*21 डिसेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *बुधवार* 🧩
💥 *श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1965 - दादा कोडगे निर्मित व दिग्दर्शित वसंत सबनीस लिखित विच्छा माझी पुरी करा या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला*
👉 *2012 - आजच्या दिवशी गगंनम स्टाईल या कोरियन गाण्याला यु ट्यूब वर एक अब्ज लोकांनी पाहिले*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*
👉 *1903 - भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे प्लाॅस्टिक व नाॅयलाॅन उद्योगाचे जनक महाराष्ट्राचा औद्योगिक विकासाचे एक प्रमुख शिल्पकार पद्मभूषण, डि.लाट., उद्योजक निवृत्तीनाथ पाटील ऊर्फ पी.सावळाराम भावगीतलेखक कवी कुसुमाग्रज यांनी त्यांना जनकवी ही उपाधी दिली यांचा जन्म*
👉 *1979 - नरहर रघुनाथ तथा न.र.फाटक चरिञकार, टिकाकार इतिहास संशोधक,संत साहित्याचे अभ्यासक व लेखक यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1997 - पं.प्रभाशंकर गायकवाड सनईवादक यांचे निधन*
👉 *2011 - न्युक्लिअर फिजिस्टिस पी.के.अरंगार यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═➖➖➖➖═━┅
*👉गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते ?*
*🥇सिद्धार्थ*
*👉रातांधळेपणा कोणत्या व्हिटामिन च्या कमतरतेमुळे होतो ?*
*🥇व्हिटामिन ए*
*👉मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात ?*
*🥇कल्ले*
*👉राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत ?*
*🥇विश्वनाथन आनंद*
*👉तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते ?*
*🥇आंध्रप्रदेश*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*👍खरा मिञ👈*
*आश्रमात राहणाऱ्या शिष्यांनी एके दिवशी आपल्या गुरूला एक प्रश्न विचारला,"गुरुजी !*
*धन, कुटुंब आणि धर्म यापैकी खरा सहकारी कोण आहे? " गुरुजींनी एक कथा ऐकवली. ती पुढीलप्रमाणे - एका व्यक्तीला तीन मित्र होते, तिघांपैकी पहिला त्याला प्रिय होता. तो प्रत्येक दिवशी त्याला भेटायचा. प्रत्येक कामात त्याची सोबत करायचा. दुसऱ्या मित्राबरोबर त्याची मध्यम स्वरूपाची मैत्री होती. दुसरा मित्र २-३ दिवसातून भेटायचा आणि क्वचितच त्याच्या सोबत असायचा. तिसरा मित्राला मात्र तो २ महिन्यात एकदा भेटायचा आणि कोणत्याही कामात त्याची मदत घेत नसे. एकदा त्या व्यक्तीकडून काहीतरी चूक झाली. त्यामुळे त्याला राजदरबारात बोलावण्यात आले. तो घाबरला. त्याने पहिल्या मित्राला सांगितले व नेहमीप्रमाणे सोबत राहण्याचा आग्रह केला. मात्र त्याने सर्व गोष्ट ऐकून सोबत राहण्यास नकार दिला. कारण तो राजाशी आपले संबंध बिघडवू इच्छित नव्हता. दुसऱ्या मित्रानेही त्याला सोबत येण्याची तयारी दर्शविली पण अचानक कामाचे कारण सांगून येण्याची टाळाटाळ केली. त्या व्यक्तीने तिसऱ्या मित्राला विचारताक्षणी तो त्याच्यासोबत गेला आणि राजासमोर त्या व्यक्तीची बाजू मोठ्या धीराने व खंबीरपणे मांडली. राजाला पण ते कथन योग्य वाटल्याने त्याने त्या व्यक्तीला दोषमुक्त केले. ही कथा ऐकवून गुरुजींनी समजावले पहिला मित्र म्हणजे पैसा. ते परमप्रिय असते पण मृत्युनंतर काहीच कामी येत नाही. तर दुसरा मित्र म्हणजे कुटुंब. आपले आपले म्हणणारे शेवटी आपल्याला वेळेला उपयोगी पडत नाहीत. आणि तिसरा मित्र म्हणजे आपला धर्म, जो आपल्याला जिवंत असेपर्यंत साथ देतोच पण मृत्युनंतर ही तो एकमेव आपल्या सोबत असतो.*
*🧠तात्पर्य :-*
*माणसाने आपल्या वर्तनातून आपल्या मनूष्य धर्माचे पालन केले पाहिजे, जे माणूसकीच्या दृष्टिने योग्य आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌐 आजच्या बातम्या 🌐*
*📢राज्यात भाजप-शिंदे गट मविआला भारी, भाजपकडे सर्वाधिक 2023 ग्रामपंचायती असल्याचा दावा, तर राष्ट्रवादीचे 1215 ठिकाणी वर्चस्व.*
*📢मुख्यमंत्र्यांवर न्यायालयाने ताशेरे ओढलेत, त्यांनी राजीनामा द्यावा; एनआयटी भूखंड प्रकरणावरून विरोधक आक्रमक*
*📢अनिल देशमुखांच्या जामीनावर उद्या हायकोर्टात पुन्हा सुनावणी, स्वीय सहाय्यक संजीव पालांडेंना जामीन मंजूर*
*📢बृहन्मुंबई महापालिकेतील प्रभाग संख्या, पुर्नरचनेवरील काम तूर्तास 'जैसे थे'; राज्य सरकारचं कोर्टात स्पष्टीकरण.. सुनावणी 5 जानेवारीपर्यंत तहकूब*
*📢५०० रुपयांत मिळणार गॅस सिलेंडर, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा