09 डिसेंबर दिनविशेष


*09 डिसेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *शुक्रवार* 🧩
     
   
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *2007 - पाकिस्तान च्या बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तान सरकार सोबत पूर्णप्रकार त्यांचे संबंध समाप्त केले*        
👉 *2013 - इंडोनेशिया मेबिनटरो च्या जवळ एका ट्रेन अपघातात 63 लोक जखमी झाले*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*

👉 *1945 - चित्रपट अभिनेता शञुध्न सिन्हा  यांचा जन्म*
👉 *1946 - भारतीय राजकारणी सोनिया गांधी   यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1997 - कन्नड लेखक चिञपट निर्माते विचारवंत तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पद्मभूषण आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते के शिवरामन कारंथ   यांचे निधन*
👉 *2012 - बारकोडचे सहनिर्माते नाॅर्मन जोसेफ वोटलॅड   यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═➖➖➖➖═━┅

*👉गाडगे बाबा यांचे खरे नाव काय?*
*🥇डेबूजी झिंगराजी जानोरकर*

*👉इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात कोणत्या महिन्याने होते?* 
*🥇जानेवरी महिना*

*👉 महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण आहेत?* 
*🥇 यशवतराव चव्हाण*

*👉वानखेडे क्रिकेट स्टेडियम कोठे आहे?* 
*🥇मुंबई*

*👉श्री महालक्ष्मी मंदिर कोठे स्थित आहे?* 
*🥇कोल्हापूर*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
*🤨युक्तिच सर्वश्रेष्ठ,*

*नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती.*

*🧠तात्पर्य:-*
*युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते.*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         *🌐 आजच्या बातम्या 🌐*

*📢गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचं अभूतपूर्व यश, सलग सातव्यांदा विधानसभा निवडणुकीत बाजी, तब्बल 157 जागा जिंकत विधानसभेवर कब्जा, काँग्रेस फक्त 16 जागा तर आम आदमी पाच मतदारसंघात विजयी.  हिमाचल प्रदेशात 39 जागा जिंकत काँग्रेसचा भाजपला धोबीपछाड.*  
*📢अमित शाहांनी महाविकास आघाडीच्या खासदारांना दिलेली भेटीची वेळ अचानक रद्द, सीमा प्रश्नावर होणार होती चर्चा.* 
*📢सगळे प्रकल्प पळवले, मग एकतर्फी निकाल लागणारच, गुजरात निकालावर शरद पवार यांची प्रतिक्रिया* 
*📢कोकणात पावसाचा अंदाज, 'मंदोस' चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम.*   
*📢Fifa World Cup 2022 : 32 संघांनी सुरु केली होती स्पर्धा, 8 संघच उपांत्यपूर्व फेरीत दाखल.*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा