कांद्री - माईन येथे प्रशासन आपल्या गावी शिबिराचे यशस्वी आयोजन
प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन विद्यार्थ्यांच्या पुढाकार
कान्द्री-माईन - प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन येथे बुधवार (ता २8) सकाळी दहा ते एक वाजता पर्यंत विद्यार्थी प्रशासन आपल्या गावी चे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन संरपच परमानंद शेडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून कार्मिक अधिकारी ललित अरसडे, उपसरपंच मनजित बहेलिया ,ग्राम पंचायत सदस्य विक्की देशमुख, शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे उपस्थित होते.
नागरिकांना व विद्यार्थ्यांना आवश्यक जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आधारकार्ड, राशन कार्ड, मतदानकार्डे व मतदान नोंदणी याप्रकारची कामे पूर्ण करण्यात प्राधान्य देण्यात आले. नागरिकांना यासारख्या शिबिराचा नक्कीच लाभ होईल असा आशावाद सर्व प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संचालन कामिनी पाटील यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशोक नाटकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्याम गासमवार, विजय लांडे, महानंदा इळपाते, सुचिता बिरोले, अनिता खंडाईत ठकराले बाबु, प्रभाकर खंडाते, मिलिंद वाघमारे सेतू केंद्र कान्द्री-माईन चे नितेश बागडे, कोतवाल प्रभू मेश्राम, पालक सुधिर गोदुले, विनोद रौतेल, सुरेश रौतेल सह इतर पालक होते कान्द्री, माईन, बोन्द्री परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा