*#क्रिडा_महोत्सवातून_चांगले_खेळाडू_घडतील*
👉 *विस्तार अधिकारी श्रीमती शालिनी रामटेके यांचे प्रतिपादन*
👉 *प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन येथे तिन दिवसीय क्रिडा महोत्सवाचे आयोजन*
रामटेक - शालेय जिवनात क्रिडा खेळाचे महत्त्व असून यातूनच चांगले खेळाडू निर्माण होतात. प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन येथे क्रिडा महोत्सवाचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला असल्याचे, प्रतिपादन उद्घाटक विस्तार अधिकारी श्रीमती शालिनी रामटेके यांनी केले.
प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन येथे आजपासून (ता 3) तिन दिवसीय क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी सौ.शालिनी रामटेके यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री मिलिंद व्हि वानखेडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माया मरस्कोल्हे, सौ.आशा रौतेल उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन मुलींना शिक्षणात पुढे आणण्याचे आवाहन करुन क्रांतीज्योत पेटविली.
या तिन दिवसीय क्रिडा महोत्सवात फुटबॉल, कबड्डी, लंगडी, रनिंग, चमचा गोटी, या सारखे विविध खेळ होणार आहे. या महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळेल, असा आशावाद मुख्याध्यापक श्री मिलिंद व्हि वानखेडे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन सौ.कामिनी पाटील व आभार प्रदर्शन श्री अशोक नाटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री श्याम गासमवार, श्री विजय लांडे, श्री प्रशांत सरपाते, सौ.महानंदा इळपाते, सुचिता बिरोले, अनिता खंडाईत, ज्योत्सना मेश्राम, प्रभाकर खंडाते यांनी सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा