7 SEPTEMBER DINVISHESH


*7 सप्टेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *बुधवार* 🧩
 
   
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *2018 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे नीती आयोग व्दारे आयोजित वैश्र्वीक गतीशीलता शिखर सम्मेलनाचे उध्दाटन केले*         
👉 *2009 - भारतीय बिलियर्ड्स खेळाडू पंकज अडवाणी यांनी वर्ल्ड प्रोफेशनल बिलियर्ड्स जेतेपद जिंकले*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

👉 *1963 - अशोक चक्र पुरस्कार सन्मानित शुरवीर भारतीय वैमानिक नीरजा भनोट  यांचा जन्म*
👉 *1933 - भारतीय सहकारी संघटक कार्यकर्ता आणि गांधीवादी तसच भारतीय स्वयंमरोजगार महिला असोशिएशन च्या संस्थापिका इला रमेश भट  यांचा जन्म*

🌍 *मृत्यू*

👉 *2013 - भारतीय परराष्ट्रीय सचिव, दिल्ली, अदमान आणि निकोबार बेटाचे माजी उपराज्यपाल आणि ञिपूरा गोवा आणि उत्तरप्रदेश राज्याचे माजी राज्यपाल रमेश भंडारी  यांचे निधन*
👉 *1997 - भारतीय चिञपट निर्माते व दिग्दर्शक मुकूल आनंद   यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आजच्या ठळक बातम्या*

१.मुंबईत काल मंगलमूर्ती आणि 'अमंगलमूर्ती' पाहिले, जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना अस्मान दाखवू; उद्धव ठाकरे यांचा अमित शाहांना टोला  मुंबई महानगरपालिकेवर भाजपा-शिंदे सेनेचा भगवा फडकणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा  

२.बारामती जिंकणार म्हणजे जिंकणारच, बावनकुळेंचा विश्वास, 2024 ला भाजपचं महाराष्ट्रात 45 प्लस  श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे पवारांना पळून जावं लागणार; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल 

३.कोरोनाविरोधातील लढाईला बळ; नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीला मंजुरी 

४.नितीश कुमार यांनी घेतली केजरीवाल यांची भेट, ऑपरेशन लोटस आणि या मुद्द्यांवर झाली चर्चा   के. चंद्रशेखर राव यांचा 'भाजप मुक्त भारत'चा नारा, 

५.मुंबईत शिवसेनेला मोठा धक्का बसणार? खासदार किर्तीकर, अमेय घोले शिंदे गटाच्या वाटेवर! 

६.शिक्षक दिनी पंतप्रधानांची मोठी घोषणा; PM-SHRI योजनेंतर्गत 14 हजार 500 शाळा अपग्रेड होणार  

७.उद्यापासून पावसाचा जोर वाढणार, करपणाऱ्या पिकांना मिळणार जीवदान तर रब्बीसाठी पहिली सलामी  गणपती विसर्जनाच्या वेळी कोल्हापूर, सांगली, सातारसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा 

८.सायरस मिस्त्रींच्या अपघातग्रस्त कारचा डेटा जर्मनीला पाठवणार, अनेक प्रश्नांचा उलगडा होणार   टाटा उद्योग समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर  अंत्यसंस्कार  

९.आर्थिक दुर्बल घटकांच्या 10 टक्के आरक्षण वैधतेबाबतची सुनावणी 13 सप्टेंबरपासून सुरु होणार 

१०. IND vs SL, Asia Cup  भारतासमोर आज श्रीलंकेचं आव्हान; आशिया चषकातील आव्हान टिकवण्यासाठी विजय अनिवार्य 

*स्पेशल*

१.पाच वर्षांमध्ये रस्ते अपघातात 41 हजार जणांचा मृत्यू, आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर 

२. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 12 व्या हफ्त्यासाठी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 7 सप्टेंबरपर्यंत मुदत 

3. Lalbaugcha Raja 2022 : 250 तोळे सोनं आणि 2900 तोळे चांदी, लालबागच्या राजाच्या चरणी पाच दिवसात भक्तांचं भरभरुन दान
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *सामान्य ज्ञान*

*👉कोणता प्राणी एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो ?*
*सरडा*

*👉भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात ?*
*कर्नाटक*

*👉पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ?*
*मज्जासंस्था*

*👉कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे ?*
*करडई*

*👉त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो ?*
*मेलानिन*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
*🐈बुड बुड घागरी*

*बुड घागरी तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर करण्याचे ठरविले. माकड म्हणाले 'मी आणतो साखर'. मांजर म्हणाले 'मी आणतो दूध'. उंदीर म्हणाला 'मी आणतो शेवया'. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले 'चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ'. इकडे मांजराच्या तोंडाला सुटले होते पाणी. ते अर्ध्या वाटेतूनच परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला विचारले 'खीर कोणी खाल्ली?' मांजर म्हणाले, 'मला नाही माहीत.' मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ' हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला 'चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ' म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली.*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद व्हि वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज  कान्द्री-माईन* 
*9860214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿
🤺💥⛓🇮🇳🙅‍♂🇮🇳⛓💥🤺

      🏹 *आद्य क्रांतिवीर*
         *राजे उमाजी नाईक* 🤺

       *जन्म : 7सप्टेंबर 1791* 
         *(भिवडी, पुरंदर, पुणे)*

       *फाशी : 3 फेब्रुवारी 1832*
                   *(पुणे)*

            सासवडच्या सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम रामोशी समाज एकत्रित आला. सत्तू नाईक, साता-याचा चित्तूरसिंग नाईक व पुरंदरचा उमाजी नाईक हे रामोशांचे प्रमुख नेते होते. पुण्याच्या आग्नेय भागात रामोशाची जास्त दहशत होती.
           सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक व त्याचा भाऊ अमृता नाईक यांनी पुण्याजवळ भांबुर्ड्याचा लष्करी खजिना 1924 - 25 साली लुटला. पुण्यातून रामोशांच्या  हकालपट्टीसाठी ब्रिटिशांनी जवाहरसिंग रामोशी यास सासवडचा अंमलदार बनविले. पण  उमाजी व सत्तू नाईकाने जवाहरसिंग व त्याच्या मुलाच्या मुसक्या आवळल्याने त्याने इंग्रजांची नोकरी सोडून दिली.
          सत्तू नाईक नंतर रामोशांचे नेतृत्व उमाजी नाईकवडे आले. भूजाजी, कृष्णाजी, येसाजी व अमृता हे उमाजीचे विश्वासू सरदार होते. उमाजी स्वत: ला राजे समजून घेत असे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी 1791 साली उमाजीचा जन्म झाला होता.
           ब्रिटिश काळात रामोशांची संख्या 18000 होती. दरम्यानच्या काळात उमाजीने एका यात्रेत तलवारीने कोतवालाचे तुकडे करून पोलिसात दहशत पसरवली. उमाजीला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी 1826 साली पहिला जाहीरनामा काढला. यानुसार उमाजी व त्याचा साथीदार पांडुजी यांना पकडून देणा-यास 100 रुपये ईनाम जाहीर केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. 
          सरकारने पुन्हा जाहीरनामा काढून ईनामाची रक्कम 1200 रूपये कली आणि जाहीरनाम्यात असे म्हटले की, "सरकारला मदत केली नाही तर बंडवाल्यात सामिल झालात, असे समजण्यात येईल." यावेळी उमाजीस पकडून देण्याचा विडा उचलणा-या  शिवनाक यास रामोशांनी ठार केले.
            त्यावेळी उमाजीचा धाक पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जेजुरी, सासवड व मराठवाड्याच्या काही भागात होता. यावेळी पुण्याचा कलेक्टर एच . डी . रॉबर्टसन  याने वेळोवेळी जाहीरनामा काढून उमाजीला पकडण्याचे ठरविले. कोणीच गददारी न केल्यामुळे त्याच्या हाती काहीच आले नाही.
             रॉबर्टसनने दरम्यान कोकणावर वचक बसविण्याठी बंडखोरांची माहिती देणा-यासाठी खास बक्षिस जाहीर केले. या काळात उमाजीने ठाणे व रत्नागिरी जिल्हयातील लोकांनी ब्रिटिशांकडे महसूल न भरता उमाजीकडे दयावा असे जाहीर केले. याच्या परिणामस्वरूप भोर  संस्थानातील 13 गावानी उमाजीकडे महसुल भरला.
             शेवटी ब्रिटिशांनी उमाजीची बायको, दोन मुले व एक मुलगी यांना अटक केली. त्यामुळे कुटुंबाखातर उमाजी ब्रिटिशांना शरण आला. ब्रिटिशांनी त्याचे सर्व गुन्हे माफ करून त्याला सरकारी नोकरी दिली. पुणे व सातारा जिल्हयात शांतता व सुव्यवरथा राखण्याचे काम उमाजींकडे देण्यात आले. पण पुढे नंतर 13 गावांच्या महसुलावरुन उमाजी व ब्रिटिश यांच्यात वाद सुरू झाला. 
           1831 साली ब्रिटिशांनी जाहीरनामा प्रसिध्द करून उमाजीला पकडण्याची जबाबदारी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश यांच्याकडे सोपविली. उमाजी, येसाजी, मुंजाजी व कृष्णाजी यांना पकडून देणा-यास 5000 रूपये व 2 बिघा जमीन बक्षीस देण्याचे जाहीर केले. त्यापैकी एकटया उमाजीस पकडून देणा-यास 2500 रूपये व 1 बिघा जमीन जाहीर करण्यात आली. बक्षीसाच्या आमिषाला बळी पडून एकेकाळचे त्याचे जवळचे साथीदार काळू रामोशी, नाना रामोशी यानी गददारी केली. उमाजीचा जुना शत्रु बापूसिंग यानेही त्यांना मदत केली. 15 डिसेंबर 1831 रोजी कॅप्टन मैकिन्तोशने पुण्याच्या मुळशी तालुक्यातील अवळस येथे उमाजीला  अटक केली. पुण्याच्या तहसिलदार कचेरीत 3 फेब्रुवारी 1832 रोजी उमाजीला फाशी देण्यात आली.  त्याठिकाणी आता पुतळा स्वातंत्र्याचा संदेश देत ठामपणे उभा आहे. 
          उमाजीचा पहिला चरित्रकार व उमाजीस पकडण्याच्या मोहीमेचा प्रमुख मैकिन्तोश म्हणतो, “उमाजीच्या नजरेसमोर शिवाजी राजांचे उदाहरण होते. स्वराज्य संस्थापक शिवाजी हे त्याचे श्रध्देय व स्फूर्तीचे स्थान होते. शिवाजीच त्याचा आदर्श होता. मोठमोठया लोकांनी मला स्वतः  सांगितले की, उमाजी हा काही असला तसला भटक्या दरोडेखोर नाही. त्याच्या नजरेसमोर नेहमी शिवाजीचे उदाहरण होते. शिवाजी महाराजांप्रमाणे आपण मोठे राज्य कमवावे, अशी त्याची इच्छा होती." 
          आम्हाला मात्र त्याने स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इंग्रज सरकारशी दिलेल्या दीर्घकालीन लढ्याची जाणीव नाही हे आपल्या देशाचे दुर्देव होय.

          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌷🙏
                                                                                                                                                                                                                                                               ➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा