15 नोव्हेंबर दिनविशेष


*15 नोव्हेंबर दिनविशेष 2022 !*
      🧩 *मंगळवार* 🧩


💥 *जननायक बिरसा मुंडा जयंती*
         
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *2000 - झारखंड हे 28 वे राज्य झाले*
👉 *1989 - सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले*        
👉 *1949 - महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी नथ्युराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*

👉 *1986 - सानिया मिर्झा- लाॅन टेनिस खेळाडू, पद्मभूषण, पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न  यांचा जन्म*
👉 *1948 - सुहास शिरवळकर  - कादंबरीकार, आणि रहस्य कथालेखक  यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 **2020 - सौमित्र चट्टोपाध्याय बंगाली दिग्दर्शक अभिनेते पद्मभूषण राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार  याचे निधन*
👉 *2021 - आर्यभट्ट   यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏


➖➖➖➖➖➖➖➖➖
*आजच्या बातम्या*

१.मुंबईत गोवरचे 740 संशयित रुग्ण, 50 बालकं कस्तुरबा रुग्णालयात; काय काळजी घ्यावी? 

मुंबईत प्रेम, दिल्लीत हत्या, 35 तुकडे करुन लावली मृतदेहाची विल्हेवाट; पाच महिन्यांनी उलगडा  

3. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया, विनयभंगाच्या गुन्ह्यापेक्षा राजकारणातून संन्यास बरा, असं म्हणत राजीनामा देत असल्याचं आव्हाडाचं ट्वीट  तक्रारदार महिलेने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याचा आव्हाड यांचा दावा ..तर रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’होतात; जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया 

4. सध्या राज्यात गलिच्छ प्रकार सुरू आहेत, अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; आव्हाडांवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी  मुख्यमंत्री घटनास्थळीच होते, आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा कसा, सरकार आणि पोलिसांना जाब विचारु : जयंत पाटील 

5. होम सेंटर रद्द, वाढीव वेळही मिळणार नाही; दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल  

6. नागपूर विद्यापीठातील प्राध्यापकाकडून सात प्राध्यापकांना ब्लॅकमेल? कुलगुरुंसह राज्यपालांकडे लेखी तक्रार, प्रशासनाचं मौन 

7. कुख्यात गुंड अक्कू यादवच्या सामुहिक हत्येत नक्षलवाद्यांची प्रेरणा; नक्षलवाद्यांच्या पत्रकात धक्कादायक खुलासा

8. लई भारी पुणे पोलीस! सीसीटीव्ही फुटेज, पाच पोलीस पथकं अन् 48 तास तपास; मार्केट यार्ड गोळीबार प्रकरणात 7 जणांना अटक 

 9. मालेगावातून इमाम कौन्सिलचा अध्यक्ष एटीएसच्या ताब्यात


1. मुंबईत गोवरचे 740 संशयित  

२. मुंबईत प्रेम, दिल्लीत हत्या, 35 तुकडे करुन लावली मृतदेहाची विल्हेवाट; पाच महिन्यांनी उलगडा  

३. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया, विनयभंगाच्या गुन्ह्यापेक्षा राजकारणातून संन्यास बरा, असं म्हणत राजीनामा देत असल्याचं आव्हाडाचं ट्वीट  तक्रारदार महिलेने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याचा आव्हाड यांचा दावा ...तर रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’होतात; जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया   

४. सध्या राज्यात गलिच्छ प्रकार सुरू आहेत, अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; आव्हाडांवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी  मुख्यमंत्री घटनास्थळीच होते, आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा कसा, सरकार आणि पोलिसांना जाब विचारु : जयंत पाटील 

५. होम सेंटर रद्द, वाढीव वेळही मिळणार नाही; दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल 

६. नागपूर विद्यापीठातील प्राध्यापकाकडून सात प्राध्यापकांना ब्लॅकमेल? कुलगुरुंसह राज्यपालांकडे लेखी तक्रार, प्रशासनाचं मौन 

७. कुख्यात गुंड अक्कू यादवच्या सामुहिक हत्येत नक्षलवाद्यांची प्रेरणा; नक्षलवाद्यांच्या पत्रकात धक्कादायक खुलासा 

८. लई भारी पुणे पोलीस! सीसीटीव्ही फुटेज, पाच पोलीस पथकं अन् 48 तास तपास; मार्केट यार्ड गोळीबार प्रकरणात 7 जणांना अटक 

 ९. मालेगावातून इमाम कौन्सिलचा अध्यक्ष एटीएसच्या ताब्यात, पीएफआय संघटनेची व्याप्ती वाढतीच!   

१०. Pune Weather News : पुण्यात हुडहुडी वाढणार! महाबळेश्वरपेक्षा पुणे गार; 16 नोव्हेंबरपर्यंत गारठा कायम
➖➖➖➖➖➖➖➖➖
*मिलिंद व्हि वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज  कान्द्री-माईन* 
*9860214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬
     संकलन ~ सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
               चंद्रपूर, 9403183828
➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  
🏇⚜️🔫🇮🇳👳‍♀️🇮🇳🔫⚜️🤺
                  
  🏹 *जननायक बिरसा मुंडा* 🏹

     *जन्म : 15 नोव्हेंबर 1875*
            *(उलिहातू - झारखंड)*

 *वीरमरण : 9 जून 1900*
                    *(रांची तुरुंग)*
                     (वय - 24 वर्षे)

               सन १७८९ मध्य कंपनी सरकाने १२५०० चौ. मैल क्षेत्राचा छोटा नागपूर विभाग आपल्या अधिपत्याखाली आणला. हा सारा डोंगराळ प्रदेश. त्यातले प्रमुख रहिवासी कोल जमातीचे आदिवासी. ते सारे शेती करीत व जंगलावर निर्भर राहात. त्यांच्या प्रत्येक गावच्या प्रमुखाला मुंडा असे म्हणत. या भागातील शेतीवरील व इतर कारांच्या वसुलीसाठी इंग्रजांनी  परप्रांतातील ठेकेदार आणले होते आणि मोगली सत्तेच्या करांच्या दुपटी-तिपटीने या लोकांवर कर लादले होते. हे ठेकेदार मनमानीपणे जादा कर वसूल करीत व ज्यांना कर भरता येत नसत, त्यांच्या जमिनी बळकावीत. त्यामुळे ते बड़े जमीनदार बनले होते. त्यामुळे हजारो आदिवासी भूमिहीन बनले व नगण्य मजुरीवर त्या जमिनदारांच्या जमिनीत मजुरी करू लागले. त्यामुळे ते अन्नाला मोताद झाले. शिवाय जमीनदारांना पालीतून वाहून नेणे, त्यांची सर्वतोपरी विनामूल्य सेवा करणे, त्यांचे चैनबाजीचे सर्व प्रकारचे खर्च भागविणे या आदिवासींना सक्तीचे होऊन बसले. त्यांच्या पूर्वापार न्यायपंचायतीची व्यवस्था इंग्रजांनी मोडून काढली व आपली न्यायदान पध्दती सुरू  केली . त्यासाठी वकील आले. मुकादम्यांचा खर्च लोकांना पेलवेनासा झाला. त्यामुळे हे लोक त्रस्त झाले व कंगाल बनले. तशात या भागात ख्रिस्ती मिशनरी आले. त्यांनी प्रलोभने दाखवून या लोकांना ख्रिस्ती बनविण्याचा सपाटा सुरू केला. जो कोणी ख्रिस्ती होई,  त्याला करात सूट मिळे व त्यांची जमीनही जप्त होत नसे. त्यामुळे हे हजारो आदिवासी ख्रिस्ती बनले. त्यांचा मूळचा धर्म बुडाला. परिणामतः अनेक आदिवासी बंडखोर बनले व त्यांनी राज अधिकान्यांशी, ठेकेदारांशी, नव्या जमीनदारांशी, ख्रिस्ती मिशन-यांशी अनेक वेळा लढे दिले. पण ते इंग्रजांच्या आधुनिक शस्त्र बळामुळे निष्प्रभ ठरले. हे लढे एकोणीसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत चालूच राहिले. शेवटचा सर्वात मोठा लढा दिला बिरसा मुंडाने.
               बिरसा मुंडा यांचा जन्म उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. त्याच्या बापाचे नाव सुगना मुंडा. त्यालाही आपल्या सगळ्या कुटुंबियांसह ख्रिस्ती धमांचा स्वीकार करावा लागला होता. त्यामुळेच बिरसाचे प्राथमिक शिक्षण बुर्जू येथील जर्मन मिशनच्या शाळेत सुरू झाले. त्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी चाईबासा येथील लूथरन मिशनच्या शाळेत दाखल झाला. तेथेच त्याला ख्रिस्ती मिशन-यांच्या कारवाया समजून आल्या. त्यामुळे त्याच्या मनात इंग्रज सरकारविषयी अत्यंत तिरस्कार निर्माण झाला. नंतर त्याने आपल्या सर्व कुटुंबियांसह त्या अन्यायी लोकांच्या ख्रिस्ती धर्माचा त्याग केला. पुढे तो तोडन ठाण्याअंतर्गत गोडबेडा येथील आनंद पांडे या गुरुंच्या संपर्कात आला. त्यांनी त्याला रामायण - महाभारतातील कथा शिकविल्या व आयुर्वेदाचेही ज्ञान दिले. त्यांच्यासमोर त्याने आपल्या धरतीला इंग्रजांच्या  जुलमी शासनाच्या जाचातून मुक्त करण्याची घोर प्रतिज्ञा केली. बिरसाच्या मनावर हिंदू धर्मातील आदर्श तत्वांचा प्रभाव पडला व  वैष्णव बनला. त्याने शिकार करणे सोडून दिले. आपल्या लोकांच्या मनात नैतिक गुण विकसित करण्यासाठी  त्याने गावोगावी दौरे सुरु केले. 
           बिरसाचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होते.  गोरापान,  अत्यंत तेजस्वी,  उंच तगडा, प्रसन्नमुख, डोक्याला फेटा, पायात खडावा असे त्याचे रूप सर्वांनाच आकर्षित करुन घ्यायचे. त्यामुळे त्याच्या समाजाचे लोक भराभर  त्याचे अनुयायी बनले. त्यांना तर तो'धरतीचा देवच'  वाटायचा. तो सुध्दा लोकांना सांगायचा, " देवपुरूष सिंगबोसाने मला स्वप्नात दर्शन देऊन दिव्य शक्ती दिली आहे. त्या शक्तीच्या बळावर मी आपल्या धरतीला  या इंग्रजांच्या व जमीनदारांच्या जुलमी शासनातून मुक्त करणार आहे. तेव्हा लोकांचा त्याच्यावर जागा त्याच्यावर दृढ विश्वास बसला. बिरसालाही वाटायचे,
 " मी माझ्या समाजाचा उदारकर्ता म्हणून जन्मास आलो आहे. त्याचे अनुयायी हजारोच्या संख्येने वाढू लागले. त्यांच्यामधून त्याने शेकडो चांगले लढवय्ये निवडून आपले सैन्य सज्ज केले. गया मुंडा या आपल्या जिवलग मित्राला त्याने आपला सेनापती म्हणून नियुक्त केले.
          सर्वांनी आपल्या समाजावर इंग्रज अधिका-यांकडून,  ख्रिस्ती मिशन-यांकडून, जमीनदारांकडून व ठेकेदाराकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मरेपर्यंत लढा देण्याची प्रतिज्ञा केली व  स्वराज्य स्थापन करण्याचे ठरविले. इंग्रज सरकारला त्यांच्या हालचालीचा सुगावा लागलाच होता. २४ जेगिस्ट १८९५ रोजी रांची जिल्ह्याच्या इंग्रज पोलिस इंस्पेक्टरने अनेक शिपायांसह रात्री बिरसाच्या घरावर छापा टाकून  झोपेत असतानाच त्याला आणि त्याच्या काही साथीदारांना अटक केली. बिरसा दोन वर्षांची  सक्तमजुरीची शिक्षा व ५० रु. दंड केला व त्याच्या साथीदाराला प्रत्येकी २०/२० रु. दंड केला.
            कैदेतून सुटून आल्यानंतर बिरसाने नव्या जोमाने संघर्ष सुरू केला. इंग्रजांच्या अनेक ठाण्यांवर त्याने हल्ले केले.  पराक्रमाची शर्थ केली.  पण इंग्रजांच्या  बंदूकांपुढे त्यांची परंपरागत हत्यारे निष्प्रभ ठरली.  शेकडो कोल जवान मृत्युमुखी पडले. एका लढाईत सेनापती गया मुंडा ठार झाला. बिरसाचा मुक्काम घनदाट जंगलातील टेकड्यांवर गुप्त ठिकाणी असे. त्यामुळे तो इंग्रजांच्या हाती लागणे अशक्यप्राय होते .
परतु घरभेद्यांकडून इंग्रजांना त्याचा सुगावा लागताच त्याला घेरून पकडण्यात आले. त्याच्याबरोबर त्याचे ८० अनुयायीसुद्धा जेरबंद झाले. तेव्हा रांचीच्या इंग्रज जिल्हाधिका-याने बिरसाला जमीनदारी देण्याची लालूच दाखवून त्याने आपला उद्योग सोडून द्यावा, असे सांगितले.  पण बिरसाने ते धुडकावले. अखेर तुरुंगात त्याचे फार हाल करण्यात आले आणि विष देऊन मारण्यात आले. बिरसा पटकीमुळे मेला, असे इंग्रज सरकारने खोटेच जाहीर केले. त्याच्या अनुयायांनाही जबर शिक्षा ठोठावण्यात आल्या व बिरसाने छोटा नागपूरमध्ये स्वातंत्र्यासाठी आरंभिलेला लढा चिरडून टाकण्यात आला.
                       अशारीतीने कोल समाजाचा हा  'धरतीचा देव ' बिरसा मुंडा जानेवारी १९०० मध्ये त्या धरतीच्या कुशीतच विसावले.
             बिरसा मुंडा हे आदिवासी क्रांतिकारक होते. बिरसा मुंडा यांना *जननायक* हा किताब लोकांनी बहाल केला. आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले आहे. ते एकटेच क्रांतिकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने डाक तिकीट जारी केले असून झारखंड मधील रांची येथे स्मारक बांधण्यात आलेले आहे.
   
             🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🌹🙏 *विनम्र अभिवादन*🙏🌹

    
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा