15 डिसेंबर दिनविशेष


*15 डिसेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *गुरवार* 🧩


💥 *जागतिक चहा दिन*
         
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *2003 - फ्रान्स चा फुटबॉलपटू झिनादिन झिदान याची वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड झाली*
👉 *2008 - झालेल्या संसद हल्ल्याची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी चा स्थापनेच्या प्रस्तावला मंजुरी*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*

👉 *1937 - संत साहित्य भाषाविज्ञान अभ्यासक प्राथमिक.कल्याण काळे  यांचा जन्म*
👉 *1988 - भारताचे प्रसिद्ध  कुश्तीपटू गीता फोगाट यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1950 - सरदार वल्लभभाई पटेल स्वातंत्र्य सेनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री ,भारताचे लोहपूरूष व भारतरत्न  यांचे निधन*
👉 *2000 - प्रसिद्ध लेखक व पञकार गौर किशोर घोष यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿
⚜️🤝🎓🇮🇳👴🇮🇳🎓🤝⚜️

                   *लौहपुरुष* 
      *सरदार वल्लभ भाई पटेल*
*(भारतीय स्वतंत्रता संग्राम सेनानी)*

   *जन्म : 31 आक्टोबर 1875*
(नडियाद, बंबई प्रेसीडेंसी, ब्रिटिश भारत)
     *मृत्यु :15 डिसेंबर 1950* 
                   (वय 75)
वडिल : झावेरभाई पटेल
आई : लाडबाई
पत्नी : झावेरबा
मुलांची नावं : दहयाभाई पटेल, मणिबेन पटेल 
शिक्षण : एन.के. हायस्कुल पेटलाड, इंस ऑफ कोर्ट लंडन इंग्लंड
पुस्तक : राष्ट्र के विचार, वल्लभभाई पटेल, वल्लभभाई पटेल  के संग्रहित कार्य, 15 खंड
स्मारक : स्टॅच्यू ऑफ युनिटी     *भारताचे उप-प्रधानमंत्री*
                *पद बहाल*
15 आॕगष्ट 1947 – 15 डिसेंबर 1950
प्रधानमंत्री : जवाहरलाल नेहरु
पूर्वा धिकारी : पद सृजन
उत्तरा धिकारी : मोरारजी देसाई
            *गृह मंत्रालय*
             *पद बहाल*
15 अॕॉगष्ट 1947 – 15 डिसेंबर 1950
प्रधानमंत्री : जवाहरलाल नेहरु
पूर्वा धिकारी : पद सृजन
उत्तरा धिकारी : चक्रवर्ती  
                       राजगोपालाचारी
🔸 *वल्लभभाई पटेलांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन*
वल्लभाईंचा जन्म नडियाद येथे 31 ऑक्टोबर 1875 ला एका जमीनदार परिवारात झाला. झवेरभाई पटेल आणि लाडबाईंचे हे चैथे अपत्य. वल्लभाईंचे वडिल शेतकरी आणि आई एक गृहिणी व आध्यात्मिक धर्मपरायण महिला. वल्लभभाईंना तीन मोठे भाऊ नरसीभाई, विðलभाई व सोमाभाई आणि एक बहिण जीचे नाव दहीबा पटेल असे होते.

👫🏻 *वल्लभभाई पटेल यांचा विवाह*
            त्या काळी बालविवाहाची प्रथा असल्याने वल्लभभाई पटेल यांचा विवाह वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी 1891 साली झावेरबा नावाच्या कन्येशी करून देण्यात आला. त्यांच्या पासुन दहयाबाई आणि मणिबेन पटेल अशी दोन अपत्ये झालीत.

♦️ *पत्नीच्या मृत्युची बातमी ऐकुन देखील कोर्टात करत राहीले कामकाज*
        वल्लभभाईंची पत्नी झावेरबा कॅंसर ने पीडित असल्याने त्यांचा आणि वल्लभभाईंचा संसार दिर्घकाळ टिकला नाही 1909 साली त्यांचे निधन झाले.
                  ज्यावेळी झावेरबांच्या निधनाची बातमी वल्लभभाईंना मिळाली त्यावेळी ते कोर्टात कामात व्यस्त होते. ही बातमी मिळाल्यानंतर देखील त्यांनी आपले कामकाज पुर्ण केले कोर्टातील खटला जिंकले देखील त्यानंतर आपल्या पत्नीच्या मृत्युची बातमी त्यांनी सर्वांना दिली. पुढे आपले संपुर्ण जीवन आपल्या अपत्यांसमवेत विधुर म्हणुन व्यतीत केले.

💁🏻‍♂️ *वल्लभभाई पटेलांचे शिक्षण आणि वकिलीची सुरूवात*
       आपले प्रारंभिक जीवन त्यांनी गुजराती मीडियम स्कुल मधुन पुर्ण केले. पुढे त्यांनी इंग्लिश मिडियम शाळेत प्रवेश घेतला. शिक्षण पुर्ण करण्याकरीता त्यांना विलंब लागला. 1897 ला वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी 10 वी ची परिक्षा उत्तीर्ण केली.
               घरची परिस्थीती बेताची असल्याने महाविद्यालयात न जाता वल्लभभाईंनी घरी राहुनच पुस्तकं उधार घेउन शिक्षण घेतले. शिवाय जिल्हाधिकारी होण्याकरता दिल्या जाणा-या परिक्षेचा अभ्यास सुध्दा त्यांनी घरूनच केला. अभ्यासात ते एवढे हुशार होते की या परिक्षेत त्यांना सगळयात जास्त गुण मिळाले.
            1910 साली लाॅ ची पदवी मिळविण्याकरता वल्लभभाई इंग्लंड ला गेले. काॅलेज चा त्यांना कुठलाही अनुभव नव्हता परंतु ते बुध्दीने एवढे तल्लख होते की 36 महिन्यांचा कोर्स त्यांनी अवघ्या 30 महिन्यांमधे पुर्ण केला.  अश्याप्रकारे 1913 साली वल्लभभाईंनी इंस ऑफ कोर्ट मधून वकिलीची पदवी मिळवीली, या परिक्षेत सर्वाधिक गुण मिळवले आणि काॅलेज मधुन पहिले आले.
        त्यानंतर वल्लभभाई भारतात परतले गुजरात मधील गोधरा येथे त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली. वकिलीतील त्यांची समज पाहुन ब्रिटीश सरकारने त्यांना कित्येक मोठया पदांवर नियुक्ती देण्यास आमंत्रीत केले परंतु वल्लभभाई पटेलांनी ब्रिटीश शासनाचा एकही प्रस्ताव स्विकारला नाही कारण त्यांना ब्रिटींशांचा एकही कायदा अजिबात पसंत नव्हता आणि ते त्यांचे कट्टर विरोधक होते त्यामुळे ब्रिटींशाकडुन आलेला एकही प्रस्ताव त्यांनी स्विकारला नाही.

🔆 *वल्लभभाई गांधीवादी विचारांनी प्रभावित झाले*
          पुढे ते अहमदाबाद येथे एक यशस्वी बॅरिस्टर म्हणुन काम करू लागले, सोबतच ते गुजरात क्लब चे सदस्य देखील झाले या दरम्यान त्यांनी महात्मा गांधीजींच्या एका व्याखानात भाग घेतला त्यावेळी ते गांधीजींच्या विचारांनी फार प्रभावित झाले. पुढे गांधीजींचा कट्टर अनुयायी बनण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अश्यातऱ्हेने ते गांधीवादी सिध्दांतावर चालु लागले हळुहळु राजकारणाचा हिस्सा बनले.
🔸 *वल्लभभाई पटेलांची राजकिय कारकिर्द*
⚜️ *स्वातंत्र्य संग्रामात सरदार वल्लभभाई पटेलांची भुमिका*
                  भारताच्या स्वातंत्र्याचे महानायक महात्मा गांधी यांच्या प्रभावशाली विचारांनी प्रेरित होउन वल्लभभाईंनी अस्पृश्यता, जातीयवाद, स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात आवाज उठविला आणि समाजात पसरलेली नकारात्मकता दुर करण्याकरीता भरपुर प्रयत्न केलेत.
                    सोबतच गांधीजींच्या विचारधारेला स्विकारत स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

🔮 *शेतकरी संघर्षात वल्लभभाईंची महत्वाची भुमिका*
                    महात्मा गांधीजींच्या शक्तिशाली विचारांनी प्रभावित झालेल्या वल्लभभाई पटेलांनी 1917 साली शेतकऱ्यांच्या आंदोलनात महत्वाची भुमिका बजावली. त्या दरम्यान गुजरात मधील ग्रामीण भाग मोठया प्रमाणात दुष्काळाचा सामना करीत होता अश्यात शेतकरी ब्रिटीशांनी लावलेले अवास्तव कर देण्यास समर्थ नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांनी ब्रिटीश शासनाला करात सवलत देण्याची विनंती केली होती.
                  परंतु शेतकऱ्यांच्या या प्रस्तावाला ब्रिटीश शासनाने धुडकावुन लावले त्यावेळी सरदार वल्लभ भाई पटेल यांनी मोठया प्रमाणावर ’नो टॅक्स कॅंपेन ’ या मोहिमेचे नेतृत्व केले आणि शेतकऱ्यांना कर न भरण्यास प्रोत्साहन दिले.
                   या संघर्षामुळे ब्रिटीश शासनाला सरदार पटेलांच्या दृढ संकल्पापुढे झुकण्यास मजबुर व्हावे लागले आणि शेतकऱ्यांना करा मधे सवलत द्यावी लागली. स्वातंत्र्य समरात सरदार वल्लभ भाई पटेलांचे हे पहिले मोठे यश मानल्या गेले.                               ♦️ *महात्मा गांधीजींच्या असहकार आंदोलनासमवेत सर्व आंदोलनांना सरदार वल्लभ भाई पटेलांनी दिले समर्थन*   
वल्लभ भाई पटेल गांधीजींच्या विचारांनी एवढे प्रभावित होते की 1920 साली असहकार आंदोलनादरम्यान त्यांनी स्वदेशी खादी वस्तुंचा स्विकार केला आणि विदेशी कपडयांची होळी केली.
                  याशिवाय वल्लभभाई पटेलांनी गांधीजींनी शांततापुर्वक केलेल्या देशव्यापी आंदोलन उदा. स्वातंत्र्य संग्राम, भारत छोडो आंदोलन, दांडी यात्रा यात गांधीजींचे समर्थन करीत सहकार्य केले.

♦️ *अशी मिळाली सरदार ही पदवी*
                     आपल्या वक्र्तृत्वाने जनसामान्यांना प्रभावित करणा-या सरदार पटेलांनी 1928 साली सायमन कमिशन विरोधात पुकारलेल्या बारडोली सत्याग्रहा दरम्यान लोकांना आपल्या महान विचारांनी फार प्रभावित केले त्यामुळे इंग्रजांनी अवाजवी वाढवलेल्या करांना न भरण्यावर जनता सहमत झाली त्यामुळे ब्रिटीश व्हाईसराय ला पराभव पत्करावा लागला.
               या आंदोलनात आपल्या सशक्त नेतृत्वाने वल्लभभाई पटेल जनतेत चांगलेच प्रसिध्द झाले आणि बारडोलीतील लोक त्यांना सरदार म्हणु लागले त्यामुळे पुढे सरदार त्यांच्या नावा आधी जोडल्या गेले.

🌀 *काॅर्पोरेशनच्या अध्यक्षांपासुन ते देशाच्या पहिल्या गृहमंत्रीपदापर्यंतचा प्रवास*
                     दिवसेंदिवस सरदार वल्लभभाई पटेलांची ख्याती वाढत चालली होती आणि त्यामुळेच अहमदाबाद येथील निवडणुकांमधे त्यांनी सतत विजय मिळवला. 1922, 1924 आणि 1927 ला ते अहमदाबाद नगरपालीकेचे अध्यक्ष म्हणुन निवडल्या गेले.
             1931 साली वल्लभभाई पटेल कॉंग्रेस च्या 36 व्या अहमदाबाद अधिवेशनात स्वागत समितीचे अध्यक्ष बनले आणि ते गुजरात प्रदेशाच्या कॉंग्रेस समितीचे पहिले अध्यक्ष म्हणुन नियुक्त झाले पुढे 1945 पर्यंत ते गुजरात कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदावर राहिले.
           या दरम्यान त्यांना अनेकदा कारागृहात देखील जावे लागले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वल्लभभाई पटेल भारताचे गृहमंत्री आणि उपप्रधानमंत्री झाले. तसे पाहाता सरदार वल्लभभाई पटेल यांची ख्याती आणि प्रसिध्दी एवढी पसरली होती की प्रधानमंत्री होण्याचे सामथ्र्य त्यांच्यात होते परंतु महात्मा गांधीजीं मुळे त्यांनी स्वतःला या स्पर्धेपासुन दुर ठेवले आणि जवाहरलाल नेहरूंना देशाचे पहिले प्रधानमंत्री बनविण्यात आले.

♨️ *स्वदेशी साम्राज्यांना एकत्रीत करण्याकरीता सरदार पटेल यांनी निभावली महत्वपुर्ण भुमिका*
                स्वतंत्र भारताचे गृहमंत्री झाल्यानंतर वल्लभभाई पटेल यांनी सर्वात आधी भारतातील वेगवेगळया साम्राज्यातील राजांना आपल्या राजनैतिक दुरदर्शीपणाचा आणि बुध्दीमत्तेचा वापर करत संघटीत केले आणि वेगवेगळया राज्यांचे स्वप्न सत्यात उतरणे शक्य नसल्याची जाणीव भारतीय संघातील 565 साम्राज्यांच्या राजांना करून दिली.
              त्यानंतर भारतात विलीन होण्याकरता सर्व राज्यांनी सहमती दर्शवली परंतु हैदराबाद चे निजाम, जुनागढ आणि जम्मु कश्मीर च्या नवाबांनी मात्र आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास विरोध दर्शविला. वल्लभभाई पटेल यांनी आपल्या कुशाग्र बुध्दीमत्तेच्या बळावर सैन्याचा वापर करीत या तिन राज्यांना आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास सहमत करून घेतले.
          वल्लभभाई पटेलांनी अश्या तऱ्हेने भारतीय संघाला कोणत्याही युध्दाशिवाय शांततेच्या मार्गाने एकत्रीत केले. या महान कार्यामुळे त्यांना लोहपुरूष ही पदवी देण्यात आली.

🔰 *सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताचे विभाजन*
                   फाळणी संघर्ष आणि आंदोलनात मुस्लीम लीग नेता मुहम्मद अली जिन्ना यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगदी आधी पेटलेल्या हिंदु मुस्लीम संघर्षाला हिंसात्मक स्वरूप देण्यात आले होते.
               सरदार पटेल यांच्या मते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अश्यात तऱ्हेने हिंसात्मक आणि सांप्रदायिक दंगे केंद्र सरकारच्या कार्यक्षमतेला कमजोर बनवतील परिणामी असे संघर्ष लोकतांत्रिक राष्ट्राला मजबुत करण्याकरीता बाधा पोहोचवतील.
                  या समस्येला निकाली काढण्याकरीता पटेल यांनी 1946 ला सिव्हील वर्कर वी.पी मेनन यांच्यासमवेत काम केलं आणि फाळणी परिषदेदरम्यान भारताचे प्रतिनीधीत्व केले.

🪔 *निधन* 
                    1950 साली सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वास्थ्य बिघडु लागले. 2 नोव्हेंबर 1950 ला त्यांची प्रकृती एवढी बिघडली की ते अंथरूणावरून उठण्यास देखील असमर्थ होते. पुढे 15 डिसेंबर 1950 ला आलेल्या हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने या महान आत्म्याची प्राणज्योत मालवली.

📜 *सरदार वल्लभभाई पटेल यांना मिळालेले सन्मान*
       1991 साली त्यांना मरणोत्तर भारताच्या सर्वोच्च नागरिक सन्मान भारत रत्न ने गौरविण्यात आले. त्यांचा जन्मदिवस 31 ऑक्टोबर ला 2014 साली राष्ट्रीय एकता दिवसाच्या रूपात घोषित करण्यात आले.

या व्यतिरीक्त भारत सरकार व्दारा 31 ऑक्टोबर 1965 ला सरदार पटेल यांच्या स्मरणार्थ पोस्टाने डाक तिकीट प्रकाशित केले. एवढेच नव्हे तर त्यांच्या नावावर अनेक शिक्षण संस्था, रूग्णालयं आणि विमानतळांचे नामकरण करण्यात आले… जसे की

सरदार वल्लभभाई पटेल कृषी आणि प्रौद्योगिकी विश्वविद्यालय मेरठ
सरदार वल्लभभाई राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, सुरत
सरदार पटेल विश्वविद्यालय, गुजरात
सरदार पटेल विद्यालय, नई दिल्ली
सरदार वल्लभभाई पटेल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी, वासद
स्मारक सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय स्मारक, अहमदाबाद
सरदार सरोवर बांध, गुजरात
सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एयरपोर्ट, अहमदाबाद
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अहमदाबाद
🎯 *सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर एक दृष्टीक्षेप*
▪️1913 साली लंडन येथुन बॅरिस्टरची पदवी संपादन करून भारतात परतले
▪️1916 मध्ये लखनौ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कॉंग्रेस अधिवेशनात वल्लभभाईंनी गुजरात चे प्रतिनिधीत्व केले.           ▪️ 1917 साली ते अहमदाबाद नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडुन आले.
▪️1917 मधे शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाचे त्यांनी प्रतिनीधीत्व केले, शेतसारा बंदी आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले, अखेर ब्रिटीशांना झुकावेच लागले, सगळे कर माफ केले, सरदार पटेलांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला यश मिळाले 1918 साली जुन महिन्यात शेतकऱ्यांनी विजयोत्सव साजरा केला त्यावेळी महात्मा गांधीजींना आमंत्रीत करून त्यांच्या हस्ते वल्लभभाईंना मानपत्र देण्यात आले.
▪️ 1919 साली रौलेट अॅक्ट विरोधात वल्लभभाई पटेलांनी अहमदाबाद येथे खुप मोठा मोर्चा काढला
▪️ 1920 ला गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केले. या आंदोलनात वल्लभभाईंनी आपले संपुर्ण जीवन देशाला समर्पीत केले. प्रत्येक महिन्याला हजारो कमवुन देणारी वकिली देखील त्यांनी देशाकरता सोडुन दिली.
▪️ 1921 मधे गुजरात प्रांतीय कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षस्थानी त्यांची निवड झाली.
▪️1923 साली ब्रिटीश शासनाने तिरंग्यावर बंदीचा कायदा केला त्या विरोधात वेगवेगळया ठिकाणांवरून हजारो सत्याग्रही नागपुर येथे एकत्रीत झाले, साडेतीन महिने जोशपुर्ण लढाई सुरू झाली. या लढाईला संपवण्याकरीता ब्रिटीशांनी अनेक अयशस्वी प्रयत्नं केले.
▪️1928 मधे बारडोली येथे वल्लभभाईंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या हिताकरता शेतसारा बंदी आंदोलन सुरू झाले. सुरूवातीला वल्लभभाईंनी ब्रिटीश सरकारला शेतसारा कमी करण्याचे निवेदन दिले परंतु सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. वल्लभभाईंनी योजनाबध्द आणि सावधानतेने आंदोलन सुरू केले. आंदोलनाला दाबण्याकरीता ब्रिटीशांनी अनेक अयशस्वी प्रयत्नं केले परंतु त्याच वेळी मुंबईत विधानसभेच्या काही सदस्यांनी आपापल्या पदांचा राजिनामा दिला. याचा परिणाम हा झाला की सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या सशर्त मान्य केल्या. बारडोलीत शेतकऱ्यांनी वल्लभभाईंना ’सरदार’ हा बहुमान दिला.
▪️1931 कराचीत झालेल्या राष्ट्रीय कॉंग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी वल्लभभाई होते.
▪️1942 ला ’भारत छोडो’ आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांना जेल मधे जावे लागले.
▪️1946 ला स्थापन झालेल्या मध्यवर्ती अभिनय मंत्रीमंडळात ते गृहमंत्री होते. पटेल घटनासमितीचे सदस्य देखील होते.
▪️15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर पहिल्या मंत्रीमंडळात उपपंतप्रधान पदाचे स्थान त्यांना मिळाले त्यांच्या जवळ गृह, माहिती, प्रसारण, तसेच घटक राज्य संबंधीत प्रश्नांची खाती देण्यात आली.                 ▪️वल्लभभाईंनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळ जवळ सहाशे साम्राज्यांचे भारतात विलीनीकरण केले, हैद्राबाद संस्थान देखील त्यांनी घेतलेल्या पोलिस कारवाईमुळे 17 सप्टेंबर 1948 ला भारतात विलीन झाले.                                           🎞️📽️ *सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर आधारीत चित्रपट*
                    1993 साली सरदार वल्लभभाई पटेल यांची बायोपिक फिल्म ’सरदार’ प्रदर्शित झाली होती या चित्रपटाचे दिग्दर्शक केतन मेहता होते या चित्रपटात सरदार वल्लभभाईंची भुमिका परेश रावल यांनी साकारली होती.

🗽 *स्टैच्यू ऑफ यूनिटी*
       लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ जगातील सर्वात उंच मूर्ति स्टैच्यू ऑफ यूनिटी तयार करण्यात आली. त्याची उंची जवळपास 182 मीटर आहे. या मुर्तीची कोनशिला 2013 साली सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते ठेवण्यात आली होती आणि नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच 2018 ला जगातील सर्वात उंच प्रतिमेचे उद्घाटन करण्यात आले.
                    अश्या तऱ्हेने सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपले संपुर्ण जीवन देशाला समर्पित केले. त्यांनी केवळ अनेक भागांत वाटल्या गेलेल्या भारतिय संघाला एकिकृत करण्यात आपली महत्वाची भुमिका बजावली असे नाही तर आपल्या बुध्दीमत्तेच्या आणि दुरदर्शितेच्या जोरावर कित्येक असे निर्णय घेतले ज्याचा उपयोग आधुनिक भारताच्या निर्मीतीत झाला. भारताकरीता अश्या महान वीर सुपुत्राचा जन्म होणे गौरवपुर्ण आहे.

          🇮🇳 *जयहिंद*🇮🇳
                                                                                                                                                                                                                                              ➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा