*9 सप्टेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *शुक्रवार* 🧩
💥 *अंनत चतुर्दशी*
💥 *सार्वजनिक गणेशमुर्ती विसर्जन*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2012 - भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने पीएसएलव्हीसी 21 राॅकेटच्या साह्याने दोन परदेशी उपग्रहांचे उड्डाण करून आपली 100 वी अंतराळ मोहिम यशस्वीपणे पुर्ण केली*
👉 *1985 - भारतीय मुक बधीर जलतरणपटू तारानाथ शेनाॅज यांनी तिसरांदा इंग्लिश खाडी पार करून विक्रम स्थापित केला*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
👉 *1967 - भारतीय हिंदी चिञपट अभिनेता, निर्माता, मार्शल आर्टिस्ट अक्षय कुमार यांचा जन्म*
👉 *1932 - भारतीय हिंदी भाषीक रचनाकार कांती कुमार जैन यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*
👉 *2012 - जगातील सर्वात मोठा कृषी दुग्ध विकास कार्यक्रम ऑपरेशन फ्लड चे जनक वर्गीज कुरीयन यांचे निधन*
👉 *2010 - महाराष्ट्रीयन मराठी समाजवादी कामगार नेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक वसंत नीलकंठ गुप्ते यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आजच्या बातम्या*
१.मुंबईत अतिरेक्याची कबर सजवली? याकूब मेमनच्या कबरीवर संगमरवरी फरशा अन् लायटिंग दहशतवादी याकूबची कबर कधी आणि कुणी सजवली? BMC आयुक्त म्हणाले, पालिकेच्या कक्षेत नाही तर मशीद ट्रस्टी म्हणतात. याकूबच्या कबरीवरील एलईडी काढल्या; माझाच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं, पोलिसांकडून बडा कब्रस्तानची पाहणी
२.याकूब मेमनच्या कबरीवरील रोषणाईवरुन राजकारण तापलं.. शिवसेनेनं कबर बचाव अभियान सुरू करावं; भाजपची टीका, 'याकूबच्या कबरी'वरुन उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न, याकूब मेमन प्रकरणाशी सेनेचा काहीही संबंध नाही : अरविंद सावंत दहशतवाद्याचा मृतदेह कुटुंबियांना देत नाहीत, याकूबचा मृतदेह दिला; भाजपनं देशाची माफी मागावी: काँग्रेस
३.मुंबई, ठाण्यात विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस; मुंबईतील अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद, तर मुसळधार पावसानं मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क, NDRF च्या टीम तैनात करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना सातारा जिल्ह्यात 11 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांनी काळजी घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
४.पक्षनिधीच्या नावाखाली 'असा' सुरू होता झोलझाल; आयकर विभागाकडून सायन, बोरिवलीतील झोपड्यांवर छापे
५.गणेश विसर्जनासाठी राज्यभर कडक बंदोबस्त, अनेक ठिकाणी वाहतूक मार्गात बदल गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज, पंधरा हजार पोलीस आणि SRPF च्या तुकड्या तैनात विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलीस सज्ज! 5,000 पोलीस, 85 विसर्जन घाट अन् महत्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद; पहा कोणते रस्ते वाहतूकीसाठी बंद?
६.मोठी बातमी! अखेर आदेश निघालाच, मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता होणार बंद
७.आंतरधर्मीय विवाह प्रकरणातील अमरावतीमधील युवती अखेर सापडली; सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात, आज परतणार अमरावती प्रकरणात नवा ट्विस्ट, घरच्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणी घर सोडून गेल्याचं स्पष्ट
८.राजस्थानची कनिष्का ठरली ऑल इंडिया टॉपर! NEET-UG 2022 56.3% विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण.. महाराष्ट्रातून ऋषि विनय बालसे या विद्यार्थ्याने पटकावले 710 गुण
९. ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ डॉक्टरांच्या देखरेखीखाली, प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त
१०.Apple iPhone 14 Launch: प्रतीक्षा संपली! iPhone 14 अखेर लॉन्च; जगातील सर्वात फास्ट फोन, कंपनीचा दावा
*स्पेशल*
१.Aadhaar Voter ID linking : तुमचे मतदान ओळखपत्र आधारशी लिंक करा! घरबसल्या देखील करू शकता हे काम
2.महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं नेमकं संख्याज्ञान किती? राष्ट्रीय सर्वेक्षण अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3.Ahmednagar : इगतपुरीच्या मुलांची अहमदनगर जिल्ह्यात वेठबिगारीसाठी विक्री? पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर
4.Crime: 'मला आय लव्ह यू म्हण, नाहीतर गल्लीत फोटोचे बॅनर लावीन'; पोलिसात मजनूविरोधात गुन्हा दाखल
5.Crime : मुस्लिम मुलीशी विवाह करणारा हिंदू तरुण अचानक बेपत्ता, तरुणाचा घातपात झाल्याचा संशय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सामान्य ज्ञान*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉भारतात इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे ?*
*दिल्ली*
*👉फैजाबाद जिल्ह्यात असलेले अयोध्या हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?*
*उत्तर प्रदेश*
*👉ययाती कादंबरीबद्दल कोणत्या लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ?*
*वि. स. खांडेकर*
*👉महाराष्टू राज्याच्या पोलिस ध्वजाचा रंग कोणता आहे ?*
*गडद निळा*
*👉महाराष्ट्रातील पहिले माहिती आयुक्त कोण होते ?*
*डॉ सुरेश जोशी*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*🤲लोभी माणूस*
*एका लोभी माणसाने आपला सगळा पैसा शेतात पुरून ठेवला होता. तेथे दिवसातून दोन वेळा जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे समाधान मानीत असे. ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला की, आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो, तेव्हा तेथे काहीतरी पुरलेले असावे. रात्री त्याने तेथे जावून खणून पाहिले तर आत बरेच धन त्याला दिसले. ते घेऊन तो पळून गेला. दुसर्या दिवशी तो लोभी माणूस नेहमीप्रमाणे तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले. मग तो डोके बडवून घेत रडू लागला. तेव्हा त्याचा शेजारी त्याच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला. लोभी माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितली. ते ऐकून शेजारी म्हणाला, ''अरे मला वाटते की तसे तुझे काहीच गेले नाही. आपला पैसा येथेच आहे, असे समजून तू पूर्वीप्रमाणेच या जागेकडे पहात जा म्हणजे झाले.''*
*🧠तात्पर्य :- लोभी माणसे पैसे असून दारिद्र्यी व अशांना पैश्यांचा उपयोग न होता दुसरेच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतात. जवळ असलेला पैसा वापरायचा नाही तर तो चोरीला गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ आहे?*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद व्हि वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
▬ ❚❂❚❂❚ ▬ संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
चंद्रपूर 9403183828
➿➿➿➿➿➿➿➿➿
⚜️🙋🏻♂️🔫🇮🇳👦🏻🇮🇳🙋🏻♂️🔫⚜️
*बालशहीद*
*शिरीषकुमार मेहता*
*जन्म : 28 डिसेंबर 1926*
(नंदुरबार , महाराष्ट्र , भारत)
*वीरमरण : 9 सप्टेंबर 1942*
*(वय 15)*
(नंदुरबार , महाराष्ट्र , भारत)
राष्ट्रीयत्व : भारतीय
साठी प्रसिद्ध : भारतीय स्वातंत्र्य
चळवळ
पाताळगंगा नदीच्या काठी चार डोंगराच्या कुशीत वसलेल्या नंदनगरी अर्थात नंदुरबार शहराची पूर्वापार ओळख ही व्यापाऱ्यांची वसाहत म्हणूनच. या गावात १९२६ मध्ये एका व्यापाऱ्याच्या घरात शिरीषकुमारांचा जन्म झाला. त्याच्यासह पाच संवगड्यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती दिली. त्यामुळे या गावाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले. नंदुरबार हे आता कुठे अंदाजे एक लाख लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. परस्परांना ओळखणारे आणि स्नेह जाणणारे लोक आहेत. घराघरांतून चालणारा व्यापार आणि देवाणघेवाण हे महत्त्व जाणून पूर्वापार अनेक ज्येष्ठ प्रवाशांनी या गावाला भेटी दिल्या आहेत. प्रसिद्ध प्रवासी ट्वेनियरने १६६० ला श्रीमंत आणि समृद्धनगरी असे नंदुरबारचे वर्णन केले आहे, तर नंद नावाच्या गवळी राजाने हे गाव वसविल्याची आख्यायिका आहे. ऐन-ए-अकबरी (इ.स. १५९०) मध्ये नंदुरबारचा उल्लेख किल्ला असलेले आणि सुबक घरांनी सजलेले शहर असा आहे.
नंदुरबारमध्ये बाळा शंकर इनामदार नावाचे एक व्यापारी होते. त्यांचा तेलाचा व्यापार होता. त्यांना मुलगा नसल्याने ते काहीसे दु:खी होते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी दुसरा विवाह केला. त्यांना कन्याप्राप्ती झाली. ही कन्या त्यांनी पुष्पेंद्र मेहता यांना सोपवली. १९२४ ला पुष्पेंद्र व सविता यांचा विवाह झाला. २८ डिसेंबर १९२६ ला या दांपत्याच्या पोटी, मेहता घराण्यात शिरीषकुमारचा जन्म झाला. या काळात देशातील अन्य गावे व शहरांप्रमाणेच नंदुरबारचेही वातावरण स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेने भारलेले होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सामान्यांनी काय करायचे तर हाती तिरंगा झेंडा घेऊन प्रभातफेरी, मशाल मोर्चे काढायचे. देशप्रेमांनी ओतप्रोत घोषणा द्यायच्या! नंदुरबारमधील अशा कामात मेहता परिवाराचा सहभाग होता. शिरीष वयपरत्वे शाळेत जाऊ लागला होता आणि त्याच्यावर महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मोठा प्रभाव होता. त्या काळात "वंदे मातरम्' आणि "भारत माता की जय' असा जयघोष करणाऱ्या कोणालाही पोलिस अटक करू शकत होते.
🇮🇳 *नहीं नमशे, नहीं नमशे !*
महात्मा गांधींनी ९ ऑगस्ट १९४२ ला इंग्रजांना "चले जाव'चा आदेश दिला. त्यानंतर गावोगावी प्रभात फेऱ्या, ब्रिटिशांना इशारे दिले जाऊ लागले. बरोबर महिनाभरानंतर, ९ सप्टेंबर १९४२ ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत आठवीत शिकत असलेला शिरीष सहभागी झाला होता. गुजराथी मातृभाषा असलेल्या शिरीषने प्रभात फेरीत घोषणा सुरू केल्या, "नहीं नमशे, नहीं नमशे', "निशाण भूमी भारतनु'. भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. शिरीषकुमारच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकांनी ते आवाहन झुगारले आणि "भारत माता की जय', "वंदे मातरम्'चा जयघोष सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. एका पोलिस अधिकाऱ्याने मिरवणुकीत सहभागी मुलींच्या दिशेने बंदूक रोखली. तेव्हा त्या अधिकाऱ्याला एका चुणचुणीत मुलाने सुनावले, *"गोळी मारायची तर मला मार!'*. ती वीरश्री संचारलेला मुलगा होता, शिरीषकुमार मेहता! संतापलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या, एक, दोन, तीन गोळ्या शिरीषच्या छातीत बसल्या आणि तो जागीच कोसळला. त्याच्यासोबत पोलिसांच्या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्यामदास शहा हे अन्य चौघेही शहीद झाले.
🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌷🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा