॥ *10 एप्रिल दिनविशेष 2023* ॥
🔥 *सोमवार* 🔥
🌏🌏 *घडामोडी* 🌏🌏
💧 *1955 - योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलियो लसिची सर्वप्रथम यशस्वी जाहीर केली*
💧 *1970 - पाॅल मेकार्टनीनै व्यक्तीगत आणि व्यावसायिक कारणास्तव द बीटल्स सोडण्याचे जाहीर केले*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌅 *जन्म*
💧 *1931 - भारतीय शास्त्रीय गायीका किशोरि आमोणकर याचा जन्म*
💧 *1972 - स्काईप चे सहसंस्थापक प्रेसिड कासासुलु याचा जन्म*
🌅 *मृत्यू*
💧 *1965 - स्वतंञ भारताचे पहिले कृषीमंञी डाॅ.पंजाबराव देशमुख यांचे निधन*
💧 *2000 - संस्कृत पंडित डाॅ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचे निधन*
🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔵 बोधकथा
*❃ साखर आणि माती ❃*
एक दिवस बादशहा अकबर यांच्या दरबार भरलेला होता, तेव्हा एक दरबारी हातात का घेऊन आला.
बादशहाने विचारले या बरणीत काय आहे'? दरबारी बोलला 'यात माती आणि साखरेचे मिश्रण आहे'
'ते कशासाठी?' अकबर बादशहाने पुन्हा विचारले.
'माफी असावी, महाराज' दरबारी बोला. 'आम्ही बिरबलच्या बुध्दिमत्तेची परीक्षा घेऊ इच्छितो, आमची अशी इच्छा आहे की, त्यांनी मातीतून साखरेचा दाणानदाणा वेगळा करावा.'
बादशहाने बिरबलकडे बघितले आणि स्मितहास्य करीत बोलले ' हे बघ, बिरबल तुझ्या समोर रोज नवीन आव्हान असतात, आम्हाला असे वाटते की तू पाणी न वापरता मातीतून साखर वेगळी करावी.'
'हे तर खुपच सोपे आहे, महाराज. ' बिरबल बोलला 'हे तर लहान मुलांच्या खेळण्यासारखे आहे.'
असे म्हणत बिरबलने बरणी उचलली आणि तो दरबाराच्या बाहेर निघाला आणि दरबारी देखील त्याच्या मागे गेले.
बिरबल बागेत गेला आणि त्याने एका आंब्याच्या झाडाखाली बरणीतील साखर व मातीचे मिश्रण पसरवले.
'हे तुम्ही काय केले?' एका दरबाऱ्याने विचारले. 'याचे उत्तर तुम्हाला उदया मिळेल' बिरबल बोलला.
दुसऱ्या दिवशी ते सर्वजण बागेतील त्या आंब्याच्या झाडाजवळ पोचले, तिथे फक्त माती पडलेली होती. साखरेचे सर्व दाणे मुंग्या गोळा करून आपआपल्या वारूळात गेल्या होत्या, काही मुंग्या अजुनही साखरेचे दाणे घेऊन जाताना दिसत होत्या. 'परंतु सगळी साखर कुठे बरे गेली?' दरबाऱ्याने विचारले.
'मातीपासुन वेगळी झाली' बिरबल बोलला. सर्वजण हसायला लागले.
बादशहाने सर्व दरबाऱ्यांना सांगीतले, 'जर तुम्हाला साखर पाहीजे असेल, तर मुंग्याच्या वारूळात जाऊन बघा'. सर्वजण जोरात हसायला लागले.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
*बुध्दिमत्तेची कशीही परीक्षा घ्या, ते यशस्वी होईलच..!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔷प्रेरणादायी विचार
10. *दिवा मातीचा आहे की सोन्याचा*
*हे महत्त्वाचं नसून*
*तो अंधारात प्रकाश किती देतो*
*हे महत्त्वाचं आहे*
*त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की*
*श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून*
*तो तुमच्या संकटात किती*
*खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो*
*हे महत्त्वाचं आहे..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🔴सामान्य ज्ञान🔴*
*✿ वैज्ञानिक प्रश्न ✿*
▶ रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.
▶ नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.
▶ सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.
▶ हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते.
▶ पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
10. *💠पंजाबराव देशमुख💠*
┄─┅━━●✹●━━┅─┄
स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री, कृषीरत्न, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख..
डॉ. पंजाबराव देशमुख
( भाऊसाहेब देशमुख)
🔹जन्म :~ २७ डिसेंबर १८९८
पापळ, अमरावती
🔸मृत्यू :~ १० एप्रिल १९६५, दिल्ली
🔹प्रशिक्षणसंस्था :~
श्री शिवाजी शिक्षण संस्था
*💎पंजाबराव देशमुख*
यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सहभागी झाले. इ.स. १९३६ च्या निवडणुकीच्या नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. स्वतंत्र भारतात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये , अभियांत्रिकी पदवी , तसेच पदविका तंत्रनिकेतन , कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय असे अनेक महाविद्यालये सुरू करून आज शिक्षण क्षेत्रात फार मोठं योगदान देत आहे.
*◆संक्षिप्त जीवन◆*
🔻डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख) मूळ आडनाव - कदम
🔸१९२७- शेतकरी संघाच्या प्रचारासाठी 'महाराष्ट्र केसरी' हे वर्तमानपत्र चालविले.
🔹वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास' या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.
🔻१९३३ - शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारीत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.
🔸१९२६ - मुष्टिफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.
🔹१९२७ - शेतकरी संघाची स्थापना.
🔻१९३२ - श्री. ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना .
🔸ग्रामोद्धार मंडळाची स्थापना.
🔹१९५० - लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रुपांतर करण्यात आले.
🔻१९५५ - भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने 'राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.
🔸१९५६ - अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.
🔹'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा'.
🔻१८ ऑगस्ट १९२८ - अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .
🔸१९३० - प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री
🔹लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.
🔻१९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री. भारताचे पहिले कृषीमंत्री.
🔸देवस्थानची संपत्ती सरकाराने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देश्याने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.
🔹प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.
🔻१९६० - दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
------------------‐------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा