24 डिसेंबर दिनविशेष


*24 डिसेंबर दिनविशेष 2022!*
🧩 *शनिवार*🧩

 
              🌍 *घडामोडी*🌍

*👉१९९९: काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्‍या इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.*
*👉२०१६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले.*

               🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* *(प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

               🌍 *जन्म*🌍

*👉१९४२: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार इंद्र बानिया यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च २०१५)*
*👉१९५९: हिन्दी चित्रपट कलाकार अनिल कपूर यांचा जन्म.*
 
      🌍*मृत्यू*

*👉२००५ : भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार*
*👉१५२४ : वास्को द गामा – पोर्तुगीज दर्यावर्दी. अफ्रिकेला वळसा घालून युरोपातुन भारतात येण्याचा मार्ग त्याने शोधला. (जन्म:  १४६९)*
----------------------------------------
मिलिंद विठ्ठलराव वानखेडे 
------------------------------------------

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═➖➖➖➖═━┅

*👉उष्णतेचा मंदवाहक पदार्थ कोणता?* 
*🥇लाकूड, रबर, काच*

*👉 ए.आर.रहेमान हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?* 
*🥇संगीत क्षेत्र*

*👉इंग्लंड या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता?* 
*🥇क्रिकेट*

*👉भारताच्या पूर्व सरहद्दीवरील देशाचे नाव सांगा?* 
*🥇बांगलादेश व म्यानमार*

*👉भारतातून सर्वात शेवटी निघून जाणारे परकीय कोण होते?* 
*🥇पोर्तुगीज 1961*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
*🧠प्रेमळ कथा,*

*एका शहरा जवळील खेड्या मध्ये एक वृद्ध माणूस राहत होता, त्याची इच्छा होती कि घरासमोरील अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण हे खूप कष्टाचे काम आहे, ........ आणि दुर्दैवाने त्याचा मुलगा तुरुंगात होता, त्यामुळे हे कसे होणार, असे म्हणून तो आपल्या मुलाला एक पत्र लिहितो,*

 *राजू,*
*तुझ्या स्वर्गवासी आईची इच्छा होती कि आपल्या अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण त्यासाठी सारे आंगण खोदावे लागणार, मी तर थकलो आहे, तू इथे असतास तर मदत झाली असती*

*दोनच दिवसात त्या वृद्ध माणसाला त्याच्या मुलाकडून पत्र आले,*

 *बाबा, कृपया करून तुम्ही आपले आंगण खोदू नका, तिथे मी पिस्तुल व कार्तुस लपविली आहेत*

*दुसर्या दिवशी सकाळी पूर्ण शहरातील पोलीस गावामध्ये दाखल झाली, त्यांनी पूर्ण आंगण खोदले पण त्यांना काहीच मिळाले नाही.*

*लगेच मुलाचे पत्र आले,   बाबा आंगण खोदून झाले, आता तुम्ही बी पेरा व बटाट्याची मोठी बाग आपल्या अंगणात फुलवा  ............ इथे बसून मी तुमच्यासाठी सर्वोत्तम म्हणजे हेच करू शकतो.*

*🧠तात्पर्य :- मनापासून काहीही करायचे ठरविले तर ते नक्की होते, मग तुम्ही दुसर्या गावी असूद्यात किंवा परदेशात असूद्यात.*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         *🌐 आजच्या बातम्या 🌐*

*📢चीनमध्ये एकाच दिवसात सापडले कोरोनाचे 3.7 कोटी रुग्ण, 18 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण*
*📢कोरोना रोखण्यासाठी केंद्र सरकार सतर्क, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, त्र्यंबकेश्वर, पंढरपुरात मास्कसक्ती, पुणे विमानतळावर थर्मल स्क्रीनिंग*
*📢शेअर बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'; गुंतवणुकदार रडकुंडीला, 8.20 लाख कोटींचा चुराडा*
*📢IND vs BAN, 2nd Test : दुसऱ्या दिवसाअखेर भारताकडे 80 धावांची आघाडी, दुसऱ्या डावात बांगलादेश 7/0*
*📢महापुरुषांचे अपमान करणाऱ्यांवर सरकारचे मौन; विधानमंडळाच्या गेटवर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न*
*📢पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढे ढकलला, पुढील तारखा लवकरच जाहीर होणार*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा