शुभेच्छा समारंभ......!
आज दि.15/02/2023.इ.10,12 वी चा निरोप समारंभ संपन्न झाला.इ.10 वी चा स्कूल डे आणि निरोप समारंभ एकत्र आयोजित करण्यात आला.
नवरी वाटं लावावी,तशी गत आम्हा शिक्षकांची दर वर्षी होते.
हाता बोटानं...घडवलेले विद्यार्थी नव्या आयुष्याच्या वाटेवर निघालेली असतात.
ही विद्यार्थ्यांच्या जीवाची घालमेल आणि शिक्षकांच्या मनाची उलघाल.....या सारख्याच भावना.
विद्यार्थीनींना निरोप देणे, शुभेच्छा समारंभ खरोखरच.... आनंद...दु:ख, सोहळा...!
मनाला स्पर्श करून जाणारी भाषणे,मनोगतं.
इ.12 वी च्या विद्यार्थ्यांनीने कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितेतील काव्यपंक्ती उच्चारल्या खरोखरच अंग शहारलं....
शिक्षकांनी आम्हाला भाकरीचा चंद्र शोधण्याचं बळ दिलं.
काही दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दिवस दु:खात गेले......!
हिशोब करतो आहे किती उन्हाळे डोईवर उरले.......!
भाकरीचा चंद्र शोधण्यातचं जिदंगी बरबाद झाली....!!
झटकन... माझ्या डोळ्यांसमोरून स्मृती शेष कविवर्य नारायण सुर्वे आणि मास्तरांची सावली कृष्णाबाई यांच आयुष्य आठवलं.....आणि डोळे भरुन गेले.त्या दिव्य दाम्पत्याच्या आठवणीने.
निर्जीव भिंतीनाही आज हुंदका फुटावा अशा या सुकुमार मुलींच्या..... हळूवार संवेदना...!
गणवेशाची ओढ, शाळेतील प्रत्येक ठिकाण.... यांच्या आयुष्यातील चीरस्मरणीय.......!
बॅंच वरील हक्क दाखवणाऱ्या चिमण्या......!
आज आकाशाकडे झेपावताना पाहिल्या.पण घरट्याची ओढ कायम मनात धरुन.
आमच्या लेकींना... 🦅 गरुडझेप घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा....... तुमच्या प्रत्येक वळणावर आम्ही सोबत आहोत....!
घे उंच भरारी.......!!!
*मिलिंद वानखेडे*
*प्राचार्य*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा