*07 डिसेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *बुधवार* 🧩
💥 *श्री दत्त जयंती*
💥 *ध्वज निधी*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1998 - 72 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी कवी वंसत बापट यांची निवड*
👉 *2016 - पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या पीके 661 विमान कोसळले यात 47 लोकांचा मृत्यू झाला*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*
👉 *191957 - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जिऑफ लासन यांचा जन्म*
👉 *1921 - स्वामीनारायन पंथातील अध्यात्मिक गुरु प्रमुख स्वामी महाराज यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2004 - ॲमवे चे सहसंस्थापक जय व्हॅन एन्डेल यांचे निधन*
👉 *2013 - ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक विनय आपटे यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═➖➖➖➖═━┅
*👉जगातील क्षेत्र फळानुसार सर्वात मोठा देश कोणता आहे?*
*🥇रशिया*
*👉जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?*
*🥇ब्लू व्हेल*
*👉क्रिकेट संघात किती खेळाडू असतात?*
*🥇अकरा*
*👉कोणता उत्सव रंगाचा उत्सव म्हणून ओळखला जातो?*
*🥇होळी*
*👉आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव कोणता आहे?*
*🥇त्वचा*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*🐴घोडा आणि नदी💦🚣♂️*
*एकदा एका माणसाला त्यच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले. मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल". मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला. कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."*.
*🧠तात्पर्य :- उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌐 आजच्या बातम्या 🌐*
*📢बेळगाव सीमाभागात कन्नड संघटनांचा उच्छाद, महाराष्ट्राच्या 6 ट्रकवर दगडफेक; राज्यात संतापाची लाट.*
*📢सीमा भागातील महाराष्ट्राच्या वाहनांवरील हल्ले 48 तासांत थांबले नाहीत तर आम्हाला कर्नाटकात जावं लागेल; शरद पवारांचा इशारा.*
*📢संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमावादाचे पडसाद? ठाकरे गट आक्रमक तर शिंदे गटाचे खासदार अमित शाहांची भेट घेणार*
*📢'संविधानामुळे सामान्य जनेतचं आयुष्य बदललं', महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरून राज्यपालांनी जनतेला केले संबोधित*
*📢दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी लागतील 50 रुपये, राज्य शिक्षण मंडळाचा फतवा l.*
*📢गोकुळच्या दूध दरात वाढ, मुंबईत गायीचं दूध प्रति लिटर तीन रुपयांनी महागलं.*
*📢ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन; वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
मिलिंद व्हि वानखेडे
मुख्याध्यापक
प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन
9860214288
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
▬ ❚❂❚❂❚ ▬ संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
चंद्रपूर 9403183828
➿➿➿➿➿➿➿➿➿
💥💣⛓️🇮🇳👨🏻🇮🇳⛓️💣💥
*हुतात्मा*
*भास्कर पांडुरंग कर्णिक*
(भारतीय क्रांतिकारक)
*जन्म : ७ डिसेंबर १९१३*
(करूळ, रत्नागिरी, महाराष्ट्र )
*मृत्यू : ३० जानेवारी, १९४३*
(पुणे, महाराष्ट्र)
📖 *शिक्षण*
त्यांचे प्राथमिक शिक्षण करूळ गावी, तर माध्यमिक शिक्षण गुलबर्गा येथे झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून त्यांनी बी.एस्सी. केले आणि १९४२ साली ते पुण्याजवळच्या देहूरोड येथील ॲम्युनिशन फॅक्टरीत नोकरीस लागले.
💣 *अर्धा ट्रक बॉम्ब*
देहूरोड येथील एच. डेपोमध्ये असताना भास्कर कर्णिक यांनी तेथून बॉम्ब पळवायला सुरुवात केली. बाजूला काढून ठेवलेल्या बॉम्बच्या खोक्यांतला एक बॉम्ब रोज जेवणाच्या डब्यातून बाहेर आणला जाई. अश्या पद्धतीने कर्णिक यांच्याकडे अर्धा ट्रक भरेल एवढे बॉम्ब जमा झाले होते. या बॉम्बपैकी काही बॉम्ब पुढे पुणे कॅन्टॉन्मेन्टमधील कॅपिटॉल चित्रपटगृहात टाकण्यात आले. बॉम्ब टाकण्याच्या कटात सामील असलेले बापू साळवी, बाबूराव चव्हाण, एस.टी. कुलकर्णी, रामसिंग, दत्ता जोशी आणि हरिभाऊ लिमये असे सहा जण जेलमध्ये गेले, पैकी दत्ता जोशी जेलमध्येच वारले, बाकीचे काही काळानंतर सुटले.
⏳ *फरासखान्यात मृत्यू*
कॅपिटॉलमध्ये सापडलेल्या बॉम्बच्या अवशेषांवरून हे बॉम्ब कोठून आले याचा पोलिसांनी शोध घेतला, आणि त्यांनी भास्कर पांडुरंग कर्णिक, भालचंद्र दामोदर बेंद्रे, अनंत आगाशे, वामन कुलकर्णी आणि रामचंद्र तेलंग या पाच जणांना पकडून पुण्याच्या फरासखाना पोलीस चौकीत आणले. आणल्यानंतर कर्णिक लघुशंकेच्या निमित्ताने किंचित दूर गेले आणि त्यांनी खिशातली सायनाईडची पूड खाल्ली. त्यांचे निधन झाले. त्यांच्या या कृत्यामुळे कर्णिकांकडून मोठी माहिती मिळेल असे वाटणार्या पोलिसांची निराशा झाली. कर्णिकांच्या बलिदानामुळे मोठ्या संख्येने क्रांतिकारक वाचले.
💣 *हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक*
‘कॅपिटल व वेस्टएंड’ ही पुण्यातील दोन सिनेमागृहे होती. तिथे गोरे अधिकारी परिवारासह सिनेमा पहायला जात. कॅपिटल म्हणजे आजचे VICTORY सिनेमागृहात प्रचंड बॉम्बस्फोट झाला. त्यात चार युरोपियन्स ठार झाले व १४ जण जखमी झाले. त्यावेळी हॅमंड व रोच या गोऱ्या अधिकाऱ्यांची माथी भडकली. दारूगोळा कुठून आला? बॉम्ब कसे बनवले? याबाबत हैराण झाले. त्यानंतर अनेकांची धरपकड झाली.
प्रथम हाती लागला तो आगाशे नावाचा तरूण. त्याच्याकडून जोगेश्वरीच्या देवळाचे पुजारी भालचंद्र बेंद्रे यांचे नाव समजले. मध्यरात्रीनंतर देवळाला वेढा देऊन झोपेत असताना बेंद्रेंना पकडले. तर दुसऱ्या दिवशी जंगली महाराजांच्या देवळासमोरील जज्ज पाटील यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या भास्कर पांडुरंग कर्णिक नावाच्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पिस्तुल रोखून उलट सुलट तपासणी केली. खोलीची झडती घेतली असता खॉटखाली ढिगभर बॉम्ब सापडले. हॅन्ड ग्रेनेड्स बनवायची स्फोटके सापडली.
त्यानंतर भास्कर कर्णिकला हॅमंडचे फरासखान्यात मुसक्या बांधून आणले व पोलिसांना इशारा दिला. बाहेर केसरीचे वार्ताहर वि. स. माडीवाले व सकाळचे भि. न. ठाकोर बातम्या मिळविण्यासाठी आले होते. त्यांनी भास्करला पोलिसांच्या गराड्यात पाहिले. भास्कर शांतपणे म्हणाला, साहेब तुम्ही मला पकडलेच आहे. आता मी काय लपवणार? तुम्हाला मी माझ्या सहकाऱ्यांची सर्व नावे सांगतो, पण मला खूप लघवीला लागली आहे. जरा जाऊन येतो. पोलिसांनी खुश होऊन परवानगी दिली. पुढेमागे पोलीस ठेवून भास्कर कर्णिक यांना शौचालयात जाऊ दिले. त्याने दार लोटून घेतले आणि १० मिनिटातच बाहेर आला आणि फरासखान्याच्या पहिल्या चौकाच्या अलिकडे धाडकन खाली कोसळला. काय झाले कुणालाच कळेना. पोलीसही चक्रावून गेले.
हॅमंड साहेबांनी तातडीने डॉ. जेजुरीकरांना बोलावून भास्करला तपासायला लावले. पण भास्करचे प्राण कधीच गेले होते. हॅमंडच्या अमानुष मारहाणीपुढे कदाचित आपला टिकाव लागला नाही आणि चुकूनसुद्धा आपल्या सहकाऱ्यांची नावे तोंडातून जाऊ नयेत यासाठी हुतात्मा भास्कर कर्णिक याने योजना आखून ठेवली होती.
त्याने पोटॅशियम सायनाईटच्या जहाल विषाची कुपी मुद्दाम वाढवलेल्या नखामध्ये लपवून ठेवली होती. लघवीच्या निमित्ताने शौचालयात जाऊन ते विष पिऊन टाकले आणि पोलिसांच्या कचाट्यातून आणि पुढील लढ्यासाठी आपल्या इतर सहकाऱ्यांची सुटका केली. ३० जानेवारी १९४३ रोजी भास्कर पांडुरंग कर्णिक याने हौतात्म्य पत्करले.
🇮🇳 *जयहिंद*🇮🇳
🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा