4 जानेवारी दिनविशेष


*4 जानेवारी दिनविशेष 2023 !*
  🛟 *बुधवार* 🛟


💥 *आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन*    
    
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *2010 - बुज्र खलिफा- या जगातील सर्वात उंच इमारती चे उध्दाटन झाले*
👉 *2004 - नासाची मानवरहित स्पिरीट ही गाडी मंडळग्रहावर उतरली*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1925 - प्रदीप कुमार हिन्दी व बंगाली अभिनेते यांचा जन्म*
👉 *1940 - श्रीकांत सिनकर मराठी कांदबरीकार  यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *2022 - सिधुंताई सपकाळ मतीमंद मुलाच्या कामायनी संस्थेच्या संस्थापिका पद्मश्री  यांचे  निधन*
👉 *2016 - एस.एच.कपाडिया भारताचे 38 वे सरन्यायाधीश  यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━➖➖➖➖═━┅

*👉कर्नाटक या राज्याची राज्यभाषा कोणती आहे?* 
*🥇कन्नड*

*👉 अन्न चावताना त्यात कोणता पाचक रस मिसळतो?* 
*🥇 लाळ*

*👉शांती निकेतन ही निसर्गाच्या सान्निध्यात रमणारी शैक्षणिक संस्था कोणी स्थापन केली?* 
*🥇रविंद्रनाथ टागोर*

*👉पदावर असताना निधन पावलेले भारताचे पाहिले राष्ट्रपती कोण आहेत?* 
*🥇डॉ.झाकीर हुसेन*

*👉लोणार सरोवर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे?* 
*🥇महाराष्ट्र*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
*👎अपमान आणि उपकार🙏*

    _एकदा *दोन मित्र* वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो,_

    _"आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले". ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेहीजण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो,_
   _"आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले". हे पण  थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि,_

    _"पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?" लिहिणारा मित्र म्हणाला, "जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला,मनाला,भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होवून जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत._

*🧠तात्पर्य :-* 
     *"माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे".*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         *🌐 आजच्या बातम्या 🌐*

*📢महावितरण कर्मचारी मध्यरात्रीपासून तीन दिवस संपावर, खासगीकरणाविरोधात आक्रमक पवित्रा* 
*📢समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या तीनशे मजुरांचं आंदोलन, पाच महिन्यांपासून वेतन न दिल्याने मजूर आक्रमक* 
*📢महिला सक्षमीकरणसाठी विज्ञान नाही, तर महिलांच्या योगदानामुळे विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य* 
*📢पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन; कर्करोगाशी झुंज अखेर अपयशी* 
*📢म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणं आणखी सोपं; एकदाच नोंदणी करुन अर्ज करता येणार, 5 जानेवारीपासून नोंदणी सुरू* 
*📢भारत राष्ट्र समिती पक्ष महाराष्ट्रात चार सभा घेणार, तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या BRS पक्षाची पहिली जाहीर सभा नांदेडमध्ये* 
*📢महाराष्ट्र गारठला; उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात घसरले तापमान, उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा कहर*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा