*7 जानेवारी दिनविशेष 2023 !*
🛟 *शनिवार*🛟
🌍 *घडामोडी*🌍
*👉१९२२: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.*
*👉२०१४ ला आजच्या दिवशी शेख हसीना ने बांगलादेश च्या निवडणुक जिंकली.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
*(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)*
*9860214288,9405980847*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
*👉१९६७ ला जगप्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचा जन्म.*
*👉१९७९ ला भारतीय अभिनेत्री बिपाशा बसू चा जन्म.*
🌍 *मृत्यू*🌍
*👉१९४३ ला वाय फाय चा शोध लावणारे संशशोधक निकोला टेसला यांचे निधन.*
*👉२०१६ ला जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे निधन.*
*👉२००० : डॉ. अच्युतराव आपटे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची व त्याद्वारे सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आयुष्य वेचलेले विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═➖➖➖➖═━┅
*👉पृथ्वीवर कोण कोणती आवरणे आहेत?*
*🥇 शिलावरण, जलावरण, वातावरण*
*👉भारताच्या शेजारील देश एकूण किती आहेत?*
*🥇सात (७) पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका ई.*
*👉अष्टविनायकातील सिद्धिविनायक हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यातील आहे?*
*🥇अहमदनगर*
*👉जानेवारी महिन्यात येणारा सर्वात मोठा राष्ट्रीय सन कोणता आहे?*
*🥇26 जानेवारी प्रजासत्ताक दिन*
*👉सर्वात जास्त तापमान असलेला जिल्हा कोणता आहे?*
*🥇चंद्रपूर*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*🤴लोभी राजा,🤲*
*फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. इंद्रप्रस्थ एका आटपाट नगराचा राजा होता. त्याच्या राज्यात सर्व काही छान चालले होते. पण तरीही राजा अस्वस्थ होता. कारण त्याच्याकडे भरपूर धन होते. तरीही त्याला अजून धन मिळावे असे वाटे.*
*एके दिवशी त्याच्या दरबारात एक थोर तपस्वी येतो. राजा दोन दिवस त्यांची मनोभावे सेवा करतो. ते पाहून तो तपस्वी खूश होतो व त्याला म्हणतो, 'राजा, तू माझी जी सेवा केली त्याने मी प्रसन्न झालो आहे. तू पाहिजे तो वर माग'. तो लोभी राजा म्हणातो, 'मला असा वर द्या की मी ज्या वस्तूला हात लावेन ती सोन्याची होईल.' तपस्वी म्हणतो, 'नीट विचार कर. नंतर पश्चाताप करशील.'*
*राजा आपल्या मागणीवर ठाम असतो. तपस्वी तथास्तू म्हणतो. राजा लगेच शेजारच्या सिंहासनाला हात लावतो. ते सोन्याचे होते. तो खूष होतो. मग तो पुढे ज्या वस्तूंना हात लावतो, त्या सोन्याच्या व्हायला लागतात. थोड्यावेळाने त्याला भूक लागते. म्हणन तो फलाहार करायला जातो, पण ती फळेही सोन्याची होतात.*
*त्याला काहीच खाता, पिता येत नाही. कारण ज्याला तो हात लावी ते सोन्याचे होई. निराश झालेला राजा आपल्या सिंहासनावर बसलेला असताना त्याची मुलगी बागेतून खेळून त्याच्याकडे येते. तो आनंदातने तिला घेण्यासाठी हात करतो, तर ती ती सोन्याची होऊन जाते. राजा अतिशय दु:खी होतो.*
*त्याला एकदम रडू कोसळते. त्याची लाडकी मुलगी त्याला मिळालेल्या वरामुळे सोन्याची मूर्ती होऊन बसली होती. त्याला आपली चुक कळते, पण आता फार उशीर झालेला असतो.*
*🧠तात्पर्य:- कोणत्याही गोष्टीचा अति लोभ वाईटच.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌐 आजच्या बातम्या 🌐*
*📢आता शाळेतही चिकन? पश्चिम बंगालच्या मुलांना शाळेत मिड-डे मीलमध्ये आठवड्याला मिळणार चिकन व हंगामी फळे, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घोषणा; 371 कोटी रुपये मंजूर*
*📢17 नेते काँग्रेसमध्ये परतले! काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या गुलाम नबी आझाद यांना मोठा धक्का, जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांच्यासह 17 माजी काँग्रेस नेत्यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश.*
*📢देशात गेल्या 24 तासांत 228 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 2,503 पर्यंत; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहीती*
*📢'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो ची टीम आता दुबईला जाणार, येत्या 15 जानेवारीला शेख रशीद ऑडिटोरिअममध्ये हा कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजता पार पडणार.*
*📢आज आळंदीमध्ये खोटे बोलून धर्मांतर करण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल; 3 जणांविरोधात गुन्हा दाखल; राज्यामध्ये धर्मांतरविरोधी कायद्यासाठी जोरदार मागणी.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा