन्मदिन*
🛟 *शिक्षक दिन- 
सर्वाना शिक्षक दिनाचा हार्दिक शुभेच्छा*
   
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *2012 - स्पेनमध्ये टेलिव्हिजनवर बंदी घालण्यात आलेल्या थेट बुलफाईटिगच्या प्रसारणावर सहा वर्षाची बंदी उठवण्यात आली*         
👉 *2005 - इंडोनेशियातील सुमाञा येथे मंडाला एअरलाईन्सचे फ्लाईट 091 हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळून विमानातील 104 आणि जमिनीवरील 39 लोक ठार झाले*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

👉 *1933 - भारतीय नौदलाचे माजी सेवानिवृत्त प्रमुख अधिकारी व लोकपाल लक्ष्मीनारायण रामदास यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित रॅमन मॅगसेस पुरस्कार जाहीर झाला   यांचा जन्म*
👉 *1928 - दमयंती जोशी संगीत नाटक अकादमी पुरस्कार भारतीय शास्ञीय कथ्थक नर्तक   यांचा जन्म*

🌍 *मृत्यू*

👉 *1918 - भारतीय टाटा घराण्यातील उद्योगपती दानशुर व्यक्ती रतनजी जमशेदजी टाटा यांचे निधन*
👉 *1997 - शांततेचा नोबेल पारितोषिक आणि भारतातील सर्वोच्च नागरीक पुरस्कार सम्मानीत प्रसिद्ध समाजसेविका व कथालेखक, चर्चच्या धर्मगुरू मदर टेरेसा  यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *सामान्य ज्ञान*

*👉जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यालय कोठे आहे?* 
*जिनिव्हा*

*👉या वर्षी साजरा केलेला १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस भारत देशाचा कितवा स्वातंत्र्य दिवस होता?* 
*७६ वा*

*👉नागपूर जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे?* 
*संत्री*

*👉भारताचे हवामान कोणत्या प्रकारात मोडते?*
*मान्सून*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
*📚शिस्तीचा धडा 📚*

*अनेक शिष्य गुरू अंबुजानंद यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी येत असत. त्यांचा आश्रम बराच काळ चालू होता. आता अंबुजानंद खूप म्हातारे झाल्यामुळे त्यांना गुरुकुल चालवणे अवघड होत होते. त्यांना गुरुकुलाचे सर्व काम त्यांच्या एका शिष्यावर सोपवायचे होते. एके दिवशी त्याने त्याच्या 18 सर्वोत्तम विद्यार्थ्यांना त्याच्याकडे बोलावले. तो त्यांना म्हणाला, 'तुम्ही सर्व गुणवान, मेहनती आणि प्रामाणिक आहात. जर मला तुमची शिक्षणासाठी विशिष्ट क्षेत्रात नियुक्ती करायची असेल तर तुम्हाला कोणते क्षेत्र निवडायचे आहे?'*
*हे ऐकून सर्व शिष्यांनी थोडा वेळ विचार केला आणि नंतर 17 विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्राची नावे गुरूंना सांगितली.* *अठरावा शिष्य आयुष अजूनही काहीतरी विचार करत होता. त्याला शांत पाहून गुरूंनी विचारले, 'बेटा आयुष, तू स्वत:साठी कोणतेही क्षेत्र निवडले नाहीस?' गुरूंचे म्हणणे ऐकून आयुषने डोके टेकवले आणि म्हणाला, 'गुरुजी, मी तुमच्याकडूनच शिकलो आहे. तुमच्याकडून शिकलेले शिक्षण मला लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे.* *यासाठी मला कोणताही विशिष्ट प्रदेश निवडण्याची गरज नाही. प्रत्येक क्षेत्रात तुम्ही दिलेली शिकवण मी इतरांना देऊ इच्छितो.*
*तथापि, क्षेत्रापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे आपल्या मूल्यांचा किंवा मूल्यांचा प्रसार करणे, जे धर्मग्रंथांपेक्षा भिन्न आहेत. लोकांनी त्याला ओळखावे अशी माझी इच्छा आहे जेणेकरून ते नैतिकदृष्ट्याही श्रेष्ठ असतील. केवळ पुस्तकी ज्ञानाने काही होणार नाही. तुम्ही आम्हाला शिकवलेला शिस्तीचा धडा मला विशेषतः शिकवायला आवडेल. ज्ञान मिळविण्यासाठी व्यक्तिमत्त्वाला विशिष्ट साच्यात घडवावे लागते. तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीने साचेबद्ध केले आहे, तसेच मला इतरांनाही घडवायला आवडेल. आयुषचे बोलणे ऐकून गुरु अंबुजानंद यांचा चेहरा आनंदाने उजळला. त्याला मिठी मारली आणि म्हणाले, 'बेटा, आजपासून हे गुरुकुल तुझ्या देखरेखीखाली चालेल.'*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         *🌐 आजच्या बातम्या 🌐*

*📢टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे कार अपघातात निधन, उद्योगविश्वावर शोककळा, उपमुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश*
*📢करमाळा येथे मालगाडीचे रेल्वे इंजिन रूळावरून घसरले; मोठी हानी टळली*
*📢मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा निर्णय*
*📢पाकिस्तानात पुराचा हाहाकार! 1300 नागरिकांनी जीव गमावला; 5 लाख लोकांचे स्थलांतर*
*📢जगाला कळणार भारताची ताकद, येत्या काळात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल*  
*📢चायनीज लोन एप्लिकेशन प्रकरणी ED ची मुंबईत छापेमारी, 17 कोटी रुपये जप्त*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद व्हि. वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज  कान्द्री-माईन* 
*9860214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿
⚜️✏️🎓🇮🇳👳‍♀️🇮🇳🎓✏️⚜️
               *भारतरत्न*         
    *डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन*
     *जन्म : ५ सप्टेंबर १८८८*
(तिरुत्तनी, तमिळनाडू तील एक छोटे गाव, दक्षिण भारत)
    *मृत्यू : १७ एप्रिल १९७५*                                  *२ रे भारतीय राष्ट्रपती*
कार्यकाळ : १३ मे १९६२ – 
                 १३ मे १९६७
मागील : राजेंद्रप्रसाद
पुढील : झाकीर हुसेन
       *भारतीय उपराष्ट्रपती*
कार्यकाळ : १९५२ – १९६२
   
राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय 
                       काँग्रेस
पत्नी : सिवाकामुअम्मा
अपत्ये : पाच मुली व एक पुत्र, 
             सर्वपल्ली गोपाल
व्यवसाय : राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, 
                प्राध्यापक
धर्म : वेदान्त (हिंदू)

सर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ होते. डॉ. सर्वेपल्ली राधाकृष्णन  हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ  त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई (मद्रास) शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.

पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्‌वादाचा तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.

राधाकृष्णन यांच्या जीवनात तीन प्रमुख प्रश्न होते. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?' कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत, असे नरहर कुरुंदकर लिहितात.

🎖 *पुरस्कार*

१९५४ : 'भारतरत्‍न' पुरस्काराने सन्मानित.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ‘शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस…. 

डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्‍यातही सुरूच राहिल. 1962 मध्ये डॉ. राधाकृष्णन् यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते.

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. कारण डॉ. राधाकृष्णन यांनी 1909 ते 1948 वर्षं पर्यंत म्हणजे 40 वर्षे शै‍क्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला .

त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 साली आंध्र राज्यातील चितुर जिल्ह्यातील तिरूत्तनी या गावी झाला. प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावी झाले व पुढील शिक्षण तिरुपती या गावी झाले. त्यांचे शिक्षण लुथरम मिशन हायस्कूल मध्ये झाले. नंतर उच्च माध्यमिक शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजात. तत्त्वज्ञान विषय घेऊन ते प्रथम क्रमांकाने पास झाले व एम्.ए. साठी नितीशास्त्र विषय घेतला.

मद्रास येथे प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून 1917 पर्यंत कार्य केले. 1939 मध्ये आंध्र विद्यालयाने त्यांना डी. लिट. ही पदवी दिली.

1931साली इंग्लॅडने डॉ. राधाकृष्णन यांना सर ही मानाची पदवी बहाल केली. त्यांच्या वाढत्या गुणांमुळे, प्रगतीमुळे 1946ते 1949 या काळात भारतीय राज्य घटना समितीचे सभापती म्हणून निवड झाली.

1952साली भारताचे पहिली निवडणूक होऊन उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्याच वेळी ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते. त्याचप्रमाणे 1939 ते 48 बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलपती होते.

1957च्या दुसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुन्हा उपराष्ट्रपती झाले. उत्कृष्ट कार्य कर्तृत्त्वामुळे त्यांना 1958 साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला.

13 मे 1962 साली डॉ. राधाकृष्णन यांची राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. 1967 साली निवृत्त झाले. त्यानंतर आंध्रराज्यातील तिरूपती या गावी 24 एप्रिल 1975 रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

*‘शिक्षक’ भावी पिढीचा शिल्पकार…*

शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात.

शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो.

आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी‍ आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

शिक्षक दिन अर्थात चिंतनाचा दिन
समाज व शिक्षक यांचे नाते अतूट आहे. तसेच ते अमूल्यही आहे. भारतीय तत्त्वज्ञानातील परंपरेमध्ये समाजऋण फेडण्यासाठीचाही उल्लेख आढळतो. शिक्षक म्हणजे समाज घडविणारा सर्जनशील घटक. राष्ट्राची ध्येय-धोरणे बळकट करण्यासाठी व देशाला अधिक बलशाली बनवण्यासाठी जी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे आखली जातात त्याची रूजवणं करणारा, ती मूल्ये वृध्दिंगत होण्यासाठी संस्कार करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक. राष्ट्रउभारणीत शिक्षण व शिक्षकांना महत्त्वाचे स्थान आहे. अशावेळी एखाद्या राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षक हा महत्त्वाचा मानला जातो. समाजातील अनेक पिढय़ा त्यांच्या हाताखालून जात असतात. या पिढय़ांना माणूस म्हणून घडवताना राष्ट्रीय चारित्र्यही घडणे अभिप्रेत असते. महात्मा गांधीजींना शिक्षणांची व्याख्या करताना हेच अभिप्रेत होते व ते कालातीतही आहे.

शिक्षकांनी, शिक्षक हा पेशा न मानता ते व्रत समजावे व घेतला वसा टाकू नये, ऊतू नये, मातू तर अजिबात नये. कालौघात शिक्षणक्षेत्रातील आवाहने व शिक्षकांविषयीच्या संकल्पना बदलत आहेत. गुरू, गुरुजी, मास्तर, बाई, सर, ताई आणि आता मॅडम अशी बिरूदे शिक्षकांसाठी पुढे आली आहेत. शिक्षक व विद्यार्थी यातील अंतर कमी झाले आहे. शिक्षकांविषयीची आदरुक्त भीती आता अभावानेच आढळते. गुरुंविषयीचा अभिमान, आदर असणारी ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वेही तशीच कमीच होत आहेत. शिक्षकांची जागा तंत्रज्ञानाने घेतली आहे. गुरुची कामं आता यंत्र करत आहे. शाळा, महाविद्यालय ही संकल्पना भविष्यात लयालाही जाईल. ऑनलाइन शिक्षण व ऑनलाइन पदवीही मिळेल. या सगळ्या गदारोळात माणसाच्या सामाजिकीकरण प्रक्रिया मात्र होणार नाही. सहवेदना, सहकार्य, सहानुभूती, त्याग, सोसणे या मानवी भावभावनांचे विकसीकरण कदाचित होणार नाही. सवंगडय़ा सोबत, एका विशिष्टवेळी, विशिष्ट इमारतीत प्रत्यक्ष प्रसंग घडत असताना, प्रत्यक्ष जीवनानुभवातून आपण जे अनुकरणाने, अवलोकनाने, अनुभवातून शिकतो त्याचे काय? हा प्रश्न बाकी असेल. यादृष्टीने विचार करता, मानवाने यंत्रे निर्माण केली. विकसित केली. हीच यंत्रे माणसाची जागा घेत आहेत. पण शिक्षण क्षेत्रात ई-लर्निगची साधने हा शिक्षकांसाठीचा पर्याय होऊ शकत नाही. संस्कार, प्रेम, शिस्त, सृजनांचे रूजवण करण्याचे काम यंत्रे करू शकत नाहीत. हेच खरे.
आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना पारंपरिक शिक्षण व आधुनिक शिक्षण असे दोन प्रवाह दिसतात. जीवन कौशल्यावर आधारित किमान कौशल्ये प्राप्त करून देणारे शिक्षण हे भविष्यात उपोगी पडणारे आहे. कुशल मनुष्यबळ हीच आपली आपल्या राष्ट्राची खरी संपत्ती असणार आहे. अगदी आधुनिक पद्धतीच्या शेतीपासून ते अवकाश शास्त्रापर्यंतच तंत्रज्ञानाचा शिक्षणात अंतर्भाव करून राष्ट्राला घडवणारी, राष्ट्राला स्वतंत्र वेगळी ओळख प्राप्त करून देणारी पिढी निर्माण करण्याचे मोठे आव्हान मात्र आपल्या पुढे आहे. शिक्षणाने प्रगती होते, समाज विकसित होतो, देश प्रगत होतो हे खरे; पण आपण मिळवलेले ज्ञान, कौशल्ये हे आपल्या ‘स्व’ सुखापुरते मर्यादित न ठेवता. समाजाभिमुख व्हावे आपण कार्य करतो. समाजासाठी लढतो, उभे राहतो, समाजाला योगदानाच्या रूपात काही देऊ शकतो तेव्हाच हे शक्य आहे व हीच मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे अवघड काम मात्र शिक्षकांना करायचे आहे. धर्म, प्रांत, जात, देश या मर्यादा ओलांडून गेल्याशिवाय ग्लोबलाझेशनच्या खर्‍या अर्थापर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. म्हणून सर्व थरातील शिक्षणाला व शिक्षकांना आज महत्त्व आहे. माझ्यामधले ‘दि बेस्ट’ देण्याची तळमळ असणारे शिक्षकच हाडाचे शिक्षक ठरतात. समाजभिमुखी पिढी घडवताना विद्यार्थ्यांमध्ये ग्रासलेल्या प्लसची जाणीव, सामर्थ्याची ओळख करून देण्याचे काम होणे आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला अभिप्रेत असलेला शिक्षणातून सर्वागिण विकास घडणार आहे. ‘शिक्षक दिन’ म्हणूनच सगळ्यांसाठी चिंतनाचा दिन ठरावा.
मी देशासाठी काय करू शकतो. देशाला काय देऊ शकतो, माझ्या जन्माची सार्थकता कशात आहे, ते इप्सित साध्य करण्याच्या दृष्टीने एक शिक्षक म्हणून आपण कार्यरत असावे. आज काळ बदलला आहे. शिक्षण क्षेत्रातील आव्हाने वाढली आहेत. शिक्षणतज्ज्ञांइतकेच या शिक्षण प्रक्रियेत पालकांनाही महत्त्व आले आहे. समाजाची गरज, विद्यार्थी घडवणे, पालकांची अपेक्षा, आपल्या व्यवसायाची पवित्रता जपणे, प्रतिमा जपणे या सगळ्याचा मेळ घालताना आपले ज्ञानही अद्यावत ठेवणे गरजेचे आहे. या सगळ्याचे संतुलन साधत ह्या व्रताची अवघड वाटचाल करावायची आहे. शिक्षक दिनानिमित्त सर्व गुरुजनांना हार्दिक शुभेच्छा...!

यानिमित्तानं जाणून घेऊया त्यांचे अनमोल आणि प्रेरणादायी विचार...
 
1. भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं घडवतो, तो खरा शिक्षक.

2.  मानवतेच्या मूलभूत गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरुन चांगली व्यवस्था आणि स्वातंत्र्य दोन्ही अबाधित राहील.

3. पुस्तकांच्या वाचनानं आपल्याला एकांतात विचार करण्याची सवय आणि खरे सुख लाभते.

7. कवी धर्मामध्ये कोणत्याही निश्चित स्वरुपातील सिद्धांतासाठी कोणतीही जागा नसते.

8. मानव दानव बनणं, हा त्याचा पराभव... मानव महामानव बनणं, हा त्याचा चमत्कार... आणि मनुष्य मानव होणे, हा त्याचा विजय...

9.  कोणतंही स्वातंत्र्य तोपर्यत खरे नसते, जोपर्यंत त्या विचाराचं स्वातंत्र्य प्राप्त होत नाही. सत्याच्या शोधात असताना कोणत्याही धार्मिक श्रद्धा किंवा राजकीय सिद्धांतांमध्ये बाधा आणू नये. 

10. धर्माविना एखादी व्यक्ती लगाम नसलेल्या घोड्याप्रमाणे असतो.
          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏 *डाॕ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन*🙏

                                                                                                                                                                                                                                                                 ➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा