*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभागातर्फे शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले यांचा सत्कार .


*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभागातर्फे शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले यांचा सत्कार*


नागपूर - नवनियुक्त शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले यांचा विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभागातर्फे (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ) शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली सत्कार करण्यात आला.


रविभवन नागपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात शिक्षकांच्या प्रश्नावर व हक्कासाठी प्रशासनासोबत संघर्ष करण्याचे अभिवचन शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले सरांनी दिले. संघटनेच्या वतीने शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण विभागातर्फे वेतन पथक अधिक्षक (प्राथमिक) श्री वाघमारे, वेतन पथक अधिक्षक (माध्यमिक ग्रामीण) श्री सोनटक्के, वेतन पथक अधिक्षक (माध्यमिक शहर) श्री जिभकाटे, प्राथमिक विभागाच्या अधिक्षक सौ भारती गेडाम, श्री योगेश राठोड यांनी सुध्दा सत्कार केला.
यावेळी नागपूर विभागीय सचिव श्री खिमेश बढिये, माध्यमिक विभाग संघटक श्री शेषराव खार्डे, मुख्याध्यापक संघाचे विभागीय अध्यक्ष श्री प्रकाश भोयर, प्राथमिक विभाग ग्रामीण जिल्हा संघटक श्री गणेश खोब्रागडे, नगरपरिषद आघाडी जिल्हा संघटिका सौ रूपाली मालोदे (डोंगरे), काॅग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष श्री संजय धरममाळी, दिव्यांग आघाडी जिल्हा संघटक श्री दिनेश गेटमे, शहर संघटक श्री समिर काळे, श्री अजय नहातकर, श्री अविनाश बडे, श्री विठ्ठल जुनघरे, श्री अमोल डोंगे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा