*08 एप्रिल दिनविशेष 2023 !*
🛟 *शनिवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1921 - आचार्य विनोबा भावे यांनी पवनार आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली*
👉 *2005 - पाॅप जाॅन पाॅल याच्या अंत्ययाञेत अंदाजे 40 लाख लोक सहभागी झाले*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1928 - नामवंत मराठी साहित्यीक स्वामीकार रणजित देसाई यांचा जन्म*
👉 *1938 - संयुक्त राष्ट्राचे 7 वे प्रधान सचिव कोफी अन्नान यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1974 - मराठी रंगभूमीवर कलाकार नानासाहेब फाटक यांचे निधन*
👉 *2015 - भारतीय पञकार आणि लेखक जयकानधन यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔵 बोधकथा*🔵
*❃ खरे अनुयायी ❃*
••◆•◆•◆★◆•◆•◆••
एकदा तथागत गौतम बुद्ध एका ठिकाणी धम्म देसना देण्यासाठी गेले.समोर हजारो लोक बसलेले होते,तथागत काहीच न बोलता काही वेळ बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले. दुसऱ्या दिवशी परत धम्म देसना देण्यासाठी आले समोर पाचशे लोक बसलेले होते. परत तथागत काही वेळ काहीच न बोलता बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले.
परत तिसऱ्या दिवशी जेंव्हा ते धम्म देसना देण्या साठी आले तेंव्हा फक्त वीस लोक समोर बसलेले होते,आणि त्या दिवशी तथागतांनी धम्म देसना दिली.
जेंव्हा त्यांच्या शिष्याने त्यांना विचारले की पहिले दोन दिवस जास्त लोक असतांना तुम्ही धम्म देसना न देता तिसऱ्या दिवशी फक्त
वीस लोक असतांना का दिली?
तथागतांनी खुप छान उत्तर दिले,"ज्या लोकांना खरच धम्म ऐकायचा होता ते तिसऱ्या दिवसा पर्यन्त आपल्या निश्चयावर ठाम राहिले व तिसऱ्या दिवशी उपस्थित राहिले.परन्तु जे मला फक्त बघण्या साठी आले होते व जे आपल्या निश्चयावर ठाम नव्हते ते अपोआपच कमी होत गेले.मला फक्त धम्म ऐकून घेणारे नकोत तर आचरणात आनणारे अनुयायी हवेत.म्हणून मी तिसऱ्या दिवशी योग्य अशाच अनुयायांना धम्म दिला."
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
जो पर्यन्त चांगल्या विचारांशी एकनिष्ठ राहण्यावर आपण ठाम नसतो तो पर्यन्त आपल्याला त्यापासून मिळणारा लाभ मिळत नाही.किती आहेत यापेक्षा कसे आहेत हे महत्वाचे...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सामान्य ज्ञान*
*✿ वैज्ञानिक प्रश्न ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑
▶ केमोथेरपी व रेडिओथेरपी हे उपचार कर्करोगावरील आजाराकरिता घेतले जातात.
▶ मेंदूतील टय़ुमर ओळखण्यासाठी आर्सेनिक व आयोडिनचा वापर करतात.
▶ मानवी शरीरात गुणसूत्रांच्या २३ जोडय़ा असतात.
▶ शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’ हा घटक करतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
08. *❒ बंकिमचंद्र चटोपाध्याय ❒*
┄─┅•●●★◆★●●•┅─┄
जन्म नाव :~ बंकिमचंद्र यादवचंद्र
चटोपाध्याय
जन्म :~ २६ जून १८३८
*मृत्यू :~ ८ एप्रिल १८९४*
★बंकिमचंद्र चटोपाध्याय★
हे बंगाली कवी, कादंबरीकार, पत्रकार होते. भविष्यात भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या वंदे मातरम् या गीताचे रचनाकार होते. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी १८८२ साली प्रकाशित झाली आणि लवकरच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले.
◆वन्दे मातरम्◆
वन्दे मातरम् या गीताच्या पहिल्या कडव्याला भारतीय संविधानानुसार राष्ट्रगीत हा दर्जा मिळालेला आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी इ.स. १८८२ मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये हे गीत लिहिले होते आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणागीत बनले.
भारताचा स्वातंत्र्य लढा १८५७ च्या सशस्त्र क्रांतीपासून सुरू झाला. हा लढा यशस्वी झाला नसला, तरी याने पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल पुढे अखंडितपणे निरनिराळ्या रूपांत प्रकट होत राहिली. बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब हे सशस्त्र क्रांतीचे केंद्र बनले. सुखदेव, भगतसिग, चंद्रशेखर आजाद, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सारख्या झपाटलेल्या क्रांतिवीरांनी इंग्रजांविरुद्ध ही क्रांतीची मशाल तेवत ठेवली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा