22 नोव्हेंबर दिनविशेष 

       🧩मंगळवार 🧩
                           
*💥 आंतरराष्ट्रीय संगीत दिवस*

             🌍*घडामोडी*🌍

👉२०१३ : भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.
👉२००५ : अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.
👉१९९७ : नायजेरियात ’मिस वर्ल्ड’ स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार

🔥🔥🔥🔥🔥
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

            🌍*जन्म*🌍

👉१९७० : मार्वन अट्टापट्टू – श्रीलंकेचा क्रिकेट कर्णधार
👉१९६७ : बोरिस बेकर – ६ वेळा ग्रँड स्लॅम जिंकलेला जर्मन लॉनटेनिस पटू
👉१९४३ : बिली जीन किंग – अमेरिकन लॉनटेनिस पटू
👉१९३९ : मुलायमसिंग यादव – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री
👉१९१५ : किशोर साहू – चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक 

               🌍*मृत्यू*🌍

👉२०१२ : पी. गोविंद पिल्लई – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते
👉२००८ : रविंद्र सदाशिव भट – गीतकार 
👉२००० : डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर – अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक
👉 १९८० : मे वेस्ट – हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती 
👉 १९६३ : अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या 
👉 १९६३ : अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक 

==========/==============
मिलिंद विठ्ठलराव वानखेडे 
मुख्याध्यापक 
प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज  कान्द्री-माईन 

◆━━━━➖➖➖━━━◆
        © *प्रश्नमंजुषा*                                                                                                 *१)एशियन खाडी पार करणारी पहिली भारतीय महिला कोण?    
उत्तर  - आरती साह                                              २)महाराष्ट्र संदर्भात मंत्रीपरिषदेतील मुख्यमंत्रीसह राज्यातील मंत्र्यांची संख्या कमीत कमी किती आवश्यक आहे?    
उत्तर  - चोवीस                                                                                     ३)भारतातील सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू आणि गुटखा यांच्या सेवणावर बंदी करणारे पहिले राज्य कोणते?*    
उच्च  - महाराष्ट्र  
                                                                                                          ▬▬➖➖➖➖➖➖▬▬                                        🎯 *ठळक घडामोडी*
▬▬➖➖➖➖➖➖▬
■ *अनुदानाचा GR सकारात्मक काढण्यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट - के.पी.पाटील सर* 
■ *अशासकीय खाजगी मान्यताप्राप्त शाळांतील घड्याळी तासिका तत्वांवर नेमलेल्या शिक्षकांच्या मानधनात वाढ*
■ *आधार कार्ड काढण्याच्या नियमात बदल, पासपोर्टप्रमाणे कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन होणार..*
■ *आज महाराष्ट्रात थंडीची लाट: उत्तर महाराष्ट्रात व मराठवाड्यात तापमानात घट होण्याची शक्यता, राज्यात 10 ℃  पेक्षाही कमी तापमानाची नोंद होणार असल्याचा अंदाज*
■ *केंद्र सरकारने पॅन कार्ड हे आधारला लिंक करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी वारंवार मुदतवाढही देऊनही अनेकांनी पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक केलेले नाही. याबाबत आयकर विभागाने आता होणार पॅन कार्ड बंदचा निर्णय घेतला आहे.* 
▬▬▬▬➖➖➖▬▬▬▬
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
    🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
            ▬ ❚❂❚❂❚ ▬
संकलन ~ सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
              चंद्रपूर, 9403183828
➿➿➿➿➿➿➿➿➿
💥🏇🤺🇮🇳🥷🇮🇳🤺🏇💥         
                 *झलकारीबाई*
(कोळी समाजातील महिला क्रांतिकारी)
       *जन्म: 22 नवंबर 1830*
               (झांसी, भारत)
       *मृत्यु : 4 एप्रिल 1857*
              (झांसी, भारत)
व्यवसाय : रानी लक्ष्मीबाईंच्या नियमित सैन्यात महिला शाखा दुर्गा दलाची सेनापती
प्रसिद्धि : भारतीय स्वतन्त्रता सेनानी
धर्म : हिन्दू
झलकारीबाई  ही एक स्त्री लढवय्यी होती, जिने १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात एक महत्त्वाची भूमिका बजावली. तिने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्त्री लष्करात काम केले. हिचा जन्म कोळी समाजात झाला. पुढे ती झाशीची राणी लक्ष्मीबाईची एक प्रमुख सल्लागार बनली. झाशीच्या किल्ल्याचे युद्ध पेटलेले असताना, ती स्वतः राणी म्हणून गादीवर बसली आणि राणीच्या बाजूने आघाडीवर लढली, त्यामुळे राणीला किल्ल्यातून पळून जाणे शक्य झाले.
              झलकारीबाई संबंधातील कथा कित्येक शतके बुंदेलखंडातील लोकांच्या स्मरणात आहेत. तिचे आयुष्य, खास करून राणीला वाचवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या सेनेशी लढतानाचे तिचे धैर्य, याची बुंदेली लोकसाहित्यात आजही स्तुती केली जाते. तिचे शौर्य आणि तिची कोळी ही ओळख यामुळे उत्तर भारतातील शाक्यांमधे स्वाभिमान आणि सांस्कृतिक ऐक्याची भावना निर्माण होण्यास मदत झाली. 

💁🏻‍♀️ *जीवन*
                झाशीजवळ असलेल्या भोजला गावामध्ये २२ नोव्हेंबर १८३० मध्ये सदोबा सिंग आणि जमुना देवी यांच्या पोटी झलकारीबाईंचा जन्म झाला. एका खेडेगावातल्या मुलीच्या वाट्याला येतात ती सर्वच कामे झलकारी करत असे. तरी तिच्या लहानपणामध्येच तिने काही अचंबित करणाऱ्या बाबी करुन आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधले होते. स्थानिक लोक गीतांमध्ये झलकारीच्या वीरतेविषयी अनेक उदाहरणे गायली जातात. झलकारीने कमी वयातच वाघाला कुऱ्हाडीने मारल्याची कथा रंगवून सांगितली जाते. तसेच झलकारी गायी वळायला गेलेली असताना तिने एका चित्त्याला काठीने मारल्याची कथाही तेव्हढीच प्रसिद्ध आहे. राणी लक्ष्मी बाईच्या सैन्यातील तोफखान्याचा काम करणाऱ्या पुरण सिंग नावाच्या सैनिकाशी तिचा विवाह झाला होता. ज्याने झलकारीची ओळख राणी लक्ष्मी बाईशी करुन दिली होती. झलकारी लक्ष्मीबाई सारखीच दिसायची आणि ह्यामुळे तिला लक्ष्मीबाईच्या स्त्रियांच्या पलटणीमधे सहभागी करुन घेतले गेले.

🏇 *युद्धातील शौर्य*
                राणीच्या सैन्यात तिला वेगाने बढती मिळत गेली आणि लवकरच ती स्वतःच्या सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करु लागली. १८५७ च्या बंडाच्या दरम्यान ह्युज रोज यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने झाशीवर आक्रमण केले त्या दरम्यान राणी तिच्या किल्ल्यात स्वतःच्या ४००० सैनिकांसह दबा धरुन बसली होती. कल्पी या गावात छावनी टाकून बसलेल्या पेशव्यांचे सैन्य सोडवणूक करेल या अपेक्षेने लक्ष्मीबाई वाट पहात राहिली. परंतु पेशव्यांचे सैन्य येवू शकले नाही, कारण ते जनरल रोज कडून आधीच हारवले होते. दरम्यान झाशीच्या किल्ल्याच्या एका दरवाज्याची सुरक्षा पाहणारा "दुल्हा जू’ याने इंग्रजांशी हातमिळवणी केली आणि झाशीच्या किल्ल्याचा दरवाजा उघडला.जेव्हा ब्रिटीशांचे सैन्य किल्ल्यात शिरले, किल्ल्यात इंग्रजांचे सैन्य झाशीची सैन्य ह्यांमध्ये समोर-समोरचे युद्ध सुरू झाले. ह्या गोंधळाचा फायदा घेत आणि दरबारी व्यक्तींचा सल्ला ऐकत लक्ष्मीबाई मागच्या दरवाज्याने पळून गेली. लक्ष्मीबाईच्या जागेवर झलकारी आली, तिने लक्ष्मीबाईसारखाच पोशाख केलेला होता. झलकारीने लक्ष्मीबाईशी असलेल्या तिच्या साधर्म्याचा फायदा घेत स्वतः राणी लक्ष्मीबाई असल्याचे भासवत पुर्ण दिवस लढाई चालू ठेवली.

🌀 *वारसा*
                       गेल्या काही वर्षात झलकारीबाईच्या प्रतिमेने उत्तर भारतात महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. झलकारीबाईच्या कथेचे सामाजिक-राजकीय महत्त्व मान्य करण्यात आले आहे. झलकारीबाईचा मृत्यूदिन अनेक कोळी संघटना “शहीद दिवस” म्हणून साजरा करतात. बुंदेलखंड या वेगळ्या राज्याची मागणी करणाऱ्या चळवळी देखील झलकारीबाईची कथा बुंदेली अस्मितेच्या निर्मितीसाठी वापरत आहेत. भारत सरकारच्या डाक-तार विभागाने झलकारीबाईची प्रतिमा असलेले पोस्टाचे तिकिट काढले आहे.

            भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग पंच महल येथे झाशीच्या किल्ल्यात झलकारीबाईच्या स्मरणार्थ एक पाच मजली संग्रहालय बांधत आहे. बी. एल्. वर्मांच्या १९५१ मध्ये लिहिलेल्या “झांसी की रानी” या कादंबरीत झलकारीबाईचा उल्लेख आहे आणि त्यात तिच्यावर उपकथानक तयार केले आहे. त्यांनी झलकारीबाईचा उल्लेख कोळीण आणि लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक सामान्य सैनिक असा केला आहे. राम चंद्र हेरन यांची त्याच वर्षी प्रकाशित झालेली "माटी" ही बुंदेली कादंबरी तिला एक “लढवय्यी आणि शूर शहिद” असे चित्रित करते. झलकारीबाईचे पहिले चरित्र १९६४ मध्ये भवानी शंकर विशारद यांनी, वर्मांची कादंबरी आणि झाशीच्या आसपासच्या कोळी समाजाच्या मौखिक कथांवर संशोधन करून लिहिले.
                  झलकारीबाईची कथा सांगणाऱ्या कथालेखकांनी झलकारीबाईला लक्ष्मीबाईच्या पातळीवर आणून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.१९९० च्या दशकापासून झलकारीबाईच्या कथेने कोळी स्त्रीत्वाच्या उग्र स्वरूपाच्या आदर्श उभा करण्यास सुरुवात केली. ज्याला राजकीय परिमाण मिळाले आणि तिच्या प्रतिमेची सामाजिक परिस्थितीतून येणाऱ्या गरजेप्रमाणे पुनर्निर्मिती सुरू झाली. राष्ट्र्पती रामनाथ कोविंद यांनी १० नोव्हेंबर २०१७ रोजी भोपाळ मधील गुरू तेग बहादुर संकुलामध्ये झलकारीबाईच्या पुतळ्याचे अनावरण केले.
          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳   
🙏🌸 *विनम्र अभिवादन* 🌸🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा