*1 सप्टेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *गुरुवार* 🧩
💥 *राष्ट्रीय पोषक आहार दिन*
💥 *ॠषी पंचमी*
💥 *ॠषी पंचमी याञा आंभोरा नागपूर*
💥 *श्री गजानन महाराज पुण्यतिथी शेगाव*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1956 - भारतीय जीवन बिमा निगम (एल.आय.सी.)ची स्थापना करण्यात आली*
👉 *1951 - अर्नेस्ट हेमिग्वे द ओल्ड मॅन न अंडर द सी ही कादंबरी प्रकाशित झाली या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक पुरस्काराने सम्मानीत*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
👉 *1949 - भारतीय राजकारणी व लोकसभेचे माजी अध्यक्ष व मेघालयचे मुख्यमंत्री पी.ए.संगमा यांचा जन्म*
👉 *1915 - राजदिरसिग बेदी उर्दू कथाकार आणि पटकथालेखक साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मश्री यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*
👉 *2008 - बाटा शुक्रवार कंपनी चे संस्थापक थाॅमस जे बाटा यांचे निधन*
👉 *2014 - स्पॅनडेक्स चे निर्माते योसेफ शेव्हर्स यांचे यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🛟सामान्य ज्ञान 🛟*
*👉महानायक म्हणून कोणत्या चित्रपट कलाकाराला ओळखले जाते?*
*🛟अमिताभ बच्चन*
*👉आपल्याला स्वच्छतेचा संदेश देणारे कोणते एक महान संत होऊन गेले?*
*🛟संत गाडगे महाराज*
*👉महाराष्ट्रातील सप्तश्रृंगी गड (वणी) हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यातील आहे?*
*🛟नाशिक जिल्हा*
*👉भारताने अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह कोणता?*
*🛟आर्यभट्ट*
*👉महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे?*
*🛟प्रवरा नगर(अ.नगर)*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌍 बोधकथा 🌍*
*उंदराचे सिंहाशी लग्न*
*उंदरामुळे जाळ्यातून सुटलेला सिंह खूश होऊन त्या उंदराला म्हणाला, ''अरे, तू माझ्यावर फार उपकार केले आहेस त्यासाठी तुला जे काय हवे असेल ते माझ्याजवळ माग, मी देतो.'' ते ऐकून उंदीर गर्वाने फुगला व आपल्या योग्यतेचा विचार न करता म्हणाला, ''महाराज, ज्या अर्थी आपण आनंदाने काय पाहिजे ते माग म्हणता त्या अर्थी काहीही भीती न धरता मी मागतो की तुमची मुलगी मला द्यावी.'' हे ऐकताच सिंहाला फार वाईट वाटले, पण तो वचनात गुंतल्यामुळे त्याला नाही म्हणता आले नाही. त्याने आपली मुलगी आणून उंदराच्या स्वाधीन केली. ती तरुण मुलगी मोठय़ा डौलाने चालत असता तिचा पाय उंदरावर पडून तो तात्काळ मरण पावला.*
*तात्पर्य :-*
*जे मागायचे ते विचारपूर्वक व आपल्या योग्यतेला साजेल असे मागावे, नाहीतर भलतेच मागणे मागितल्यामुळे संकट निर्माण होईल.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
💥 *आजच्या बातम्या* 💥
*आजपासून नागपूर जिल्ह्यात शिक्षकोत्सव सुरु*
*सुखकर्ता... दुखहर्ता... दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव, घराघरांत बाप्पाच्या आगमनाची लगबग.. राज्यभरात गणेशोत्सवाची धूम.. राजकीय नेते, सेलिब्रिटींसह सार्वजनिक गणेश मंडळाच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा.*
*खबरदार! डीजे वाजवाल तर... नाशिकमध्ये पोलिसांकडून गणेशोत्सव नियमावली जाहीर.*
*राज्यात तब्बल 31 हजार 472 शिक्षकांची पदे रिक्त! दुसरीकडे आहे त्या शिक्षकांना शाळाबाह्य कामात जुंपले!*
*26/11 प्रमाणेच हल्ल्याच्या धमकी प्रकरणी मोठी माहिती तपासात उघड, धमकीच्या फोनसाठी वापरलेला आयपी अड्रेस पाकिस्तानचाच*
*आता हे अण्णा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहेत', केजरीवालांचा भाजपवर निशाणा*
*मोलकरणीचा 8 वर्ष अमानुष छळ, जीभेनं फरशी पुसायला लावली! भाजप नेत्या आणि निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या पत्नीला अटक*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद व्हि. वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
▬ ❚❂❚❂❚ ▬ संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
चंद्रपूर 9403183828 ➿➿➿➿➿➿➿➿➿
✍️♟️🎭🇮🇳👨🏻🇮🇳🎭♟️✍️
*वाजिद अली शाह*
*जन्म : ३० जुलै १८२२*
(लखनऊ, भारत)
*मृत्यू : १ सप्टेंबर १८८७*
(कोलकाता, भारत )
*शासनकाळ :*
१३ फेब्रुवारी १८४७
ते ७ फेब्रुवारी १८५६
पूर्ववर्ती : अमजद अली शाह
उत्तरवर्ती : बिरजिस क़द्र
अवधच्या तख्तावर १३ एप्रिल १८४७ रोजी नबाब वाजिद अली शाह बसला. अवधच्या सर्व नबाबात तोच एकटा जनतेचा आवडता नबाब होता. त्याचा जन्म १८२३ साली झाला होता. आपल्या प्रजेच्या तक्रारी तो स्वतः ऐकायचा. योग्य प्रकारे न्याय दान करायचा. बिशप हेबरने म्हणाले आहे की, "अवध राज्यातील शेती फारच सुपीक असून प्रजा सुखासमाधानात आहे. या राज्यातील जनतेची स्थिती आणि उद्योग पाहिल्यावर असे दिसून येते की, येथे कोणावरही अत्याचार होत नाही." अवधचे राज्य समृद्ध होते. नबाब धनाढ्य होते. वाजिद अली शाहच्या पूर्वजांनी कंपनी सरकारला वेळोवेळी लाखो रुपयांची मदत केली होती. वॉरन हेस्टिंग्जला युद्ध समयी २ कोटी, लाई एम्हर्स्टला ५० लाख रूपये, विल्यम बेटिंगला ६२ लाख रूपये दिले होते. अवधचे सगळे नबाब कंपनी सरकारचे दोस्त होते. तरीही कंपनी सरकारने वेळोवेळी त्यांच्याशी अपमानास्पद तह केले. तैनाती फौज व रेसिडेंट ठेवायला लावले. त्यांचा खर्च जबरदरत होता. आणखी त्या नबाबांना दरवर्षी ७६ लाख रुपये खंडणी म्हणून कंपनी सरकारला द्यावे लागत होते. कंपनी सरकारच्या अधिका-यांच्या हस्तक्षेपामुळे व धनलोभामुळे अवध राज्याचा कारभार विस्कळीत होत होता. तरीही प्रत्येक गव्ह. जनरल अवधच्या नवाबांना धमकी देत होती की, "राज्यकारभारात सुधारणा करा, नाहीतर तुमचे राज्य आम्ही आमच्या ताब्यात घेऊ." चोराच्या उलट्या बोंबा, दुसरे काय ? खरे पाहिले तर सारेच इंग्रज गव्ह. जनरल अवधचे राज्य हडपण्यासाठी ललचावले होते.
इंग्रज अधिका-यांच्या हस्तक्षेपामुळे अवध दरबारात काटकारस्थाने होत होती. इंग्रजांची सत्ताकांक्षा व त्यांची दहशत यामुळे अवधचे नाव हतबल झालेले होते. वाजिदअली शाह मात्र अत्यंत स्वाभिमानी होता. वयाच्या २५ व्या वर्षीच तो अवधच्या तख्तावर आला होता. त्याच्या पूर्वजांनी व त्याने आपली राजधानी लखनौ नगरीत अनेक भव्य कलापूर्ण इमारती बांधल्या. सुंदर बागा तयार केल्या. त्या काळात लखनौ हे अत्यंत सुदर शहर म्हणून प्रसिद्ध होते. जनता सुखासमाधानाने नांदत होती.
लखनौच्या तख्तावर बसल्यावर वाजिद अली शाहने आपला राज्यकारभार अतिशय चांगल्या प्रकारे सुरू केला. आज जेथे चारबाग स्टेशन आहे, तेथे त्या काळात एक मोठे मैदान होते. त्या मैदानावर वाजिद अली शाह स्वतः आपल्या सैनिकांची परेड दररोज सकाळी दोन तास घेत असे. आपले सैन्य शिस्तबद्ध आणि लढण्यात वरचढ व्हावे, यासाठी तो खपत होता. हे रेसिडेंटला पाहविले नाही. त्या इंग्रज रेसिडंटने लखनौ दरबारच्या हकिम ( वैद्य ) याला लाच देऊन आपल्या विश्वासात घेतले व त्याला पटवून दिले की, " नबाबाने दररोज एवढे कष्ट उपसले तर त्याला क्षयरोग होईल. म्हणून त्याने परड घेणे बंद केले पाहिजे, हे तुम्ही नावाच्या आईला पटवून द्या. ' ' त्या हकिमाने वाजिद अली शाहची आई मालिका किश्वर हिला त्याप्रमाणे सांगितले व नबाबाला दररोजची परेड बंद करण्याचे सुचविले. कोणत्याही आईला आपल्या मुलाची काळजी वाटणारच. तिने आपल्या मुलाला ती दररोजची परेड बंद करायला भाग पाडले. त्यामुळे इंग्रज रेसिडेंट सुखावला.
रेसिडेंटने नंतर दुसरी चाल खेळली. नबाब आता मोकळाच असे. रेसिडेंटने त्याला चैनविलासात हळूहळ गुंतविले. वाजिद अली शाह जात्याच रंगेल प्रवृतीचा होता. तो चैन विलासात पूर्णपणे गुंतला. दोन तीन दिवसानंतर अधून मधून थोडावेळ दरबारात जात असे. त्यामुळे दगारीचे फावले. त्यांची कटकारस्थाने सुरू झाली. त्याचा राज्यकारभारावर परिणाम होऊ लागला. अव्यवस्था दिसू लागली हेच कंपनी सरकारला हवे होते. तरीही अवध राज्यात सुखसमाधान नांदतच होते.
वाजिद अली शाह कलासक्त होता. नृत्य , गायन , संगीत , नाट्य याची त्याला आवड होती. तो स्वतः शायर होता. दीवान - इ - अख्तर आणि हरन - इ - अस्तर हे त्याचे दोन गझल संग्रह प्रसिद्ध आहेत. त्याला पैशाची कमतरता नव्हती. दरवर्षीचे त्याचे उत्पन्न १५ लाखांवर होते. त्याने आपल्या दरबारात संगीत , नृत्य , गायन , नाट्य , शेरो-शायरी आदी कलांना उत्तेजन दिले. उदार आश्रय दिला. उर्दू , अरबी , हिंदी , फारसी या भाषांवर त्याचे प्रभुत्त्व होते. त्याचा बहुतेक वेळ या कलांच्या आस्वादातच जाऊ लागला. त्याने एक परीखाना उभारला. शंभरावर सुंदर मुली त्या परीखान्यात ठेवल्या. त्याच्या संगीत - नृत्य - गायनादी कलाच्या शिक्षणासाठी अनेक उस्ताद ठेवले. कृष्ण कन्हैयाची रासलीला त्याला फार आवडायची. तो स्वतः कृष्णाची भूमिका करायचा. परीखान्यातील प-या गोपिका व्हायच्या व त्यांची रासलीला चालायची. परीखान्यात दाखल झालेल्या मुलीला ' परी ' म्हणायची पद्धत त्याने सुरू केली होती. बेगम हजरत महल लहानपणी त्या परीखान्यात दाखल झाली. तेव्हा तिचे सौंदर्य पाहून वाजिद अली शाहने तिला
' महकपरी ' असा किताब दिला. ती वयात आल्यावर त्याने तिच्याशी निकाह लावला व ती बेगम हजरत झाली. हे लग्न १८३५ मध्ये झाले. १८३८ साली तिला पुत्ररत्न प्राप्त झाल्यावर ती ' बेगम हजरत महल ' झाली. ज्या बेगमला मुलगा होत असे तिच्या नावापुढे ' महल ' हे किताब दर्शक नाव लावण्याचा प्रघात होता. हीच बेगम १८५७ सालच्या स्वातंत्र्य युद्धात प्रसिद्ध झाली.
वाजिद अली शाहची रासलीला कैसरबाग या भव्य महालात होत असे. त्याने स्वतः
‘ राधा कन्हैय्याका किरसा ' हे नाटक लिहिले व त्याचा प्रयोग कैसरबाग महालात केला. कैसर बाग हे भारतातले पहिले नाट्यगृह होते. त्या नाट्यमंचावर आगा हसन अमानत याने लिहिलेले ' इंदर सभा ' या नाटकाचाही प्रयोग झाला. वाजिद अली शाह हा भारतीय रंगभुमीचा जनक मानला जातो. त्याने ' बहार - इ उल्फत ' हे नाटक लिहून ४० / ५० नृत्य - गायन - निपुण सुंदरीच्या साह्याने केसर बागच्या रंगमंचावर त्याचे प्रयोग केले होते. त्याला शतरंज ( बुद्धिबळ ) खेळण्याचा ही शौक होता . तास- न -तास तो त्याखेळात खेळात रंगून जाई. असा हा कलासक्त व बुद्धीमान नबाब इंग्रज सरकारच्या कारवायांना बळी पडला. त्याने प्रत्यक्षपणे इंग्रजांशी रणांगणावर दोन हात केले नाहीत. पण इंग्रजांनी त्याला पदव्युत करताच अवधची जनता इंग्रजाविरूद्ध बंड करून उठली, हे त्याचे स्वातंत्र्य लढ्यातील अप्रत्यक्ष योगदानच आहे.
वाजिद अली शाहच्या काळात स्लीमन हा लखनौचा इंग्रज रेसिडेंट होता. त्याला वाटत होते की, "अवधचे राज्य कंपनी सरकारने आपल्या ताब्यात घेऊ नये." पण गव्ह. जन. डलहौशीने त्याला अवध राज्याविषयी खराब रिपोर्ट पाठविण्यासाठी रेसिडेंट म्हणून पाठविले होते. त्याला तर अवध राज्यात तशी काही चिन्हे दिसेनात. पण वरिष्ठाची आज्ञा म्हणून त्याने तसा सौम्य स्वरुपाचा रिपोर्ट डलहौसीला सादर केला आणि तो आपल्या नोकरीचे त्यागपत्र देऊन इंग्लडला निघून गेला. डलहौशीने त्याच्या जागी आउट्रम याची नेमणूक केली. त्याने स्लीमनच्या रिपोर्टवरूनच अवध दरबाराची बदनामी असलेला रिपोर्ट डलहौसीला दिला. त्याचे काम झाले. त्याला कोणत्याही परिस्थितीत अवधचे राज्य बळकावयाचे होते. कारण कलकत्ता ते दिल्ली पंजाब या मार्गात अवधचे राज्य आड येत होते. तो समृद्ध प्रदेश ताब्यात आल्यावर कंपनी सरकारच्या उत्पन्नात फार मोठी भर पडणार होती. हे राज्य ताब्यात आल्यावर दिल्लीची दुर्बल बादशाही सहज नष्ट करता येईल, अशी डलहौसीची योजना होती. म्हणून त्याने लखनौच्या रेसिडेंटकडे एक तहनामा पाठविला. रेसिडेंटने तो तहनामा ४ फेब्रुवारी १८५४ रोजी वाजिद अली शाह समोर ठेवला. तो तहनामा वाचताच वाजिद अली शाह मनातून संतप्त झाला. पण वरून शांत दिसला . त्याने त्या तहनाम्यावर आपले हस्ताक्षर केले नाही. त्यात पहिले कलम होते, वाजिद अली शाहने स्वतःहून राज्य त्याग करावा आणि आपले अवधचे राज्य कंपनी सरकारच्या ताब्यात द्यावे. ते वाचताच वाजिद अली शाहने बाणेदारपणे त्या रेसिडेंटला सुनाविले की, “ संधियाँ बराबर वालोमें होती हैं । इस कारण इस संधिपर मेरे हस्ताक्षरकी जरूरत नहीं है ।' दुसरे कलम असे होते की, कंपनी सरकार वाजिद
अली शाहला दरवर्षी १२ लाख रुपये पेन्शन देत जाईल." त्यावरही तो सडेतोडपणे म्हणाला, "अंग्रेजोने मेरा सन्मान और देश छीन लिया है । जीवनयापन के लिए मुझे तुम्हारी भीख की जरूरत नहीं है । रेसिडेंट एवढेसे तोंड परत गेला व त्याने भेटीची सर्व हकिकत डलहौसीला कळविली. तेव्हा डलहौसीने एकतर्फी जाहीरनामा काढून "अवधचे राज्य कंपनी सरकारच्या राज्यात सामील करून घेतले आहे" असे जाहीर करून टाकले आणि ७ फेब्रुवारी १८५६ रोजी डलहौसीने अवध राज्य बळकाले. त्याच दिवशी रेसिडेंट आऊट्रमने वाजिद अली शाह याला अटक केली. व त्याला कलकत्याला पाठविण्याची तयारी केली. बेगम खास महल आणि काही बेगमा आपल्या दास दास्यांसह त्याच्या बरोबर कलकत्यास गेल्या. बेगम हजरत महल मात्र लखनौलाच राहिली. वाजिद अली शाह जेव्हा लखनौहून निघाला, तेव्हा त्याने एक शेर म्हटला, दसे दिवार पर हसरतकी नजर करते हैं । खुश रहो अहले वतन, हम तो सफर करते हैं ' ( प्रत्येक घराच्या दरवाज्यावर आम्हाला दु : खाची छाया दिसते आहे. प्रजाजनांनो तुम्ही खुश राहा. आम्ही तर निघालो आहोत.)
वाजिद अली शाह कलकत्याला पोचल्यावर त्याला व त्याच्या परिवाराला मातीया बुर्ज ( मातीचा बुरुज ) येथील एका महालात नजर कैदेत ठेवले. तेथे त्याने नृत्य - नाट्य - गायन - संगीत आदी कलांना उत्तेजन दिले. संगीताची दैवी देणगीच त्याला लागली होती. २१ जून १८८७ रोजी तेथेच त्याचे निधन झाले . तेथेच त्याची कबर आहे. वाजिद अली शाहने इंग्रजाशी युद्ध केले नाही. पण त्याच्या पदच्युतीने सारा अवध प्रात इंग्रजाविरूद्ध बंड करून उठला. शेवटच्या तहनाम्याविषयी त्याने बाणेदारपणे रेसिडेंटला सुनावले व पेन्शनही नाकारले, हे त्याचे करणे क्रांतिकारकच होते. त्याच काळात अनेक राजे-रजवाडे इंग्रजापुढे लाचार झाले होते. असे उतर इंग्रज अधिका-यांना देण्याची त्यांची हिम्मतच नव्हती.
🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🌹🙏 *विनम्र अभिवादन* 🌷🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा