शैक्षणिक साहित्य वाटप व शिक्षक दिन साजरा


*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री येथे उत्सहात शिक्षक दिन साजरा*


🛟 *50 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन येथे युनियन बॅक कान्द्री (कन्हान)यांचा संयुक्त विद्यमानाने शिक्षक व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप*
*यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे, युनियन बँकेचे मॅनेजर रवि पाटिल,बॅकेचे कर्मचारी धनोरे, तसेच सोनी,बोन्द्री येथिल पोलिस पाटील अनुसया मेश्राम उपस्थित होते*


*सर्वप्रथम डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णम यांचा प्रतिमेला माल्यार्पण केले तसेच युनियन बँकेचे मॅनेजर रवि पाटिल यांनी विद्यार्थ्यांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षण घ्यावे बॅकेचे खाते उघडावे आपणास अडचण आल्यास बॅकेकडून सहकार्य होईल आदिवासी बहुल भागातील शाळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे त्याचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी उपयोग करावा मुख्याध्यापक वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रम राबविण्यात यावे विद्यार्थ्यांनी विज्ञाना सोबत सांगड घालावी आणि गुणवत्ता पुर्ण शिक्षण घ्यावे. सर्व शिक्षकांचे शिक्षक दिना निमित्त पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आज विद्यार्थ्यांनी स्वयंम अध्ययन पध्दतीने शिक्षक बनवून वर्गात अध्यापनाचे कार्य केले 

विद्यार्थ्यांनचे पालक व शिक्षकांनी कौतुक केले तसेच कार्यक्रमाचे सुञसंचालन कामिनी पाटील व आभार अशोक नाटकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्याम गासमवार, विजय लांडे, प्रशांत सरपाते, सुचिता बिरोले,मिलिंद वाघमारे, प्रभाकर खंडाते सह प्रयत्न केले.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा