रक्तदान ही चळवळ म्हणून स्विकारा...मुख्याध्यापक वानखेडे


*रक्तदान ही चळवळ म्हणून स्विकारा - मुख्याध्यापक वानखेडे*


रामटेक - रक्तदानामुळे गरजवंताना वेळेवर रक्त उपलब्ध होते. त्यामुळे रक्तदान ही चळवळ म्हणून उभी करावी, असे आवाहन मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे यांनी केले.
प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन (मनसर) येथे आयोजित आज (ता ११) रक्तदान शिबिरात बोलत होते.


ग्रामहित शिक्षण मंडळाचे अध्यक्ष स्व बळीरामजी दखने यांच्या १९ व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच राष्ट्रीय युवा दिन, जिल्हा परिषदेचे पहिले उपाध्यक्ष स्व श्री बळीरामजी दखने यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त तसेच माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार जयंतीनिमित्त आज (ता ११)
भव्य रक्तदान, आरोग्य व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खाण प्रबंधक श्री मनोज मोंढे, कार्मिक अधिकारी श्री ललित अरसडे, माजी मुख्याध्यापक श्री उमेशकुमार चौकसे, श्री लोहकरे, श्री प्रविण गजभिये, मनसर ग्रामपंचायत सदस्य श्री बैजू खैरे, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभागाचे विभागीय सचिव श्री खिमेश बढिये, ग्रामीण जिल्हा संघटक श्री गणेश खोब्रागडे, श्री प्रविण इटनकर, टोल मॅनेजर श्री अतुल आदमने, डॉ हनवंत, सचिन डोले, श्री राठोड, मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे होते. महात्मे नेञ तपासणी कडून 80 नागरिकांची नेञ तपासणी करण्यात आली तर आरोग्य तपासणी कडून 30 नागरिकांची तपासणी झाली व नितेश बागडे, निलेश टोगंसे, पुरुषोत्तम भोगे, प्रभात कठौते, नितेश रौतेल, मुकेश सोमकुवर महेश रंदीये, नरेश चुरबिया, क्रिष्णा उपाध्याय, पंकज हांडे, दुर्गेश राऊत, उद्देश कठौते, विशाल रौतेल सह 28 रक्तदातानी रक्त दिले त्याच बरोबर गरजवंत नागरिकांना बॅलकेट वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सुञसंचालन विजय लांडे तर आभार सौ कामिनी पाटील यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री श्याम गासमवार, श्री प्रशांत सरपाते, श्री अशोक नाटकर, सौ.सुचिता बिरोले ,सौ.महानंदा इळपाते, सौ.अनिता खंडाईत, कु.ज्योत्सना मेश्राम, बसंत ठकराले, प्रभाकर खंडाते, मिलिंद वाघमारे प्रयत्नशील होते
या कार्यक्रमाला विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, मनसर, रामटेक, पारशिवनी व कन्हान येथील पत्रकार संघ, बिरसा मुंडा फुटबॉल क्लब कांद्री, लाईव्ह अर्थ संरक्षण सेवा ट्रस्ट नागपूर, अभिनव शेतकरी संघटना भिलेवाडा यांचे सहकार्य लाभले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा