क्रिडा महोत्सवाचे समापन


*क्रिडा महोत्सवाचे समापन*


प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन येथे आज (ता ६) दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करुन क्रिडा महोत्सवाचे समापन करण्यात आले. क्रिडा महोत्सव समापन कार्यक्रमाला पुण्य नगरीचे पत्रकार श्री पंकज चौधरी, गरजा महाराष्ट्र 24चे पञकार श्री हर्षपाल मेश्राम, दैनिक भास्करचे पत्रकार श्री आकाश वानखेडे, जेष्ठ नागरिक श्री राष्ट्रपाल खोब्रागडे, मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे उपस्थित होते.


यावेळी पत्रकार दिनाच्या निमित्ताने कांद्री (मनसर) येथील स्थानिक पत्रकारांचा शाळेच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित पत्रकारांनी शाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुञसंचालन सौ कामिनी पाटील व आभार श्याम गासमवार होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक नाटकर, विजय लांडे, प्रशांत सरपाते, सौ.महानंदा इळपाते, सुचिता बिरोले, अनिता खंडाईत, ज्योत्सना मेश्राम, प्रभाकर खंडाते, मिलिंद वाघमारे प्रयत्नशील होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा