आज भव्य रक्तदान व नेञ तपासणी शिबीर


*कांद्री (माईन) येथे आज भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबीर*



*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन (मनसर) येथे आयोजन*

*दिनांक - 11जानेवारी 2023*
वेळ - सकाळी 10 ते 3 वाजता पर्यंत

ग्रामहित शिक्षण मंडळाचे अध्यक्ष *स्व बळीरामजी दखने यांच्या 19 व्या पुण्यतिथीनिमित्त*
तसेच
1️⃣ *राष्ट्रीय युवा दिन*
2️⃣ *जिल्हा परिषदेचे पहिले उपाध्यक्ष स्व श्री बळीरामजी दखने यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त*
3️⃣ *माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार जयंतीनिमित्त*


भव्य रक्तदान, आरोग्य व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री आशीष जयस्वाल, पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री अभिजीत वंजारी, खाण प्रबंधक श्री मनोज मोंढे, सरपंच श्री परमानंद शेंडे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, मनसर, रामटेक, पारशिवनी व कन्हान येथील पत्रकार संघ, बिरसा मुंडा फुटबॉल क्लब कांद्री, लाईव्ह अर्थ संरक्षण सेवा ट्रस्ट नागपूर, अभिनव शेतकरी संघटना भिलेवाडा यांचे सहकार्य लाभले आहे.
या रक्तदान शिबीरात सहभागी व्हावे तसेच नेत्र तपासणी, शुगर, बिपी, हिमोग्लोबीन तपासणी शिबीराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे यांनी केले आहे.

*रक्तदान करणा-या व्यक्तींनी आपली नावे कळवावी. तसेच आरोग्य तपासणीचा नागरिकांनी बहुसंख्येने लाभ घेण्यासाठी सकाळी १० ते ३ वाजता पर्यंत उपस्थित राहावे.*

👆 *सोबत कार्यक्रम पत्रिका जोडली आहे*

👏👏👏👏👏👏👏👏
*मिलिंद वानखेडे*
प्राचार्य
प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन (मनसर)
9860214288

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा