17 जानेवारी दिनविशेष


*17 जानेवारी दिनविशेष 2023 !*

🛟 *मंगळवार*🛟


 🌍 *घडामोडी*🌍

*👉१९९९: नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.*
*👉२००५: एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.*

       🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
*(प्राथमिक,माध्यमिक श उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)*
*9860214288,9423640394*
     🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

           🌍 *जन्म*🌍

*👉१९१८: चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’माल अमरोही यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९९३)*
*👉१९३२: साहित्यिक मधुकर केचे यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९९३)*

            🌍 *मृत्यू*🌍

*👉२०१३: मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या ज्योत्स्‍ना देवधर यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी १९२६)*
*👉२०१४: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९३१ – पाबना, पाबना, बांगला देश)*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
मिलिंद व्हि वानखेडे 
########################
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═➖➖➖➖═━┅

*👉ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण?*
 *🥇 वि.स. खांडेकर*

*👉मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते?* 
*🥇दर्पण*

*👉शिर्डी हे धार्मिक स्थळ कोणत्या तालुक्यात आहे?*
 *🥇राहता*

*👉महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण ?* 
*🥇 यशवंतराव चव्हाण*

*👉महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते?* 
*🥇गंगापूर*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
*◼️कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको◼️*  

*एकदा एक राजहंस एका बगळय़ाला म्हणाला, 'काय रे, तू आधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागे-पुढे पाहात नाहीस. बरे-वाईट, नासके-चांगले हा फरकसुद्धा तुझ्या खादाड जिभेला समजत नाही. माझे पाहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा असणे बरे नव्हे. ज्यावेळी जे मिळेल ते खावे अन् सुखी राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला की, तो खावा हेच शहाणपणाचे.' असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला एक मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसर्‍या कमळे असलेल्या तळय़ात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे लावले होते. त्यात तो सापडला.* 

*🧠तात्पर्य : - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         *🌐 आजच्या बातम्या 🌐*

*📢पैलवान सिकंदर शेखवर अन्याय? सोशल मीडियावर समर्थक-विरोधक आक्रमक* 
*📢मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची ईडीची चौकशी संपली, कोविड घोटाळ्याप्रकरणी झाली चौकशी* 
*📢नाशिक पदवीधरमध्ये 16, नागपूर शिक्षक मतदारसंघात 22 उमेदवार रिंगणात, मराठवाड्यात बंडखोरी; पाचही मतदार संघाच्या लढती ठरल्या* 
*📢जूननंतर भारतात आर्थिक मंदीची शक्यता, केंद्र सरकार दुष्परिणाम रोखण्यासाठी प्रयत्नशील : नारायण राणे.* 
*📢नेपाळ दुर्घटनेतील 68 मृतदेह हाती, चार जणांचा शोध सुरु; ब्लॅक बॉक्समधून समोर येणार अपघाताचं कारण.* 
*📢हुडहुडी वाढली! राज्यात पुढील तीन दिवस थंडीचा कडाका कायम, नागरिकांना शेकोट्यांचा आधार, मुंबईत पारा घसरला; मोसमातील सर्वात कमी तापमान, पारा 13.8 अंशावर*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा