क्रांतीवीर उमाजी राजे नाईक जंयती व युवा संवाद कार्यक्रम


*आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांची 231 वी जयंती साजरी*


*तालुका प्रतिनिधी: (रामटेक)*
आज दिनांक 07 सप्टेंबर 2022 रोजी प्रकाश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कांद्री येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प तालुका रामटेक च्या वतीने समान संधी केंद्र उपक्रमांतर्गत 'आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांची 231 वी जयंती व युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्व प्रथम आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांच्या स्वयंरेखीत प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करण्यात आले. याप्रसंगी रामटेक तालुका समतादूत राजेश राठोड यांनी उमाजी राजे नाईक यांची जीवनगाथा व माहिती 


सांगितली.भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वप्राणाची सर्वप्रथम आहूती देणारे, हसत फासावर चढणारे,आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांच्या अतुलनीय कार्याचे समाजाला विस्मरण होऊ नये असे आवाहन केले.तसेच युवा संवाद कार्यक्रमांतर्गत युवकांना समान संधी केंद्र बाबत चर्चा केली.यावेळी मौदा तालुका समतादूत ओमप्रकाश डोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मिलिंद वानखेडे होते त्यांनी युवकांना संवाद कसे असावे या बाबत सोदाहरण मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक अशोक नाटकर यांनी केले.कार्यक्रमास प्राध्यापिका अनिता खंडाईत व महाविद्यालयीन युवक, युवती उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा