30 नोव्हेंबर दिनविशेष


*30 नोव्हेंबर दिनविशेष 2022 !*
      🧩 *बुधवार* 🧩
     
   
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *2000 - पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन एन्डेव्हर या अंतराळ्याने फ्लोरिडातील केप कॅनव्हेराॅल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचा दिशेने उड्डाण केले*        
👉 *1998 - एक्साॅन आणि मोबिल यांच्यामध्ये 73.7 बिलियन अमेरिकन डॉलर चा करार झाल्यामुळे एक्साॅनमोबिल ही जगातील सर्वात मोठी कंपनी तयार झाली*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*

👉 *1945 - वाणी जयराम  - पार्श्र्वगायीका  यांचा जन्म*
👉 *1935 - आनंद यादव- मराठी लेखक  यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1995 - वा.कृ.चोरघडे- मराठी साहित्यीक  याचे निधन*
👉 *2012 - इंदरकुमार गुजराल भारताचे 12 वे पंतप्रधान   यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═➖➖➖➖═━┅

*👉अजिंठा वेरूळ लेण्या कुण्या जिल्हात आहेत?* 
*🥇औरंगाबाद*

*👉पृथ्वीच्या मध्यातून जाणा-या काल्पनिक रेषेस काय म्हणतात?*
 *🥇विषुववृत्त*

*👉भारतातील प्रमुख अवकाश केंद्र कोठे आहे?* 
*🥇श्रीहरिकोटा*

*👉सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता?* 
*🥇बुध*

*👉खालीलपौकी कोणता देश ब्रिक्य (BRICS) या जागतिक संघटेनेचा सदस्य नाही?*
*🥇इंडोनेशिया*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
*🗣️प्रेमळ बोल*

*एका शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबड्याला हाका मारायला सुरुवात केली असता तो कोंबडा पळून जाऊ लागला.*
*त्याच शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाणा पाळला होता. तो त्या कोंबड्याला म्हणाला, 'अरे वेड्या, मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत आहे, आणि तू असा पळून का जातोस? एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारल्या असत्या, तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो असतो.'*
*यावर तो कोंबडा म्हणाला, 'अरे ससाण्या, आजवर माझ्या अनेक नातेवाइकांना या मालकाने अशाच प्रेमाने जवळ बोलावून, त्यांच्या माना कापताना मी पाहिले आहे. त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तुझी गोष्ट अगदी निराळी आहे. त्याच्या दृष्टीने तुझे मांस रुचकर नसल्याने, तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही.'*

*🧠तात्पर्य : प्रेमळ बोलणाऱ्यांच्या मनात प्रेम असतेच असे नाही.*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         *🌐 आजच्या बातम्या 🌐*

*📢राज्य सरकारचा मोठा निर्णय; पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ* 
*📢मुंबईच्या आरे कॉलनीत मेट्रो कारशेडच्या बांधकामातील अडथळा दूर, 84 झाडे तोडण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने वृक्ष प्राधिकरणावर सोपवला*  
*📢अदानी समूह करणार धारावीचा पुनर्विकास; पाच हजार कोटींची जिंकली बोली*  
*📢Maharashtra 75 हजार नोकरभरतीला गती देणार, अनुसूचित जमातीची रिक्त पदे तात्काळ भरणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे नऊ निर्णय* 
*📢अतिवृष्टीसह रोगराईचा कापसावर परिणाम, उत्पादनात मोठी घट, शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलं*   
*📢घानाचा दक्षिण कोरियावर 3-2नं विजय; पुढील फेरीचे दरवाजे अद्याप खुले.*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद व्हि वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿
🤺⛓🔗🇮🇳🙅‍♂🇮🇳🔗⛓🤺

           *पझसी राजा केरल वर्मा* 

     *जन्म :  3 जानेवारी 1753*
                  (कन्नूर , मालाबार)

      *वीरमरण : 30 नोव्हेंबर 1805*
      (म्हैसूर जवळ काँकेर नदीकिनारी)

                 *वय : 52 वर्षे*

            सन १७६३ पर्यत बंगालवर आणि कर्नाटकच्या तिस-या युध्दानंतर मद्रास प्रांतावर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले होते. महाराष्ट्र आणि म्हैसूरचे राज्य सोडून सारा दख्खन भारत त्यांनी बळकावला होता. हैद्राबादचा निजाम तर त्यांच्या हातातले बाहुले बनला होता. त्या काळात पश्चिमेकडील उत्तर मलबारवर कोट्टायम वंशाचे लहानसे राज्य होते. त्या राज्यात इरिबानाड, वायनाड व कुरुग्रानाड या तत्कालिन तीन जिल्ह्यांचा समावेश होता. कोट्टायम राजे पझसी महालात राहायचे. शेवटचा कोट्टायम राजा ही त्याच महालात राहत असे म्हणून त्याला ' पझसी राजा ' असे त्याची जनता म्हणायची.
          पझसी राजा केरल वर्मा जसा महापराक्रमी होता, तसाच तो रसिक, विद्वान, कवी व कलाकारही होता. कथकली कथा त्याने रचल्या होत्या व कथकली नृत्यातही तो प्रवीण होता. ज्या काळात तो वनवासात होता,  त्या काळात कथकली कलाकार म्हणून मैदानी प्रदेशात येऊन शत्रुची हालहवाल हेरायचा. आपल्या प्रजेत त्याने स्वातंत्र्याची आग व देशभकीची भावना जिद्दीने चेतविली होती.
            इंग्रजांनी सन १७९३ मध्ये पझसी राजाच्या राज्यात सारा-वसुली सुरू केली. तेव्हा राजाने त्यांना विरोध केला व जनतेचा कैवार घेतला. त्यामुळे इंग्रजांच्या सारा - वसुलीस आळा बसला. इंग्रजाना कोणीही माल सुद्धा विकेनासा झाला. एवढेच नव्हे,  तर शेतक-यांनी आपली शेतही पेरली नाहीत . इंग्रज खवळले व त्यांनी राजाचा महाल लुटला. याची बातमी राजाला आधीच माहित झाल्यामुळे राजा आधीच आपल्या कुटुंबासह अज्ञात स्थळी निघून गेला होता. 
            इंग्रजांच्या प्रशिक्षित व सुसंगठित मोठ्या सैन्यापुढे मैदानात आपला निभाया लागणे शक्य नाही, असे पाहून राजाने इंग्रजांशी गनिमी काव्याने टक्कर द्यायचे ठरविले. वायनाडला जाऊन त्याने आपले सैन्य संगठित केले. त्याच्या राज्यात कुरुचिया व कुरुमर या दोन्ही जातीचे लोक चांगले लढाऊ योध्दे होते. त्यांचे हत्यार केवळ धनुष्य बाण भाले व ढाल तलवार हेच होते व ते नेमबाजीत अत्यंत तरबेज होते. तलस्कर चंदू व नीली हे राजाचे प्रमुख साथीदार होते. नीली ही पराक्रमी स्त्री होती व तिने महिलांचे सैन्य शिकवून तयार केले होते. राजाने आपल्या सैन्याच्या लहान लहान तुकड्या तयार करून राज्यात ठिकठिकाणी नियुक्त केल्या. त्या सैन्याला राजाने स्पष्टपणे सांगितले की, 
“ मला राजपदाची मुळीच इच्छा नाही. माझे लक्ष केवळ इंग्रजांना आपल्या राज्यामधून हाकून लावणे हेच आहे. आपल्या मंदिरांचे आणि आपल्या परंपरांचे संरक्षण आपल्याला करायचे आहे." या विचाराने राजाने मरेपर्यंत पालन करुन इंग्रजांशी झुंज दिली. 
            लार्ड मेनिंगटनने मद्रास सरकारला सुचविले की, राजा जर शांतपणे जीवनयापन करीत असेल, तर त्याला कोट्टायमचा राजा म्हणून मान्यता देऊन पेन्शन व इतर सवलती द्याव्या. परंतु हा स्वाभिमानी व पराक्रमी राजा ते कसे मान्य करील ? त्याने आपल्या राज्याच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी झुंज द्यायचे ठरविले. १८ मार्च १७९७ रोजी मेजर कॅमराॕन आपल्या १००० सैनिकांसह पेरियार दरीतून जात असता राजाने आपल्या निवडक सैनिकांसह त्याच्यावर हल्ला केला व त्याच्या त्या सगळ्या सैन्याला ठार केले. ही खबर मिळताच ले. कर्नल पेटिकने आपल्या मद्रासच्या मुख्यालयास कळविले की, 
"जोपर्यंत हा राजा जिवंत आहे, तोपर्यंत आपल्यापैकी कोणाचेही जीवन सुरक्षित राहणार नाही." 
          राजा या घटनेनंतर सावध झाला व त्याने आपले सैन्य वाढविले. त्या सैनिकांना युद्धकलेत चांगले प्रशिक्षित केले. त्यानंतर इंग्रजांनी पझसी राजावर मोठ्या तयारीनिशी सन १८०० मध्ये चढाई केली. त्याचे सेनापती कण्णवत शंकरन नंबियार, कूगन नायर व तलक्कर यांनी पराकाष्टा करून इंग्रजांचा पराभव केला. 
           कंपनी सरकारने त्यानंतर कर्नल वेलस्ली याला मलबारचा सैनिक कमाण्डर म्हणून नियुक्त केले. कर्नल वेलस्लीने पझसी राजाशी अनेक जबरदस्त झुंजी दिल्या. पण प्रत्येक युद्धात त्याला पराभवच पत्करावा लागला. त्या युद्धामध्ये इंग्रजांचे कॅप्टन बोमन, मेजर कॅन्वन, कॅप्टन डिकिन्सन व ले. मिलिन चॕम्प हे सेनाधिकारी मारले गेले. पझसी राजाची पत्नीही त्याच्या खांद्याशी खांदा भिडवून या युद्धांमध्ये लढली. परंतु जंगलातील वातावरणाने ती आजारी पडली. त्याचा बारा वर्षाचा मुलगाही जंगलात राजाबरोबर राहात होता. राजाची स्थिती बिकट झाली होती. त्याला राजसुख तर मिळतच नव्हते. त्याच्याजवळ मोठा खजिनाही नव्हता व आधुनिक शस्त्रास्त्रेही नव्हती. जंगलात कसले चांगले अन्न त्यांना मिळणार ? तरीही त्याने आपल्या सैनिकांना ठामपणे सांगितले की, “ मी इंग्रजांशी संघर्ष चालूच ठेवीन." राजाचे वय तेव्हा बत्तीस वर्षांचे होत. गेली ६-७ वर्षे तो इंग्रजांशी अविरतपणे झुंजी देत होता राजसुखाला पारखा होऊन घनदाट जंगलात राहत होता. जे मिळेल ते अन्न खात होता. आपल्या कोट्टायम राज्याच्या स्वातंत्र्यासाठी तो एवढे कष्ट झेलीत होता .
            इंग्रजांचे सैन्य तर त्याच्या राज्यात शिरुन त्याचा शोध घेतच होते. चट्टपन नांबियार, कन्नगचेटी नाम्बियार, चंद रहमान, कुल्लुचमा, कुण्हप्पन इ. त्याचे प्रमुख सहयोगी इंग्रजांच्या हाती सापडले व इंग्रजांनी त्यांना फासावर चढविले.
             सन १८०१ मध्ये कलेक्टर 
मॕक्लोडने प्रत्येक गांव शस्त्रविरहित करण्याचा व जमिनी संबंधीचा असे दोन कायदे लागू केल्याने जनतेत भयंकर असंतोष माजला. व जनतेतून पझसी राज्याला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळू लागले. ऑक्टोबर १८०१ मध्ये एलच्चना कुंजन नायर व थलक्कन चन्द राजाच्या या दोन सेनाधिका-यांनी पणमारन हा पहाडी किल्ला जिंकून घेतला व सत्तर इंग्रज सैनिकांना ठार केले. राजाच्या साथीदारांचा उत्साह त्यामुळे वाढला, परंतु राजाचा एक प्रमुख सेनाधिकारी कण्णवत नाम्बियार व त्याचा मुलगा कट्टीडी या गावाजवळ इंग्रजांच्या हाती लागला. इंग्रजांनी त्या दोघांना कण्णटम या गावात आम जनतेसमोर त्यांची शिरे उडवून ठार केले आणि त्यांची प्रेते लोकांना दहशत यावी म्हणून तशीच काही दिवस तेथे पडून राहू दिली. या घटनेने राजाला व त्याच्या साथीदारांना मोठा धक्का बसला.
           पझसी राजाच्या सैनिक तुकड्यांनी इंग्रजांना व्यापारासाठी आवश्य असलेल्या मसाल्यांची पिके कांची भागातून नष्ट करून टाकली. इंग्रज सैनिक पावसाळी वातावरणाने मलेरिया होऊन धडाधड मरण पावले. कंपनी सरकारने १२०० सैनिकांची नव्या दमाची पलटन राजाच्या पाडावासाठी नियुक्त केली. या तुकडीशी राजाच्या सैनिकांनी दीर्घकाळ टक्कर दिली. या युद्धात इंग्रजांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. ती टीपू सुलतानशी झालेल्या तिस-या युद्धात झालेल्या हानीपेक्षाही जात होती. त्या युद्धात इंग्रजांनी अधिकाधिक सैनिक पाठविले. शेकडो सैनिक त्यात मारले गेले. राजाला हिंदू - मुस्लिम व अन्य धर्माच्या लोकांनी चांगली साथ दिली. राजा सर्व धर्माच्या व सर्व जातीच्या लोकांचे हित समानतेने जपायचा. सारी जनता त्याला आपला दाता मानायची. म्हणूनच सा-या जनतेने तन - मन - धनाने राजाला साहय दिले. तीच त्याची मोठी शक्ती होती. राजाने हे युद्ध धर्मयुद्ध म्हणून घोषित केले होते. राजा घनदाट अरण्यात राहूनही आपल्या सैन्याचे भरण पोषन कसे करतो, हेच इंग्रजांना कोडे पडले होते. टीपू सुलतानाने फ्रेंच जनरल मनगलोनला या संबंधात पत्राने कळविले होते की,
" पझसी राजाच्या छोट्याशा राज्यातील एवढ्याशा सैन्याने एक हजार इंग्रज सैनिक व तेवढेच इंग्रजांचे भारतीय सैनिक ठार केले आहेत. हा राजा डोंगरातच नव्हे, तर मैदानातही इंग्रजांचा सामना करतो आहे."
             सन १८०५ मध्ये मलबारला थाॕमस हर्ने बेवर हा नवा कलेक्टर नियुक्त केला. त्याने दोन जाहीरनामे जारी केले. एक पझसी राजाला जो कोणत्याही प्रकारचे साह्य करील, त्याला 'राजद्रोही' म्हणून समजले जाईल. दुसरा - पझसी राजाचे शिर आणून देणारास तीन हजार नाणी बक्षीस दिली जातील, त्याच्या काळातही राजाने इंग्रजांशी अनेक ठिकाणी झुंजी दिल्या. त्यामध्ये राजाचा उजवा हात असलेला सेनापती तलक्कर चंदू याला इंग्रजांनी अचानक पकडले व त्याला फासावर चढविले. 
            ३० नोव्हेंबर १८०५ रोजी म्हैसूर सीमेजवळून वाहणान्या काँकेर नदी काठी हा अदभूत महत्त्वाकांक्षी व पाणीदार राजा विश्रांती घेत असताना कंपनीच्या सैन्याने त्याला चहुबाजुनी घेरले. तेव्हा अस्वस्थ कुटी नम्बियार या राजाच्या सेनापतीने घनघोर युद्ध केले व तो या युद्धात धारातीर्थी पडला. आपला पराजय निश्चित आहे असे पाहून व इंग्रजांच्या हाती जिवंतपणी सापडू नये म्हणून पझसी राजाने आपल्या अंगठीतला हिरा काढून गिळून घेतला व तो गतप्राण झाला. त्याची आजारी पत्नी मात्र ईग्रजांच्या हाती सापडली. 
            आपल्या धनुष्यबाण, भाले व तलवारी या परंपरागत शस्त्रांनी 
लढणा-या मोजक्या सैन्यासह सलगपणे ९-१० वर्षे आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या मोठया इंग्रज सैन्याशी प्राणपणाने लढा देणा-या पझसी राजाचे उदाहरण जगाच्या इतिहासात एकमेवच म्हटले पाहिजे. कलेक्टर थॉमस हर्ने वेबरने पझसी राजाचे शव आपल्या घोडागाडीत घालून ते मानाटीडी या गावी नेले व त्याचा अंतिम संस्कार परंपरागत विधिनुसार सन्मानाने करवून घेतला. त्याने लिहून ठेवले आहे," पझसी राजाकडे मी आपोआप आकर्षित होत गेलो, त्याच्या प्रजेची आपल्या राजावरची श्रद्धा व आदर एवदा दृढ होता की, त्याच्या निधनानंतरही तो कायम राहिला."
           "नेपोलियनला पराभूत करणा-या ड्यूक ऑफ वेलिंग्टनने म्हटले आहे.
" पझसी  राजा गनिमी काव्याच्या युद्धात अद्वितीय पारंगत होता."
           मानाटोडीच्या कुरुचिया वीरांनी पझसी राजाचा अंतिम संस्कार ज्या जागेवर झाला, त्या जागेवर वडाचे एक झाड लावले. ते झाड गेल्या १८० वर्षांपासून या महान क्रांतिवीराचे स्मरण देत अजूनही उभे आहे.

          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌸  *विनम्र अभिवादन* 🌸🙏

                                                                                                                              ➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा