10 नोव्हेंबर दिनविशेष


*10 नोव्हेंबर दिनविशेष 2022 !*
      🧩 *गुरवार* 🧩


💥 *जागतिक विज्ञान दिन*
         
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *2001 - ज्येष्ठ अणूशास्ञज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डाॅ आर चिदंबरम यांची केन्द्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड*        
👉 *1983 - बिल गेट्स यांनी विंडोज 1.0 प्रकाशित केले*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*

👉 *1952 - सुनंदा बलरामन- सुप्रसिद्ध लेखिका  यांचा जन्म*
👉 *1920 - दत्तोपंत ठेगंडी- भारतीय समाजकारणी, स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ व कामगार संघ संस्थापक  यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 **2013 - विजयदन देठा - भारतीय लेखक  यांचे निधन*
👉 *2009 - सिंपल कपाडिया  - अभिनेञी व वेषभूषाकार  यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02dckBfD8kV3szrx1XjToXNcGQKKYuN5NBzPwURYwH1Vuk7iwhV7YQ1cUypab44ypxl&id=100004484765144
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आजच्या बातम्या*

१.संजय राऊतांना जामीन मंजूर, तब्बल 100 दिवसांनी जेलबाहेर येणार  संजय राऊतांना जामीन अन् कोर्टात टाळ्यांचा कडकडाट, वाचा नेमकं काय घडलं?  संजय राऊत यांची अटक ही बेकायदेशीर; PMLA कोर्टाचे ईडीवर ताशेरे, ईडीने स्वतःच्या मर्जीने आरोपी निवडल्याचा घणाघात.. मुख्य आरोपींना मोकाट सोडल्याबद्धल कोर्टाचा संताप 

२. जामीन मिळताच संजय राऊतांच्या मोतोश्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या..  उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया  संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक, त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण गद्दारी केली नाही : आदित्य ठाकरे 

३. खासदार संजय राऊत यांना अटक ते सुटका... असा आहे घटनाक्रम  आधी गोंधळले, मग भावूक झाले; जामीन मंजूर झाल्यावर संजय राऊतांचे डोळे पाणावले  पिंजऱ्यातून वाघ बाहेर येतोय, राऊतांच्या जामीनावर नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया, पाहा कोण काय म्हणाले? 

४. शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यातील सर्वात मोठी निवडणूक जाहीर, 7750 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान  नाशिकमध्ये पुन्हा 177 ग्रामपंचायतींची रणधुमाळी, असा आहे निवडणूक कार्यक्रम  कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर 

५. भारत जोडो यात्रा ‘मन की बात’ची यात्रा नाही, जनतेच्या चिंतेची यात्रा: जयराम रमेश  भाजपकडून भारत जोडो यात्रा थांबवण्याचा प्रयत्न, पण...पाहा नेमकं काय म्हणाले जयराम रमेश 

६. ऐतिहासिक सिनेमांच्या मान्यतेसाठी इतिहास तज्ज्ञांची समिती स्थापन करा; 'हर हर महादेव'च्या वादानंतर आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र 

७. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड देशाचे 50 वे सरन्यायाधीश, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ 

८. दिल्ली-NCR ते उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, नेपाळमध्ये भूकंपाचं केंद्र..  तीव्रता 6.3 रिश्टर स्केल  देशातील 'या' राज्यांना भूकंपाचा सर्वाधिक धोका, जाणून घ्या तुम्ही कोणत्या झोनमध्ये आहात? 

९. संभाजी भिडे आणि सुधा मूर्ती यांच्या भेटीनंतर 'रामायण' सुरुच; आता नवा वाद सुरु 

१०.  पाकिस्तानची फायनलमध्ये धडक, न्यूझीलंडवर 7 गडी राखून मात  भारत- पाकिस्तानमध्ये फायनल होऊ देणार नाही, इग्लंडचा कर्णधार जोस बटलरचा सेमीफायनलपूर्वी इशारा
➖➖➖➖➖➖➖➖➖    *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज  कान्द्री-माईन* 
*9860214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  
⚜️📰✍️🇮🇳👨🏻🇮🇳📰✍🏢
    *बंगालचा अनभिषिक्त राजा*
    *सुरेंद्रनाथ दुर्गाचरण बॕनर्जी*

  *जन्म : 10 नोव्हेंबर 1848*
(कोलकाता, पश्चिम बंगाल, ब्रिटिश भारत) 
   *मृत्यू : 6 ऑगस्ट 1925*
                  *(वय 76)*
(बॅरेकपूर , बंगाल प्रेसीडेंसी (आता पश्चिम बंगाल), ब्रिटिश भारत )

राष्ट्रीयत्व : भारतीय
इतर नावे : सरेंडर नाॕट बॅनर्जी, राष्ट्रगुरू, इंडियन एडमंड बुर्के, सुरेंद्रनाथ बॅनर्जी
गुरुकुल : कलकत्ता विद्यापीठ
व्यवसाय : अभ्यासक, राजकारणी   प्रसिद्ध : भारतीय राष्ट्रीय  
             संघटनेचे संस्थापक 
राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय
                       कॉंग्रेस

                  सुरेंद्रनाथ बॕनर्जी थोर भारतीय नेते व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक. जन्म कलकत्ता येथे. वडील दुर्गाचरण डॉक्टर होते. सुरेंद्रनाथांचे प्राथमिक व उच्च शिक्षण कलकत्त्यातच झाले. बी. ए. झाल्यानतंर (१८६८) इंग्‍लंडला जाऊन ते आय्. सी. एस्. परीक्षा उत्तीर्ण झाले (१८६९). भारतात परतल्यावर त्यांची साहाय्यक दंडाधिकारी म्हणून सिल्हेटला नियुक्ती झाली पण त्यांच्या प्रशासनातील किरकोळ चुकांचा बाऊ करून ब्रिटिश सरकारने त्यांना नोकरीवरून काढले (१८७४). त्या विरुद्ध त्यांनी इंग्‍लंडमध्ये जाऊन इंडिया ऑफिसकडे दाद मागण्याचा प्रयत्‍न केला पण तो निष्फळ ठरला. त्यांना बार ॲट लॉच्या परीक्षेसही परवानगी नाकारण्यात आली. इंग्‍लंडमधील मुक्कामात एडमंड बर्क, जूझेप्पे मॅझिनी यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या अशा अन्याय्य धोरणामुळेच त्यांच्या विरुद्ध जनमत जागृत करण्याची चळवळ त्यांनी हाती घेतली (१८७५). कलकत्त्यातील मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये (विद्यमान विद्यासागर महाविद्यालय) ते सुरुवातीस इंग्रजी विषयाचे अध्यापक होते. नंतर काही दिवस ते फ्री चर्च कॉलेज मध्ये होते. पुढे त्यांनी रिपन महाविद्यालय (विद्यमान सुरेंद्रनाथ महाविद्यालय) स्थापन केले. तेथेच अध्यापक म्हणून त्यांनी  ३७ वर्षे घालविली तथापि राजकारणा पासून ते अलिप्त नव्हते. जनजागृतीसाठी त्यांनी बेंगॉली हे इंग्रजी वृत्तपत्र काढले (१८७८). त्यातून त्यांनी ५० वर्षे सातत्याने लेखन केले.

शिखांचा इतिहास तसेच भारतीय एकात्मता यांसारखे विषय हाताळून राष्ट्रीय जागृती करण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला. त्यांच्या वक्तृत्वाचा तत्कालीन बंगाली तरुणांवर व विशेषतः ब्राह्यो समाजातील अनुयायांवर एवढा परिणाम झाला, की ते सुरेंद्रनाथांच्या चळवळीत सहभागी होऊ लागले. सुरेंद्रनाथांनी इंडियन ॲसोसिएशन ही संस्था स्थापन केली (२६ जुलै १८७६) आणि तिच्या प्रसारार्थ भारतभर दौरा काढला. बेंगॉली या वृत्तपत्रातून कलकत्ता उच्च न्यायालयाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. तेव्हा देशभर हरताळ व निषेधाच्या सभा झाल्या. भारतीय सनदी सेवा परीक्षेचे किमान वय २१ वरून १९ वर आणण्यात आल्याने होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी भारतभर प्रचार केला. सुरेंद्रनाथांनी इंडिया ॲसोसिएशनतर्फे राष्ट्रीय सभा कलकत्त्यात बोलविली (डिसेंबर १८८३). यानंतर दुसरी सभा १८८५ मध्ये कलकत्त्यातच घेण्यात आली. राष्ट्रीय काँग्रेसचे ते दोनदा (पुणे–१८९५ अहमदाबाद–१९०२) अध्यक्ष झाले. सुरुवातीपासून ते मवाळ पक्षात होते बंगालच्या फाळणीला त्यांनी कडाडून विरोध केला (१९०५) आणि बहिष्काराचा जोरदार पुरस्कार केला. सुरेंद्रनाथांना लो. टिळकांचा जहालवाद किंवा गांधींचा असहकार हे दोन्ही मार्ग मान्य नव्हते. द्विदल राज्यपद्धती असेलल्या बंगालच्या विधिमंडळावर त्यांची नियुक्ती झाली (१९२१) व लवकरच त्यांना ब्रिटिश सरकारने ‘नाइट’ हा किताब बहाल केला. १९२१–२३ दरम्यान त्यांची स्थानिक स्वराज्य मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. अखेरच्या दिवसांत त्यांची लोकप्रियता कमी झाली. बराकपूर येथे त्यांचे निधन झाले.

सुरेंद्रनाथांनी स्फुट लेखन बेंगॉली या इंग्रजी वृत्तपत्रातून केले. त्याशिवाय त्यांनी ए नेशन इन मेकिंग : बिइंग द रेमिनन्सीस ऑफ फिफ्टी इअर्स ऑफ पब्लिक लाइफ (१९२५) या शीर्षकाने आत्मचरित्र लिहिले.
      सुरेंद्रनाथांनी भारतात विशेषतः बंगालमध्ये राष्ट्रवाद जागृत केला आणि आपल्या अस्खलित वक्तृत्वाने त्याचा देशभर प्रसार केला. त्यांच्या कार्याचा उचित गौरव त्यांना ‘बंगालचा अनभिषिक्त राजा’ ही उपाधी देवून करण्यात आला.
     🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🌹🙏 *विनम्र अभिवादन* 🙏🌷
                 

                                                                                                                                                                                      ➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा