Neha नृत्य स्पर्धेसाठी नेहा प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी जाणार साता समुद्रापार


नेहा प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनीची जागतिक नृत्य स्पर्धेसाठी निवड

शाळा व संस्थेतर्फे सोनाक्षी किरण पेटारे चा सत्कार.


कन्हान :- अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ, नागपूर द्वारा आयोजित वर्ड डांस आँलमपीयाड सिझन 3 मध्ये नेहा प्राथमिक शाळा कन्हान येथील इयत्ता पाचवीत शिकणारी विद्यार्थींनी सोनाक्षी किरण पेटारे हिने सोलो हिपाॅप या प्रकारात पहिला क्रमांक पटकावत जागतिक नृत्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
जुलै २०२२ मध्ये अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ, नागपूर द्वारा वर्ड डांस आँलमपीयाड सिझन 3 आॅनलाईन पध्दतीने नृत्य स्पर्धा आयोजित केली होती. या नृत्य स्पर्धेत सोनाक्षी किरण पेटारे हिने सहभाग नोंदवित गोल्ड मेडल मिळवित बँकाॅक (थायलंड) येथे होणाऱ्या जागतिक डांस स्पर्धेसाठी सोलो हिपाॅप या प्रकारात आपले स्थान निश्चित केले आहे.


 हि स्पर्धा डिसेंबर 2022 मध्ये थायलंड येथील बॅंकॉक येथे होणार आहे. तिच्या या पात्रतेसाठी नेहा प्राथमिक शाळा व संस्थेतर्फे संस्थापक/अध्यक्ष श्री. प्रेमलाल रोडेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले, तसेच तिचे डान्स प्रशिक्षक लोकेश राऊत यांचा सुध्दा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे संस्थापक/अध्यक्ष श्री. प्रेमलाल रोडेकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश खोब्रागडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री. राजेश पेटारे, सदस्य श्री. दिपक गायकवाड, श्री किरण पेटारे, प्रभाकर बावणे, पवन कोचे, सौ. सोनु पेटारे, मालाबाई पुरवळे, अर्चना पात्रे तसेच शिक्षिका मंगला पाहुणे, सुनिता तांदूळकर, वनिता घोडेस्वार व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता तांदूळकर तर आभार प्रदर्शन मंगला पाहुणे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा