18 जानेवारी दिनविशेष


*18 जानेवारी दिनविशेष 2023 !*
🛟 *बुधवार* 🛟
 
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *2005 - एअरबस ए 380 या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमानाचे अनावरण करण्यात आले*
👉 *1997 नार्वेच्या बोर्ग औसलॅडने एकट्याने अटलांटीक महासागर पार केला*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1995 - वि.द.घाटे- साहित्यीक, कवी आणि शिक्षणतज्ञ  यांचा जन्म*
👉 *1954 - जगदीश माळी  - भारतीय छायाचित्रकार यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *2003 - हरिवंशराय बच्चन- भारतीय हिन्दी साहित्यीक आणि कवी पद्मभूषण साहित्य अकादमी पुरस्कार  यांचे  निधन*
👉 *2015 - बेबी शंकूतला - अभिनेञी यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═➖➖➖➖═━┅

*👉सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता?*
*🥇 बुध*

*👉WHO ची स्थापना कोण्या वर्षी करण्यात आली?*
*🥇१९९५*    
      
*👉देशाचे राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखले जाते?* 
*🥇महात्मा गांधी*

*👉पृथ्वीच्या मध्यातून जाणा-या काल्पनिक रेषेस काय म्हणतात?*
*🥇विषवृत्त*     

*👉विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते?*
*🥇चिखलदरा*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
*🔸सवयी सुटू शकत नाही!🔸* 

 *कृष्णेला पूर आला होता. यंदाच्या पावसाळतील हा पहिलाच पूर. पुराचे पाणी पाहण्यासाठी दोन्ही काठांवर गर्दी ओसंडून वाहत होती. त्या गर्दीत पांडुरंगही होता. इतक्यात तेथे असलेला सहदेव ओरडला, ‘अरे पांडुरंग, घोंगडं वाहत चाललं आहे. पाहिलसं का?’ लोभी वृत्तीच पांडुरंगची लालसा चाळवली गेली. त्याने मागचा पुढचा विचार न करता नदीत उडी घेतली. घोंगडेही खूप लांब नव्हते. सात-आठ हात मारून पांडुरंग घोंगडय़ाजवळ गेला. त्याने घोंगडे पकडले. मग मात्र तोच ओरडू लागला, ‘वाचवा! वाचवा!’ तेव्हा काठावर असणारे, त्याला व त्याच्या लोभी वृत्तीला ओळखणारे लोक म्हणाले, ‘अरे, यात ओरडण्यासारखं काय आहे? जर तू ते घोंगडं बाहेर आणू शकत नसशील तर सोडून दे!’ तेव्हा पांडुरंग म्हणाला, ‘अहो, हे घोंगडं नाही, अस्वल आहे. आणि त्यानेच मला पकडलं आहे. कसं सोडू?’*   

*🧠तात्पर्य - आपण सवयींना असेच अगोदर पकडतो, आणि मग सवयी आपणाला पकडतात. मग सुटू शकत नाही.*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         *🌐 आजच्या बातम्या 🌐*

*📢जालना जिल्ह्यात 2022 या वर्षी 56 बालविवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागाला आले यश, कोरोना काळात राज्यात मोठ्या प्रमाणात बाल विवाह*
*📢सुपा इंडस्ट्रियल पार्कसंदर्भात चर्चा! जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी महाराष्ट्र दालनात बैठक*
*📢जेपी नड्डा आणखी वर्षभर भाजप अध्यक्ष: लोकसभा निवडणुकीपर्यंत पदावर राहणार, अडवाणी-शहांनंतर सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे तिसरे नेते*
*📢सत्यजित तांबेंचे काँग्रेस सोडण्याचे संकेत: ट्विटर, फेसबूकच्या बायोतून पक्षाचे नाव हटवले; म्हणाले - कर्तृत्व सिद्ध करावे लागते*
*📢लातूरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, अपघातात 42 प्रवासी जखमी, 14 जण गंभीर ; स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले*
*📢कॅनरा बँकेने सर्व प्रकारच्या डेबिट कार्डवरील सेवा शुल्कात केली वाढ, नवीन सेवा शुल्क 13 फेब्रुवारी 2023 पासून लागू होणार*
*📢जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि जवानांत चकमक, चकमकीत एक दहशतवादी ठार; लष्करी अधिकाऱ्याची माहीती*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
मिलिंद व्हि वानखेडे 
मुख्याध्यापक 
प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज  कान्द्री-माईन 
9860214288
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿                                                            
🚩🤺🏇🚩🤴🚩🏇🤺🚩

   *छत्रपती प्रतापसिंह भोसले*

मराठा साम्राज्य - सातारा संस्थान
अधिकारकाळ : १८०८ - 
                   ४ सप्टेंबर १८३९
राज्याभिषेक : ३ मे १८०८
राज्यव्याप्ती : सातारा
राजधानी : सातारा
पूर्ण नाव : छत्रपती प्रतापसिंहराजे 
               भोसले

    *जन्म : १८ जानेवारी १७९३*
                (अजिंक्यतारा)
    *मृत्यू : ४ ऑक्टोबर १८४७*
                 (वाराणसी)
पूर्वाधिकारी : छत्रपती शाहूराजे    
                  भोसले (दुसरे शाहू)

वडील : छत्रपती शाहूराजे भोसले
राजघराणे : भोसले

हा लेख साताऱ्याचे राजे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्याबद्दल आहे. हे शाहू राजांचे ज्येष्ठ पुत्र होते.

सातार्‍याचे छत्रपती हे मराठय़ांच्या साम्राज्याचे खरे धनी. युगपुरुष शिवाजी महाराजांचे वंशज वंशपरंपरेने सातार्‍याच्या गादीवर होते. तथापि, पेशवाईचे महत्त्व वाढल्याने सातार्‍याचे छत्रपती केवळ नामधारी राहिले. सन १७९३ च्या सुमारास छत्रपती प्रतापसिंहांचा जन्म झाला. सातार्‍याचे छत्रपती दुसरे शाहू सन १८०८ च्या सुमारास मृत्यू पावल्यावर प्रतापसिंह छत्रपती झाले.

महाराष्ट्रातील एक सद्‌गुणी, प्रतापसिंह भोसलेप्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजा. हा छत्रपती दुसरा शाहू (कार. १७७७-९८) व आनंदीबाई यांचा थोरला मुलगा. छत्रपती शाहूनंतर साताऱ्याच्या गादीवर आला. सवाई माधवराव (कार. १७७४-९५) पेशवेपदावर असताना नाना फडणीस मुख्य कारभारी होता आणि छत्रपती पहिला शाहू यांनी स्वहस्ते लिहून दिलेल्या दोन याद्यांप्रमाणे मराठी राज्याचे पुढारीपण पेशव्यांकडे आले होते, तरी सवाई माधवरावाने छत्रपतिपदाची प्रतिष्ठा सामान्यतः राखली; परंतु दुसरा बाजीराव (कार १७९५-१८१८) पेशवेपदी आल्यावर त्याने हळूहळू छत्रपतिपदाचा अवमान करण्यास प्रारंभ केला व अखेरीस छत्रपती प्रतापसिंहांना त्याने प्रायः सातारच्या किल्ल्यात नजरकैदेत टाकले. हे सहन न होऊन छत्रपतींचा सेनापती चतुरसिंग भोसले याने पेशव्यांविरुद्ध बंड केले (१८०९).

ते बंड पेशव्यांतर्फे सेनापती बापू गोखले याने मोडले पण त्यामुळे दुसऱ्या बाजीरावाने प्रतापसिंहाची नजरकैद अधिकच कडक केली. त्या वेळचा इंग्लिश रेसिडेंट मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन याने या परिस्थितीचा फायदा घेऊन दुसऱ्या बाजीरावाशी युद्ध सुरू केले. हे करताना त्याने प्रकट केले, की ‘मी छत्रपतींना पेशव्यांच्या जाचातून सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. मला पेशव्यांचे राज्य बुडवावयाचे असून छत्रपतींची सत्ता राखावयाची आहे.’ परिणामतः अष्टी (सोलापूर जिल्हा) येथे झालेल्या शेवटच्या इंग्रज-मराठे लढाईत (१८१८) प्रतापसिंह इंग्रजांच्या सैन्याबरोबर होते. पेशवाईच्या अस्तानंतर एल्फिन्स्टनने प्रतापसिंह यांना छत्रपतींच्या गादीवर पुन्हा नेऊन बसविले.

एल्फिन्स्टनने प्रतापसिंहांशी तह करून त्यांच्या अनेक वाजवी हक्कांत काटछाट केली; तरी साताऱ्यात नेमलेल्या ग्रँट डफसारख्या रेसिडेंटने साताऱ्याची राजकीय व्यवस्था लावून प्रतापसिंहास सुशिक्षित आणि सुसंस्कृत केले, राज्यकारभारात उत्तजेन दिले व राज्यात शिस्त आणली. प्रतापसिंहांनी सातारा शहरात अनेक सुधारणा केल्या : शहरात नवा राजवाडा, जलमंदिर यांसारख्या काही वास्तू बांधल्या; शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून यवतेश्वर डोंगरावर तलाव खोदून खापरी नळाने गावात पाणी आणले तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा काढली आणि तीमधून संस्कृत-मराठी बरोबर इंग्रजी भाषेच्याही अध्ययनाला उत्तेजन दिले; छापखाना काढून अनेक उपयुक्त ग्रंथ छापविले. याशिवाय मराठा तरुण-तरुणींना लष्करी शिक्षण देण्यास प्रारंभ केला. त्यांत महाराजांची कन्या गोजराबाईही होती.

या लोकहितवादी राजाच्या कार्यक्षम प्रशासनाविषयी ग्रँट डफने गव्हर्नरकडे शिफारस केली. तेव्हा त्यांच्या काही अधिकारांत ईस्ट इंडिया कंपनीने ५ एप्रिल १८२२ च्या जाहीरनाम्याने वाढ केली. ग्रँट डफ हा रेसिडेंट म्हणून प्रतापसिंहाच्या दरबारी १८१८-२२ दरम्यान होता; त्याने या काळात मराठ्यांच्या इतिहासाची साधनसामग्री जमा करून पुढे हिस्टरी ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला (१८२६). एल्फिन्स्टनची कारकीर्द संपल्यावर इंग्रजांचे प्रतापसिंहाविषयीचे एकूण धोरण बदलले. मुंबईचा गव्हर्नर रॉबर्ट ग्रँट (कार. १८३५-३८) याने कर्नल ओव्हान्स या रेसिडेंटच्या सांगण्यावरून प्रतापसिंहांचे राज्य बुडविण्यासाठी हीन वृत्तिनिदर्शक अनेक कटकारस्थाने रचली.

शेवटी इंग्रजांविरुद्ध कट केल्याचा खोटा आरोप लादून ४ सप्टेंबर १८३९ रोजी त्यांना पदच्युत करून त्यांचा धाकटा भाऊ आप्पासाहेब (शहाजी) यास नामधारी छत्रपती म्हणून सातारच्या गादीवर बसविले व काशीला (बनारस) प्रतापसिंहांना स्थानबद्धतेत राजकुटुंबासह ठेवण्यात आले. प्रतापसिंहानी ईस्ट इंडिया कंपनीचे डायरेक्टर व ब्रिटिश पार्लमेंट यांपुढे रंगो बापूजी गुप्ते यांस इंग्लंडमध्ये पाठवून व इंग्लंडमधील काही प्रतिष्ठित इंग्रजांमार्फत आपली सत्य बाजू मांडण्याचा खूप प्रयत्न केला; पण यश आले नाही. अखेर रंगों बापूजी परत येण्यापूर्वीच काशी येथे प्रतापसिंह स्थानबद्धतेत मरण पावले.

आप्पासाहेबाच्या मृत्यूनंतर सातारा संस्थान दत्तक वारस नामंजूर करून खालसा करण्यात आले (१८४८).
   
    🚩 🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🚩

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा