11 जानेवारी दिनविशेष


*11 जानेवारी दिनविशेष 2023 !*
🛟 *बुधवार* 🛟


💥 *भव्य रक्तदान व नेञ तपासणी शिबीर ...स्थळ- प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन ता.रामटेक जि.नागपूर*


💥 *आजपासुन राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह ला सुरवात*
 
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *1999 - कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी*
👉 *2000 - छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1973 - राहूल द्रविड  - भारतीय क्रिकेटपटू  यांचा जन्म*
👉 *1955 - आशा  खाडिलकर- उपशास्ञीय व नाट्यसंगीत गायिका  यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *2004 - नागपूर जिल्हा परिषदेचे पहिले उपाध्यक्ष बळीरामजी दखने यांचे निधन*
👉 *1966 - लालबहाद्दूर शास्त्री  - भारताचे 2 प्रधानमंञी यांचे  निधन*
👉 *2008 - यशवंत दिनकर फडके  - मराठी लेखक व इतिहाससंशोधक  यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═➖➖➖➖═━┅

*👉आपल्या शरीराचे बाह्य आवरण कोणते आहे?* 
*🥇 त्वचा*

*👉प्रथिने मिळविण्यासाठी रोजच्या आहारात कोणते पदार्थ असणे आवश्यक आहे?* 
*🥇डाळी*

*👉वस्तूंची अधिकाधिक विक्री व्हावी यासाठी कोणते माध्यम प्रभावी आहे?* 
*🥇जाहिरात*

*👉सुरत येथे पहिली वसाहत स्थापन करणारे विदेशी राष्ट्र कोणते?* 
*🥇इंग्रज*

*👉लहान मुलांवर होणाऱ्या संस्काराचे प्रमुख केंद्र कोणते आहे?* 
*🥇कुटुंब / घर*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
*😊संतोष व समाधान हेच खरे धन🙏*

*एका श्रीमंत माणसाजवळ अमाप धन होते. तरीही त्याला समाधान नव्हते. एके दिवशी एक साधू त्या गावात आला. श्रीमंत माणसाने त्याची बरीच कीर्ती ऐकली. तो त्याच्याकडे गेला. आपली मनोव्यथा त्याला सांगितली. 'मला सात पिढय़ा पुरेल एवढी संपत्ती हवी आहे,' अशी मागणी त्याने त्या योगी पुरुषाकडे केली. त्या संत पुरुषाने श्रीमंत माणसाला आपादमस्तक न्याहाळले व ते म्हणाले, 'तुझ्या घराजवळ एक झोपडे आहे. त्यात एक म्हातारी राहते. त्या म्हातारीला पुरेल एवढा शिधा फक्त तू नेऊन दे. तुझ्या संपत्तीत पाहिजे तेवढी वाढ होईल.' दुसर्‍या दिवशी सकाळी श्रीमंत माणूस त्या झोपडीत गेला व म्हातारीला म्हणाला, 'तुझ्यासाठी मी पीठ, साखर, डाळ, तूप अशा वस्तू आणल्या आहेत. त्यांचा स्वीकार व्हावा.' म्हातारीने नम्रतापूर्वक उत्तर दिले, 'आज खाण्यासाठी पुरेल एवढी सामग्री आमच्याकडे आहे. त्यामुळे तू देत असलेल्या खाद्य वस्तूंची आम्हाला गरज नाही.' मग आपण उद्यासाठी म्हणून त्याचा स्वीकार करावा.' श्रीमंत माणूस उद्गारला, 'अंगण साफ करणारी म्हातारीची सून उद्गारली, 'आम्ही कोणत्याही गोष्टीचा संग्रह करून ठेवत नाही. उद्याची आम्हाला काळजी नसते. आमचे रोजचे जेवण आम्हाला व्यवस्थित मिळत राहते.' ते ऐकून श्रीमंत माणूस चकित झाला. 'उद्याची काळजी न करणारे हे लोक कोठे आणि सात पिढय़ांची काळजी करणारा मी कोठे?' असा विचार त्याच्या मनात आला.* 

*🧠संतोष व समाधान हेच खरे धन, ही दृष्टी त्याला मिळाली.*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         *🌐 आजच्या बातम्या 🌐*

*📢राज्य वेतन सुधारणा समितीचा (बक्षी समिती) अहवाल खंड-2 स्वीकारण्याचा निर्णय, अनेक संवर्गाच्या वेतन त्रुटी दूर होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार*
*📢राज्य सरकार 75 हजार नोकरभरतीबाबत समिती स्थापन करणार; दोन दिवसांत मोठा निर्णय होणार*
*📢शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा? निवडणूक आयोगासमोर आज झाली सुनावणी, पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला*
*📢भारत श्रीलंका एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीचे शतक, टीम इंडियाचा दणदणीत विजय.*
*📢संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ अनाथांपर्यंत पोहोचणार, तर्पण फाऊंडेशनसमवेत त्रिपक्षीय करार करण्यास मान्यता*
*📢पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर, मेट्रो 2A आणि मेट्रो-7 चे लोकार्पण होणार*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
मिलिंद व्हि वानखेडे 
प्राचार्य 
प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन 
9860214288
-------@##-----@##-------@##--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा