*2 जानेवारी दिनविशेष 2023 !*
🛟 *सोमवार* 🛟
💥 *योगानंद परमहंस जयंती*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1985 - पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाचा शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन*
👉 *1998 - डाॅ सरोजिनी बाबर यांच्या पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्मानिय डी लिट पदवी प्रदान केली*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1957 - अमाची वेक्कन सुब्रह्मण्यम- भारतीय पञकार आणि अभिनेते यांचा जन्म*
👉 *1932 - जाॅनी बक्षी- भारतीय चिञपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2015 - वसंत गोवारीकर- भारतीय हवामान शास्ञज्ञ, पद्मभूषण, पद्मश्री यांचे निधन*
👉 *2016 - अर्धेन्दू भूषण बर्धन - भारतीय कम्युनिस्ट नेते,स्वातंत्र्यसेनानी यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═➖➖➖➖═━┅
*👉 इंद्र धनुष्यात किती रंग असतात?*
*🥇सात रंग*
*👉अमिताभ बच्चन यांच्या वडिलांचे नाव काय होते?*
*🥇हरिवंशराय बच्चन*
*👉जानेवारी हा महिना किती दिवसांचा असतो?*
*🥇३१ दिवस*
*👉आकाशात फेकलेली वस्तू जमिनीवर पडणे हे कोणत्या शक्तीचे उदाहरण आहे?*
*🥇 गुरुत्वाकर्षण शक्ती*
*👉सोन्याची लंका नगरी असलेला दैत्य कोणता?*
*🥇महादेव भक्त रावण*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
_*🐧मूर्ख डोमकावळा,*_
*एका गरूडाने कुरणात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्या कोकराला पळवून नेले. त्याचे हे धाडस आणि सामर्थ्य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्या गरूडाकडे भीतीयुक्त आदराने पाहू लागले.*
*'गरूडाने पळवले त्यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्मान वाढेल, त्याच्याइतकीच प्रतिष्ठा आपल्याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले.*
*त्यासाठी त्याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्या पाठीवर बसून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण ते कोकरू उचलले जाण्याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्या पाठीवरील लोकरीमध्ये अडकले व तिथून सुटण्यासाठी त्याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्या कानी गेली.*
*तो तिथे आला व त्याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्याला स्वत:च्या मुलांच्या स्वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,''बाबा या पक्ष्याचे नाव काय हो'' यावर तो मेंढपाळ हसून म्हणाला,'' या मूर्ख पक्ष्याला जर तुम्ही याचे नाव विचारले तर हा स्वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्ठ असा पक्षी म्हणून स्वत:ची ओळख करून देईल पण प्रत्यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.''*
*🧠तात्पर्य: काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्याची प्रचंड सवय असते. यामध्ये त्यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्यांची पात्रता जाणून असतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌐 आजच्या बातम्या 🌐*
*👉नव्या उत्साहात, नव्या जोमात... नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत, रोषणाई अन् आतिषबाजीनं उजळला देश*
*👉नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अग्नितांडवाचा थरार! इगतपुरीतल्या जिंदाल कंपनीत बॉयलरच्या स्फोटामुळे भीषण आग, दोन महिलांचा मृत्यू तर, 17 जखमी, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा*
*👉नव्या वर्षात मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात पारा घसरला, हुडहुडी वाढली; उत्तर भारतात देखील थंडी वाढणार,*
*👉लाखो विद्यार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता, राज्यातील 25 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं आधार कार्ड अपडेट नसल्याची माहिती*
*👉परदेशातून आलेले 53 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, नव्या वर्षात कोरोनाचा धोका कायम*
*👉वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडिया उतरणार मैदानात, श्रीलंकेविरुद्ध टी20 सह वन-डेचा थरार,*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा