नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ मतदार नोंदणी


*नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ*
*मतदार नोंदणी*
............................................
*नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणी 01 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार आहे. हे नोंदणी फॉर्म आणि प्राचार्य/मुख्याध्यापक प्रमाणपत्र.*


*आपल्या विद्यालयातील/कनिष्ठ महाविद्यालयातील/महाविद्यालयातील मुख्याध्यापक/प्राचार्य तसेच सर्व शिक्षक/प्राध्यापक यांचे फॉर्म क्रमांक 19 (मुख्याध्यापक/प्राचार्य यांचे प्रमाणपत्रासह) एकत्र करून त्यासह आपल्या शाळा/महाविद्यालयाचे कव्हरींग लेटर शिक्षक/प्राध्यापक यांच्या यादिसह जोडून आपल्या तालुक्यातील मा.तहसीलदार/मा.निवडणूक अधिकारी यांचेकडे सबमिट करावे व त्याची एक रिसिव्हड कॉपी आपल्या दप्तरी ठेवावी.*

*या मतदार नोंदणीत आपण सहकार्य करावे ही नम्र विनंती.*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴
➖➖➖➖➖➖➖➖➖


*मतदार म्हणून कुणाची नोंदणी करता येईल.*

*१) माध्यमिक पेक्षा कमी दर्जा नसलेल्या शाळा,कनिष्ठ महाविद्यालय,महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक तथा सर्व प्राध्यापक आणि शिक्षक (०१ ऑक्टोबर २०२२ ला आपल्या सेवेची कमीत कमी तीन वर्ष पूर्ण करनारे. वरिष्ठ महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर कार्य करणारे प्राध्यापक सुद्धा नोंदणी करू शकतात.)*
*२)बी.एड.कॉलेज तथा डी.एड.कॉलेज येथील प्राचार्य व प्राध्यापक.*
*३)आय. टी.आय.येथे कार्यरत प्राचार्य तसेच निर्देशक.*
*४)मेडिकल कॉलेज तसेच इंजिनियरिंग कॉलेज चे प्राचार्य आणि प्राध्यापक.*
*५)इयत्ता १० किंवा त्यावरील वर्ग असणारे कॉन्व्हेन्ट मधील प्राचार्य आणि सर्व शिक्षक.*
*६)शासकीय तसेच माध्यमिक आश्रम शाळांतील प्राचार्य,मुख्याध्यापक,प्राध्यापक,शिक्षक.*
*७)शासन मान्य कम्प्युटर तसेच टायपिंग इन्स्टिट्यूट मधील शिक्षक.*

*आवश्यक कागदपत्रे*

*१)फॉर्म नंबर 19 व सोबत प्राचार्य/मुख्याध्यापक यांचे प्रमाणपत्र.*
*२)मतदार ओळखपत्रक्रमांक (EPIC No.)*
*३)आधार क्रमांक*
*४)पूर्ण चेहरा आणि दोनही कान दिसतील असा 4.5 बाय 3.5 सेमी.आकाराचा कलर पासपोर्ट फोटो.*

*(या मतदार नोंदणीला कोणत्याही प्रकारचे कागदपत्र जोडायचे नाही. प्राचार्य/मुख्याध्यापक यांचे प्रमाणपत्र हेच अंतिम पुरावा मानला जातो.)*
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा