*योग्य संधी शोधुन व्यक्तीमत्व फुलवा-पोलीस उपनिरीक्षक कांचन उईके यांचे मनोगत*


*योग्य संधी शोधून व्यक्तीमत्व फुलवा*
*पोलीस उपनिरीक्षक कांचन उईके यांचे मनोगत*
*प्रकाश हायस्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन येथे विद्यार्थी उत्सव साजरा*


मनसर - शालेय जिवनात संधीची विपुल दालने उपलब्ध असतात. या दालनात योग्य संधी शोधून त्यादृष्टीने वाटचाल करीत व्यक्तीमत्व फुलवावे, असे भावनिक आवाहन नक्षलग्रस्त भागातील पोलीस उपनिरीक्षक कांचन उईके यांनी केले.


प्रकाश हायस्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन व रेनबो काॅन्व्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता २१) विद्यार्थी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथील प्रा. ललिता चंद्राचे, नक्षलग्रस्त भागातील पोलिस उपनिरीक्षक कांचन उईके, सौ सोनाली कल्याण वाक्षे श्रीमती साधना चौकसे, माजी मुख्याध्यापक श्री उमेश कुमारजी चौकसे उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी प्रा. ललिता चंद्राचे, श्रीमती सोनाली कल्याण वाक्षे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात आलेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.


मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे यांनी शाळेत राबविलेल्या विविध उपक्रम आणि भविष्यातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आणखी कोणते उपक्रम राबवता येईल याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले.


यावेळी रेनबो कॉन्व्हेंट येथील छोट्या छोट्या मुलांनी फार सुंदर असे गीत सादर केले. वर्ग पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी विविध अशा गाण्यावर नृत्य सादर केले.


यामध्ये फुलमती छत्तीसगढी डान्स, घुंगरू तुट जायेंगा हरियाणी डान्स, रोली पोली हा नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर हरियाणी डान्स स्वामी स्वामी हा साउथ इंडियन डान्स नेव्हर गिव्ह ऑफ एज्युकेशन एज्युकेशनल थीम यावर सुद्धा एक विद्यार्थ्यांनी सादर केली त्याचबरोबर आराधना कठौते या 12 वीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील जे प्रसिद्ध नृत्य आहे लावणी यावरती चंद्र नावाची लावणी सादर केली हा डोंगरी मांडे हे गोणी नृत्य सुद्धा सादर करण्यात आलं. तेरे मिट्टी मे मिल जाऊंगा यावर सुद्धा विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट असे नृत्य सादर केलं तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात काय काय मिस्टेक होतात आणि त्या कशा पद्धतीचे असतात यावर गलतीसे मिस्टेक हे सुद्धा एक नृत्य सादर केलं आणि तसेच आजही आपल्या भारत देशामध्ये कशा पद्धतीची अंधश्रद्धा आहे हे समजून सांगण्यासाठी प्रकाश हायस्कूल कांद्रीमाईन यांच्या विद्यार्थ्यांनी एक अंधश्रद्धा भक्ती पर नाटक सादर केलं अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी वेगवेगळी नृत्य व नाटके सादर केली आणि या कार्यक्रमाला बरेच पालक आणि विद्यार्थी हे प्रामुख्याने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कामिनी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री अशोक नाटकर सर यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वी त्यासाठी श्री श्याम गासमवार श्री विजय लांडे , प्रशांत सरपाते , सुचिता बिरोले, सौ अनिता खंडाईत , कु. ज्योत्सना मेश्राम , बसंत ठकराले, मिलिंद वाघमारे , प्रभाकरजी खंडाते शाळेतील सर्व विद्यार्थी व पालक प्रामुख्याने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा