नागपूर विद्यापीठाचा नोदणीकृत पदवीधराच्या सुचीबाबत


*नागपूर विद्यापीठाचा नोदणीकृत पदवीधराच्या सूचीबाबत*

दिनांक २० ऑक्टोबर २०२२


नोंदणीकृत पदवीधरांच्या सूचीबाबत

या अधिसूचनेद्वारा संबंधित सर्व पदवीधरांना सूचित करण्यात येते की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधरांच्या नोंदवहीत नाव नोंदविण्याकरिता विद्यापीठाच्या पदवीधरांकडून विद्यापीठ अधिसूचना क्रमांक रातुमनावि / साम / निक/२२/२. दिनांक २८ एप्रिल २०२२ नुसार अर्ज मागविण्यात आले होते. तद्नुसार प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधरांच्या नोंदवहीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र ठरलेल्या आणि नोंदवहीत नोंद झालेल्या पदवीधरांची तात्पुरती सूची विद्यापीठाच्या www.nagpuruniversity.ac.in या संकेतस्थळावरीत Election-2022 या ●Portal वर प्रसिध्द करण्यात आली असून सूचीतील पदवीधरांना अधिसभा निवडणूक - २०२२ करिता मतदार म्हणून त्यांचे नांव नोंदणीकृत पदवीधर गटाच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच ज्या पदवीधरांचे अर्ज पदवीधर नोंदणीसाठी अपात्र ठरले आहेत त्या पदवीधरांची सूची अपात्रतेच्या कारणांसह वरील Portal वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ज्या संबंधित पदवीधरांना वर नमूद सूचीवर आक्षेप नोंदवायचा असेल, असे पदवीधर मा. कुलगुरूंकडे मंगळवार, दिनांक २५ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत आक्षेप नोंदवू शकतील. या आक्षेपांवरील मा. कुलगुरूंचा निर्णय अंतिम असेल.

त्याचप्रमाणे यासंदर्भात संबंधित सर्व पदवीधरांना सूचित करण्यात येते की, २०१७ अधिसभा निवडणुकीपर्यंत ज्या पदवीधरांचे नाव नोंदणीकृत पदवीधर सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. अशा नोंदणीकृत पदवीधरांना नोंदणीकृत पदवीधर गटाच्या मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्याकरिता FORM-B मध्ये माहिती ऑनलाईन प्रणालीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत सादर करणे अनिवार्य राहील ( २०१७ अधिसभा निवडणुकीनंतर नोंदणी केलेल्या नविन पदवीधरांना वगळून), २०१७ मध्ये विद्यापीठ प्राधिकरण्याच्या निवडणूकीवेळी केलेली मतदार यादी ग्राह्य धरली जाणार नाही.

याबाबतच्या विस्तृत माहितीविषयीची अधिसूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील Election-2022 या Portal वर प्रकाशित करण्यात आली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

मा. कुलगुरूंच्या आदेशान्वये,

(डॉ. राजू हिवसे) कुलसचिव व निवडणूक निर्णय अधिकारी
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सिनेट निवडणूक 2022*

नवीन पदवीधर मतदार नोंदणी यादी www.nagpuruniversity.ac.in या संकेतस्थळावरील Election -2022 या Portal वर प्रसिध्द करण्यात आली आहे.
कृपया पदवीधर मतदारांनी आपले नाव तपासून घ्यावे,आक्षेप असल्यास दिनांक २५ ऑक्टोंबर २०२२पर्यंत नोंदवावे.
२०१७ पर्यंत ज्या मतदारांची नावे नोंदणीकृत मतदार यादीत आहेत त्यांनी Form -B मध्ये आँनलाईन माहिती भरावी,धन्यवाद!

🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा