16 जानेवारी दिनविशेष


*16 जानेवारी दिनविशेष 2023 !*
🛟 *सोमवार* 🛟


💥 *छञपती संभाजी राजे राज्यभिषेक दिन*
    
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *2008 - टाटा मोटार्स च्या नॅनो या एक लाख रुपये किमतीच्या पीपल्स कारंचे अनावरण*
👉 *1998 - ऊर्दू लेखन कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *2004 - रमिता- भारतीय रायफल नेमबाज सुवर्णपदक  यांचा जन्म*
👉 *1946 - कबीर बेदी  - चिञपट अभिनेते  यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *2012 - ग्लेन बेल- टाको बेलचे संस्थापक  यांचे  निधन*
👉 *2005 - श्रीकृष्ण हरी मेहंदळे - संगीतकार  यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿                                                   
🏇🤺🚩🚩🤴🏻🚩🚩🤺🏇
        *छत्रपती संभाजी महाराज*                                                            
            *राज्याभिषेक*
     👑 *१६ जानेवारी १६८१*🚩
    
छत्रपती शिवरायांच्या माध्यमातुन निर्माण झालेल्या छत्रपती पदाने खऱ्या अर्थाने इथल्या रयतेला स्थैर्य दिले. आपले राज्य, आपली व्यवस्था ज्यामध्ये एका अभिषिक्त राजाच्या छत्रछायेखाली आपल्याला सर्व प्रकारच्या न्याय, सुरक्षितता आणि कल्याणाची हमी मिळु शकेल हा विश्वास इथल्या रयतेच्या मनात छत्रपती पदामुळे निर्माण झाला.
            ते केवळ पद राहिले नाही, तर लोकांच्या जगण्याचा आधार बनले. जुलमी व्यवस्था संपुन लोककल्याणकारी व्यवस्था अंमलात आल्याचे ते प्रतीक होते.

👑 *छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्व*
थोरल्या महाराजांच्या अकाली जाण्याने लोकांचा आधार हरवला. परत एकदा जुलमी व्यवस्थेचे सावट येऊन आपण पारतंत्र्यात जातो की काय अशी भीती रयतेच्या मनात निर्माण झाली. मात्र शंभुराजांनी १६ जानेवारी १६८१ या दिवशी आपला राज्याभिषेक करुन घेतला. खचलेल्या रयतेला आधार दिला. थोरल्या महाराजांच्या काळातील व्यवस्था पुढेही कायम राहील याची हमी दिली.
             खऱ्या अर्थाने शंभुराजांनी लोकांना परत एकदा उभे केले. त्यांच्यात इतका स्वाभिमान भरला की शंभुराजांच्या जाण्यानंतरही इथली रयत त्या स्वाभिमानावर अविरत झुंजत राहिली. औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशहाला त्यांनी इथल्याच मातीत संपवले.

🔮 *श्रीशंभुराज्याभिषेक पार्श्वभुमी*
              राज्यकारभारात एखाद्या शासनकर्त्याचे निधन झाल्यास त्याची जागा कोण घेणार असा प्रश्न निर्माण होतो. छत्रपती शिवरायांच्या मृत्युनंतरही हा तशी काही परिस्थिती नव्हती. मात्र जाणीवपुर्वक वाद निर्माण केले जातात. वास्तविक शिवरायांच्या राज्याभिषेक समयी सोयराबाईंना पट्टराणी तर संभाजीराजेंना युवराज म्हणुन मान मिळाला. तिथेच स्वराज्याचे पुढचे छत्रपती संभाजीराजेच असतील यावर शिक्कामोर्तब झाले.

शंभुराजे लहानपणापासुनच जिजाऊ आणि शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेत होते. त्यात ते तरबेजही झाले. शिवरायांच्या सुचनेनुसार शंभुराजेंनी पन्हाळ्यावरुन राज्यकारभार सुरु केला.
 
दरम्यान ३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर छत्रपती शिवरायांचे आकस्मिक निधन झाले. शंभुराजांच्या गैरहजेरीत बाल राजारामांना गादीवर बसवुन काही स्वार्थी दरबारी मंत्र्यांनी आपल्या हातात राज्यकारभार घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना त्यात अपयश आले. शंभुराजांनी पन्हाळगडावरुनच ही कठीण परिस्थिती हाताळुन राज्यकारभाराची घडी नीट बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु स्वराज्याला दुसऱ्या छत्रपतींची आवश्यकता निर्माण झाली होती.

🏮 *श्रीशंभुराज्याभिषेक घडामोडी*
शके १६०२ रौद्र संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी (नागपंचमी) म्हणजेच २० जुलै १६८० रोजी संभाजी महाराजांचे मंचकारोहण झाले आणि त्यांनी स्वतःला “राजा” झाल्याचे घोषित केले. यासंदर्भात डाग रजिस्टर मध्ये २४ ऑगस्ट १६८० ची नोंद आहे –

“जुन-जुलै शिवाजीराजा मरून संभाजीला त्याचे सिंहासन मिळाले असावे असे सर्वत्र बोलले जाते. आपल्या बापाच्या तत्त्वांप्रमाणे संभाजी वागणारा आहे असे लोक म्हणतात.”

संभाजी महाराजांचा कारभार रायगडावरुन सुरळीत सुरु झाला. त्यांनी आगळीक करणाऱ्या सर्व मंत्र्यांना माफ करुन पुन्हा त्यांच्या पदावर पुन्हा नियुक्त केले. मोरोपंत पिंगळेंच्या निधनानंतर त्यांच्या पुत्राला पेशवाई दिली गेली.

🪙 *शंभुराजांची राजमुद्रा*
             ७ मे १६८० रोजी रुद्राप्पा देसाई याला लिहिलेल्या पत्रात महाराजांची राजमुद्रा दिसुन येते. शंभुराजांची राजमुद्रा शिवरायांपेक्षा वेगळी असुन तिचा आकार पिंपळाच्या पानासारखा आहे.

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते |
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि ||

अर्थ- शिवपुत्र श्री शंभो यांची राजमुद्रा आकाशाप्रमाणे अमर्याद आहे व ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त अशी मुद्रा कोणाच्यावर छत्र म्हणुन असणार नाही ? (सर्वांवर छत्र म्हणुन राहील.)

👑 *श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा*
                   थोरल्या महाराजांच्या मृत्युनंतरच्या अस्थिर वातावरणात झालेल्या मंचकरोहणात शंभुराजे व त्यांच्या सहकारी मंत्र्याधिकाऱ्यांना त्यातुन तितके समाधान व शास्त्रार्थाच्या दृष्टीने निर्दोषत्व वाटले नाही. त्यामुळे शंभुराजांवर विधियुक्त राज्याभिषेक करवुन राजसिंहासानाची प्रतिष्ठा राखावी असा विचार झाला. त्यानुसार शंभुराजांनी आपला राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला.

१४, १५ व १६ जानेवारी १६८१ (रौद्रनाम संवत्सरातील माघ शुद्ध ७, शके १६०२) यादिवशी शंभुराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.

राज्याभिषेक प्रसंगी पुर्वीच्या कैद्यांना मुक्त करण्याचा रिवाज असल्याने शंभुराजांनी कैद्यांना मुक्त केले. प्रधान मंडळातील अण्णाजी दत्तो, निळोपंत, बाळाजी आवजी, जनार्धनपंत आदींच्या समावेशाने प्रधान मंडळ नेमुन त्यांना कारभार सांगितला गेला.

संभाजी राजांच्या प्रधान मंडळाची रचना –
सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती – संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (सेनाधीशांचे सेनाधीश – सर्वोच्च अधिकार असलेले )
श्री सखी राज्ञी जयति – छत्रपती येसुबाई संभाजीराजे भोसले (संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)
सरसेनापती – हंबीरराव मोहिते
कुलएख्तीयार (सर्वोच्च प्रधान) – कवी कलश
पेशवे – निळो मोरेश्वर पिंगळे
मुख्य न्यायाधीश – प्रल्हाद निराजी
दानाध्यक्ष – मोरेश्वर पंडितराव
चिटणीस – बाळाजी आवजी
सुरनीस – आबाजी सोनदेव
डबीर – जनार्दनपंत
मुजुमदार – अण्णाजी दत्तो
वाकेनवीस – दत्ताजीपंत

🪙 *छत्रपती संभाजी महाराजांची नाणी*
    शिवरायांप्रमाणेच शंभुराजांनीही आपल्या राज्याभिषेक प्रसंगी स्वतःच्या नावे नाणी पाडली. सदर नाण्याच्या पुढच्या बाजुवर “श्री राजा शंभूछत्रपती” ही अक्षरे कोरलेली असुन मागच्या बाजुवर “छत्रपती” हे अक्षर कोरलेले आहे.

🏇 *राज्याभिषेकानंतर शंभुराजांची कर्तबगारी*
                   आपला राज्याभिषेक झाल्यानंतर शंभुराजांनी लगेच १५ व्या दिवशी बुऱ्हाणपुरवर छापा टाकला आणि १ करोड होनांची दौलत स्वराज्यात आणली. त्यानंतर त्यांनी मोगल, इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्दी या शत्रुंना नामोहरम करीत पुढील केवळ आठच वर्षात शिवरायांनी उभारलेले स्वराज्य दुप्पट केले. सैन्यही दुपटीपेक्षा अधिक वाढविले. स्वराज्याच्या खजिन्यात तिपटीपेक्षा अधिक वाढ केली.

संकलन – शिवपुत्र शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्ट, पुणे.

🚩🚩 *हर हर महादेव...*🚩🚩

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏
                                                                                                                                                                                                ➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा