Ganpatibappa धर्मराज मध्ये चिमुकल्यांनी साकारले मातीकलेतून गणपती


*धर्मराज मध्ये चिमुकल्यांनी साकारले मातीकलेतून गणपती*

*मातीकलेतून ४९ गणेश मुर्तीची निर्मिती*




कन्हान- येथील धर्मराज प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मातीकलेतून श्री गणेशाच्या मुर्तीची निर्मिती केली.
शिक्षणासोबतच कला कार्यानुभव याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व सुप्तगुणाची जाणीव करण्यासाठी उपक्रमशील शिक्षक श्री अमीत मेंघरे यांच्या संकल्पनेतून *आमचा बाप्पा किती गोड* हा उपक्रम वर्ग पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत ४९ चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध आकारात व रुपात श्री गणरायाची मूर्ती साकारत आम्ही सुद्धा कलेचे उपासक असल्याचे सिद्ध केले आहे.
आज झालेल्या छोटेखानी प्रदर्शनीत या गणेश मुर्ती ठेवण्यात आल्या होत्या. याचे निरीक्षण मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये व शिक्षिका शारदा समरीत यांनी केले. या मातीकलेत प्रथम क्रमांक आयुष मारबते (वर्ग ४था), द्वितीय क्रमांक भुपेंद्र वानखेडे (वर्ग २रा), तृतीय क्रमांक पिहू गि-हे (वर्ग ४था),चतुर्थ क्रमांक प्रनिधी नेवारे (वर्ग १ ला) यांनी पटकाविला. यावेळी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी धर्मराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये, उपक्रमाचे आयोजक श्री अमीत मेंघरे, श्री भिमराव शिंदेमेश्राम, श्री राजू भस्मे, श्री किशोर जिभकाटे, सौ चित्रलेखा धानफोले, कु शारदा समरीत, कु हर्षकला चौधरी, कु अर्पणा बावनकुळे, कु प्रिती सुरजबंसी, वैशाली कोहळे, कु. कांचन बावनकुळे यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा