30 जानेवारी दिनविशेष


*30 जानेवारी दिनविशेष 2023 !*
🛟 *सोमवार* 🛟


💥 *शहिद दिन*
💥 *कुष्टरोग निवारण दिन*
    
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *1999 - पं.रविशंकर यांना भारतरत्न जाहीर*
👉 *1997 - महात्मा गांधी चा अस्थीचे त्यांचे पणतु तुषार गांधी यांनी अलाहाबाद येथे विसर्जन केले 47 वर्ष येथे अस्थी कटक मधील स्टेट बँक ऑफ इंडिया चा लाॅकर मध्ये होत्या*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1930 - समीर बॅनर्जी  - भारतीय ऑलिम्पिक फुटबॉलपटू यांचा जन्म*
👉 *1949 - डाॅ सतिश आळेकर- नाटककार, दिग्दर्शक व निर्माते साहित्य अकादमी पुरस्कार  यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *2000 - आचार्य जनार्दन हरि  चिचाळकर- मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते   यांचे  निधन*
👉 *2004 - रमेश अणावकर- गीतकार  यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═➖➖➖➖═━┅

*👉भारत देशातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण?*
*🥇इंदिरा गांधी*

*👉जगातील सर्वात मोठी गर्ता कोणती आहे?*
*🥇मरियाना (पॅसिफिक)*

*👉धार्मिक क्षेत्र ज्योतिबा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?*
*🥇कोल्हापुर*

*👉दोन विषम संख्याच्या बेरजेला काय म्हणतात?*
*🥇सम संख्या*

*👉आपल्या भारत देशातील सर्वोच्य शौर्य पुरस्कार कोणता?*
*🥇परमवीर चक्र*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
   
*🤦‍♂लोभाची शिक्षा*
       
*एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्‍काळ पडला. त्‍यामुळे ब्राह्मणाला रोजच्‍या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्‍करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्‍ले तर तर त्‍याची भूक भागेल व माझीही मृत्‍यूची इच्‍छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्‍यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्‍याला सांगितली. तेव्‍हा वाघाला त्‍याची दया आली. तो प्रत्‍यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्‍याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्‍य दिले व भविष्‍यात कधीही आत्‍महत्‍येचा विचार करू नकोस असे बजावून त्‍याला परत पाठविले. ब्राह्मण अत्‍यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्‍यासाठी गेला तेव्‍हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्‍या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्‍यानेही तसेच वागण्‍याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्‍याने जंगलात जाऊन त्‍याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्‍याच्‍यासमोर प्रगटला. त्‍याला व्‍यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्‍काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्‍याने त्‍याच्‍यावर हल्‍ला चढवला आणि जखमी व्‍यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्‍यायोगे तू असे धाडस पुन्‍हा करणार नाहीस.*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         *🌐 आजच्या बातम्या 🌐*

*📢राज्यात शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीची रणधुमाळी, आज मतदान, 5 मतदारसंघात चुरस, तयारी पूर्ण.*
*📢70 टक्के मागण्या पूर्ण झाल्यानं लिंगायत समाजाचा आझाद मैदानातला मोर्चा स्थगित,मात्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी लढा सुरुच राहणार असल्याचं जाहीर*  
*📢महावितरण ग्राहकांना देणार दरवाढीचा शॉक! MERC कडे 37 टक्के दरवाढीचा प्रस्ताव*  
*📢ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता! बदलत्या हवामानाचा पिकांवर परिणाम; गहू, हरभरा, मोहरी, कांदा पिकाला धोका* 
*📢सोयाबीनच्या दरात मोठी घसरण, उत्पादन खर्चही निघणं कठीण; शेतकरी संकटात*  
*📢ज्वारी आणि बाजरी आरोग्यासाठी उत्तम, 'मन की बात'मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं तृणधान्याचं* 
*📢ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा दास यांच्यावर पोलिस अधिकाऱ्याचा गोळीबार, प्रकृती गंभीर; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश*
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा