12 जानेवारी दिनविशेष


*12 जानेवारी दिनविशेष 2023 !*
🛟 *गुरुवार* 🛟




💥 *राष्ट्रीय युवा दिन*
https://www.sutrasanchalan.com/2018/01/12.html?m=1
   🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *1997 - सामाजिक कार्यकर्ता गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्ञी शिक्षण तर्फे दिल्या जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान*
👉 *2005 - राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1598 - छञपती शिवाजी महाराज यांचा मातोश्री यांचा जन्म*
👉 *1863 - स्वामी विवेकानंद यांचा जन्म*
👉 *1918 -सी.रामचंद्र  - संगीतकार  यांचा जन्म*
👉 *1964 - जेफ बेझोस- एमॅझोन कंपनी चे संस्थापक  यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1992 - कुमार गंधर्व  - भारतीय शास्ञीय गायक, पद्मश्री, पद्मभूषण  यांचे  निधन*
👉 *2005 - अमरिश पुरी  - भारतीय जेष्ट अभिनेता  यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═➖➖➖➖═━┅

*👉बिग बी या नावाने ओळखले जाणारे सिने अभिनेता कोण आहेत?*
*🥇अमिताभ बच्चन*

*👉नाटकातल्या संभाषणाला काय म्हणतात?* 
*🥇संवाद*

*👉इंग्रज सरकारला शह देण्यासाठी त्यांच्या विरोधात निर्माण केलेलं सरकार कोणते?* 
*🥇 प्रतिसरकार*

*👉रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये कोणता खनिज पदार्थ असतो?* 
*🥇लोह*

*👉भारताचे सर्वोच्य न्यायालय कोठे आहे?* 
*🥇नवी दिल्ली*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
*🤡मूर्खाला उपदेश केला तर...*

 *एकदा हिमालयाच्या भागात एक वानर पावसात सचैल भिजल्याने थंडीने कुडकुडत एका झाडाखाली बसला होता. त्याच झाडावर एका घरट्यात एक पक्षी राहात होता. कुडकुडणार्‍या वानराला बघून त्याने म्हटले, 'अरे, आम्ही केवळ चोचीने घरटे बांधतो. तुला तर माणसासारखे हात-पाय आहेत. डोके आहे. असे असताना राहायला घरकुल का बांधत नाही तू? बांधले असतेस तर उघड्यावर अशी कुडकुडत बसण्याची पाळी आली नसती तुझ्यावर.' 'माणसासारखे हात-पाय आहेत मला, पण..' वानर कुरकुरला, पण माणसासारखी कामगिरी आम्हाला कुठली जमायला? आमचे डोके तेवढे नाही काम करत.'  'त्याचे काय आहे..' पक्षी बोलला, 'ज्याचे मन चंचल असते, जो दुसर्‍याच्या कुचेष्टा करण्यात वेळ दवडतो, त्याच्या हातून विधायक स्वरूपाचे काम होत नाही. यासाठीच दुसर्‍याला त्रास देण्याची प्रवृत्ती तू सोडून द्यायला हवीस. मग जिद्दीने, चिकाटीने स्वत:च्या निवार्‍यासाठी घरकुल बांधता येईल तुला.' उपदेश ऐकायची सवय नसलेल्या वानराला आला वैताग. तो चिडून, दात विचकत बोलला, 'घरट्यात बसून मारे उपदेश करायला काय जाते तुझे? तू समजतोस कोण स्वत:ला? थांब, माझा इंगाच दाखवतो तुला.'  आणि झरझर झाडावर चढून त्या वानराने पक्ष्याचे घरटेच विस्कटून टाकले. दुष्ट स्वभावाच्या मूर्खाला आपण उपदेश करीत बसलो, म्हणून हा प्रसंग आपल्यावर ओढवला. हे तो पक्षी जाणून चुकला आणि 'स्वत:चं घर करवत नाही अन् दुसर्‍याने बनवलेले बघवत नाही,' असे मनाशी म्हणत तो पक्षी दूर उडून गेला.*

*🧠तात्पर्य:- मुर्खांना उपदेश करण्यात आपला वेळ वाया घालवू नका.*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         *🌐 आजच्या बातम्या 🌐*

*📢देशातील सर्वात मोठा पहिला सागरी सेतूमार्ग तयार, मुंबईला रायगड जिल्ह्याशी जोडणारा 22 किलोमीटरचा सेतूमार्ग, दिवसाला किमान 1 लाख वाहनांची ये-जा होणार*
*📢अमेरिकेत ठप्प झालेली विमानसेवा हळूहळू सुरू, सुमारे 4 हजार फ्लाईट्स उशीरा, 450 रद्द; 2 दिवसात परिस्थिती सामान्य होणार*
*📢आयसीसी क्रमवारी: विराट कोहली आयसीसी क्रमवारीत 8व्या स्थानावरून 6व्या स्थानावर, रोहित शर्मा 9व्या स्थानावरून 8व्या स्थानी तर मोहम्मद सिराज 18 व्या स्थानावर*
*📢नाकाला जीभ लावून 13व्या वर्षी केला विश्वविक्रम, मुलुंड येथील देवश्री ठोकळेची गिनीज बुकमध्ये नोंद*
*📢रेझोनन्स कन्सल्टन्सीने केलेल्या जागतिक शहरांच्या सर्वेक्षणात पहिल्या 100 मध्ये मुंबई 73 व्या क्रमांकावर, लंडन बनले 2023 मध्ये जगातील पहिल्या क्रमांकाचे शहर*
*📢'RRR' चित्रपटाचा येणार दुसरा भाग, दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्याकडून घोषणा, नुकताच या चित्रपटाने पटकावला गोल्डन ग्लोब पुरस्कार*
 ➖➖➖➖➖➖➖➖
मिलिंद व्हि वानखेडे 
प्राचार्य 
प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज  कान्द्री-माईन 
9860214288
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा