*19 नोव्हेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *शनिवार* 🧩
💥 *जागतिक विज्ञान दिन*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2001 - ज्येष्ठ अणूशास्ञज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डाॅ आर चिदंबरम यांची केन्द्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड झाली*
👉 *1983 बिल गेट्स याचे विंडोज 1.0 प्रकाशित केले*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*
👉 *1964 - आशुतोष राणा- हिन्दी चिञपट अभिनेता यांचा जन्म*
👉 *1952 सुनंदा बलरामन सुप्रसिद्ध लेखिका यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2022 - रजनी कुमार - ब्रिटिश भारतीय शिक्षणतज्ज्ञ स्प्रिगडिल्स संस्थेचे संस्थापक पद्मश्री याचे निधन*
👉 *2013 - विजयदन देठा- भारतीय लेखक यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
••➖➖➖➖➖➖➖••
*GENERAL KNOWLEDGE*
◆ How many continents are there in the world?
Ans. : *7 continents*
••➖➖➖➖➖➖➖➖•
*STORY TELLING*
*The Golden Touch...!!*
There once was a king named Midas who did a good deed for a Satyr. And he was then granted a wish by Dionysus, the god of wine.
For his wish, Midas asked that whatever he touched would turn to gold. Despite Dionysus’ efforts to prevent it, Midas pleaded that this was a fantastic wish, and so, it was bestowed.
Excited about his newly-earned powers, Midas started touching all kinds of things, turning each item into pure gold.
But soon, Midas became hungry. As he picked up a piece of food, he found he couldn’t eat it. It had turned to gold in his hand.
Hungry, Midas groaned, “I’ll starve! Perhaps this was not such an excellent wish after all!”
Seeing his dismay, Midas’ beloved daughter threw her arms around him to comfort him, and she, too, turned to gold. “The golden touch is no blessing,” Midas cried.
*The Moral :* Greed will always lead to downfall.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*SPECIAL INTRODUCTION*
*Indira Gandhi*
(Former Prime Minister of India)
Born : 19 November 1917
Died : 31 October 1984
Indira Gandhi was the daughter of Jawaharlal Nehru. She was the first woman Prime Minister of India. She was born on 19th November 1917. Her family members participated in the Freedom Movement. She also took pail in it. As her father and grandfather were frequently sent to jails, Indira spent her days alone. She was the only child of Pandit Jawaharlal Nehru. The name Indira was chosen by her grandfather. Another name "Priyadarshani" was added to that name by her parents.
Indira's school and college life was very often disturbed chiefly due to the participation of all the members of the family in the national movement. Her mother Kamala Nehru was also imprisoned once. Indira's schooling began in St. Cecilia School in Allahabad.
In March, 1926, she went to Europe along with her parents and was educated at a school in Switzerland for some time. She came back to India and obtained education in St. Marry convent of Allahabad. After her matriculation she was sent to Tagore's Shantiniketan for the intermediate course. With her talents she impressed Rabindranath Tagore.
Indira accompanied her ailing mother Kamala Nehru to Switzerland for treatment. Kamala died there. Indira then went to Somerville College, Oxford. Unfortunately she discontinued the course as she became ill for long. She came back to India in 1941. Her father was released from jail the same year. Indira married Feroz Gandhi in 1942. Feroz was a highly educated young boy of an aristocratic Parsee family in Allahabad.
Indira had a close involvement in the Freedom Movement. She had organised the Vanar Sena with a few thousand children of her own age. She also participated in the Non-co-operation Movement of Mahatma Gandhi in 1930. By 1946, she has become the mother of two sons Rajib and Sanjay.
Indira became the President of the Indian National Congress in 1959 and continued it till her death. Feroz Gandhi died in 1960, only after 18 years of their married life. Her father died in 1964. After Jawaharlal's death Lai Bahadur Sastri became the second Prime Minister of India. Indira became the Information and Broadcasting Minister, in Lal Bahadur's Cabinet. Soon after Lai Bahadur Sastri's death, Indira Gandhl, became the Prime Minister of India on 24th January 1966.
Indira's life was full of tragic events. Her mother died. Her husband died. Then her father died. She also lost her younger son Sanjay who died in a plane crash on June 23, 1980. In spite of her personal sufferings, she gave an efficient leadership to our country. India progressed in all spheres of life and acquired an international fame.
She initiated her 20 Point Programme to help millions of her countrymen. She nationalised 14 national banks, abolished the Privy Purses and made the country self-sufficient in food. The last of these feats was achieved through the Green Revolution.
A great leader like Indira Gandhi is born only once after many years. Her death in the prime of her life was an immense national loss, indeed!
During her term as the Prime Minister, many important events had happened. Our country became victorious in the Indo-Pak war in 1971. Indira Gandhi signed the historic Simila Pact with Pakistan. She sent them to Indian Expedition to the South Pole. She was the leader of the Third World. She gave order for "Operation Blue Star" to liberate the famous golden Temple of Amritsar from the clutches of the terrorists.
She became controversial after the Operation Blue Star. She was brutally killed by her own body guard on October 31, 1984. She became a martyr for her country. The whole world mourned her death.
••➖➖➖➖➖➖➖➖••
*PASAYDAN*
*SILENCE*
*All students will keep silence for two minutes.*
━━═•➖➖➖➖•═━━
*Milind Wankhede*
*Headmaster*
*Prakash Highschool and junior college kandri mine*
*9860214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
▬ ❚❂❚❂❚ ▬ संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
चंद्रपूर 9403183828
➿➿➿➿➿➿➿➿➿
💥🏇🤺🇮🇳👸🏻🇮🇳🤺🏇💥
*राणी लक्ष्मीबाई*
*१८५७ च्या स्वातंत्र्य उठावातील वीरांगना, झाशीची राणी*
*जन्म : १९ नोव्हेंबर १८३५*
(काशी, भारत)
*वीरमरण : १८ जून १८५८*
(ग्वालियर, मध्य प्रदेश)
टोपणनाव : मनू
चळवळ : १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध
प्रमुख स्मारके : ग्वाल्हेर
धर्म : हिंदू
वडील : मोरोपंत तांबे
आई : भागीरथीबाई तांबे
पती : गंगाधरराव नेवाळकर
अपत्ये : दामोदर (दत्तकपुत्र)
लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या; हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.
👧🏻 *बालपण*
लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मनिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.
👸🏻 *व्यक्तिमत्त्व*
धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत धोंडोपंत बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे आणि जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातही प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.
लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले.
इ.स. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मी असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.
दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली.
गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इ.स. १८५३ मध्ये गंगाधररावांचे निधन झाले.
🎠 *झाशी संस्थान खालसा*
ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देण्याचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या.
परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, इ.स. १८५४ रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.
झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.
🏇 *इ.स. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध*
इ.स. १८५७ चा उठाव हा संपूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकारसूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षित भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकुरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले; राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणाऱ्या हजार-दीड हजार गरिबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणाऱ्या राणीने गोवध बंदी केली. त्यांनी किल्ल्यावर रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम केले.
अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले.
दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणीस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.
उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणाऱ्या ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज भवानीशंकर, कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. घौसखान याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष.
शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.
राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला व तो अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’
या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १८ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणाऱ्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणाऱ्या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरुषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाहीत. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.
🔮 *विशेष*
ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख `’हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क' असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्ये, पोवाडे रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंचे विचार आजच्या काळातही खूप प्रेरणादायी आहेत. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधीस्थानावर इ.स. १९६२ मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. ते समाधीस्थान पाहिल्यानंतर कविवर्य भा. रा. तांबे यांनी पुढील यथार्थ ओळी सुचल्या. रे हिंद बांधवा, थांब या स्थळी। अश्रू दोन ढाळी।।
ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशिवाली।।
खूब लड़ी मर्दानी वो तो झाँसी वाली रानी थी।
..कवयित्री : सुभद्रा कुमारी चौहान
🎞📽📚 *झाशीच्या राणीवर लिहिली गेलेली ऐतिहासिक पुस्तके, कादंबऱ्या, काव्ये, चरित्रे, चित्रपट, नाटक*
The Queen of Jhansi (मूळ इंग्रजी. लेखिका महाश्वेता देवी) हिंदी भाषांतर : सागरी सेनगुप्ता व मंदिरा सेनगुप्ता
खूब लड़ी मर्दानी : झांसी की रानी (हिंदी दूरचित्रवाणी मालिका, २०१९; प्रमुख भूमिका - अनुष्का सेन, विकास माणकताला)
झाशी : १८५७ - लेखक अविनाश वासुदेव पुराणिक
*झाँसी की रानी : दूरचित्रवाणीवरील मालिका. हिचे १८-८-२००९ ते १९-६-२०११ या काळात ४८० भाग (एपिसोड्स) प्रसारित झाले होते.*
झाशीची रणचंडी : कादंबरी : लेखक पोपटराव भसे
झाशीची राणी लक्ष्मीबाई : लेखक दा.वि. कुलकर्णी
झाशीची राणी लक्ष्मीबाई : लेखक वि.श्री. जोशी
झाशीची राणी लक्ष्मीबाई’ : लेखक म.स. भावे
झाशीची राणी लक्ष्मीबाई : लेखिका प्रतिभा रानडे
झाशीची राणी लक्ष्मीबाई : लेखक वृंदावनलाल वर्मा
झाशीची वाघीण : लेखक भास्कर महाजन
झाशी राणी लक्ष्मीबाई : हिंदी पु्स्तक. लेखक : रामप्रसाद एन.एस.
झाशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाई साहेब ह्यांचे चरित्र : लेखक दत्तात्रेय बळवंत पारसनीस
मर्दानी : झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या जीवनावरील कादंबरी, लेखक : विद्याधर गोखले
मर्दानी रणरागिणी ... : आत्मकथा स्वरूपातील ललित पुस्तक, लेखिका मंदा खापरे
मनकर्णिका - दि क्वीन ऑफ झाशी (हिंदी चित्रपट, २०१७, दिग्दर्शक - केतन मेहता). या चित्रपटात अतुल कुलकर्णी यांनी तात्या टोपेंचे काम केले आहे.
स्वोर्ड्स ॲन्ड स्केप्टर्स (हाॅलिवूडचा इंग्रजी चित्रपट, २०१८) (लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत, इंडो-अमेरिकन अभिनेत्री देविका भिसे) (हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये निघाला आहे.)
वीज म्हणाली धरतीला (नाटक : लेखक वि.वा. शिरवाडकर)
वीरांगना लक्ष्मीबाई : हिंदी पुस्तक. लेखक : रामाश्रय सविता
समरसौदामिनी : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावरील हृदयद्रावक कादंबरी, लेखक भा.द. खेर
सोहराब मोदी यांनी इ.स. १९५६ मध्ये 'झाँसी की रानी' नावाचा भव्य हिंदी चित्रपट काढला होता. त्यात झाशीच्या राणीचे काम मोदी यांची पत्नी मेहताब हिने केले होते. हा भारतात बनलेला पहिला रंगीत (टेक्निकलर) चित्रपट होता.
🗽 *लक्ष्मीबाईंचे पुतळे*
ग्वाल्हेर येथील समाधीस्थानावर
नवी दिल्ली येथे 'रानी झांसी रोड आणि देशबंधु गुप्ता मार्ग' यांनी बनलेल्या चौकात.
पुण्यात संभाजी उद्यानाजवळ (जंगली महाराज रोड)
लक्ष्मीबाईंचे नाव दिलेल्या संस्था संपादन करा
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, पिरंगुट (पुणे)
रानी लक्ष्मीबाई शाळा-समूह (लखनौ)
लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण विद्यापीठ (ग्वाल्हेर)
महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालय (झांशी)
राणी लक्ष्मीबाई मध्यवर्ती शेतकी विद्यापीठ (झांशी)
राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय उद्यान (अंदमान-निकोबार)
सुभाष चंद्र बोसांच्या इंडियन नॅशनल आर्मीमध्ये राणी लक्ष्मीबाईंच्या नावाची एक रेजिमेन्ट होती.
१९५७ साली भारत सरकारने छापून प्रसिद्ध केलेल्या दोन पोस्टाच्या तिकिटांवर राणी लक्ष्मीबाईची छबी होती.
🎖 *राणी लक्ष्मीबाईच्या नावाचे पुरस्कार*
उत्तर प्रदेश सरकारचा रानी लक्ष्मीबाई पुरस्कार (कुस्तीविद्येत प्रवीण असलेल्या साक्षी मलिक यांना हा पुरस्कार मिळाला आहे.)
भारत सरकारचा राणी लक्ष्मीबाई स्त्री-शक्ती पुरस्कार
मध्यप्रदेश सरकार वीरता दाखविणाऱ्या स्त्रीला ’वीरांगना लक्ष्मीबाई राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करते. माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणाऱ्या बच्छेंद्री पाल यांना हा पुरस्कार मिळाला होता. (इ.स. २०१३)
🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा