नागपूर शिक्षक मतदारसंघात श्री सुधाकर अडबाले सरांना पाठींबा


*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ) नागपूरचा*
*नागपूर शिक्षक मतदारसंघात*
*श्री सुधाकर अडबाले सरांना पाठिंबा




नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघाची ३० जानेवारी २०२२ रोजी निवडणूक होऊ घातली आहे. या *शिक्षक मतदार संघात विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ) तर्फे *श्री सुधाकर अडबाले सरांना पाठिंबा दिला असल्याचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी सांगितले.*

आज (ता ५) संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे सरांनी शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार श्री सुधाकर अडबाले सरांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत विधानसभेत सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना व आश्वासित प्रगती योजना (१०,२०,३०) लागू करण्यासाठी आवाज बुलंद करण्याचे आश्वासन श्री अडबाले सरांनी दिले. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हितार्थ शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी श्री अडबाले सरांना पाठिंब्याचे पत्र देऊन निवडणुकीत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी माजी शिक्षक आमदार श्री व्ही यू डायगव्हाणे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री श्रावण बरडे, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे नागपूर विभागीय सचिव श्री खिमेश बढिये, नागपूर जिल्हा ग्रामीण संघटक श्री गणेश खोब्रागडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी श्री रमेश काकडे उपस्थित होते.

*आगामी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत श्री सुधाकर अडबाले सरांना पहिल्या पसंतीचे मतदान करुन विजयी करण्याचे आवाहन शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे सरांनी केले आहे.*
👏👏👏👏👏👏👏👏
*खिमेश बढिये*
नागपूर विभागीय सचिव
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा