*शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री मधुकररावजी धरममाळी यांच्या शब्दाखातर निवडणुकीतून माघार*
*मतदारांच्या हिताला व प्रेमाला सर्वोच्च प्राधान्य*
वरिल लिंक वर टच करा
शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक घोषित झाली अन मतदारांच्या हितासाठी, अधिकारासाठी निवडणूक रिंगणात उतरलो.
हि संस्था खाजगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हितार्थ मा श्री मधुकररावजी धरममाळी यांनी उभी केली आहे. *मात्र सध्याच्या संस्थेच्या राजकारणात संस्थापक अध्यक्षांनाच डावलण्यात येत आहे. हे अनाकलनीय असल्याने माझ्या मनात मतदारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.*
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री मधुकररावजी धरममाळी यांनी माझ्या शेवटच्या उरलेल्या काळात निवडणूक लढू नये अशी विनंती केली. व निवडणूक झाल्यास मतदारांच्या पैशाचा चुराडा होईल असे मला वाटले. *काकाजी पितृतुल्य व्यक्तीमत्व असल्याने त्यांच्या शब्दाखातर व त्यांच्या शेवटच्या काळात कुठेही मन दुखावू नये यासाठी निवडणुकीतून मी व श्री खिमेश बढिये माघार घेत आहे.*
*निवडणूक लढून संचालक बनणे हि कधीच माझी मनीषा राहिली नाही. तर या माध्यमातून शिक्षक शिक्षकेतर मतदार सभासदांचे हित कसे साधता येईल यासाठी हे पाऊल उचलले होते.*
संस्थेच्या २५ वर्षांच्या कालावधीत बिनविरोध निवडणूक झाली याचे सर्व श्रेय माझ्या मतदारांना व त्यांच्या प्रेमाला जाते. निवडणुकीच्या माध्यमातून सभासदांमध्ये होणारे हेवेदावे टाळले. बिनविरोध निवडीमुळे संस्थेची २५ लाख रुपयांची भरघोस बचत झाली असल्याने सभासदांना १% लाभांश अधिक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पैसा बचत झाल्यामुळे ठेवीवरील व्याजदरात वाढ शक्य आहे याकडे पतसंस्थेने लक्ष केंद्रित करावे. भविष्यात शिक्षक व शिक्षकेतर सभासदांना २५ लाख रुपयांची कर्जे मर्यादा वाढविण्याकरीता संस्थेने प्रयत्न करावेत एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो.
निवडणुकीचा फाॅर्म परत घेतांना निवडणूक निर्णय अधिकारी श्री पंकज वानखेडे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री मधुकररावजी धरममाळी, पतसंस्थेचे माजी सहसचिव श्री संजय धरममाळी, उमेदवार श्री खिमेश बढिये व मी (मिलिंद वानखेडे) उपस्थित होते.
*निवडणूकीचा फाॅर्म भरल्यापासून आजतागायत शिक्षक शिक्षकेतर मतदारांनी दाखविलेले प्रेम अनाकलनीय आहे. तुमच्या प्रेमाबद्दल आपले मनापासून धन्यवाद. तुमच्यासाठी मी संघटनेच्या माध्यमातून शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिल.*
👏👏👏👏👏👏👏👏👏
आपला स्नेही
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*संस्थापक अध्यक्ष* - विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर विभाग नागपूर)
*माजी सदस्य* - महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंडळ नागपूर विभाग
9860214288, 9423640394
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा