15 ऑक्टोबर दिनविशेष


*15 ऑक्टोबर दिनविशेष 2022 !*
        🧩 *शनिवार* 🧩


💥 *वाचण प्रेरणा दिन*
💥 *अंध सहाय्यता दिन*
💥 *वृत्तपञ विक्रेता दिन*
         
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *1999 - जागतिक फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठी यांना प्रदान*         
👉 *1997 - भारतीय लेखिका अरुंधती राॅय यांचा द गाॅड ऑफ स्माॅल थिग्ज या कांदबरीला साहित्य क्षेञातील प्रतिष्ठेच्या समजला जाणारा बुकर पुरस्कार मिळाला*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*

👉 *1931 - वैज्ञानिक आणि भारताचे 11 वे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म*
👉 *1969 - पं. संजीव अभ्यंकर मेवानी घराण्याचे शास्ञीय गायक    यांचा जन्म*
👉 *1957 - मीरा नायर- भारतीय वंशाच्या अमेरिकन चिञपट निर्माते व दिग्दर्शक  यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *2012 - कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान नाॅरदाॅन सिहानोक यांचे निधन*
👉 *2002 - वसंत सबनीस  - लेखक व पटकथालेखक  यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आजच्या बातम्या*

*1.* दिवाळीच्या तोंडावर दहा दिवसांसाठी एसटी प्रवास महागणार, प्रवास भाड्यात 75 रुपयांपर्यंत हंगामी वाढ 

*2.* अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके आणि भाजपच्या मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल, दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन 

*3.* हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा; 12 नोव्हेंबर रोजी मतदान तर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी  गुजरात विधानसभा निवडणुका प्रतीक्षेतच; पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जारी होण्याची शक्यता 

*4.* माओवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात साईबाबा निर्दोष; मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय 

*5.* ज्ञानव्यापी मशीद प्रकरण: कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग होणार नाही; वाराणसी कोर्टाचा निर्णय 

*6.* दिवाळीपूर्वी समृद्धीचा पहिला टप्पा सुरु होण्याची शक्यता, एमएसआरडीसीचे संचालक राधेश्याम मोपलवारांकडून आढावा 

*7.*  लाचखोरीचे लोण आता लष्करी विभागापर्यंत, नाशिकमध्ये दोन अधिकारी सीबीआयच्या ताब्यात  

*8.* राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह सापडला; गुरुवारपासून सुरू होता शोध 

*9.* राज्यातील 'या' जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका, मुंबईसह उपनगरातही मुसळधार द्राक्षाचे हब असणाऱ्या कासेगावाला परतीच्या पावसाचा फटका, बागांचं मोठं नुकसान 

*10.* दुखापतग्रस्त बुमराहच्या जागी शामीची निवड, टी-20 विश्वचषकात भारतीय गोलंदाजीचं नेतृत्व करणार  विश्वचषकात मध्ये सर्वाधिक सामने कोण खेळलं, सर्वाधिक सामन्यात कर्णधार कोण? सर्वाधिक अर्धशतकं कुणाच्या नावावर? 

कारमधील चालकासह आता प्रत्येक प्रवाशाला सीटबेल्ट लावणे बंधनकारक, 1 नोव्हेंबरपासून अंमलबजावणी 

धक्कादायक! पुण्यातील तरुण सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; सलग दुसऱ्या दिवशी सेक्सटॉर्शनचा दुसरा बळी  पुण्यात सेक्सटॉर्शनमधून होताहेत आत्महत्या, जाणून घ्या हा प्रकार आहे तरी काय? 

दिलासादायक बातमी! निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत, दिवाळी गोड होणार! 

Washim News : कुरघोड्या बंद करा, शेतकऱ्यांना न्याय द्या, वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यानं लावलं व्यथा मांडणारं पोस्टर 

राज्यात शीख विवाहासाठीचा 'आनंद' विधी कायदा लागू करणार का? राज्य सरकारला सहा आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश 

MCA Election: एमसीएच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटला! पवार-शेलार पॅनलकडून अमोल काळेंच्या नावाची घोषणा, संदीप पाटील विरुद्ध लढणार 

Corona New Varient : ओमिक्रॉनपेक्षाही धोकादायक आहे नवा BF.7 व्हेरियंट, 'ही' लक्षणे दिसल्यास सावध व्हा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═➖➖➖➖═━┅

*👉भारतात इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे ?*
*🥇दिल्ली*

*👉फैजाबाद जिल्ह्यात असलेले अयोध्या हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?*
*🥇उत्तर प्रदेश*

*👉ययाती कादंबरीबद्दल कोणत्या लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ?*
*🥇वि. स. खांडेकर*

*👉महाराष्टू राज्याच्या पोलिस ध्वजाचा रंग कोणता आहे ?*
*🥇गडद निळा*

*👉महाराष्ट्रातील पहिले माहिती आयुक्त कोण होते ?*
*🥇डॉ सुरेश जोशी*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
*🤲लोभी माणूस*

*एका लोभी माणसाने आपला सगळा पैसा शेतात पुरून ठेवला होता.  तेथे दिवसातून दोन वेळा जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे समाधान मानीत असे.  ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला की, आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो, तेव्हा तेथे काहीतरी पुरलेले असावे.  रात्री त्याने तेथे जावून खणून पाहिले तर आत बरेच धन त्याला दिसले.  ते घेऊन तो पळून गेला.  दुसर्‍या दिवशी तो लोभी माणूस नेहमीप्रमाणे तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले.  मग तो डोके बडवून घेत रडू लागला.  तेव्हा त्याचा शेजारी त्याच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला.  लोभी माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितली.  ते ऐकून शेजारी म्हणाला, ''अरे मला वाटते की तसे तुझे काहीच गेले नाही. आपला पैसा येथेच आहे, असे समजून तू पूर्वीप्रमाणेच या जागेकडे पहात जा म्हणजे झाले.''*

*🧠तात्पर्य :- लोभी माणसे पैसे असून दारिद्र्यी व अशांना पैश्यांचा उपयोग न होता दुसरेच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतात.  जवळ असलेला पैसा वापरायचा नाही तर तो चोरीला गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ आहे?*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
              चंद्रपूर 9403183828                                                      ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  
📡🚀🛰️🇮🇳👮‍♂️🇮🇳🛰️🚀📡
                 *भारतरत्न*
*अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम*
                       तथा  
            *ए. पी. जे. अब्दुल कलाम*
(भारताचे ११ वे राष्ट्रपती,  वैज्ञानिक, अभियंता)
       *जन्म : १५ ऑक्टोबर १९३१*
                *(रामेश्वर)*
       *मृत्यू : २७ जुलै २०१५*
                *(शिलाँग)*
सन्मान : भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण
                   कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य 
लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

🚀 *कार्य* 🛰
                १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
 📚 *शिक्षण*
             त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत.त्यांचे वडील व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते.त्यांच्यातील अध्यात्मिक चर्चा कलाम ऐकत असत.डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

 ♦ *स्वभाव* 
    विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
 
🥇 *गौरव*
                    अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
 
 *निधन*
               ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.
        🇮🇳  *जयहिंद*  🇮🇳
🌹🙏 *विनम्र अभिवादन* 🙏
                                                                                                                      ➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा